निर्मोही

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 February, 2020 - 09:22

भव्य देखणा दणकट तू वटवृक्ष
घरटी तुझिया फांद्यांवरती लक्ष
तुझ्याच आम्ही फुटलेल्या पारंब्या
मूळ म्हणा वा खोड, म्हणा काहीही

पाय रोवले, विराटसे हे बाहू
उन्मळणा-या सावरती वेलींना
आश्रय देतो येणा-या जाणा-या
पडो उन्हे वा पडो वादळी गारा

मनात माझ्या चित्र रेखते ह्याचे
अपुरे पडती चितारण्याला रंग
उपमा देवू कशा-कशाची ह्याला
पडे तोकडा शब्दांचा व्यासंग

निळ्या नभाची ओढ अव्हेरुन नित्य
कैक टाळतो निमंत्रणे रस्त्यांची
निर्मोही अन् तत्पर कर्तव्यासी
बाप म्हणू की आदर्शांचा पुतळा

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users