मराठी भाषा दिवस २०२० - आनंदछंद ऐसा

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 12:48

रोजच्या कामांच्या रहाटगाडग्यातून थोडासा विरंगुळा मिळवून देतो, तो छंद. ज्यातून मिळणार्‍या निखळ आनंदासमोर त्यासाठी घेतलेले कष्ट क्षुल्लक वाटतात, तो छंद! असा छंद जोपासताना आपला वेळ तर आनंदात जातोच, शिवाय आपल्या ज्ञानात, कौशल्यात भर पडत जाते. आपल्यासारख्याच इतर छांदिष्टांशी ओळखी होतात, मैत्र जुळतं, एकूणच या सगळ्यातून आपलं व्यक्तिमत्त्व समृद्ध होत जातं.

आपल्यापैकी खूप जणांना असा एखादा तरी छंद नक्कीच असतो. कुणी सुट्टी मिळताच डोंगर-किल्ले चढायला जातात, तर कुणी तासन्तास नेटाने बसून विणकाम, भरतकाम करतात. कुणाला नाणी जमवायला आवडतं, तर कुणाला परसबाग फुलवायला!

chand B.jpg

अशा या आपल्या जिवाभावाच्या सख्याबद्दल, आपल्या छंदाबद्दल लिहायला तुम्हाला नक्कीच आवडेल, हो ना?
चला तर मग, की-बोर्ड सरसावून लिहायला घ्या...आनंदछंद ऐसा..

लेख लिहिण्यासाठी शब्दमर्यादेची अट नाही.

या उपक्रमांतर्गत लेख लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना :

१. या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०२०' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०२०' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा.

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहा

आनंदछंद ऐसा- तुमचा आयडी

४. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

६. शब्दखुणा या बॉक्समध्ये ' मराठी भाषा दिवस २०२०' हे शब्द लिहा.

७. मजकुरात आपला लेख लिहा / कॉपी-पेस्ट करा.

८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा.
सार्वजनिक ( public- accessible to all site users) हा पर्याय निवडा. म्हणजे तुमचा लेख सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमचा लेख प्रकाशित होऊन सगळ्यांना
दिसू लागेल.

१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय
वापरून मजकुरात बदल करू शकता.

उपक्रम सुरु झाले आहेत. तुम्ही प्रवेशिका पाठवू शकता. त्या त्या धाग्यावर जाऊन माहीती पहावी.

'मराठी भाषा दिवस २०२०' हा '२७ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२०' हया काळात साजरा केला जाईल ह्याची सर्व मायबोलीकरांनी नोंद घ्यावी.

२९ फेब्रुवारी २०२० च्या रात्रौ १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) प्रवेशिका स्विकारल्या जातील.

सर्वजण ह्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. __/\__

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम. वाचण्यास उत्सुक.

माझ्या शब्दकोड्यांच्या छंदावर आधारित लेख मी नुकताच इथे ( https://www.maayboli.com/node/72730) केलेला असल्याने आता या सदरात काही लिहू शकत नाही.

धन्यवाद !

मायबोली हाच कित्येकांचा ईथे छंद असेल... माझाही दुसरया क्रमांकाचा छंद आहे. . यावर किंवा पहिल्या क्रमांकाच्या छंदवर विकेंडला वेळ मिळाल्यास लिहायला आवडेल...

नमस्कार जाई,

उत्तर देण्यास विलंब झाला त्याबद्द्ल दिलगीर आहोत.
उपक्रम सुरु झाले आहेत. तुम्ही प्रवेशिका पाठवू शकता. त्या त्या धाग्यावर जाऊन माहीती पहावी.

'मराठी भाषा दिवस २०२०' हा '२७ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२०' हया काळात साजरा केला जाईल ह्याची सर्व मायबोलीकरांनी नोंद घ्यावी.

२५ फेब्रुवारी २०२० च्या रात्रौ १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) प्रवेशिका स्विकारल्या जातील.

बर्‍याच मायबोलीकरांना विपू केल्या आहेत. कृपया आपले खाते चेक करावे. Happy
सर्वजण ह्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. __/\__

>>. ९)Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमचा लेख प्रकाशित होऊन सगळ्यांना
दिसू लागेल.
--
सर्वांना २८ तारखेला लेख दिसले पाहिजेत ना? का अगोदर?

अधिकाधिक मायबोलीकरांना उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी यासाठी सर्व उपक्रमांमध्ये प्रवेशिका पाठवण्याची मुदत २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढवत आहोत याची कृपया नोंद घ्यावी. Happy