अरबाज खान फॅन क्लब

Submitted by कटप्पा on 20 February, 2020 - 13:54

अरबाज खान च्या अभिनयावर आणि त्याच्या चित्रपटांवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
तुम्हाला अरबाज का आवडतो , नक्की कोणत्या चित्रपटापासून तुम्ही फॅन झालात वगैरे वगैरे...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक काळ होता जेव्हा युसुफ खानसारख्या कसलेल्या अभिनेत्यालाही लोकाश्रय मिळावा म्हणून दिलीपकुमार हे दुसरया धर्माचे नाव घ्यावे लागले होते.
आज शाहरूख खानने ख ख खख खान फ्रॉम एपिग्लॉटीस या नावाला ईतके ग्लॅमर मिळवून दिलेय की चुटूरपुटूर खानही कौतुकाने आणि अभिमानाने हे नाव मिरवतात.
माय नेम ईझ खान हे एक ब्रांड नेम झाले आहे हिंदी चित्रपटसृष्टीत !

Arbaaz maiaika coffee ad. They really looked loved up. Blessed with good physique. Handled divorce wisely now moved on with a pretty girlfriend. His role of kajols brother was good in a movie with a long name Happy

अमा, तो चित्रपट जब प्यार किया तो डरना क्या.. अरबाज म्हटले की तोच एक आठवतो
या चित्रपटात मला सलमान खान आजवर सर्वात जास्त आवडला. आणि एक मैने प्यार किया चा कोवळा सलमान

हेच बाकी होते... उद्या स्वप्नील जोशी फॅन क्लब काढाल...
तुमचा दोष नाही.. इथे ललित प्रभाकर आणि शिव ठाकरे फॅन क्लब आहेत... अरबाझ ने काय घोडे मारलंय ...

उद्या स्वप्नील जोशी फॅन क्लब काढाल
>>>>
ऑलरेडी आहे..
माझ्या स्वप्निलच्या लेखावर ७००-८००. प्रतिसाद झालेले. पण काही समाजकंटकांनी गोंधळ घातल्याने ॲडमिनने धागा वाहता केला Sad

मला चंद्रकांत सूर्यकांत आवडतात. ते ब्रॅण्ड नव्हते.
ब्रँड चे म्हणाल तर मला प्रोक्टर अँड गंबल, युनिलिव्हर हे फार भारी वाटतात. ते वस्तू विकतात. मी त्या वस्तू कंझुम करतो.

माझ्या स्वप्निलच्या लेखावर ७००-८००. प्रतिसाद झालेले. पण काही समाजकंटकांनी गोंधळ घातल्याने ॲडमिनने धागा वाहता केला Sad>>>> Proud माझा नंबर पहिला आहे समाजकंटकात. Biggrin

इथे ललित प्रभाकर आणि शिव ठाकरे फॅन क्लब आहेत... अरबाझ ने काय घोडे मारलंय ...>> च्रप्स, बहुसंख्य महिला वर्गाचा श्राप लागेल तुम्हाला, जपून! Happy

माझा नंबर पहिला आहे समाजकंटकात. Biggrin
>>>>>

समाजकंटकांचेही ऊसूल असतात...... लेडीज फर्स्ट !

आणि स्वप्नील बाबत महिलांना कॉम्प्लेक्स येतोच. कारण तो त्यांच्यापेक्षा गोड दिसतो Happy

स्वप्नील जोशी म्हणजे तेच ना आपले पुण्याचे महाग्रु.
>>>>
पाप पुण्याचे हिशोब मी करत नाही... पण
स्वप्निल म्हणजे तोच जो आपल्या मायबोलीवूडचा शाहरूख खान म्हणून ओळखला जातो. आणि जो स्वत:ही त्याचा प्रचंड मोठा चाहता आहे !

मायबोलीवूडचा शाहरूख खान म्हणून ओळखला जातो. >> हे आपणाव्यतिरिक्त इतर कुणाचे मत आहे बरे? कि आपण स्वतःस मायबोली समजत आहात? अर्थात, इथे एकास झाकावे आणि दुसरऱ्यास काढावे इतपत दोघे किंवा तिघे फालतू आहेत, त्यामुळे आक्षेप त्याबद्दल नाही, पण मायबोलिवुडचा शाहरुख किंवा कुणीही ठरविणारे आपण कोण?

अजिंक्यराव गल्लत होतेय.. मायबोली वेगळी मायबोलीवूड वेगळा... मायबोलीवूड म्हणजे मराठी इंडस्ट्री असे म्हणतोय ऋन्मेशzzz

च्रप्स +७८६
हॉलीवूड बॉलीवूड टॉलीवूड तसेच मराठी आपली मायबोली म्हणून मराठी चित्रपटसृष्टी मायबोलीवूड...

बाकी मायबोलीचा शाहरूख तर मी स्वत:ला समजतो ना, स्वप्निलला कश्याला बोलेन Happy

बाकी अजिंक्यराव यांना दुसरया कोणाला समजायचे असेल तर माझी हरकत नाही किंवा मी हरकत घेणारा कोण हे सुद्धा नमूद करतो Happy

Pages