घरगुती काल्पनिक साहित्यप्रकार - १

Submitted by ॲमी on 12 February, 2020 - 04:30

स्त्रियांनी, स्त्रियांसाठी, स्त्रियांबद्दल लिहलेल्या कथा-कादंबरींना घरगुती काल्पनिक (Domestic Fiction) या साहित्यप्रकारात गणले जाते.
यालाच घरगुती वास्तववादी किंवा भावनातिरेकी काल्पनिक किंवा स्त्रियांचे काल्पनिक असेदेखील म्हणतात.

१८२० ते १८७० या काळात मध्यमवर्गातील गोऱ्या स्त्रियांमधे हा साहित्यप्रकार फार लोकप्रिय झाला होता. इतका की द स्कार्लेट लेटरच्या सुप्रसिद्ध लेखकाने त्याच्या प्रकाशकाला पत्र लिहले होते "a damned mob of scribbling women मुळे माझी पुस्तकं कमी खपतायत". Lol Lol

कॅथरीन सेज्विकच्या New-England Tale (1822) या कादंबरीने या प्रकाराची सुरवात झाली असे समजले जाते. अठराव्या शतकात ज्या भावनातिरेकी काल्पनिक कथा लिहल्या जायच्या उदा The Man of Feeling (1771), The Vicar of Wakefield (1766), The Power of Sympathy (1789), त्यांचीच पुढील आवृत्ती म्हणजे या स्त्रीकथा म्हणता येईल. मनुष्यस्वभाव हा मूलतः चांगलाच असतो; भावना जर सच्च्या असतील तर त्यातून मिळणारे बळ तुम्हाला योग्य आचरण करायला भाग पाडते या विश्वासावर या कादंबर्याचे कथानक बेतलेले असायचे. कॅल्व्हनिस्ट सिद्धांताच्या विरोधी प्रतिक्रिया म्हणून या कथा लिहल्या गेल्या असेदेखील काहीजण मानतात.

दिवसभरातल्या घरगुती कामकाजातून किंवा त्या पार्श्वभूमीवर घडू शकतील अशा घटनांमधून, पौगंडवय-मध्यमवर्ग-गौरवर्ण असलेल्या नायिकेचा 'परिपूर्ण स्त्री' बनण्याकडे होणारा प्रवास दाखवणे हा या साहित्याचा मूळ ढाचा असायचा. स्वतःला सांस्कृतिकदृष्ट्या वरचढ समजणाऱ्या समाजाच्या, आपल्या स्त्रियांनी कुठे कसे वागावे याबद्दल ज्या अपेक्षा त्याकाळी असायच्या, त्या कोवळ्या मुलींवर बिंबवण्यासाठी या साहित्यप्रकाराचा वापर केला गेला. एकोणीसाव्या शतकातील सांस्कृतिक आदर्श जपणारी, प्रोटेस्टन्ट ख्रिश्चन मूल्यं असलेली, विशुद्ध-धार्मिक-घरेलु-लीनता वगैरे गुण असलेली, खरी आदर्श स्त्री (Cult of True Womanhood) घडवण्यासाठी हे साहित्य लिहले गेले.
===

या साहित्यप्रकाराचा सखोल अभ्यास समिक्षक नीना बायम हिने सर्वप्रथम केला. तिच्या मते या कथानकांचा ढाचा साधारण असा असतो
• नायिका तरुण मुलगी असते.
• आपल्या जीवनावश्यक गरजा आयुष्यभर पुरवणारे काहीतरी/कोणीतरी आहे या भरवशावर ती असते; तिने हे असे अध्याहृत धरणे बरोबर असते की चूक हा वेगळा मुद्दा. पण अचानक तो पुरवठा बंद होतो.
• त्यामुळे तिला या गरजा भागवण्याचा मार्ग स्वतःच शोधावा लागतो.
• आतापर्यंतचे आयुष्य घरात, सुरक्षित वातावरणातच घालवले असल्याने, बाहेरजगाचे टक्केटोपणे कधीच खाल्ले नसल्याने, सुरवातीला ती फारशी गंभीर नसते. एकतर 'स्व' नसतोच किंवा जागा झालेला, दुखावलेला नसतो. हे अक्खे जग आपले लाड करायला, आपल्याला सुरक्षित ठेवायलाच निर्माण झाले आहे किंवा अस्तित्वात आहे असा काहीतरी तिचा भ्रम असतो.
• तिच्या अपेक्षा अगदीच अवास्तव असतात असेदेखील म्हणता येत नाही, पण त्या गृहीत धरलेल्या असतात.
• पण तिथे अपेक्षाभंग झाल्यावर तिचा स्व जागृत होतो. आपला मार्ग आपणच शोधावा लागणार आहे हे तिला कळतं.
• कथेच्या शेवटी ती एक स्व-मूल्य जाणणारी परिपूर्ण स्त्री बनलेली असते. त्यामुळे ती स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा सतत उंचावत नेते, त्या पूर्णदेखील करते. तिच्यातील हा बदल पाहून जगाचा तिच्याविषयीचा दृष्टिकोनदेखील बदलतो. आधी जे तिला नाकारले गेले होते ते आता तिला न मागता मिळते.

बायमच्या मते कथा दोन वेगवेगळ्या प्रकारची असू शकते.
• एका प्रकारात नायिका गरीब, मैत्र नसलेली असते. ती शक्यतो अनाथ असते, किंवा आपण अनाथ आहे अशा समजुतीत असते, किंवा पालकांपासून बराच काळ दूर झालेली असते.
• दुसर्यात नायिका आधी लाडकोडाची श्रीमंत असते पण पौगंड वयाची झाल्यावर पालकांच्या मृत्यूमुळे किंवा त्यांच्या आर्थिक डबघाईमुळे हीदेखील गरीब, मैत्र नसलेली होते.
===

या साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये साधारण अशी होती:
१. नायिका एकतर देवदूत असेल नाहीतर व्यवहारचतुर स्त्री असेल किंवा दोन्ही असेल.
२. तिच्या अगदी विरुद्ध गुणांची दुसरी एक स्त्री असेल (शक्यतो नायिकेची आई किंवा एखादी गावंढळ अशिक्षीत स्त्री). आळशी, अक्षम, भेकड, अज्ञानी.
३. नायिका स्वतःच्या तारुण्यसुलभ आवेशांवर (passions) विजय मिळवते आणि प्रगल्भ स्त्री बनते. हा प्रवास वेदनेच्या मार्गे होतो.
४. स्वतःची स्वातंत्र्याची मूलभूत इच्छा आणि समाजाच्या 'आदर्श स्त्री'कडून असणार्या अपेक्षा यांचा सुवर्णमध्य नायिका साधते, शक्यतो धर्माचा वापर करून.
५. बळाचा किंवा सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांकडून नायिकेचा छळ होतो. मग ती समदुःखी लोकांना एकत्रित आणते.
६. आपल्या खऱ्या भावना व्यक्त करणे किंवा भावनातिरेकात वाहून जाणे ही स्त्रीसाठी सगळ्यात मोठी धोकादायक गोष्ट आहे हे वारंवार सांगितले जाते. स्त्रीने कशा स्वतःच्या भावना ताब्यात ठेवल्या पाहिजेत, ते तिचे कर्तव्य आहे, हीच खरी आदर्श स्त्री!
७. कथेचा शेवट खालीलपैकी एक प्रकारच्या लग्नाने होतो.
• वाईट किंवा जंगली पुरुष नायिकेला अपेक्षीत असा सुधारतो
• नायिकेला अपेक्षीत सगळे गुण आधीपासूनच असलेला खरा पुरुष मिळतो
८. वाचकांकडून सहानुभूती मिळावी म्हणून अश्रूंची भाषा वापरली जाते.
९. आर्थिकवर्ग आणि त्याचे चित्रण हादेखील एक महत्वाचा मुद्दा असतो. गरिबी, (आणि त्यामुळे असलेली) तितरबीतर परिस्थिती हा एक वर्ग आणि श्रीमंत, (आणि त्यामुळे) काही कामधाम नसलेला, उथळ हा एक वर्ग. नायिका किंवा आदर्श कुटुंब बरोबर या दोहोंच्या मधे असते.

जेन ऑस्टीन आणि एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग या साहित्यप्रकारच्या संस्थापक म्हणता येतील.
===

एन्सायक्लोपीडिया आणि वोशिंग्टन स्टेट युनिवर्सिटी वरील लेखांचा स्वैर अनुवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला लिटल वुमेन बद्दल सगळं आवडतं. त्यात असं काय रसायन आहे माहीत नाही.मेग ज्यो चा बिघडलेला स्वयंपाक, मीठ घालून नासलेले स्ट्रॉबेरी क्रीम, वरच्या मजल्यावर केलेली नाटकं आणि त्यात पडलेला पत्र्याचा मनोरा, स्वतःच्या बोलण्याने युरोप ट्रिप ची संधी गमावलेली ज्यो, स्टॉल मधलं गर्ल पॉलिटिक्स, ज्यो आणि प्रोफेसर भार चा वेगळा रोमान्स आणि वेगळे निर्णय, मध्ये मध्ये येऊन प्रॅक्टिकल सल्ले देणारी आंट मार्च.
लिटल वूमेन आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आवडते आणि रिलेट होते.

मी लिटल वुमेन चं भाषांतर लहानपणी वाचलंय. तेव्हा तरी खूप आवडलं होतं.

पण मला खरं म्हणजे ही चर्चा समजत नाहीये. एकोणिसाव्या शतकात बहराला आलेल्या इंग्रजी साहित्यातल्या एका विशिष्ट प्रकाराबद्दल बोलणं इथे अपेक्षित आहे, की या प्रकारच्या लेखनाचा मराठी counterpart शोभेल अशा लेखनाबद्दल? आणि हे लेखन स्त्रियांनी, स्त्रियांवर, स्त्री वाचकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं असलं पाहिजे का? की पुरुषांनी लिहिलेलं, पण स्त्रीकेंद्रित, स्त्री वाचकांसाठी असंही चालेल?
बहुतांश स्त्री वाचक आणि स्त्री लेखिका यांच्या अनुक्रमे वाचनाच्या आणि लेखनाच्या विषयांच्या आवडी आणि निवडी साधारण्पणे एकाच प्रकारच्या असतील ( आणि त्या पुरुषांपेक्षा वेगळ्याच असतील) का, यावर काही अभ्यास झाला आहे का?

इंग्रजी डोमेस्टिक फिक्शनबद्दलच्या काही लेखांचं मराठीत भाषांतर करावंसं मला वाटलं. सहजच.

प्रतिसादातली चर्चा कुठूनही कुठेही गेली तरी हरकत नाही Happy

Domestic Fiction याचा अनुवाद माजघरातील कल्पनाविश्व असा करता येइल का? लेख व चर्चा आवडते आहे.
___________
माझ्या एका मैत्रिणीची मुलगी या २१ व्या शतकात, 'ग्रुमिंग स्कूलस' ना गेलेली आहे. रिडीक्युलस वाटतं मला ते.

हे असले लेख नसावेत. इंग्रजी न जमणाऱ्या आमच्यासारख्याना फार वाईट वाटते.
एक पान वाचायला मला एक आठवडा लागेल. खरंच... अमी तुमचे कौतुक आहे.

सामो,
माजघरातील कल्पनाविश्व. हम्म. परवा दिवाणखान्यातील कथानक असा शब्ददेखील कुठेतरी पाहिला होता. बहुतेक ललिता-प्रितीने लिहलेला. मला Domestic चे दोन अर्थ दिसले कौटुंबिक आणि घरगुती. Family Saga सोबत गोंधळ होऊ नये म्हणून घरगुती शब्द वापरला.
अजून कोणाच्या काही सुचवण्या असतील तर सांगा. सगळ्या एकसाथ मॉडिफाय करेन.

ग्रुमिंग स्कुलबद्दल पहिल्यांदाच ऐकतेय. अंदाज आला काय असेल त्याचा. पण तू सविस्तर नवीन लेख लिहू शकते यावर. बरेच दिवस झाले काही लिहलं नाहीस Happy
===

च्रप्स,
Lol Lol सोप्पय इंग्रजी वाचणं, फक्त तीन टीप लक्षात ठेवायच्या
• क्लासिक, नोबेल, बुकर वगैरेनी सुरवात करायची नाही. त्यातलं इंग्रजी अवघड असतं
• आपला आवडता जॉन्रच निवडायचा. मिस्टरी, रोमान्स, चिल्ड्रेन हे जॉन्र उगाच विनाकारण लोकप्रिय झालेले नाहीयत. ते सोप्या भाषेत असतात.
• आपला उद्देश चांगल्या कथा वाचणे हा आहे, शब्दसंग्रह वाढवणे हा नाही. एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर पुस्तक बाजूला ठेऊन लगेच डिक्शनरी उघडून बघत बसायचं नाही (इ-पुस्तकं वाचत असाल आणि तिथेच इनबिल्ट डिक्शनरी असेल तर ठिकय). तसंच पुढे जायचं. आधीचं वाक्य, नंतरचं वाक्य यांच्यामुळे अवघड शब्द आलेल्या वाक्याचा अर्थ साधारण लक्षात येतो, तेवढा पुरेसा असतो. प्लॉटलाईन आणि इमोशनल अंडरकरन्ट यावर लक्ष केंद्रित करायचं, शब्दांवर नाही.

पुस्तक बाजूला ठेऊन लगेच डिक्शनरी उघडून बघत बसायचं नाही>>>>> शाळकरी वयात " रिबेका"ची १-२ पाने वाचताना मी, डिक्शनरी उघडून पहायचे.त्यामुळे ८ दिवस लागले.वाचताना कंटाळा आला होता.मग आईने सरळ वाचत रहा,आपोआप अर्थ समजेल म्हटलं होते.खरंच कादंबरी पटकन वाचून झाली.पण त्यानंतर मात्र फारशी इंग्रजी पुस्तके नाही वाचनात आली

Cuty+1

>>माझ्या एका मैत्रिणीची मुलगी या २१ व्या शतकात, 'ग्रुमिंग स्कूलस' ना गेलेली आहे. रिडीक्युलस वाटतं मला ते.>>
आजच्या काळासाठी फिनिशिंग स्कूल हे रिडीक्यूलस का वाटते? हल्ली स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फिनिशिंग स्कूल/ एटीकेट क्लासेस असतात. तुम्हाला कामाचा भाग म्हणून एका विशिष्ठ गटात वावरावे लागणार असेल तर त्या गटात वावराचे नियम माहिती असणे हिताचे नाही का? असे नियम शिकणे, त्याचा सराव करणे घरगुती पातळीवर शक्य नसेल तर क्लास लावून शिकणे ठीक आहे की.

डोमेस्टिकचे भाषांतर यासंदर्भात घरगुती असे करण्याऐवजी कौटुंबिक असे करणे जास्त चपखल होईल का?

माफ करा पण भाषांतर खूप कृत्रिम वाटल्यामुळे मुद्दा मला तरी नीट पोचला नाहीये. परत वाचून बघेन.

डोमेस्टिक आणि डोमेस्टीसीटी यासाठी घरगुती आणि कौटुंबिक हे दोन्ही शब्द योग्य नाहीत. त्यातल्या त्यात घरगुती हा शब्द जरा संकल्पनेच्या जवळ जातो. त्यामुळे मी कायम मूळ इंग्रजी शब्दच वापरतो. इत्यादीच्या लेखातही मी डोमेसटीसीटी आणि डोमेस्टिक हेच शब्द वापरले आहेत.

एरवी तू म्हणतोस ते योग्यच आहे. पण ज्या प्रकारच्या मराठीतल्या लेखनाची चर्चा चालू आहे इथे ते बघता कौटुंबिक शब्द जास्त योग्य होईल की काय असे वाटले इतकेच.

कोणाकडे वेळ, इच्छा असेल, आपण जास्त नीट भाषांतर करू शकू असे वाटत असेल, प्रयत्न करून बघायचा असेल तर वर लेखात लिंक दिलेल्या आहेत.
एन्सायक्लोपीडिया वरचा लेख मूळ आहे. तो मराठीत आणायचा आहे.

Pages