बीएस सहा विषयी

Submitted by आर्यन वाळुंज on 23 February, 2020 - 11:27

एक एप्रिलपासून बीएस सहा मानक असणाऱ्या वाहनांना परवानगी असेल आणि बीएस चार भंगार मध्ये काढावे लागेल अशी चर्चा ऐकत आहे.
तर बीएस सहा मानक फक्त मोठ्या शहरांमध्ये लागू होणार आहे की संपूर्ण भारतात? अजूनही आमच्या कडे ऐंशी पासून ची वाहनं काळाकुट्ट धूर सोडत फिरत असतात. त्यांचे काहीच वाकडं कोण करत नाही. सगळ्यात जास्त राग बजाजचा येतो. त्या खटमाळ्या, टरमाळ्या टू स्ट्रोक इंजिन रिक्षा भकाभक धूर सोडत फिरत आहेत. अक्षरशः जीव गुदमरतो त्यांच्या मागे वाहन चालवताना.
प्रदुषण काही मुंबई, पुणे दिल्ली येथेच नाही. तालुका ठिकाणी सुध्दा खूप प्रदुषण वाढत आहे.
मला माझी बीएस चार मानक असलेली कार एक एप्रिल नंतर वापरता येईल का? कृपया योग्य मार्गदर्शन करा माबोकरांनो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हालांकि दिल्ली में एक अप्रैल, 2018 से ही बीएस-6 फ्यूल मिल रहा है. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान ने नवंबर, 2017 में राजधानी दिल्ली में बढ़ते वायु प्रदूषण को लेकर नाराजगी जताई थी. प्रधान ने राष्ट्रीय राजधानी क्षेत्र में 01 अप्रैल, 2018 से ही बीएस-6 ईंधन सप्लाई का आदेश जारी किया था. वहीं पूरे देश के लिए ये डेडलाइन 01 अप्रैल, 2020 है.

# अब ये बीएस क्या बला है –
BS दरअसल भारत सरकार के बनाए हुए स्टैंडर्ड हैं. इसका फुल फॉर्म होता है ‘भारत स्टेज’. इन्हें बीएसईएस लागू करता है. बीएसईएस का फुल फॉर्म है –भारत स्टेज एमिशन स्टैंडर्ड. ये आती है सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड के अंडर और सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड आता है पर्यावरण और जलवायु परिवर्तन मंत्रालय के अंडर. बीएसईएस में ‘एमिशन’ का अर्थ होता है उत्सर्जन यानी उगलना या उल्टी करना. और ‘स्टैंडर्ड’ किस चीज़ का? इस चीज़ का कि वाहन अधिकतम कितना प्रदूषण उगल सकते हैं, और कितने से अधिक के बाद ये ग़ैरकानूनी हो जाएगा?

# कैसे बनते हैं ये नियम –

भारत सरकार इन स्टैंडर्ड्स को बनाने में ज़्यादा मेहनत नहीं करती. यूरोप के देशों में ऐसे ही स्टेंडर्ड चलते हैं जिन्हें ‘यूरो’ कहा जाता है. बस इन्हीं मानकों या स्टैंडर्ड्स में थोड़ा-बहुत परिवर्तन करके ये भारत में लागू कर दिए जाते हैं. वो जैसे गांव में नाइकी के ड्यूप्लिकेट वाइकी जूते मिलते हैं न, वैसे ही भारत में ‘यूरो’ का ड्यूप्लिकेट है ‘बीएस. लेकिन ये तो कॉपी-पेस्ट वाला हिसाब-किताब है, हम रेस में पिछड़ रहे थे इसलिए यूरो5 का इंडियन वर्ज़न रिलीज़ ही नहीं किया. कुद्दी मार दी. सीधे बीएस6 पर, जो यूरो6 की मिरर इमेज है.

# टाइमलाइन –

इन मानकों को पहली बार 2000 में लागू किया गया था. उसका नाम बीएस नहीं, इंडिया 2000 था और रेफरेंस था यूरो1.

सबसे लास्ट लागू किया जा चुका नियम बीएस4 है जिसका रेफरेंस है यूरो4 और जिसे दो साल पहले यानी 2017 के अप्रैल महीने में देशभर में लागू किया गया था. ‘देशभर में’ मेंशन करना इसलिए ज़रूरी है क्यूंकि यूरो4 अप्रैल,2017 से पहले भी अस्तित्व में था. ये अप्रैल 2010 में ही लागू हो गया था लेकिन तब केवल तेरह शहरों और नैशनल कैपिटल रीजन (NCR) भर में लागू हुआ था.

# क्या कहते हैं यूरो और बीएस के नियम –

यूरो6 स्टैंडर्ड सितंबर, 2014 में लागू कर दिया गया था. और सब कुछ सही रहा तो लगभग ऐसे ही स्टैंडर्ड भारत में भी 2020 में लागू हो जाएंगे. आइए देखते हैं कि इसमें किस तरह के नियम थे.

इसके अनुसार डीज़ल से चलने वाली कारें प्रति किलोमीटर चलने के दौरान –

– .50 ग्राम से अधिक कार्बन नहीं उत्सर्जित कर सकतीं
– 0.080 से अधिक नाइट्रोजन ऑक्साइड नहीं उत्सर्जित कर सकती
– 0.005 से अधिक पार्टिकुलेट मैटर (PM) नहीं उत्सर्जित कर सकते

ऐसे ही नियम कमर्शियल वाहनों, ट्रकों, बसों, टू व्हीलर्स आदि के लिए भी हैं. डीज़ल और पेट्रोल से चलने वाले वाहनों के लिए अलग-अलग नियम हैं.

बीएस- VI फ्यूल हानिकारक हाइड्रोकार्बन के स्तर को कम करने में भी मदद करेगा. एक रिपोर्ट के मुताबिक, BS-IV से BS-VI में शिफ्ट होने से रिफाइनर्स पर 28,000 करोड़ खर्च होंगे. पार्टिकुलेट मैटर (PM) में लगभग 10-20% की कमी करने में मदद मिल सकती है.

देशात १ एप्रिल २०२०पासून केवळ आणि केवळ बीएस सिक्स निकषांची पूर्तता करणारीच नवी वाहने रस्त्यावर येणार आहेत. याचा अर्थ असा नाही की, सध्या वापरात असणारी बीएस फोर निकषांवर आधारित वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. नव्याने सादर होणाऱ्या वाहनांमध्ये बीएस सिक्स मानकाचे पालन करणाऱ्या इंजिनाचा समावेश असणार आहे.
काय आहे बीएस सिक्स?
सर्वप्रथम बीएस सिक्स म्हणजे भारत स्टेज होय…या संकल्पनेचा संबंध थेट उत्सर्जन मानकांशी येतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास बीएस सिक्स इंजिनयुक्त वाहनांमध्ये विशेष प्रकारच्या फिल्टरचा अंतर्भाव असणार असून, या माध्यमातून ८० ते ९० टक्के पीएम २.५ सारखे कण रोखले जातील. या माध्यमातून वातावरणात पसरणाऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइडवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. जेणेकरून देशातील प्रदूषण घटवणे शक्य होणार आहे.
भारत स्टेज एमिशन स्टँडर्ड्सची सुरुवात २०००मध्ये करण्यात आली. हे उत्सर्जनाचे मानक असून, त्याची निर्मिती केंद्र सरकारतर्फे करण्यात आली आहे. वाहनांच्या इंजिनांमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांना नियंत्रित करणे, हा या मानकांच्या निर्मितीचा प्रमुख उद्देश आहे. भारत स्टेज मानके युरोपीयन रेग्युलेशनवर आधारली आहेत. बीएस फोर मानके एप्रिल २०१७मध्ये देशात लागू करण्यात आली. भारत स्टेजच्या मानकांनुसार वाहनांमधून हवेत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषकांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या प्रदूषकांमध्ये कार्बन डाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर आणि सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर आदींचा समावेश होतो. एखाद्या वाहनातून वरीलपैकी कोणतेही एक प्रदूषक किंवा सर्व प्रदूषके निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात बाहेर टाकली जात असल्यास ते वाहन युरोपात विकले जाऊ शकत नाही.
बीएस सिक्सचा काय फायदा?
वाहतूक क्षेत्रातील आणि वाहन उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितानुसार बीएस सिक्स इंजिनाचा अंतर्भाव असणाऱ्या वाहनांमुळे हवेमध्ये प्रदूषके मिसळण्याचे प्रमाण सध्याच्या बीएस फोर इंजिनांच्या तुलनेत कमी होणार आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. बीएस सिक्स इंजिनयुक्त वाहनांमुळे (पेट्रोल आणि डिझेल) प्रदूषणात ७५ टक्के घट होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत.
बीएस फोरपेक्षा किती वेगळे?
सध्याच्या बीएस फोर इंजिनांच्या तुलनेत बीएस सिक्स किती कार्यक्षम आणि वेगळे हा प्रश्न अनेकांना पडत आहे. बीएस सिक्स इंजिनांमधून बीएस फोर इंजिनांच्या तुलनेत कमी घातक पदार्थ वातावरणात सोडले जातील. बीएस फोर आणि बीएस थ्री इंधनामध्ये सल्फरचे प्रमाण ५० पीपीएमपर्यंत असते. हे प्रमाण माणसांसाठी खूपच घातक आहे. मात्र, बीएस सिक्स इंधनामध्ये हेच प्रमाण १० पीपीएमपर्यंत घटविण्यात यश आले आहे. त्यामुळे बीएस फोरच्या तुलनेत बीएस सिक्स इंधनाच्या ज्वलनातून खूपच कमी प्रदूषण होण्याची शक्यता आहे.
वाहने महागण्याची शक्यता
बीएस सिक्स इंजिनाचा अंतर्भाव असणाऱ्या गाड्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे बीएस सिक्सच्या इंजिनाची आणि त्यातील इलेक्ट्रिकल वायरिंगची वाढती किंमत… त्यामुळे बीएस सिक्सयुक्त इंजिनाच्या कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे. इंजिनाच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याने त्यातून होणारे उत्सर्जन कमी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीएस सिक्स इंजिनाचा अंतर्भाव असणाऱ्या वाहनाच्या किमती सध्याच्या वाहनांच्या किमतीपेक्षा १५ टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर बीएस सिक्सच्या निकषांनुसार सादर करण्यात येणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर दोन ते तीन रुपयांनी महागण्याचीही शक्यता आहे.
मायलेजवरही पडणार फरक
बीएस सिक्स इंजिनाचा अंतर्भाव असणाऱ्या नव्या वाहनांच्या मायलेजमध्येही फरक पडण्याची शक्यता आहे. अर्थातच या नव्या वाहनांचे मायलेज अधिक असणार आहे. त्यातच पुन्हा मायलेजच्या बाबतीत कोणत्याही कंपनीला खोटे दावे करता येणार नाहीत.

इलेक्ट्रिक गाड्या येताहेत मार्केटात. तिकडेही लक्ष द्या.

फक्त रेचार्जिंगची सोय कुठे असणार? Cng अजूनही फक्त मोजक्या शहरात मिळते तसे याचे व्हायला नको.

15 वर्षे झालेल्या गाड्यांना काही रुपये भरून अजून 5 वर्षे एक्सटेन्शन मिळते. नंतर भंगारात काढाव्या लागतात करण इन्शुरन्स मिळत नाही.

15 वर्षे झालेल्या गाड्यांना काही रुपये भरून अजून 5 वर्षे एक्सटेन्शन मिळते. नंतर भंगारात काढाव्या लागतात करण इन्शुरन्स मिळत नाही.> हो. आमच्या बाईकसाठी भरले पैसे. २०२३ पर्यंत वाढली लाईफ.

भंगारात देण्यापेक्षा थोड़े अजुन काही वर्षे जपून ठेवाव्यात अर्थात चालु कंडीशन मध्ये.
माझ्या ओळखीत १ येजडी मोटरसायकल एक लाखाला वीकली गेली आणि जुन्या यामहा मोटर सायकलसाठी सुद्धा मुँह माँगा दाम अशी गत असते. जुन्या फियाट कार आणि लँब्रेडा स्कूटर हौशि लोकांकडून विंटेज मॉडेल म्हणून लईच डिमांड मध्ये असतात .... जुने ते सोने Wink

तेच विचारतो की विंन्टेज कार्स रस्त्यावर आणण्याच्या / चालवण्यासाठी त्या दिवशीचे परमिट पाचशे रु भरून काढावे लागते का?

एस आरडी जी मोठ्या आशेने धागा काढला होता. जून्या गाड्या कोणत्या सालापर्यंत चालणार आहेत हे मलाही नीट कळलं नाही.

बीएस चार मानक असलेल्या वाहनांना बंदी नाहीय. तर ३१ मार्च २०२० नंतर बीएस चार मानक असलेल्या वाहनांची नोंदणी होणार नाही. नवीन वाहन बी एस सहा मानकाचे असेल तरच आरटीओ कडे नोंदणी करता येईल. काही शहरांमध्ये बीएस चार मानके असलेल्या वाहनांना बंदी घालण्यात येवू शकते इतकेच समजलं.

केमिस्ट्री सांगते की इंधन जळण्यास हवा लागते आणि इंधन म्हणजे काय तर त्याच्या हवेतील प्राणवायुगाच्या संयोगाने इतकी शक्ती निर्माण होते की जड वस्तू हलवू शकते. वेगवेगळी इंधने वेगवेगळ्या तत्परतेची असतात. म्हणजे किती वेळात किती शक्ती निर्माण करतील. ते जेवढे जलद किंवा ते किती कमी प्रमाणात लागते त्यावर त्याची किंमत वाढते.
आता हे सगळे शोध लागताना सर्वात महत्त्वाचे ठरत होते की माणूस, जनावरं यांच्यापेक्षा सरस काम होतंय ना? पण प्रसार वाढल्यावर इतर मुद्दे त्याकाळी गौण,दुय्यम आणि बिनमहत्त्वाचे होते त्यांचे महत्त्व वाढले. ते म्हणजे इंधन जळल्यावर किती आणि कायकाय नकोशा गोष्टी निर्माण करते. त्यांचा विचार आणि नियोजन म्हणजेच एंजिनांचे प्रमाणिकरण. मग त्यांची वर्गवारी लावणे हे आले आणि त्यास अनुमती देण्याची कायदेशीर प्रक्रीया. सरकारी नियम आणि हस्तक्षेप.

इंधन जलद शक्ती निर्माण करताना नकोशा गोष्टी निर्माण करण्याचे प्रमाणही वाढत असणार. त्यासाठी भरपूर हवा मिसळली गेली पाहिजे. ते करण्याचे एखादे जोड संयत्र निर्माण करून जुन्या एंजिनांचा दर्जा सुधारता येईल असं मला वाटतं.

सर इंधनातच सल्फर, शिसे सारखे द्रव्य असतात. कार्बन मोनाक्साईड, नायट्रस ऑक्साईड हे विषारी वायू इंधन ज्वलनातून बाहेर पडतात. बीएस सहा कम्प्लायंट इंजिन अधिक गुंतागुंतीचे तंत्रज्ञान वापरून या विषारी वायूंचे प्रमाण फारच कमी करतात. जास्त हवेच्या पुरवठ्यासाठी टर्बो ही असेंब्ली खूप दिवसांपासून वापरात आहे.

आजच puc करायला गेले. त्याने विचारले गाडी bs4 आहे का? मी म्हटले मला माहीत नाही, तूच शोध. माझी गाडी bs4 आहे हे शोधून त्याने नम्रतेने गाडीचे puc त्याच्याकडे होणार नाही ही खुशखबर दिली. वर puc नसेल तर म्हणे 10,000 रु दंड. मी घाबरून आता काय करू विचारल्यावर कोणीतरी एकजण वाशीला आहे म्हणे तोच bs4 सध्या करतोय म्हणून सांगितले. मला आजवर कोणीहि puc विचारले नाही पण आता puc केल्याशिवाय बाहेर पडायला जाम भिती वाटेल. आधी वाशीला जाऊन puc करायला हवे.

आता एप्रिल 2020 पासून bs6 झाले तर त्याचे puc 2021 पासून ड्यु होणार. तोवर सगळ्या puc वल्यानी स्वतःला अपडेट करायला हवे.

भंगारात देण्यापेक्षा थोड़े अजुन काही वर्षे जपून ठेवाव्यात अर्थात चालु कंडीशन मध्ये.
माझ्या ओळखीत १ येजडी मोटरसायकल एक लाखाला वीकली गेली आणि जुन्या यामहा मोटर सायकलसाठी सुद्धा मुँह माँगा दाम अशी गत असते >>>> आमच्याकडे यामाहा RX100 आहे. नवऱ्याची ,कॉलेज डेज मधली, आता मी जिमला जायला आणि जवळपास जायला वापरते. आम्हालाही ती गाडी हवी सांगणारे ओळखी अनोळखी चिक्कार लोक भेटतात.
आता या BS4 च्या चक्कर मध्ये माझी टू व्हिलर जाणार असं दिसतं.

>> इंधनातच सल्फर, शिसे सारखे द्रव्य असतात. >>
हे कोणतेही एंजीन वापरले तरी काढता येणार नाही. त्याप्रकारचे इंधन वापरूनच बदलता येईल.

१) सवात प्रथम सरकारी वाहनांची आकडेवारी द्या म्हणावं. किती जुन्या एंजीनावर आहेत, कधी टाकणार वगैरे.

>>मोनाक्साईड, नायट्रस ऑक्साईड हे विषारी वायू>>
हे कमी करता येतील हवा जास्ती टाकून.

>>>बीएस सिक्स इंजिनांमधून बीएस फोर इंजिनांच्या तुलनेत कमी घातक पदार्थ वातावरणात सोडले जातील. बीएस फोर आणि बीएस थ्री इंधनामध्ये सल्फरचे प्रमाण ५० पीपीएमपर्यंत असते. हे प्रमाण माणसांसाठी खूपच घातक आहे. मात्र, बीएस सिक्स इंधनामध्ये हेच प्रमाण १० पीपीएमपर्यंत घटविण्यात यश आले आहे. त्यामुळे बीएस फोरच्या तुलनेत बीएस सिक्स इंधनाच्या ज्वलनातून खूपच कमी प्रदूषण होण्याची शक्यता आहे.
वाहने महागण्याची शक्यता >>>>

इंधनच वाईट असले तर म्हणजे त्यात सल्फर असेल तर तो बाहेर पडणारच कोणत्यातरी रूपात. त्याला एंजीन काय करणार? शिवाय एखादे वाहन शंभर किमि जाण्यासाठी बारा लिटर्स इंधन जाळत असेल तर ते सहा लिटर्स खाणाऱ्या वाहनापेक्षा दुप्पट वायू बाहेर टाकणार हे नक्की.

हम्म्.
मग बॅटरीवर चालणारीच वाहने पाहिजेत. दुसरा पर्यायच दिसत नाही.
शिवाय याला बीएस ४,६ वगैरेची झंझट कधीच नसेल.
खरच असं झालं तर पीयुसी हा प्रकारच बंद होईल का?

Petroleum is a naturally occurring complex mixture made up predominantly of carbon and hydrogen compounds, but also frequently containing significant amounts of nitrogen, sulfur, and oxygen together with smaller amounts of nickel, vanadium, and other elements.

Environmental Pollution

Petroleum-derived contaminants constitute one of the most prevalent sources of environmental degradation in the industrialized world. In large concentrations, the hydrocarbon molecules that make up crude oil and petroleum products are highly toxic to many organisms, including humans. Petroleum also contains trace amounts of sulfur and nitrogen compounds, which are dangerous by themselves and can react with the environment to produce secondary poisonous chemicals. The dominance of petroleum products in the United States and the world economy creates the conditions for distributing large amounts of these toxins into populated areas and ecosystems around the globe.

प्रदूषण होणार कमी; 'BS-VI'ची अंमलबजावणी होणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Feb 2020, 10:32:00 AM
येत्या एक एप्रिलपासून देशामध्ये अतिशुद्ध इंधन मानल्या जाणाऱ्या 'BS-VI' मानकांवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचा वापर सुरू होणार आहे. इंधनाच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी 'BS-IV' वरुन वरून 'BS-VI'ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : येत्या एक एप्रिलपासून देशामध्ये अतिशुद्ध इंधन मानल्या जाणाऱ्या 'BS-VI' मानकांवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचा वापर सुरू होणार आहे. इंधनाच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी 'BS-IV' वरुन वरून 'BS-VI'ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अवघ्या तीन वर्षांतच नव्या इंधनाची अंमलबजावणी करण्यात यश आले आहे. अशी कामगिरी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाने केलेली नाही.
बीएस सिक्स मानकांवर आधारित पेट्रोल आणि डिझेलमध्ये सल्फरचे प्रमाण केवळ १० पीपीएम इतके असून, ते वापरणाऱ्या जगभरातील मोजक्याच देशांमध्ये आता भारताची गणना होणार आहे. या स्वच्छ इंधनामुळे देशातील बऱ्याच मोठ्या शहरांमधील वाहनांच्या धुराचे आणि प्रदूषणाचे प्रमाणही कमी होण्याचीही शक्यता आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सर्वच शुद्धिकरण प्रकल्पांमध्ये अल्ट्रा लो सल्फर अर्थात बीएस सिक्स निकषांवर आधारित इंधनाची निर्मिती करण्यास डिसेंबर २०१९पासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार नवे इंधन देशाच्या सर्वच भागांत उपलब्ध करून देण्याची तयारीही पेट्रोलियम कंपन्यांनी चालवली आहे. एक एप्रिलपासून देशभरात बीएस सिक्सवर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या वितरणाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. 'येत्या एक एप्रिलपासून स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल देशातील पेट्रोलपंपांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, पेट्रोलियम कंपन्यांनीही स्वच्छ इंधनाच्या वितरणासाठी सर्व तयारी आरंभली आहे,' असेही सिंग म्हणाले.
भारताने २०१०मध्ये युरो तीन मानकांची (बीएस ३ मानके) अंमलबजावणी केली. या इंधनांमध्ये सल्फरचे प्रमाण ३५० पीपीएम इतके असते. त्यानंतर सात वर्षांनी (२०१७)बीएस फोर मानकांची अंमलबजावणी केली. या प्रकारच्या इंधनांमध्ये सल्फरचे प्रमाण ५० पीपीएम इतके असते. बीएस फोरवरून बीएस सिक्स मानकांपर्यंतचा पल्ला गाठण्यासाठी केवळ तीन वर्षांचा कालावधी लागला. 'वाढत्या उत्सर्जनाच्या पार्श्वभूमीवर बीएस फोरवरून बीएस सिक्सची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. बीएस सिक्सची अंमलबजावणी करण्यासाठी शुद्धिकरण प्रकल्पांबरोबरच वाहन उत्पादकांनीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे,' असेही सिंग यांनी नमूद केले.
अल्ट्रो लो सल्फर अर्थात बीएस सिक्स मानकांवरील इंधनाची निर्मिती करण्यासाठी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले. बीएस तीनवरून बीएस फोर आधारित इंधनाच्या निर्मितीसाठी कंपन्यांना ६०,००० कोटी रुपयांचा खर्च करावा लागला होता.
'सीएनजी'इतकेच स्वच्छ इंधन
बीएस सिक्सवर आधारित इंधनामध्ये सल्फरचे प्रमाण १० पीपीएम इतकेच असते. याचाच अर्थ हे इंधन सीएनजीप्रमाणेच अतिशुद्ध असते. दिल्ली आणि नजीकच्या भागात एप्रिल २०१९पासूनच बीएस सिक्सवर आधारित इंधनाचा पुरवठा करण्यात येत असून, एप्रिल २०२०पासून या इंधनाचा पुरवठा देशाच्या सर्वच भागात करण्यात येणार आहे. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार बीएस सिक्सला अनुकूल वाहनांमधून नायट्रोजन ऑक्साइडचे होणारे उत्सर्जन पेट्रोल कारमध्ये २५ टक्के कमी आणि डिझेल कारमध्ये ७० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

@अज्ञानी,
हवेवर चालणारी पण चालतील. पण ती हळू चालणारी असावीत असं दिसतंय. बॅटरी व हवेवर अशी हायब्रीड बनवता येतात का? तसं झालं तर टाॅर्कसाठी बॅटरी वापरायची. मग हवेवर पळवायची. किंवा प्लाॅयओव्हर आला की बॅटरी वापरायची. उतारावर व सरळ रस्त्यावर हवेचा वापर करायचा. पहिल्या गिअरला टाॅर्क जास्त लागत असेल, तर गाडी बॅटरीवर सुरू करायची आणि वेग आल्यावर हवेवर पळवायची. मला त्यातलं फारसं कळत नाही. पण तुम्ही दिलेली लिंक वाचल्यावर, त्यात उल्लेखलेल्या हायब्रीड प्रकारावरून जे सुचलं ते लिहीलं. निदान दिल्लीतल्या प्रदुषणावरती तरी सार्वजनिक वाहनांसाठी असा उपाय तातडीने अमलात आणला पाहिजे.

बीएस ४ किंवा बीएस ६ मधे इंजिन व्यतिरिक्त एक पार्ट अजुन महत्त्वाचा रोल प्ले करतो. एअर फिल्टर/कटॅलिस्ट्//एअर प्युरिफिकेशन म्हणा.
प्लॅटिनम गृप मेटल व काही बेस मेटल यांच्या एकत्रितपणे बनवलेला साका वापरुन प्रदुषण आवाक्यात ठेवता येत.

ह्या प्रदूषणाच्या समस्येसाठी Nikola Tesla हे अजुन एक छान उत्तर आहे.

येत्या काळात पेट्रोल आणि डिझेल कार म्हणजे --फार फार वर्षापुर्वी की नै.. आमच्या काळात--- अश्या गोष्टी सांगण्याची वेळ येईल असे सध्या सुरु असलेल्या अनेक संशोधनाद्वारे आशादायी चित्र वाटत आहे

सल्फर काढलेलं किंवा अगदी कमी असलेलं ओईल बाजूला काढल्यावर जे उरतं त्यात सल्फर खूप राहतो. त्याचं काय करायचं? ते इंडस्ट्रिअल बॉईलर्समध्ये जाळतात असं म्हणतात. कारण ते फेकणार कुठे?
प्रत्येक रासायनिक प्रक्रियेत हवे असलेले पदार्थ काढले की नको असलेले किंवा आता त्यांचा वापर कसा कुठे करायचा माहीत नाही असेही बनत असतातच. ते संपवणे हीच मोठी डोकेदुखी असते. न्युक्लिअर रिअक्टरातही तेच.
दृष्टीआड करतात पण नाहीसे नाही करता येत.

अगर आपके पास बीएस-4 कार है तो : अगर आपके पास BS4 पेट्रोल वाहन है तो आपको घबराने की कोई जरूरत नहीं है, क्योकि BS6 वाहनों के लिए मिलने वाला ईंधन BS4 में भी इस्मेताल किया जा सकता है। हालांकि BS4 डीजल वाहन में BS6 ईंधन का इस्तेमाल नहीं किया जा सकेगा। BS4 डीजल वाहन में सल्फर की मात्रा 50 ppm तक होती है, जो BS6 से अपडेट होने के बाद 10 ppm तक रह जाएगी। BS6 फ्यूल कम सल्फर पैदा करता है और पीएफ (पार्टिकूलेट फिल्टर) स्तर को नीचे रखता है।
बैन होंगे BS4 वाहन : सुप्रीम कोर्ट द्वारा जारी किए गए निर्देशनुसार 1 अप्रैल 2020 से भारत में केवल उन्हीं वाहनों की बिक्री और रजिस्ट्रेशन हो सकेगा जिनमें BS6 मानक वाले इंजन का प्रयोग किया जाएगा। यानी की मौजूदा BS4 इंजन मानक वाले वाहनों की बिक्री नहीं हो सकेगी। यही कारण है कि वाहन निर्माता कंपनियां जल्द से जल्द अपने BS4 वाहनों के स्टॉक को क्लीयर करने में लगे हैं। वहीं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन (FADA) ने इस मामले में कोर्ट से अपील की है कि वो BS4 वाहनों की बिक्री की समय सीमा को आगे बढ़ा दे।
हालांकि भारत के वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण ने कहा है कि मार्च 2020 तक खरीदे गए बीएस 4 वाहन पंजीकरण की अवधि के दौरान चालू रहेंगे। इसलिए यदि आपके पास बीएस 4 कंम्पलाइंट कार है, तो आपको इसे तुरंत बेचने की जरूरत नहीं है।
>> ३१ मार्च २०२० पुर्वी घेतलेले वाहन रजिस्ट्रेशन अवधी म्हणजे पंधरा वर्षे वापरता येईल. बिएस सहा मानकाचे पेट्रोल डिझेल बिएस चार मानक असलेल्या वाहनांना चालेल.

BS-6 से अपडेट होने पर क्या होगा असर : इसके अलावा बीएस-6 ईंधन के साथ डीजल पार्टिकुलेट फ़िल्टर (DPF) और सेलेक्टिव कैटेलिटिक रिडक्शन (SCR) को प्रयोग में लाया जाएगा। जो बीएस-4 इंजन वाली गाड़ियों में नहीं मिलता है। वहीं Real Driving Emission (RDE) को भारत में पहली बार बीएस-6 इंजन के साथ मार्केट में लाया जाएगा। कुल मिलाकर BS6 वाहनों में जो सबसे बड़ा अपडेट मिलेगा वो इसके इंजन और ईंधन पर पड़ेगा, जिसका असर वाहन के माइलेज और परर्फोमेंस पर पड़ेगा

काही केले तरी इंधन ज्वलन झाले की प्रधूषणकरी पदार्थ बाहेर पडणारच.
100% इंधनाचे ज्वलन करणारे इंजिन अस्तित्वातच नाही.
वीज वापर गाडी चालवण्यासाठी केला तरी वीज निर्मिती कोळसा,डिझेल,आण्विक इंधन वापरून करावे लागणार शेवटी रिझल्ट एकच,आण्विक वीज निर्मिती मध्ये प्रदूषणकारी घटक नसतील पण आण्विक कचऱ्याचे काय करणार.
दुसरे बॅटरी चे आयुष्य किती असणार आणि त्यांची replacement cost परवडण्यासारखी असेल का.
सौर ऊर्जा वापर करायचा झाला तर सौर ऊर्जा तयार करणाऱ्या plate cha aakar kami kasa karnar.

प्रदूषणकारी घटक नसतील पण आण्विक कचऱ्याचे काय करणार.
दुसरे बॅटरी चे आयुष्य किती असणार आणि त्यांची replacement cost परवडण्यासारखी असेल का.
सौर ऊर्जा वापर करायचा झाला तर सौर ऊर्जा तयार करणाऱ्या plate cha aakar kami kasa karnar.
नवीन Submitted by Rajesh188 on 25 February, 2020 - 03:00
>> स्वत:ला खाणे आणि धुणे सोडून काय येतं हे पहावे. सगळं आयतं हाती द्यावं ही यांची अपेक्षा. फक्त टिवटिव करत असतात अशी लोक. साफसफाईच्या कामालाही यांना कोणी ठेवत नाही. Happy

Pages