सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग अकरा

Submitted by मुक्ता.... on 24 February, 2020 - 08:43

न्हाsssssssय...म्या त्ये व्हउ द्येणार न्हाय...वत्सला तवाबी आडवी आलीस आन आताबी...त्या दोगांना आस नीट व्हाउन न्हाई चालायचं...कुठं ग्येलं ते दोग? येकतर काय बोलत्यात त्ये समजत नाय..आन कस कुटून येत्यात त्येबी समजत नाय...आता हितं हुते...ह्यासनी बी तंबी द्याया हवी..."… त्या अंधार्या गुहेत एक बाई ,नऊवारी साडी, करारी विध्वंसक डोळे, लांबसडक केस...

मियाव....मयेयाव...व्हाव व्हाव....इयांव गर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
घरररर....
अचानक मांजराची गुरगुर अगदीच भयाण होती....तिला अगदी तिच्या मागेच ऐकू आली....अचानक पिशवीतून भाजी बाहेर काढल्यावर पिशवी जशी दिसते तशी ती मांजराची शरीरं खाली निपचित पडली.
आणि तिच्यमागून खांद्यावर एक दणका बसला....
केकाटली ती बाई जीवघेणी....त्या  अंधाऱ्या गुहेत...तिच्या किंकाळ्या घुमल्या....तिच्या आणि तिच्या आवाजात त्या मांजराची सरमिसळ...पूर्ण परिसर काही मिनिटे दमदमुन गेला...
आणि आता त्या गुहेत काही प्रकाशमान वेटोळी लाल आणि हिरव्या रंगाची त्या बाईभोवती घिरट्या घालू लागली....तिला आकडी येऊ लागली, दातखिळी बसली..ती कशीबशी म्हणाली,
"आरं आरं सोडा, माफी करा..पूना न्हाई कायबी बोलायची म्या...सोडा सोडा..मला भाजतंय...वरखडे काडलेत त्ये बी लै दुकतात..." आता मगाचा चढेल आवाज आर्जवी झाला होता....
ते थांबले.....पण स्थिर राहू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी मांजराची शरीरं कुठूनतरी मिळवली होती. तिला मोकळी केली आणि पुन्हा मांजरांच्या रुपात आले.त्यांच्याबद्दल बोललेलं त्यांना आवडत नसावं....
तिची अवस्था भयानक झाली...आणखीन पिवळट दिसू लागली. ज्याअर्थी तीच बोलणं ऐकून त्यांनी तिला एव्हढी इजा पोचवली त्याअर्थी ही भाषा त्यांना कळत होती...

तिच्यासमोर काही विचित्र अक्षरं उमटली विशिष्ट लयीत , तीन ते चार अक्षरांचा एक समूह याप्रमाणे बहुधा एखादं वाक्य तयार झालं....ती बघत राहिली..."आरं काय बी समजना मला...काय लिव्हलय?...ती खाली लोळपटत म्हणाली...काही क्षण शुद्ध हरपली तिची आणि निपचित राहिली....
ते दोघे...काळं आणि पांढरं मांजर...काहीतरी गुरगुरले एकमेकांकडे पाहून...पंधरा मिनिटांनी तिला शुद्ध आली....
पुन्हा जशीच्या तशी झाली होती....उभी राहिली...

पुन्हा घुंगराच्या काठीला हातात घेत म्हणाली,"माज्यावर ह्ये आसं हल्ला करून काय हुईल र? जमल का? ह्ये मांजर बनलात, कुनी सांगितलं?म्याच न्हवं? तुमची ताकद लै मोटी हाय....आन ती , ती सुटली कशी? तिला कैद क्येली होती म्या....तिच्याच घरात, खोलीत...कशी सुटली? ....

"न्हाय...न्हाय जमायचं ह्ये....वत्सल..लै झालं आता...लै आडवी आलीस...त्यात ही गंगी कुटून उपटली.....तीलाबी न्हाय काय बी करू शकलो...लै गप बसलो...इय हिरव्या, आय लाल्या....आता काय बी करा आन त्या वत्सल ला लांब ठेवाय पायजे...आन म्या त्या मुळू मुळू नवीन आन देवकीसनी बगते...."

त्या दोघा हिरव्या आणि लाल प्रकाश शक्तींना मानवी भाषा नीट येत नव्हती, तो एक महत्वपूर्ण मुद्दा....काही शब्द तोडके मोडके येत होते....कोण होते कुठले होते....पण क्रूर होते..

बकुळाला एव्हढी दुखापत त्या दोघांनी कधीच केली नव्हती. आता यश येत नव्हतं.....वत्सलने त्यांच्या सगळ्या खेळाचा बट्याबोळ केला होता. नवीन आणि देवकी हातचे निघून चालले होते....त्या शक्ती एकदम तिरीमिरीत होत्या. 

" टिक टिक टिक.....स्क्याव स्क्याव......बबबब  बकुळा........ईईई कडे  बबबबब  बघ........"

बकुळा चपापली.....कारण हा वेगळाच आवाज होता....आणि हा वावरही.....नवीनच......

आपला भसाडा चेहरा मागे वळवून बकुळा बघायला लागली......काहीतरी अंगावर आलं.....फडकन तिच्या तोंडावर चपराक बसली...." कामाची ननन ना ना नाहिस......टिक टिक " बकुळा उताणी आपटली होती आणि तिच्या गळ्यावर ते पांढरं मांजर बसलं होतं. त्याच्या गळ्यात काहीतरी होतं. गोल आकाराचं. आणि त्यात लाल रंगाचा लाईट होता.....

बकुळा एकदम कोलमडली.....हे नवीन होत तिच्यासाठी. ते बोलायला कसे लागले? यांना तर येत नव्हतं? मग अचानक....

"ह्ये कसं?" एव्हढे दोन शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले....पुन्हा तिच्या गळ्यावरली आपली पकड मजबूत करत ते मांजर मानवी बोली बोलू लागलं......" ययय यंत्र......भभ...भाषा समजणार........तुला मारणार......."

बकुळा आर्जव करू लागली नग नग मला सोड.....मी कामाची हाय तुमच्या.....म्या म्या....करील ना तुमचं काम.....करील....एक डाव संधी द्या...इतकं केल्या....समदं  आस इसरू नगासा....मला माजा बदला हवा हाय.....आन येक इसरू नगासा...म्याच तुमाला मदत करू शकती....आन तुमचं  एक शिक्रेट म्या जाणून हाय.....एका दमात वाट लागल....जर म्या त्ये ........त्यो बॉक्स....आन त्यो कूट हाय त्ये बी मलाच म्हाईत हाय....आता गुमान मला सोड...आन ये बोलतुस कसा...."

माझया गळ्यात ययय  यंत्र........टिकटिक......

आस व्हय....बकुलाने तिरस्काराने त्या मांजराला बाजूला झटकलं....झुरळ झटकतात तसं....".दूध पायजे न्हवं? मग पुन्यांदा ह्ये चालवून घ्यायची न्हाय.....त्यो बॉक्स.....धुम्मम्म अन तुम्ही बी जाल....."

दोन्ही मांजर एकमेकांकडे बघून गुरगुरली....आणि मग बकुळाकडे बघून " टिक टिक दूध दूध......"

बकुळा आज खूप जखमी झाली होती.....त्या गुहेत खूप घाणेरडा वास येत होता....कुबट्ट त्या पारगावातल्या जंगलाने उंच पर्वतरांगेला वेटोळे दिले होते, वर्षानुवर्षे तिथे कुणी फिरकले नव्हते, त्या जंगलात जो जाई आतपर्यंत तो कधीच परत येत नसे....जसे नवीनच वडील नाहीसे झाले होते.त्या जंगलात ते पदके मंदिर होते....भग्न....भयाण....त्या मागे हि गुहा होती....त्या मंदिराच्या कळसाच्या जागी एक हजारो वर्षांपूर्वी बांधलेली एक घडीव जागा होती....आणि चारही बाजूला.....उंच मनोरे....लालसर आणि हिरवट रंगाचे....तिथे काही विक्षिप्त घटना घडल्या होत्या असे लोक सांगत....आधी तिथे काही वस्ती होती पण काही अपघात किंवा काहीअ नैसर्गिक घटना घडल्याने तिथली राहणारी सगळी माणसे मारली गेली. आता त्याला हजारो वर्षे उलटली. त्या जागी कुणी चिटपाखरूही येत नसे, त्यामुळे त्याभोवती रान वाढले.....त्या बद्दल काही आख्यायिका, काही गोष्टी सांगोवांगीच्या पसरल्या होत्या....असो....

आता त्या शक्ती मानवी भाषा बोलू शकत होत्या.....

आता त्याही पलीकडे.....

इकडे मुंबईत......वत्सलने हलकेच त्या बॉक्स मधून ती पाण्याची बाटली गंगाकडं दिली. आणि दोन तशाच रिकाम्या बाटल्या...

गंगाने  रोजच्या जार मधले पाणी त्यात भरले. मग हलक्या हाताने ती बाटली उघडली. त्यातले दोन दोन थेम्ब त्या नवीन बाटल्यात घातले....हे सग सगळं खूप झटपट करावं लागत होत. रात्रीची वेळ असल्याने त्या पाण्यात काहीही हालचाल नव्हती. आता खरा धोका सुरु झाला. थोडक्यात काय तर गंगाने  साध्या पाण्याला विरजण लावले. त्या वत्सल आत्याच्या प्रयोगातले पाणी घेऊन. आणि ते नवीन बॉक्स मध्ये ठेवून दिले. दोन दिवसांनी ते बॉक्स वत्सल आणि गंगाने परत काढले...जी मूळ बाटली होती तिला आणि बाकीच्या दोन बाटल्याना नम्बर केले...१ ,२ आणि ३ 

आता काय?  गंगाने आत्याला पुन्हा त्या  बाटल्यावर हात ठेवायला सांगितला आणि बेसिक "सा"  किंवा लो टोन वर गायत्री मंत्र म्हणायला सांगितला. आता त्यात प्रकाश कण असतील तर परिणाम व्हायला हवा...या वेळेस पाण्यावर थोडासाच परिणाम झाला, बाटली नंबर दोन मधले पाणी हलकेच फिरू लागले. आणि त्यात काही छोट्या आकाराचे लाल आणि हिरवे कण  फिरताना दिसले. यावेळेस प्रयोगाची वेळ वाढवली. हळूहळू त्यातले लाल कण मोठे झाले. गंगाने  डोळे विस्फारले. आणि वत्सला आत्यांना  थांबायला सांगितले. आत्याने बाटलीवरचा हात बाजूला काढला. तसं  हातावर काही अक्षर उमटली. गंगाने लगेच फोटो काढला. या प्रकारचे शूटिंग करून ठेवत होतीच ती. आत्ता तोच प्रयोग बाटली नंबर तीन वर केला पण इथे गायत्री मंत्र मिडीयम पीच आणि स्पीड जास्त ठेवला. पण पाणी संथच फिरले जास्त वेग नव्हता. पण हिरवे कण  अधिक मोठे झाले..गंगाने थांबवताच आत्याने हात बाजूला केला पुन्हा काही विछित्र अक्षरं  उमटली....आता पुन्हा त्याचा फोटो काढून घेतला....हे पाणी स्पेकट्रोमीटर  मध्ये बघणे आवश्यक होते.हे सगळं करताना पहाट झाली. वत्सलचा हात थोडा भाजल्यासारखा झाला होता....गंगाने  ओइन्टमेन्ट लावूनदिले. आता हा पसारा आवरायला हवा होता. देवकी उठायची कधी कधी पहाटे. सध्या या गोष्टी तिच्या पचनी पडणार नव्हत्या. कधीना कधी हे सगळे तिला कळणारच होते. पण आता हा प्रयोग थांबवून हे सर्व नीट पॅक करून ठेवणे आवश्यक होते..

हा डेटा व्हिडीओ सहित अविनाशला रवाना झाला. आणि वत्सल ध्यान लावायला बसली....गंगा पांघरून ओढून झोपली. आता त्या प्रयोगातून काही बेसिक निष्कर्ष येणार होता. आणि मग आणखीन एक प्रयोग....गंगा काही पाणवनस्पती घेऊन आली होती. आणि काही झाडं जी सहज कुंडीत उगवतात.....गंगा आणि अविनाशच जाणोत त्यांना नक्की काय सिद्ध करायचंय...काहीतरी नक्कीच त्यांच्या डोक्यात शिजलं आहे. बरेच बारीक सारीक कोपरे आता जोडायला लागणार होते. अगदी सुरुवातीपासूनच.मग त्यातून एक मार्ग जो बकुळा आणि त्या दुष्ट शक्तींनी निवडला होता आणि त्यांची वाटचाल, उद्देश समजणार होते. बकुळाचं एक होतं की तिला बदला घ्यायचा होता. नविनच्या पूर्ण कुटुंबाला उध्वस्त करायचे होते...

सकाळचे आठ वाजले होते, देवकी आवरून ऑफिसला निघाली होती. वत्सल आणि गंगा अजूनही झोपल्या होत्या. इतक्यात वत्सलचा फोन वाजला. धडपडून वत्सल जागी झाली. बघते तर डॉक्टर टंडन चा मिस्ड कॉल आणि विजय सर अव्या यांचे मेसेज येऊन पडले होते.

"आर द्येवा, आज कशी जाग नाय आली, द्येवकी उटली आसन का? म्या ही अशी..."
"आई बसा, हा घ्या चहा. डॉक्टर टंडन आज आपल्याकडे यायचं म्हणताहेत. तुम्ही उचलला नाहीत म्हणून मला केला त्यांनी. मी त्यांना दुपारी जेवणाचं आमंत्रण दिलय, तुम्ही होच म्हणाल हे माहितीय"देवकी म्हणाली।

"व्हय म्या आवराय घेती. तुज काय आज..."
" भाजी करून ठेवलीय आई, डाळ भात करून ठेवलाय तुम्ही फक्त त्यांना भाकऱ्या करून द्याल ना? त्यांना तुमच्या हातच्या भाकऱ्या खायच्यात. आपल्या नवीन ने हिप्नॉटाईज अवस्थेत ही माहिती नकळत पुरवलीय त्यांना,"
देवकी मिश्कीलपणे म्हणाली.
"आ, व्हय व्हय, वाडीन की, आन त्ये म्हनत हुते का त्यासनी मला भेटायाच हाय म्हनून. बार तू आता निग बर हापिसात, उशीर व्हायाचा"
"हो, भेटू संध्याकाळी, आज जरा आईकडे जाईन म्हणते. एक म्हहत्वाची वस्तू आणायची आहे"
"व्हय व्हय आन त्यांना ईचारल हाय म्हनून सांग। सद्याच्या धावपळीत भेटणं न्हाय झालं"

हो सांगते आई, नक्कीच...येऊ?

"आ...व्हय व्हय" वत्सलचा मानेतून किंचितशी एक कळ जाणवली..पण ते न दाखवता, वत्सलने देवकीचा निरोप घेतला आणि फोन चे मेसेज चेक केले आणि विजय, अव्या यांचे मेसेज पाहून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
तर विजय आणि अव्यांने पुढच्या पाच दिवसात येतो म्हणून
कळवले होते.

आता सगळं आवरून वत्सल आणि गंगा डॉक्टर टंडन ची वाट पहात बसले.नवीन आज फ्रेश होऊन जिमला गेला. माहिती काढली.
दुपार झाली. बेल वाजली.बाहेर डॉक्टर आणि नवीन एकत्रच होते....डॉक्टरांच्या गळ्यात एक स्फटिकांची माळ चमकत होती...।आज सूट बूट न घालता डॉक्टर इंफॉर्मल मध्ये म्हणजे चक्क झब्बा आणि लेंगा घालून आले होते. पण डॉक्टर आणि नवीन दोघांना धाप लागली होती....

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users