तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक खरवस.

आपण कुकर मध्ये भात आणि डाळ शिजवायला वेगवेगळी भांडी एकाच वेळी ठेवतो, तशी कुकर-स्पेशल भांडी मिळतात, भात डायरेक्ट कुकर मध्ये करायची गरज नसते - हे पाहून माझ्या पंजाबी मित्रांना कल्चरल शॉक बसला. आणि त्या लोकांना हे माहीत नाही, त्यांच्या घरी कधीच असं कुणी करत नाही - हे बघून मला कल्चरल शॉक बसला.

मग ते लोक गाई पाळतात कशासाठी?
Submitted by रोहिणी चंद्रात्... on 24 February, 2020 - 01:55
>> शेतीला बैल मिळण्यासाठी. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जातीवंत बैल खिलारी, डांगी असे शर्यतीसाठी, शेतीसाठी तयार करताना त्यांना गाईंचे पुर्ण दुध पाजतात. मुळात या गाई अतिशय कमी पण खूप पौष्टिक दुध देतात. जास्त दुधाच्या गायी दुध काढण्यासाठी पाळतात. देशी गाय प्रामुख्याने ड्राफ्ट पर्पज म्हणजे ओझे/ नांगर ओढण्यासाठी बैल पुरवत होती.

नमस्ते,

माझे नाव अ‍ॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते.

मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते.

जातांना रिक्षा चालवणारे डायवर (येथे Drivers कसे लिहायचे?) मला हात हलवत विचारतात, "मॅडम हूं हूं???". मला समजत नाय की ते सरळ का बोलत नाही. त्यांच्या तोंडात काहीतरी असते?

येथले नागरीक काहीतरी खात असत चालत असतात. रस्त्यातच ते spit करतात. टू व्हिलर मधले नागरीक , कारमधले नागरीक spit करतात. मोबाईलवर बोलतात. spit करतात. रस्त्यात उभे राहतात. spit करतात.

रस्त्याने नागरीक असलेले मुले टू व्हिलर जोरात चालवतात. ते मस्त सिग्नल हिरवा होणेपर्यंत जोरात मोटार चालवतात. त्यांच्या मागे मुलगी बसलेली असतात. तिने तोंड भांदलेले असते. त्यामुळे ते जोरात चालवतात.

येथल्या मुली तोंड भांदतात. रस्तेत धुळ, माती असल्याने ते तोंड झाकून जातात. आपल्या तोंडाची खुप प्रोटेक्शन करतात. रस्त्याने चालतांना ते तोंड सोडत नाहीत. म्हणजे पुने किती हवा खराब झाली आहे. खुप.

मला पण तोंडाला कापड भांदायचे आहे. पण मला असेच मोकळे चालायला आवडते. मी चालत कॉलेजला जाते. मी कोथरूडला राहते. तेथून मी कॉलेजला चालत जाते. कारण की मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मी मराठी बोलते शकते.

येथे नागरीक रस्त्यावर वडापाव खातात. मी पण खाते. कधी कधी. मला पण वडापाव आवडतो. पण खुप मसालेदार असतो.

ईव्हीनिंगमदी मी भाजी घेवून येते. ती भाजी घरमालक लेडीला देते. ते खुप दयाळू आहे. घराचे रेंट टाईमबरोबर घेतात. ते खुप चांगले आहे. ते वरती टेरेसवर जावू देत नाही. मी त्यांना तेथे स्मोक करतांना पाहीले असल्याने.

भाजी घेत असतांना, रिक्षामंदी बसतांना ते नागरीक जास्त चार्ज सांगतात. कारण माझा स्किन गोरा आहे. मग मी त्यांच्या भाषेत बोलते. मग ते बरोबर चार्ज सांगतात. आता आमच्या ओळखीचे काही झाले आहे.

मला अजून पुढे मराठी शिकायचे आहे. पुढे भेटू.

हा असला धागा लिहतांना टायटलमदे कल्चर म्हणजे संस्क्टुती आणि शॉक म्हणजे धक्का असते ना? पण धाग्याचे नाव कल्चरल शॉक का लिहीले आहे?

असले आहेत संस्क्टुतीत धक्के माझे येथील.

आमी परदेशी लोक मराठी शिकायला येतो अन येथे इंग्लीशमदे बोलतात.

आपली,
अ‍ॅलीना रोमर
नॉर्वे (हल्ली मुक्काम - पुने)
(अक्षरास हसू नये.)

माडिया गोंड सर्व प्राणी खातात यात गाय बैल देखील होते. बहुतांश पशुपालक आदिवासी समाज प्राणी खाण्यासाठीच पाळतात. हिंदू धर्माच्या प्रभावाने बंद किंवा कमी झालाय. आता बहुधा आर्थिक अडचणीत विकण्यासाठी जनावरे पाळतात. मावळात अशी जनावरे सर्रास दिसतात.

लेक अभिनव इंग्रजी माध्यमात शिकत होती. चौथीच्या सुट्टीत तिला ज्ञानप्रबोधिनीच्या प्रवेश परिक्षेला बसवले. तिथे तिची निवड झाली पण तिने तिथे प्रवेश घ्यायला साफ नकार दिला. कारण वर्गात boys नसतील.

घरातल्या घरात माझ्या बाबांना कल्चरल शॉक बसला होता Proud

माझ्या पहिल्या वहिल्या कंपनीत एक पंजाबी मुलगी होती तिला सिगारेट ओढताना बघून मला प्रचंड मोठा कल्चरल शॉक बसला होता.
माझ्या डोळ्यांसमोर आजही ते दृश्य आहे.
ती स्मोकिंग झोन मध्ये सिगारेट ओढतीय असं.
नताशा, असं सेम माझ्या मावस भावा सोबतही झालंय.
त्याचा मुलगा बालशिक्षण मध्ये होता.
माझे तिकडे मित्र नाहीत ह्या नावाखाली त्याने ज्ञानप्रबोधिनीत जायला नकार दिला.

MeghaSK, नॉर्डिक देशात असे अनुभव येतात . मला सुद्धा फिनलंड मध्ये असे अनुभव आलेत. माझी सॅक ज्यात २ दिवसापूर्वी घेतलेला २०० युरोचा टॅब होता ती मी बस मध्ये विसरलो शुक्रवारी . लॉस्ट अँड फाउंड मध्ये फोन केला तर ते म्हणाले सोमवारी चौकशी करा . सोमवारी नॉमिनल फी भरून सॅक टॅब सहित मिळाली.

अजुन एकदा ....ऑफिस ला जाताना हेडफोन खिशातून पडला . त्याच वाटेवरून परत शोधयाला जात असताना कोणीतरी शेजारील दगडावर ठेवलेला (पायाखाली येईन तुटू नये म्हणून) सापडला.

आमच्या माहितीतील एका MBBS डॉक्टरने स्वतःच्या अस्थिभंग(fracture) साठी एक धनगराकडून औषध घेतले हे वाचून मला सांस्कृतिक धक्का(cultural shock) बसला.

एक डॉक्टर एका संस्थळावर इतकी वर्षे होते. तिकडून त्यांना हाकलून लावले याचा कल्चरल शॉक बसला.

( कटप्पाजी, गंभीर धाग्यावर जरा गंमत. कृपया रागावूं नका )

तुमची आई तुम्हाला नेहमी ' गाढव' म्हणते ना, तो खरंच मला कलचरल शाॅकच होता ; कारण माझी आई फक्त बाबांनाच तसं म्हणते !!!20190103_224652_6.jpg

माझ्या पहिल्या वहिल्या कंपनीत एक पंजाबी मुलगी होती तिला सिगारेट ओढताना बघून मला प्रचंड मोठा कल्चरल शॉक बसला होता.

>>>>

मलाही एका आवडीच्या सुंदर मुलीला सिगारेट पिताना बघून असाच करंट लागला होता. त्या किश्यावर मी एक कथाही लिहीली होती. ती गाजली म्हणून दुसरीही लिहीली होती.कधी कोणाला वेळ मिळाला तर जरूर वाचा
..

एक सिगरेट पिणारी मुलगी
https://www.maayboli.com/node/42727

हो, मीच ती.. एक सिगारेट पिणारी मुलगी
https://www.maayboli.com/node/42839

एखादी बाई सिगारेट पिते पाहून शॉक लागत असेल तर आपलं कल्चर(?) नक्कीच भूषणावह नाही.
>>>

लहानपणापासून घरतल्या बाप्यांना सिगारेट दारू असली व्यसने करताना पाहिले असते पण बाया यापासून चार हात लांब राहिलेले पाहिले असते. अश्यावेळी पहिल्यांदा जेव्हा एका मुलीला सिगारेट ओढताना बघतो तेव्हा शॉक लागणे स्वाभाविक आहे. जर लहानपणापासून घरच्या पुरुषांसोबत बायकांनाही सिगारेट ओढताना पाहिले असते तर शॉक न्सता लागला. ईतके सिंपल अहे हे. यात स्त्री पुरुष समानता ओढूनताणून आणायची काही एक गरज नाहीये खरे तर Happy

अमेरीकेत मुलांवर हात उगारत नाहीत हा दुर्दैवाने माझ्याकरता कल्चरल शॉक होता. दुर्दैवाने कारण लहानपणी भरपूर मार खाल्लेला आहे. मुलांना मारायच्या विरोधात आहे मी. अगदी किती का मुलं न जुमानोत. इट इज राँग.

मी सुद्धा याच मताचा आहे की मुलांना मारणे हा शेवटचा पर्याय असावा. पण मुलांना मारावेच किंवा मारूच्ब नये अश्या दोन्ही भुमिका आधीच हट्टाने ठरवणे ईज चूक. कारण एवरी चाईल्ड ईज डिफरंट. आमच्याकडे मी माझ्या मुलीला बिनधास्त मारतो. माझी मुलगीही मला बिनधास्त मारते. म्हटलं तर पाल्य-पालक समानता आहे Happy

यात स्त्री पुरुष समानता ओढूनताणून आणायची काही एक गरज नाहीये खरे तर>> wth? हे कशावरून ठरवलं लगोलग?

मल्याळी लोक दिवाळी साजरी करत नाहित हे पाहुन शॉक बसला होता, म्हणजे अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्स ला असताना एकाच बिल्डिन्ग मधे ४-५ इन्डियनची घर, दिवाळीची धामधुम, माझी युअस मधली पहिलीच दिवाळी, शेजी बाइशी गप्पा मधे विषय निघाला तेव्हा ती म्हणे आम्ही मल्याळी आहोत आणि आम्ही दिवाळी साजरी करत नाही. आमच्यासाठी मोठा सण म्हणजे ओनम.

> अमेरीकेत मुलांवर हात उगारत नाहीत हा दुर्दैवाने माझ्याकरता कल्चरल शॉक होता. दुर्दैवाने कारण लहानपणी भरपूर मार खाल्लेला आहे. मुलांना मारायच्या विरोधात आहे मी. अगदी किती का मुलं न जुमानोत. इट इज राँग. > Sad मी फारसा मार खाल्ला नाही पण प्रॉपर चाईल्ड अब्युजमधे येतील अशा केस अगदी जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे मीदेखील मुलांना मारायच्या विरोधात.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. नुकतेच कॉलेज पासआउट झालेली किंवा पासआउट होऊन तीन चार वर्षे वगैरे झालेली तरुणाई. एकाने स्टेजवर जाऊन गाणे गायला सुरु केले: "आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे" व्वा! मी मनातल्या मनात म्हटले, "इतके जुने गाणे आजच्या पिढीलाही गायची इच्छा होते. ग्रेट!" वगैरे वगैरे. तोच पाठीमागून गलका सुरु झाला "साऽहिल... साऽऽहिल..." मला कळेना नक्की काय प्रकार आहे? साहिल कोण? त्याचा काय संबंध? स्टेजवरचा मुलगा गातच होता. आणि लवकरच मला उलगडा झाला. पुढे गाण्यात ओळी आल्या...

आपकी मंज़िल हूँ मैं, मेरी मंज़िल आप हैं
क्यों मैं तूफ़ान से डरूँ, मेरा साहिल आप हैं
कोई तूफानोंसे कह दे मिल गया साहिल मुझे

शेवटच्या ओळीतले शब्द कोरस मध्ये जोरजोरात गात मागच्या रांगेतून तुफान प्रतिसाद मिळाला. मग कळले कि स्टेजवरचा मुलगा साहिल नावाच्या आपल्या खास मित्रासाठी हे गाणे गात होता. मी कपाळाला हात लावून बघत राहिलो. बदलत गेलेले कल्चर. मी कॉलेजमध्ये होतो तेंव्हाचे, आणि आताचे.

नुसतं साधं वरण पण खातात हे बघून माझ्या नॉर्थ इंडियन मित्रांना शॉक बसला होता... ते इमॅजीनच करू शकत नाहीत कि असे बिना तडका वरण खाणे ...

असाच शॉक त्यांना दही भात बघून पण बसतो. दही आणि भात एकत्र खाऊ शकतो हे त्यांच्या गावी नसतं.

आमच्याकडे कुकरची भांडी बघून पंजाबी मित्र मैत्रिणींना शॉक बसला होता. कुकरमध्ये भात आणि वरण एकाच वेळी लावण्यासाठी कायदेशीर भांडी मिळतात हे बघून ते उडाले होते. वर कुकरमध्ये डायरेक्ट भात न ओतता आत वेगळ्या भांड्यात लावला तर तो शिजतो का विचारत होते

दहीभातात साखर घालून खाणारे बंगाली आणि साबुदाण्याच्या खिचडीत अंडे किंवा कांदा घालऊन खाणारी आपलीच मंडळी हा कल्चरल शॉक मी अनुभवला आहे

साबुदाण्याच्या खिचडीत अंडे >>>> हाहा, एखाद्याने उपवासाच्या दिवशी खाल्ले तर त्याच्या उपवासाचेही अंडे लागतील Wink

हळद आणि कांदा घालून केलेली शाबुदाण्याची खिचडी बिनउपवासाच्या दिवशी खायला मस्त असते!! आम्ही करतो अधुनमधुन पोहे, उप्पीट, दडपे पोहे वगैरेचा कंटाळा आला की चवीत बदल म्हणून!!

Pages