साहित्यिकांना आणखी काय हवे आहे_

Submitted by निर्मळाहरीसुत on 8 February, 2020 - 22:03

साहित्यिकांना आणखी काय हवे आहे_

साहित्यिकांना आणखी काय हवे आहे_
चार शब्द आणि_
त्यावर स्वार होणारे प्रतिभेचे रंग_

महागडया गाड्या हव्या कुणाला ?
नि त्या उंच इमारतीत राहतो कोण ?
एक तुटकी गाडी नि झोपडी_
तो-याने मिरवण्यास आणखी काय हवे आहे ?

पंचपक्वान्न हवे कुणाला ?
नि ऊंची पोशाख करतो कोण?
अंग झाकण्यास कपडा नि एक भाकरीचा तुकडा
जीवन जगण्यास आणखी काय हवे आहे ?

द्रव्याची हौस आहे कुणाला ?
नि प्रसिद्धीचा झोत हवा कुणाला ?
शब्द नि लेखणीची जेव्हा कमाल!
जगाची मुशाफिरी करण्यास आणखी काय हवे आहे ?

सूर्याच्या प्रकाशात दिवा हवा कुणाला ?
नि ता-यांच्या झगमगटात चंद्र हवा कुणाला ?
प्रसिद्धीच्या झोतात असताना सलाम हवा कुणाला?
गरिबाचा सलाम लाख-मोलाचा_ आणखी काय हवे आहे ?

कवी - निर्मळाहरीसुत ( नितीन हरिश्चंद्र तरळ )

Group content visibility: 
Public - accessible to all site users