अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तेच.. कामगार मोहोर वाड्याबाहेर नेत होते तेव्हा का नाही मूळपुरुषाने हस्तक्षेप केला? अक्षरा वाड्यातच / कामगार जिथे काम करत होते तिथे मोहोर का शोधत नाहीये? उद्याच्या भागात कोण मरणार रेमो की निरंजन? चौथी मातृका कधी येणार? बॉस कोण आहे? तलगिरी त्या मोहोरा बॉस कडे का सुपूर्त करत नाहीये? अण्णाचा नक्की काय प्लॅन आहे? समिहाला त्यात काय रोल / फायदा?

तलगेरीच बॉस असावा, आता संपवणार असतील तर असंच दाखवतील, तोच बॉस वाटतोय.

एकतर मेन नायिका बरोबर नाही घेतली, त्यात काहीच जमलं नाही त्यांना.

अग्निहोत्र २ मध्ये खूप personal interest आहे कारण माझा भाचा प्रॉडक्शन मॅनेजर आहे. त्यामुळे कमी टीआरपी मुळे सिरियल बंद होत आहे कळल्यावर खूप दुःख झाले. Hotstarवर जास्त व्ह्यूज आणि टीव्ही वर कमी असे झाले. असो.

रश्मी अनपट लीड रोल असलेली कलर्स मराठीची एक सिरीयल जबरदस्त चालल्याने तिला जाम डीमांड होता पण नंतर झी युवावरची एक फार चालली नाही. स्टार प्रवाहची ती लिड असलेली दुसरी सिरीयल जबरदस्त आपटली, पहीली कुलस्वामिनी. रश्मी मला कधीच आवडली नाही, कलर्स मराठीवरची पण मी फार बघितली नव्हती हिच्यामुळे. तिचे केस आणि डोळे आवडतात पण अभिनयात माझ्या तरी जाम डोक्यात जाते, अर्थात माझं पर्सनल मत. कलर्स वरच्या सिरीयल मधे हिच्यापेक्षा व्हिलन झालेलीने उत्तम काम केलेलं. एक साडेआठची सिरीयल बघायचे तेव्हा, त्याआधी ही सिरीयल दोन मिनिटं बघितली जायची.

अग्निहोत्र टी आर पी न मिळायला अजूनही काही कारणं आहेत पण लीड निवड चुकली माझ्या मते. अग्निहोत्र नसती तर हिला बघूनच मी सिरीयलवर काट मारली असती. अग्निहोत्रला आमच्याकडून टीव्हीवर टी आर पी मिळाला, रोज दहाला लावतो, मी आणि नवरा बघतो, येता जाता का होईना पण बघतो.

पल्लवी पाटीलला हॅटस ऑफ, जबरदस्त अभिनय. रेमो गेल्यानंतर तर दोन दिवस जीव ओतलाय तिने. बहुतेक सर्वांनी अभिनय छान केला, इन्स्पेक्टर मराठे यांनीही मस्त केला. शरद पोंक्षे अप्रतिम.

रश्मी फक्त बाबांबद्दल इमोशनल होते तेव्हा मनाला भिडला अभिनय एकदोनदा, otherwise अजिबात नाही, फार एकसुरी कंटाळवाणी.

आम्ही सुद्धा न चुकता बघतो. आता संपवायची म्हणून जो स्पीड पकडला आहे तो सुरुवाती पासून ठेवला असता तर जास्त मजा आली असती. उगीच रेंगाळत सरकवली पुढे.

मी हे आधीच भाकीत केलं होतं. स्टार प्रवाहचे शोज हल्ली फालतूच असतात. त्यात सतीश राजवाडे. एमपीएमची तिसऱ्या भागात जी माती केली त्यावरूनच कळलं की क्रिएटिव्हली सतीश आता पूर्वीचे राहिलेले नाहीत.
ये तो होना ही था!

मीही बघते रोज. इतर मालिकांच्या जाहिराती बघता (विबासं नाही तर सासूसून भांडण) त्या मानाने मला चांगली वाटली.

अक्षराचा अभिनय मलाही नाही आवडत. रंगी/संगीताही जरा ओव्हर वाटते. समीहा बेस्ट.

त्या अक्षराचं काम करणाऱ्या मुलीचा काय दोष? कथाच इतकी अ आणि अ आहे तर ती तरी काय करणार? शिवाय दिग्दर्शकाला बहुतेक फक्त सस्पेन्स थ्रिलर करता येत असावेत. अग्निहोत्र ड्रामा न होता सस्पेन्स थ्रिलर तो ही मुंगीच्या गतीने चालणारा असा शो झाल्यामुळे ही वेळ आली आहे. सिगारेटचे धूर सोडणारा पाठमोरा बॉस, उगीच खूनशी हावभाव करणारे तलगिरी आणि काहीच आगापिछा नसलेला कुठेही मधूनच प्रकट होणारा साधूबाबा ही असली "पात्रं" आणून कथेची पार वाट लावली (जर काही कथा असलीच तर). संवाद तर इतके गंडलेले आहेत. मालिका बंद पडण्याचा दोष कथा, संवाद आणि दिग्दर्शन यांचा आहे. कलाकार (अक्षरा सह) सगळे चांगलेच काम करत आहेत.
खरंतर जरा एकदा नुसतीच warning देऊन मालिका सुधारू शकते का ते बघायला हवं होतं, एकदम बंद करण्यापेक्षा.

जिज्ञासा + १०००

रश्मी अनपटचे काम आधी कधिही बघितले नव्हते. इथे तरी बरी वाटली मला. मुळात कथेने आणि दिग्दर्शकानेच माती खाल्ली आहे.

मला वाटत,वेळ हा ही फँक्टर असावा.8ते 9.30 च्या दरम्यान ठेवली असती तर निश्चित फरक पडला असता.निदान सहा महिने तरी नक्की चालली असती.
रश्मी बद्दल बोलायच तर मलाही ती फारशी आवडत नाही,पण तिला दुसरा रोल देऊन मेन लिड मध्ये सिनियर चेहरा घेतला असता तरी चालल असत.
तुपारे मधली ईशाची मैत्रिण रुपाली(नाव नाही आठवत तिच) ती चालली असती ती अँक्टिंग छान करते.तुपारे मध्ये ईशापेक्षा मला तीच आवडली होती.गायत्री दातार असती तर सॉलिड टीआरपी मिळाला असता.अभिनय कसा केला असता माहित नाही,कदाचित थोडी सुधारणा झाली असावी.
अर्थात रश्मी गादापेक्षा उजवीच आहे.पण आजकाल टीआरपी महत्वाचा आहे ना.

लीड समिहा किंवा पल्लवी चालली असती.

नक्कीच एकटी अक्षरा कारणीभूत नाहीच, मी पण ते लिहीलं, अजुनही कारणं आहेत. जि ने लिहीलेलं योग्य आहे. पण रश्मीला बघून मला वाटलं पहील्या एपिसोडला, ही सिरीयल फार चालणार नाही, हिची कुलस्वामिनी होणार. तरी मी बाकीच्यांसाठी बघत राहीले. असो मला आवडत नाही रश्मी आणि तिला लीडमधे मला बघवलं नाही. माझ्या आवडत्या समीरबरोबर तर अजिबात नाही Lol

मी त्यांच्या फेसबुकवर पण जाऊन लिहीते, अक्षराचा अभिनय आवडत नाही, कधी आवडला तेही लिहिलं. सिरीयल भरकटत नेताय, लवस्टोरीज, खुनाखुनी बघण्यापेक्षा, सप्तमातृका एकत्र येऊन रहस्य कसे उलगडतात हे बघण्यात इंटरेस्ट आहे, हेही कधीच लिहिलं. आहेत त्या तीन मातृका एकत्र येत नाहीयेत आणि सात कशा आणणार, अर्धवट कथानक ठेऊन मालिका गुंडाळू नका. तुम्ही उगाच इतर गोष्टीत वेळ घालवला असंहि लिहिलं.

माझ्या एकटीचे अग्निहोत्रवर तिथे जास्त लिखाण होतं. तरी फार नव्हतं एरवी लिहिते तेवढं. आता बंद करणार असं समजल्यावर बरेच जण आले, नका बंद करू, का करताय करत.

कुठेतरी वाचलं शेवटचा भाग twist असणार आहे, मग अर्धवट ठेऊन सिझन 3 चा विचार आहे का, जाउदे मी तरी बघणार नाही आता. तसंहि bb सुरु झाल्यावर बघणार नव्हते हि सुद्धा.

मलाही कालचा भाग पाहून मी सच वाटल की सिझन 3 साठी अर्धवट ठेवतील.पण पुन्हा आता ही चूक करु नये.आता कायमचाच निरोप घ्यावा.

अग्निहोत्राची स्वत:ची ताकद काही दाखवत नाहीत, एक खोटारडा माणूस सतत अग्निहोत्रासमोर खोटं बोलतो, टोकाची फसवणूक करतो, अग्निहोत्र उधळून त्याच्यावर लाकूड पण नाही फेकत किंवा तो सुहास पळशीकर त्याला ताडत नाही म्हणजे मारत नाही. हीच आहे का अग्निहोत्राची शक्ती Sad .

शेवट करताना पण इतकी टिपिकल झालीय सिरीयल, इंटरेस्ट संपलाय. आहेत त्या तिघी एकत्र कधीच येत नाहीत. समीहा गेली की संगीताला आणतात, संगीता गेली की समीहाला.

सात जणी येणार होत्या ना? पहिले काही भाग पाहिले होते. अ‍ॅनिमेशन राक्षस वगैरे पाहिल्यावर बघायचं सोडून दिलं.

सात वगैरे आता आणतील असं वाटत नाही, या आहेत त्या तिघी अजून एकत्र नाहीत. त्या तिघींना इतर मातृकांची शक्ती देतील शेवटच्या एपिसोडमधे आणि संपवतील.

त्यापेक्षा आधीचे म्हणजे पहिल्या सिझन चे सगळे एपिसोड टाका ना हॉटस्टारवर ! लोकं दुवा देतील, आणि त्या निमित्ताने पुढचा सिझन पण बघतील ( हाय होपस्)

चॅनलकडून कुठलीही अधिकृत घोषणा नाही. .......हे चँनेल सिरियल अर्धवट टाकून नवीन सिरियल चालू करते.आताच संपलेली साता जल्माच्या गाठी पण अशीच अरधवट संपवली संपवली अशा प्रतिक्रिया त्यांच्या इंन्स्टागरमवर आल्या होत्या.
पण ही मालिका संपत आहे अस वाटतच नाहीये.त्यामुळे कदाचित लवकरच भेटू अशी पाटी देऊन सिझन 3आणतील.

शेवटची आशा म्हणजे आयत्या वेळी वेळ बदलतील. >>> एव्हाना डिक्लेअर व्हायला हवी होती नवीन वेळ, विठु माऊलीची वेळ बदलली तेव्हा, एक आठवडा आधी आलेली फेसबुकवर बदलेली वेळ. वेळ अग्निहोत्रची बदलली तर रात्री साडेदहा किंवा अकरा करतील, किंवा eve सहा.

मालिका संपणार असं का म्हणताहेत सगळे? कुठे वाचलं? >>> वरती एबीपी माझाची लिंक आहे बघ डी विनिता यांनी दिलीय. कोणीतरी त्यांच्या fb पेजवर पण टाकली आहे, कुठली तरी लिंक. आठवत नाही आता. लोकं विचारत आहेत का संपवताय, वेळ बदलणार आहात का, कोणाला काहीही रिप्लाय देत नाहीयेत.

हे लोक मालिका अर्धवट का संपवतात कळत नाही.
श्रीगुरुदेवदत्त ही मालिका खूप लोकप्रिय होती. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकही आवडीने बघायचे. तरी बंद केली. लोकांनी खूप नाराजी व्यक्त केली. चांगल्या मालिका मध्येच संपवतात आणि टुकार कायम चालू ठेवतात.

hotstar वर आजचा एपिसोड बघितला
अंधश्रद्धेस खतपाणी घालत नाही अशा स्वरुपाचे disclaimer नव्यानेच लावले होते.
अंधश्रद्धेस खतपाणी घालतात - असे काही घडले असायची शक्यता नाकारता येत नाही.

श्रीगुरुदेवदत्त ही मालिका खूप लोकप्रिय होती. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकही आवडीने बघायचे. तरी बंद केली>>> ही शिरेल आमच्या घरी बघितली जायची, पण बंद केले हेच बरे. श्री गुरूंविषयी जे दाखवत होते ते पटत नव्हते, बरे झाले बंद केली शिरेल

Pages