मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ- पुस्तकिडा

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2020 - 02:04

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!

या खेळांमधला दुसरा खेळ सुरू करूया.
मायबोलीवर अनेक वाचनप्रेमी सदस्य आहेत. अशा वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मायबोलीकरांसाठी खास आजचा खेळ! खेळ तसा सोपा आहे. आपण तो पूर्वी खेळलोही आहोत.
मराठी भाषेतील कुठल्याही पुस्तकाबद्दल तुम्ही कोडं घालायचं. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखून दाखवेल, त्याने/ तिने पुढचं कोडं घालायचं.

उदा.
'दक्षिणेकडच्या एका जंगलात वर्षभर राहून अस्सल अनुभव घेऊन लिहिलेलं पुस्तक'

येवू द्या उत्तरं पटापट!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेखिकेने आयुष्याचा काही काळ या ठिकाणी एकटीने राहून व्यतीत केला आणि त्या अनुभवांवर हे पुस्तक लिहिले.
महाराष्ट्रातील जागा.

बराच वेळ झाला असल्याने मी घालतो .
........................................................................
दोन लघुकादंबऱ्या असलेले पुस्तक.
त्यातील एक दुर्घटनेवर आधारित तर दुसरी एका प्राण्याशी संबंधित

नाही.
माझ्या पुस्तकातील प्राणी ४ पायांचा आहे !
आणि
दुर्घटना उत्तर भारतातील.

नाय.
लेखक आडनाव दोन अक्षरी.

... मी आता निघतो. चालू ठेवा खेळ.

दोन लघुकादंबऱ्या असलेले पुस्तक.
त्यातील एक दुर्घटनेवर आधारित तर दुसरी एका प्राण्याशी संबंधित<<<<<<
अकरा कोटी गॅलन पाणी / स्टडफार्म - अनिल बर्वे.

दुर्घटनेवर आधारित पुस्तक म्हटल्यावर पहिले हेच आठवले.

कोल्हाट्याचे पोर - किशोर शांताबाई काळे

या कादंबरीतील एक पात्र लेखकाने एका हंगेरीयन पुस्तकातील पात्रावरून बेतले होते. या पात्राची कामेच्छा विचित्र होती व त्यावरून टीकाही झाली.

Happy प्रस्तावना अनेक वेळा वाचली आहे.

पुढचं कोडं
या पुस्तकाच्या एकशब्दी नावापुढे जे तीनशब्दी extension आहे, त्यात उल्लेख केलेल्या व्यक्तींंमध्ये जवळपास दोन हजार वर्षांचं अंतर आहे.

चाणक्य नाही.
क्ल्यू- या पुस्तकातल्या विषयासंबंधी एका महत्त्वाच्या घटनेला दोन वर्षांपूर्वी चारशे वर्षे पूर्ण झाली.

Pages