YOLO & मोदीजी

Submitted by Silent Banker on 22 February, 2020 - 23:55

५ ट्रिलियन डॉलर (५ लाख करोड़ डॉलर) च्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न अणि जेमतेम ५% च्या आसपास असणारा आपला विकासदर ही वास्तविकता या दोहोमधील अंतर कापून जायचे असेल तर गरज आहे कल्पना , करते राजकारणी (बोलके नाही ) अणि लोकसहभाग या त्रिसुत्रीची। त्यासाठी दिशा देण्याचे काम ( की दशा दाखविण्याचे काम ? )करणारा महत्त्वाचा सोपस्कार फेब्रुवारी मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पार पड़ला तो म्हणजे "वार्षिक अर्थसंकल्प ".

" जोडोनीया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे खर्च करे " या तुकोबांच्या म्हणी प्रमाणे देशरूपी गाड़ा चालविणाऱ्या सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा मांडलेला लेखाजोखाच। लोकांकडून/ कंपन्यांकडून प्राप्ती कर वसूली ,वस्तु सेवा कर , अबकारी शुल्क , करोत्तर महसूल (Disinvestment etc.) , भांडवल प्राप्ती (Dividend etc.) आणि बाजा रातून उचलिलेले कर्ज अश्या माध्यमातून सरकार आपले उत्पन्न मिळविते। यातील करांचे प्रमाण वाढले अणि कर्जाचे प्रमाण कमी असेल तर वर म्हणल्याप्रमाणे धन हे उत्तमरीतिने जोड़ले जात आहे असे समजले जाते।

आता देश चालविण्यासाठी हा निधि खर्च करताना केंद्र सरकार तो पगार , अनुदाने , पेंशन , कल्याणकारी योजना , पायाभूत सुधारणा बांधणी ,देशाचे संरक्षण, राज्य सरकारकडे निधि हस्तांतरण , कर्जावरील व्याजाची परतफेड इत्यादि साठी वापरते। देश उभारण्यासाठी होणारा खर्च , पायाभूत सुविधांसाठी होणारे निधिवाटप किंवा संरक्षणावर ओतला जाणारा पैसा हे सर्व चांगल्या विचाराचे प्रतिक आहे. कल्याणकारी योजना , कर्जावरील व्याजाची परतफेड, कर्जमाफीसारख्या लोकानुयायी योजना, करात कपात व त्यासाठी राज्य सरकारकडे जास्त निधि हस्तांतरण हा खरे तर तुकोबांना अभिप्रेत नसलेला उदास विचार ठरू शकेल।

वास्तविकता अशी आहे करसंकलन कमी होत आहे। लोकानुयायी योजना, अनुदाने , कोण जास्त फुकट गोष्टी वाटतो आहे याची स्पर्धा यामुळे देशाचा विकासदर वाढविण्यासाठी शाश्वत ठरतील अशा बाबींवर ( शिक्षण ,आरोग्य , रोजगार ,पायाभूत सुविधांचे जाळे ) खर्च करताना पैसा अपुरा पडतो आहे। करोत्तर महसूल (Disinvestment etc.), भांडवल प्राप्ती (Dividend ) मधून जास्तीत जास्त पैसे उभे करून देश चालविता येईल अशी काहीशी मांडणी दिसते आहे. हे म्हणजे नोकरीत पगार वाढत नाही किंवा असलेला वेळेत मिळत नाही तरी पण संसार चालविण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्तेतील काही भाग विकून गुजारा करण्यासारखे आहे।

हा उदास विचार जेव्हा वाढीला लागतो तेव्हा आपल्या हातात असणाऱ्या पैश्याचे मूल्य घसरू नये , महागाई आटोक्यात रहावी म्हणून RBI आपले पतधोरण ठरवत असते. उत्तम व्यवहार हा धन जोड़ताना असेल आणि उत्तमच विचार तो खर्च करताना असेल तर पतधोरण ठरविणे थोड़े सोपे असते। सामान्य लोकांच्या ठेवीवरील व्याज अणि कर्जावरील व्याज यांच्यातील बदल टिपणारे हे धोरण असे साध्या भाषेत त्याला वर्णिता येईल। तो दूसरा सोपस्कार म्हणजे RBIची पतधोरण विषयक आढावा बैठक जी मागील आठवड्यामधे झा ली व व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय RBI ने घेतला।

निर्यातील होत असलेली घट (exports ), देशांतर्गत व्यापारात दिसत असलेली मंदी सदृश्य परिस्थिति(Slowdown ) , उत्पादकता निर्देशांका तील घट (Manufacturing Index Decline ), अनुत्पादक कर्जे (NPA)यांचे वाढलेले प्रमाण यामुळे नविन कर्ज निर्मिति साठी आलेली बंधने , ज्याला आपण "Consumption Trend " म्हणतो त्यामधे आलेली मरगळ हे भारतीय अर्थव्यवस्थेभोवती दाटलेले काळे ढ़गच । हे कमी म्हणुन की काय " Coronavirus " या नव्या विषाणुने घातलेले थैमान। चीन मधून सुरु झालेल्या या नवीन संकटाने आता जवळ जवळ २/३ जग व्यापले आहे। जागतीकरणाच्या काळात हे साहजिकच पण त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अधिकच गर्त्यात जात चालली आहे। पण म्हणतात ना "Every dark cloud has a silver lining". तो आशेचा किरण मला दिसतो "यंगीस्तान" मध्ये। व त्यांची फिलॉसोफी "YOLO ".

"यंगीस्तान" नावाची काय भानगड़ आहे असे जर वाटत असेल तर असे लक्षात आले की सध्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ५०% लोक हे २0 ते ४० वयोगटातले आहेत। आकड्याच्या भाषेत बोलायचे तर सुमारे ६० कोटी लोक या वयोगटातील असून ते "तरुणाई / Millennials / Generation Z " अशा विविध संज्ञांनी ओळखले जातात। ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट( २ times ) आहे ( अमेरिकन लोकसंख्या ३० कोटी ) अणि ग्रेट ब्रिटेनच्या ( आता लिटिल इंग्लंड ?) एकूण लोकसंख्येच्या दसपट ( १० times ) आहे (ग्रेट ब्रिटेन लोकसंख्या ६ कोटी). या तुलनेतून या संकल्पनेची व्यापकता आपल्या नजरेत भरते।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याला आपण समूहामध्ये( Cohort ) कैद करू शकतो । तसे करताना या समूहाकड़े आपण ग्राहक म्हणून बघितले पाहिजे अणि बाजारपेठ प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) तयार करून मग या यंगीस्तानला आचार -विचार , आवडी -निवडी , आशा -आकांक्षा , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करता येईल । यातून बाजारपेठेत आपले उत्पादन योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविणे सोपे जाईल।

"काशीस जावे नित्य वदावे " हे ब्रीद वाक्य जोपासणाऱ्या भारतीय मानसिकतेत " तीर्थयात्रा " म्हणजेच फिरणे असा साधा सरळ हिशोब होता। मनुजाला चातुर्य आणणारे जे काही घटक संस्कृत सुभाषितात सांगितले आहेत त्यामध्ये पण " केल्याने देशाटन " पहिल्या क्रमांकावर येते पण विविध कारणाने ते "तीर्थयात्रा" या संज्ञेपाशीच थांबते। आपल्या समाज जीवनात "Tourism " साठीचा खर्च हा गुंतवणुकीचा भाग नसून खर्चाचा (Discretionary Spending ) चा भाग होता। त्यासाठी कर्ज काढणे हे तर "अब्रम्हण्यमच "

"देश बदल रहा है " च्या धर्तीवर हे काही जुने ग्रह , सवयी , दृष्टिकोन हे बदलत आहेत। वर उल्लेख केलेला जो यंगीस्तान नावाचा "Cohort " आहे , त्या Millennials मधील २५-३० % लोकां ना( सुमारे १०-१५ कोटी ) असे वाटते की "Travel (प्रवास ) हे व्यावसायिक प्रगति , कौटुंबिक बंध जोपासणे अणि समाजातील आपली पत उंचावणे (Status Symbol ) यांचे प्रतिक आहे।

"Don't listen to what they say, go see" या चीनी म्हणीप्रमाणे अनुभव घेणे या लोकांना फार महत्वाचे वाटते। नुकत्याच एका टूर कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार समाज माध्यमे व त्याचे आकर्षण यातून "Unique Experience " व त्यासाठी मजबूत पैसे खर्च करण्याची तयारी हे या Millennials चे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल। कामानिमित्त असू दया किंवा कौटुंबिक सहल असू दया , वर्षातून ३०-ते ३५ दिवस यातील बहुतेक लोक प्रवास करत असतात किंवा करू इच्छितात। "Yolo " म्हणजे "You Only Live Once" हा नवा परवालीचा शब्द झाला आहे। त्यामुळेच असेल कदाचित "Package Tours " अणि त्याबरोबर येणारे आखलेल्या दिवसातील "sightseeing " असा रूढ़ प्रकार सोडून आता खास आपल्यासाठी बनविलेले प्रवास अणि त्यातील वेगवेगळे प्रकार आता रूढ़ होत चालले आहेत।

कधी त्यामध्ये "सिसीली , इटली मधील Mt Etna येथील hiking असते तर कधी साउथ अफ्रिकेतील "Bloukrans " पुलावरून करायची "Bungee Jumping " असते। कुठे मलेशियातील "क्लोरल फ्लायर " येथील दोन बेटांच्या दरम्यानची "Zipline " एन्जॉय करायची असते। कुणाला फ़िनलैंडमधील इगलू टेंट खुणावत असतो तर कुणाला khaoYai , Thailand मधील बबल स्टेची मजा लुटायची असते। कुणाला "डिजिटल डीटॉक्स " चे वेड असते , तर कोण फ़ूड टूरिस्ट असतो।

थोडक्यात काय " रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी " हा जो गोड अभंग आहे। तिथे भक्ताला विठ्ठल दर्शनाने लोचनांना सुख मिळालेले असते इथे लोचनांना सुखावणारी ही वर वर्णन केलेली असंख्य रुपे। दर्शन या संकल्पनेमध्ये पाहिले किंवा भेटले या नैसर्गिक कृतीबरोबर "आज अचानक गाठ पडे " मधील "अचानकता " ही पण तितकीच मोलाची आहे। त्यातून येणारा अनुभव हा YOLO संकल्पनेशी घट्ट जुळणारा आहे।

आता याचा अणि भारतीय अर्थव्यवस्थेचा काय संबंध असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येईल।

"Travel आणि Tourism(पर्यटन )" हा एक विभाग(सेक्टर ) म्हणून वर्षाला २४० बिलियन डॉलर म्हणजे साधारणत: भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १०% वाटा निर्माण करत असतो। ४ कोटी २० लाख रोजगार निर्माण करतो जो उपलब्ध आकड़ेवारीनुसार एकूण रोजगार निर्मितीच्या ८% आहे। २०१८-१९ च्या माहितीनुसार भारतीय लोकांनी १८२ करोड इतक्या ट्रिप देशांतर्गत पूर्ण केल्या आहेत। सुमारे ५०-६० कोटी लोक विविध कारणाने प्रवास करत असतील अणि परतीचा प्रवास वजा करून हिशेब लावला तर माणसागणिक १.५ वेळा आपण सर्वांनी वर्षभरात प्रवास केलेला आढळतो। देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की भारतीयांनी किमान ५ भारतातील पर्यटन स्थळांना वर्षातून एकदा भेट द्यावी। "खूपच चांगले पण अंमलात आणायला खूप कठीण " उद्दिष्ट असे त्याचे वर्णन बऱ्याच लोकांनी केले। सध्याच्या सरासरी १.५ वेळा पासून मोदीजींसाठी अणि पर्यायाने देशासाठी जर आपण मनावर घेतले तर सरासरी ३ वेळा जरी प्रवास केला तरी देशांतर्गत "Travel आणि Tourism " मधून निर्माण होणारे उत्पन्न दुप्पट होईल। त्याचा सरळ संबंध त्यातून निर्माण होणाऱ्या अर्थकारणाशी आहे अणि रोजगार निर्मितीशी आहे।

संपन्न भारतीय परंपरा , खण्डप्राय देश असल्यामुळे लाभलेली नैसर्गिक अणि सांस्कृतिक विविधता , खुप सुरेख अणि विविधतेने नटलेली खाद्यसंस्कृति , मेडिकल Tourism साठी लागणारी संसाधनची उपलब्ध्ता , रस्ते अणि हवाई वाहतुकीच्या पुरेश्या सुविधा , धार्मिक सहलीसाठी असलेली मुबलक ठिकाणे हे असे सर्व असताना पटकन मनावर घेऊन करून टाकता येईल (ज्याला आपण Low Hanging Fruit म्हणतो ) असा खरे तर हा विषय आहे। Unesco च्या अहवालनुसार हेरिटेज साइट्स मध्ये भारत जगात ६ व्या क्रमांकावर आहे। सांस्कृतिक वारसा विभागात ९ व्या , तर नैसर्गिक साधनसंपत्ति मध्ये २४ व्या स्थानावर आहे। किफायतशीर प्रवास ठिकाणांमध्ये १० व्या क्रमांकावर आहे। पण दुर्दैवाने हे सर्व Potential या सदरात मोडणारे आहे।

पण या सेक्टर कड़े कधी Priority म्हणून लक्ष दिले गेलेले नाही। त्यामुळे जगातील प्रवास योग्य १३६ देशात प्रवास सुरक्षा या सदरात भारत ११४ आहे किंवा आरोग्य /टापटिप पणा यात १०४ आहे। व्यवसायासाठी प्रवास सदरात ८९ वा अणि प्रवास साठी किफायतशीर (वरील मुद्दे धरुन ) ५४ वा आहे।

पायाभूत सुविधांचे जाळे, प्रवासांसाठी रहाणे अणि खाणे यासाठी सुविधा अणि जो समृद्ध , विविधतेने नटलेला सांस्कृतिक , नैसर्गिक वारसा आहे त्याचे उत्तम मार्केटिंग जरुरी आहे। हिमालयातील "Hiking " असेल किंवा केरळ मधील "floating Cottages " असतील , उत्तराखंड मधील चार धाम यात्रा असेल किंवा "Tent Stay " असेल , गुजरात मधील "Statue of Unity " असेल किंवा अंदमान मधील "Scuba Diving " असेल " चुकोनि उदंड आढळते " असे समर्थांनी म्हटल्याप्रमाणे या सर्व जागा वर उल्लेखलेल्या YOLO संकल्पनेला समृद्ध करणाऱ्या आहेत म्हणून त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे। ज्याला आपण "Outbound " प्रवास म्हणतो तो म्हणजे भारतीय लोकांनी परदेशी केलेला , त्याचे प्रमाण ५ कोटी एवढे आहे अणि त्यातील २०% म्हणजे १ कोटी लोकांनी जरी देशांतर्गत एखादा प्रवास केला तरी त्या सहभागातून निर्माण होणारी चळवळ अर्थपूर्ण ठरेल।

जागतिक अनिश्चितता, " Corona वायरस " ची भीति अणि घसरणारे अर्थकारण यातून सावरण्यासाठी हातभार लावण्याची ताकद देशांतर्गत पर्यटन क्षेत्रात नक्कीच आहे। ते प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज आहे ती " नवीन कल्पना , लोकसहभाग अणि करत्या राजकारणी लोक "या वर उल्लेख केलेल्या त्रिसूत्रिची।

"सृष्टी मध्ये बहु लोक / परिभ्रमणे कळे कौतुक " असे समर्थ सांगून गेलेच आहेत। आता गरज आहे ते अंमलात आणण्याची।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटी एक लेख कुणीतरी लिहीलाय ज्यात नुसत्या समस्यांवर रडगाणे गाण्या ऐवजी एखादा उपाय सुचवून त्या उपायाची उपयुक्तता किती याची माहितीदेखील दिलीय. धन्यवाद !
अशा माणसांची आणि लेखांची देशाला गरज आहे.

छान लेख!
मला वाटतं भारत जगातील एक नंबरची अर्थव्यवस्था बनला. प्रत्येक भारतीय नागरिक कोट्याधीश झाला तरीही रस्त्यावर थुंकणे, कुठेही मलमुत्र विसर्जन करणे, कचरा कचरापेटीत न टाकणं, वाहनं वेगाने चालवून रहदारीचे नियम मोडणं हे थांबत नाही तोपर्यंत कशाला काही अर्थ नाही. महिलांना स्वच्छ व जागोजागी स्वच्छतागृहे नाहीत. शहरातील नाले दुर्गंधी पसरवत आहेत आणि वरून पर्यटकांचा बोजा पडला तर काय होईल? लोकसंख्या नियंत्रण होत नाही तोवर मोदी सरकार पुरं पडू शकत नाही असे वाटते.

भारता सारख्या विविधतेने नटलेल्या देशात पर्यटनाला नक्कीच चांगला वाव आहे !
श्रुष्टी पर्यटन : भारत असा मोजक्याच देशा पैकी एक आहे जिथे गोवा , केरळ सारखे बीच व कुलु मनाली सारखे बर्फाच्छादीत ठीकाणे आहेत,
धर्म पर्यटन : फार पुर्वेचे लोक भारताला बुद्धाचा देश म्हणुन ओळखतात व भारताला भेट देउ ईच्छीतात. तसेच ख्रिच्शन व ईस्लाम साठीही भारत एक आकर्षण आहे.
भारताच चांगल मार्केटींग करण्याची गरज आहे. त्याच बरोबर ईथे किमान स्वच्छता, सुव्यवस्था, चांगला ट्रांस्पोर्ट , चांगली विमानसेवा, विमानतळे पाहीजेत !!

लोक सहभाग अणि उत्तम मार्केटिंग यातून पर्यटनाला नक्कीच उभारी देता येईल .

माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ते चौधरी यात्रा कंपनीचं. सुरुवातीला अतिशय कमी साधनांनी सुरुवात करुन सामान्यातील सामान्य माणसाला परवडेल अशा दरात उत्तम प्रवास व निवास व्यवस्था पुरवून मोठी झेप घेतली आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक चौधरी यात्रा कंपनीला पहिली पसंती देतात. प्रत्येक शहरात यांचं छान नेटवर्क आहे.

YOLO

You only live once

हे तर चार्वाक आजोबांचे तत्व

माझं निरीक्षण. पुर्वी आपण कधीही न कळवता नातेवाईकांकडे मुक्कामी राहण्यास जात होतो. पाहुणे आले तर घरातील सर्व आनंदाने ठेवून घेत व आजूबाजूच्या परिसरातील लोकप्रिय स्थळांवर फिरायला नेत. आजकाल स्पेसचं स्तोम माजले आहे त्यामुळे पाहुण्यांकडे न उतरता हॉटेलात लोक उतरतात. कित्येकदा घरी आलेल्या पाहुण्यांना बाहेरुन मागवलेले जेवण वाढतात.
गोवा सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन दिले, मुलभूत सुविधा पुरवल्या वगैरे.. पण तेथील स्थानिक लोक लवकरच अल्पसंख्य होतील आणि परप्रांतीय जास्त होतील असं मला वाटतं. स्थानिकांच्या संस्कृती, पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

तुम्ही ते पूर्णविराम न देता हिंदी सारखे दंडे देत लिहीता ते काही आवडत नाही. वाचनामधली पूर्ण मजाच निघून जाते.

चिडकू, ट्रम्प ला गांधीजींचा दाखवला ना रे पुतळा आणि चरखा? मग बास झालं की..

मजेची गोष्ट म्हणजे वल्लभभाई पटेलांची सामर्थ्यवादी शिकवणूक सगळे जग पाळते, पण गांधीजींची शिकवणूक त्यांच्यावर मालकी हक्क दाखवणारेच पाळत नाहीत Lol