या पिशव्यांच करायचं काय?

Submitted by रंगराव on 17 February, 2020 - 12:03

जैविक अन् विघटनशील कचर्याच्या व्यवस्थापनाच्या पर्यायी उपाययोजना आता समाजात मुळ धरु पाहतायेत. पण प्लास्टिकच्या बाबत मात्र आपण बरेचसे परावलंबी आहोत. रोज राज्यात एक कोटी दुधाच्या पिशव्यांची विक्री होते. रोज दुधाच्या पिशव्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर येत असतो. हा कचरा विविध नाले गटारे आणि इतर ठिकाणी साचून राहिल्याने बर्‍याच परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की या पिशव्या केरातून त्यांच्या पोटात गेल्याने भटक्या प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो, केरातून काही महाभाग या पिशव्या गटारी मध्ये टाकतात ,गटारी ,ड्रेनेज तुंबतात,अनारोग्य उद्धभवते. काही ठिकाणी एकीकडून कचरा गोळा करायचा आणि दुसरीकडे ओतायचा हे धोरण आहे. याने समस्या फक्त नजरेआड होते.

दुधाची पिशवी फाडतांना त्यांचा कोपरा काढायच्या ऐवजी फक्त कट मारला पाहिजे. छोटे प्लास्टिक चे कोपरे कचर्यात सापडले त्याचा पुन:र्वापर करता येत नाही व सागरी जीवनही धोक्यात येते.

मागच्या वर्षापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी "दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची तसेच ग्राहकांनी दुधाची रिकामी पिशवी परत केली तर, प्रत्येक पिशवी मागे त्यांना ५० पैसे देण्यात येतील" अशी घोषणा केली.

माझ्याकडे साचलेल्या तब्बल सहा महिने कालावधीतील दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवुन जमा करुन ठेवल्यात. स्थानिक दुकानात चौकशी केली पण नाही परत घेतल्या त्यांनी, प्रत्येक पिशवी ५० पैसे परत करणे ही गोष्ट तर दूरच राहिली, आमच्याकडे अद्यापि तशी काही व्यवस्था नाही म्हणाले. व्यावसायिक पातळीवर राज्यभरातील बहुसंख्य डेअरी चालकांशी संपर्क आहे, पण तेथेही अंधारच आहे.

कचरा व्यवस्थापनाच्या *3R* पैकी वापर कमी करणे (Reduce), पुनर्वापर करणे (Reuse) या आपल्यापुरत्या स्वांत्यसुखाय विकल्पांसोबत *Recycle* म्हणजे प्रक्रिया करण्याची यंत्रणा कोणाची, कुठे, कशी कार्यान्वित आहे याबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन अगर खाजगी पातळीवर कुठे काही प्रकल्प सुरु असल्यास सोबत दिलेल्या संपर्कमाध्यमाद्वारे अवगत करावे, ही विनंती.‍‍‌

डाॅ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे, नाशिक
सामाजिक आरोग्य सल्लागार,
सचिव- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन
vcdatrange@live.com
942 229 2335

Group content visibility: 
Use group defaults

टेट्रा पॅक रिसायकलेबल आहे असे गुगलवर दिसते.
त्यात २०% प्लास्टिक असते.
पण ७५% कागद असतो तो झाडांपासून येणार, तेव्हा पर्यावरणावर काय परिणाम होईल हे सुद्धा बघावे लागेल.

एक आहे.आपल्याला कितीही वाटलं तरी प्लॅस्टिक आपल्या जीवनाचा बराच मोठा भाग होऊन बसले आहे.
प्लॅस्टिक बंदीच्या काळात हॉटेल ना अल्युमिनियम कंटेनर आणि प्लॅस्टिक पिशव्या बंद केल्या.काही दिवस अगदी लोकांनी घरून डबे पण नेले पार्सल ला.मोठ्या हॉटेल नी फूड ग्रेड प्लास्टिक चे डबे देऊन कायद्यात राहून गिर्हाईकाना जास्त बिल लावले.लहान हॉटेल्स ना हे न परवडल्याने काही काळ पार्सल चा धंदा कमी झाला.सध्या बाहेर ब्राऊन पेपर बॅग आणि आत अल्युमिनियम फॉईल कोटेड पिशवी असा सोयीस्कर कायदा पाळलेला दिसतो.
दुधासारखा पदार्थ दुकानात ठेवायला, शेल्फ लाईफ वाढवायला 'प्लास्टिक नाही तर दुसरे काय' हा प्रश्न येतोच.पूर्वी पिक्चर मध्ये दाखवायचं तश्या काच बाटल्या सध्या शक्य नाहीत.वाहतुकीत फुटल्यास नुकसान, रिसायकल न केल्यास जागा व्यापी कचरा, कोणी कचऱ्यात चुकीच्या प्रकारे टाकल्यास कचरा गोळा करणाऱ्याना इजा.
मला स्वतःला दुधाच्या पिशवीला तसा आडवा कट दिलेला अजिबात आवडत नाही.दूध वेडं वाकडं पडतं भांड्यात काढताना.पण कोपरा कचऱ्यात जाईल हे पटतं.मग तो कापलेला त्रिकोण पिशवीत टाकून पिशवी नीट घडी करून कचऱ्यात टाकते.
घरातला 100% ओला कचरा, भाज्या, सफरचंद खाली मिळणारे पुठ्ठे बारीक तुकडे करून कंपोस्ट होतात.धान्य वाल्या प्लास्टिक पिशव्या टाकाव्या किंवा भंगार मध्ये द्याव्या लागतात.

"प्लास्टिक कमी" मला पटतं.पण यातून जो कंव्हिनियन्स गमावला जातो ते पटत नाही.नीट पर्याय शोधले नाहीत आणि नुसतीच बंदी आणली तर आपण "बगूकाकांचा फिरकीचा तांब्या गाडीत कलंडला आणि सगळ्यांच्या पायाला चिखल झाला" वाल्या जुन्या काळात परत जाऊन पोहचू.

मी अलीकडे ( एक-दीड वर्षांपासून) दुधाच्या पिशवीला आडवा कट देऊन न सांडता दूध ओतायला शिकले आहे. एखादवेळी सांडतं मात्र अजूनही.
काचेच्या नाही, पण प्लास्टिकच्या मजबूत, खूप वेळा वापरता येतील अशा बाटल्या दुधासाठी तयार नाही का करता येणार?

प्लास्टिक पूर्ण टाळता येत नाही याच्याशी सहमत.

तांदूळ, तूर-मूग-उडीद डाळी, साखर इत्यादी गोष्टी 'मोअर' मध्ये सुट्या मिळतात, कागदी पिशवीत भरून आणते. ( नंतर त्या कागदी पिशव्यांंचं काय करायचं असा प्रश्न पडतो Wink त्यातल्या काही पिशव्या मी कंपोस्ट त्यात भरून विकण्यासाठी वापरते )

मी दोन लिटरची स्टेनलेस स्टीलची किटली विकत घेतली आहे. आमच्या कडे सकाळ संध्याकाळ नाक्या नाक्यांवर दुध विक्रेते बसलेले असतात. बहुतेक लोक त्यांच्याकडून अतिशय पातळ प्लॅस्टिक पिशव्यांत दूध घेऊन जातात. धागा लेखकाने स्वत: पुरता बदल केला असता तर पिशव्यांचं काय करावे हा प्रश्न पडला नसता.
स्वत: पासून बदलाला सुरुवात करायची नाही आणि उगाच आरडाओरडा करून काय उपयोग?

Disposal of plastic is very sensitive issue. The plastic waste generated at every house today can be segregated and recycled rather it should be separated and recycled. One time use plastic which can not be circulated any more is the plastic used as a wrapper of biscutes,maggi kurkure etc. But the thicker one can be further recycled directly or processed and can be recycled. One time used plastic can be converted to the fuel like methanol while the thicker one may be shreded and the granuels csn be used in tar roads, slippers below ths rails or the new pkastic items can be made out of it.
Recently Kalyan Dombivli Municipal Corporation used plastic granuels in a tar road on experimental basis.

प्लॅटिकचा वापर रस्ते तयार करण्यासाठी सुरु झालाय. प्लास्टिक मिसळलेले रस्ते आधी टिकाऊ आणि पाणी शोषून घेणारे आहेत. भारतातही सध्या याचा वापर वाढतोय. जर मोठ्या प्रमाणात याबाबत जनजागृती होऊन अगदी छोट्या ठेकेदारापर्यंत याचा वापर वाढला तर थोड्याफार प्रमाणात का होईना ही समस्या आटोक्यात येऊ शकते. परंतु सामान्य माणूस यासाठी काय करू शकेल याबाबत कल्पना नाही.

https://www.youtube.com/watch?v=MbgU7Ox4jZM

In evry house all type of plastic need to separated from other domestic waste. Every house should work on it on a micro level such that even the pen refill small chocklate wrapper need to b separated. This is a major job of a common man. The next step it to dispose this plastic such a way that it reaches the recycler and it shouldnt get disposed ss other dry waste.

It does not take more than a week to get habitual to separate plastic waste.
In dombivli we have used the chain of ' kachara vechak' and ' raddi wala' . The separated plastic is an earning opportunity to these communities provided we dont expect any thing from them in return. So now whatever we were throwing in dustbin and ultimately adding to the dumping ground (for free) is now earning for them.

This method is getting succesful in dombivli.
If anyone is interested can talk to me k 9833933857

कागद आणि प्लास्टिक दोन्ही वेगवेगळे साठवून, प्लास्टिक स्वच्छ करून आपण नेहमीच रद्दीवल्याला देऊ शकतो.

@suhrud he wont take one time use plastic i.e. the kurkure wrappers, biscuites wrappers or for that matter even the plastic carry bags we get from vegetable vendor. For this we need to take some extra efforts. The oil cans or the plastic bags having thickness of more than 50 microns are easily accepted by him. If one time use plastic is given to him forcefully he ultimately throws in garbage so ultimately it fails the purpose.

वृषाली, मराठित पोस्ट लिहाल काय?
इतका मोठा इंग्लिश कंटेंट मराठी साईटवर वाचताना स्विचिंग मुळे गोंधळ होतो आहे.
ज्या मायक्रो लेव्हल चं सॉर्टइंग तुम्ही म्हणताय ते पटतंय.पण सर्व जनतेला पटवणे अती कठीण.सध्याचा एम जास्तीत जास्त लोकांनी असं सॉर्टइंग इतका पुण्यात ठेवला तरी भरपूर आहे.
(अवांतर,तुमच्या पोस्टशी संबंधित नाही: कंपोस्ट करता येण्याजोग्या पांढऱ्या प्लास्टिक पिशव्या, ज्यात मॉलमध्ये वजन करून भाजी घेतो त्या कंपोस्ट मध्ये इथे तिथे अडकतात.तुकडे करून टाकायचे म्हटल्यास वेळ लागतो.पांढऱ्या रंगामुळे कंपोस्ट मध्ये घाण दिसतात.सुपर डेली वाले सध्या फळं पण पुरवतात.3 सफरचंद मागवले तर प्रत्येक सफरचंद 1 पिशवी, आणि मग सगळी मिळून एक मोठी पिशवी अशी येतात.त्यांना वाहतुकीत, घाईत होणाऱ्या नुकसानामुळे ही स्टेप घ्यावी लागली.हल्ली असं वाटतं की प्लास्टिक नको पेक्षा प्लास्टिक जमा करुन घेणारी केंद्र जागोजागी काढावी.1 किलो प्लास्टिक वर एक सिगारेट पॅक/एखादा शाम्पू/दारूची बाटली /बिस्कीट पुडा असं काही फुकट द्यावं.लोक गोळा करून आणतील.नियम मोडण्यासाठी मोटिव्हेशन भरपूर आहेत.त्या टीचर फुटपाथवर उभं राहून फुटपाथवर दुचाकी चालवणाऱ्याना अडवत होत्या तर त्यावर अनेक yz लोकांचे 'रस्ता लहान आहे ट्रॅफिक आहे म्हणून फुटपाथवर जावं लागतं' असे मेसेज आले आहेत(जसं काही 3 मिनिट यांना ट्रॅफिक मध्ये थांबावं लागलां तर मंगळयान मिशन थांबणार आहे. नियम पाळण्यासाठी मोटिव्हेशन आणि इंसेंटिव्ह द्यायला लागणार आहेत.जसं वेळेच्या आधी mseb बिल भरल्यास सवलत मिळते तसे.))

मी माझ्या मते रूट लेव्हल म्हणजे माझ्या घरीच वर लिहीलय तस खूप सॉर्टींग करते.
दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून वेगळ्या साठवते . मग एक दिवस रद्दी वाल्याला देते. रद्दी पेपर वेगळे ठेवते . कुरिअरचे बॉक्स वेगळे असतातच.
ONe time use म्हणजे बिस्किटचे कागद, औषधांच पॅकिंग, तेलाच्या पिशव्या, वेफर्स चिवड्याच्या पिशव्या आणि अस अनेक प्रकारचं प्लास्टिक एका पिशवीत वेगळं ठेवते. वाण्याच्या सामानाच्या पिशव्या , भाजी आणली असेल तर त्या पिशव्या , बबल रॅपर वैगेरे वेगळ ठेवून शक्यतोवर reuse करते. अन्नाच्या कचऱ्यात प्लास्टिक नसत.

नियम पाळण्यासाठी मोटिव्हेशन आणि इंसेंटिव्ह द्यायला लागणार आहेत.जसं वेळेच्या आधी mseb बिल भरल्यास सवलत मिळते तसे.)) +१

ममो, छान सॉर्ट आहे.
मी फक्त 'ओला कचरा+कागद+पुठ्ठे कंपोस्ट बिन आणि बाकी सर्व प्लास्टिक साध्या कचऱ्यात' इतकंच पाळते.तरी कचरा खूप कमी झाला.प्लास्टिक बरण्या आणि काच बरण्या असा ढीग आहे तो भंगार वाल्याला घ्यायचाय.

मराठी त लिहायला प्रचंड वेळ लागतो. असो. मनीमोहोर करतात तसच अ्एट सोर्स कचरा वर्गीकरण अत्यावश्यक आहे व ते खरतर कायद्याने बंधनकारक ही आहे परंतु तसे न होण्यामागे प्रशासनाची अनास्था हे एक मोठे कारण आहे.
सध्या डोंबिवली मधे प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह महानगरपालिकेच्या कडून चालवला जातो. एक प्लास्टिक बँक आहे तिथे कोणत्याही दिवशी आपल्या सोयीने जाउन आपल्या घरातील प्लास्टिक देउ शकतो. हे काम कचरा वेचकांकडून करून घेतले जाते. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या माध्यमातून जनजागृती, पालीकेचे रिसोर्सेस वापरून प्रशासनाला सस्टेनेबल सोल्युशन देण्याच काम आम्ही करतो.
घरातील सुक्या कचर्याचे कागद (वर्तमान पत्र सोडून चित्रपटाचे तिकीट ई.), काच, धातू, प्लास्टिक, ईलेक्ट्रोनीक वस्तू असे पाच भाग होतात. प्रत्येक घरात अशा पाच पिशव्या बनवायच्या आणि त्या प्रमाणे त्यात कचरा गोळा करायचा. यातील प्लास्टिक कचरा पिशवी खुप लवकर भरेल पण ईतर पिशव्या सहा महिन्यात देखील कदाचित भरणार नाहीत. पिशव्या भरल्यानंतर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता भंगार वाल्याला दिले तर तो नक्की घेतो. प्लास्टिक मधे मात्र नाँन रिसायक्लेबल प्लास्टिक चे त्या ला काहीच मिळत नसल्याने एकंदरीत प्लास्टिक ची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात.
ओला कचर्याचे घरच्या घरीच किंवा सोसायटी स्तरावर विघटन करता येते किंवा वेगळा केलेला ओला कचरा प्रशासनाच्या बायोगॅस सारख्या प्रकल्प त जाउ शकतो.
सँनिटरी पँड,डायपर या सारख्या कचर्यासाठी सोसायटी स्तरावर छोटे ईंसीनीरेटर किंवा मोठ्या काँलनी साठी कम्युनिटी ईंसीनीरेटर लावून या कचर्याची विल्हेवाट लावता येते.
यासाठी प्रशासन काय करु शकते आणि नागरिक काय करु शकतात हे एकदा ठरवलं की पुढील काम करायला वेळ लागत नाही।.