FOUR MORE SHOTS & बाई "माणूस"!

Submitted by Silent Banker on 8 February, 2020 - 00:23

मे महिना चालू झाला की दरवर्षी देशभरातून नामवंत मैनेजमेंट कॉलेज मधील पदवीधर वेगवेगळ्या वित्त कंपनी जॉइन करत असतात। परवा ऑफिसमधील सहकाऱ्याने हाच धागा पकडून कैंटीनमध्ये मला प्रश्न केला की " What is the Diversity Quotient of your team ?" अशा खोचक आणि तिरकस प्रश्नांना आता मी सरावलेला होतो त्यामुळे लगेचच मी पण उत्तर दिले की "Yes,We have done full justice to Diversity".

" Diversity" या शब्दाचा खरा अर्थ " सांस्कृतिक,भाषिक, लैंगिक, धार्मिक विविधता " असा होतो जिथे सर्वसाधारणपणे 4 किंवा 5 प्रकारची विविधता अपेक्षित असते। या मध्ये प्रामुख्याने " व्यावसायिक कौशल्य( Occupation) ", "व्यक्तिमत्व ( Personal Skills),"संस्कार & विचारपद्धती, वृत्ति ( Values & Attitudes), लैंगिक पर्याय ( Sextual Orientation), शारीरिक कमतरता (Physical Disability) " या बाबींचा समावेश होतो। दुर्दैवाने कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बरेचदा " Diversity" याचा अर्थ "Representation of Women"(महिलांचा समावेश/ सहभाग ) इतकाच संकुचित घेतला जातो। तो खोचक प्रश्र याच पार्श्वभूमीवर विचारला असल्याने माझे उत्तर पण त्या संकुचित साच्यातच बसणारे होते की आमच्या टीम मध्ये महिलांचा सहभाग चांगला आहे किंवा आम्ही मोठ्याप्रमाणात महिलांना संधी दिली आहे।

"चूल अणि मूल" या मानसिकतेतून बाहेर पडून बायका शिकू लागल्या अणि संसारचे रहाटगाडगे चालवत असताना अर्थार्जन करून तो सुखाचा करण्यासाठी मदत देखील करू लागल्या। अधिकाधिक बायकांना संधि मिळावी , शिक्षणातून जमविलेली कौशल्ये वापरून प्रगति करता यावी , इच्छा असून देखील केवळ घरच्या जबाबदारीमुळे काम करण्याची संधि वाया जाऊ नये म्हणुन मग सावर्जनिक जीवनात तसेच खासगी कंपन्यांमध्ये महिलांचा कामातील सहभाग वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सरकारी अणि खासगी पातळीवर राबविलेले गेले , त्यातलेच काही खासगी उपक्रम म्हणजे " Diversity Council" , " Woman Empowerment Forum" इत्यादि। या सगळ्याचा परिणाम असा झाला की ज्याला आपण पोषक वातावरण म्हणतो ते निर्माण होऊन जास्तीत जास्त महिला वर्कफोर्स मध्ये सहभागी झाल्या व पुढेही होतील।

पण मला कुठेतरी ती "Diversity" या शब्दाची मूलभूत व्याख्या खुणावत होती। जी विविधता अपेक्षित आहे ती खरेच उपलब्ध आहे की "Tokenism" च्या युगात हे पण " प्रतिकात्मक " आहे। तेवढ्यात "Egg Punjabi " अशी हाक ऐकु आली अणि कैंटीनमध्ये दिलेली आर्डर तयार असल्याची वर्दी मिळाली। आता " Diversity" सोडून या " Variety" वर लक्ष केंद्रित करावे असा विचार करून समोर आलेल्या डिश वर तुटून पडलो।

सध्या सर्वत्र OTT (Over the Top) प्रकारात मोडणाऱ्या अणि "Subscription Video on Demand( SVOD)" या तत्वावर चालणाऱ्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या पर्यन्त पोचणाऱ्या " Web Series" नामक मनोरंजनाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे। "आपले मनोरंजन आपल्या सवड़ीनुसार " या त्यातल्या मूलभूत स्वरुपामुळे ते खूप लोकप्रिय होताना पण दिसत आहे। या "Web Series" मधून वेगवेगळे सामाजिक , राजकीय , कौटुंबिक विषय हाताळले जात आहेत। सादरीकरणातील बोल्डपणा किंवा लेंगिकतेचे ओंगळवाणे प्रदर्शन किंवा भावना चाळविण्यासाठी दाखविला जाणार "स्वैराचार " यामुळे त्यावर सडकून टीका पण होताना दिसत आहे। हा " स्क्रीनप्ले " अणि " सिनेमेटिक ट्रीटमेंट " चा भाग थोड़ा बाजूला ठेवला तरी " व्यक्तिरेखांची मांडणी (Characterisation) या मुद्द्यावर बहुतांश सर्वच ""Web Series" एक प्रकारचे साचलेपण आहे .

" Amazon Prime" या OTT Platform वरील अशाच एका गाजलेल्या " Web Series" चा ; " Four More Shots" चा थोड़ा उहापोह। ही कथा आहे " दामिनी ", " अंजना ", " सिद्धि आणि " उमंग " या चार मुलींची।

आयुष्य आपल्या अटींवर जगताना होणारी धावपळ , नातेसंबधातील ओढाताण , सामाजिक बंधने झुगारून वाटचाल करताना होणारी मानसिक घालमेल , "Winner takes it all" या मानसिकतेतून आलेली देहबोली अणि भाषेतील आक्रमकता , मनाप्रमाणे सर्व घटना घडल्या नाहीत तर येणारी अगतिकता । या सर्व परिस्थितीत आशा निराशेच्या हिंडोळ्यावर डोलताना हितगुज करण्यासाठी असलेली जागा म्हणजे या गोष्टीतील " Truck Bar" अणि " हर फ़िक्र को प्याले में उतारता चला गया " च्या तत्वावर होणारी मदिराक्षीची सूरसंगत म्हणजे "Four More Shots".

या गोष्टीतील

" दामिनी" ही एक "शोध पत्रकारिता " करणारी उद्योगिका असून ती या विषयाला वाहिलेले ऑनलाइन न्यूज़ पोर्टल चालविते। पत्रकारिता , त्यातला आशय यासाठी गौरविलेली ती वैयक्तिक आयुष्यात अत्यंत खासगी अश्या "Private Part Itching" मुळे त्रस्त आहे. या मुळे आपल्या शारीरिक गरजांची पूर्तता करण्याला अडथळा होतो आहे या भयगंडातून "gynecologist" क्लिनिकच्या वाऱ्या करणारी ती व्यावसायिक पातळीवर नफाखोरीसाठी " शोध पत्रकारिता " की " गॉसिप जर्नलिज्म " या मुद्द्यावर गुंतवणूकदारासोबत उभा दावा मांडत आहे।
" अंजना " ही एक प्रथितयश वकील असून अत्यंत मोठ्या " वकील पेढ़ी मध्ये (Law firm) मध्ये सीनियर एडवोकेट आहे। खासगी आयुष्यात एक घटस्फोटित सिंगल मॉम आहे। कामाच्या व्यापातुन मुलीकडे होणारे दुर्लक्ष , मुलीचा सांभाळ करताना होणारी नवऱ्याची मदत , नवऱ्याच्या आयुष्यात आलेली नवीन मुलगी , आपले करियर , मुलगी की प्रथम स्व:तच्या मानसिक अणि शारीरिक गरजा अश्या कचाट्यात सापडलेली अल्फ़ा वुमन आहे ।
" सिद्धि " ही एक श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेली , वडिलांची लाड़की मुलगी . " Perfect Marriage Material" या सदरामध्ये मोडण्यासाठी आईच्या आग्रहाखातर सतत " स्व:तचा पोर्टपोलिओ " तयार करायचा व " श्रीमंत मुलाशी लग्न करुन " खानदान का नाम "ऊँचा वैगरे करायचे "की आपले आयुष्य आपल्या मर्जी प्रमाणे जगायचे या विवंचनेत आयुष्य जगण ा री।
" उमंग " ही पंजाबमधील एका छोट्या गावातून मुंबईमध्ये येऊन " जीम इंस्ट्रक्टर " म्हणुन काम करणारी मुलगी। खासगी आयुष्यात उभयलिंगी (Bi-Sextual) असल्यामुळे होणारी घुसमट अणि पारंपरिक विवाह पद्धतिचा तिटकारा व आपण वेगळे असलो तरी आपले म्हणून कोणी तरी असावे ही मुलभुत मानवी गरज अशा कोंडीतून वाट काढताना होणारी तगमग कुणाला दिसू नये म्हणुन आक्रमकता अणि बंडखोरीचे पांघरूण घेऊन जगणारी ललना।

वरवर पाहता आशय वाचल्यावर " स्क्रीनप्ले" किंवा " त्याला दिलेली सिनेमेटिक ट्रीटमेंट " आधुनिक नव्हे तर अत्याधुनिक (असे खरेच असते का अस वाटायला लावण्याइतकी ) या सदरात मोडणारी , पण व्यक्तिरेखांची मांडणी (Characterisation) या मुद्द्यावर "Woman Empowerment" च्या नावाखाली बाई ला " बाई माणूस " म्हणुन रंगविणारी।

"शिक्षण , शिक्षणातून नोकरी , नोकरीतून आर्थिक सुब्बता , त्या जोडीला येणारे विचार अणि आचार स्वातंत्र्य , आत्मकेन्द्री वृत्ति अणि आपला म्हणुन जो गोतावळा आहे त्याला गृहीत धरुन आपल्याच गरजा पुढे रेटण्याची मानसिकता " ही ठाशिव पुरुषी विशेषणे घेऊन जगणाऱ्या बायका म्हणजे बाई "माणूस ". त्यामुळे त्यातून येणाऱ्या अगतिकतेला , संकटांना भिडण्याची पद्धत पण तद्दन पुरुषी : "फ़कारांत अणि भकारांत बाराखडीची भाषा अणि मदिराक्षीची सुरसंगत ".

मी विचार करू लागलो अणि ही व्यक्तिरेखांची मांडणी (Characterisation) मला कुठे तरी खटकली, त्याला कारण म्हणजे मी आजूबाजूला , कुटुंबात पाहत आलेल्या बायका अणि मी सध्या वाचत असलेले पुस्तक "आमच्या आयुष्यातील काही आठवणी :श्रीमती रमाबाई रानडे "

२० व्या शतकात स्री शिक्षण अणि सबलीकरण या क्षेत्रात काम केलेले एक मोठे नाव। घरच्या वडीलधारी मंडळींचा विरोध सहन करून , नवऱ्याच्या इच्छेखातर मराठी अणि इंग्लिश वाचायला शिकून , रोजच्या संसारात त्याचा चतुराईने उपयोग करून घेणाऱ्या दृष्टया। आपले विचार मांडण्याची संधी मिळा ल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी स्री शिक्षण अणि सबलीकरण, त्याचे फायदे अणि त्याकडे ठेवायचा दॄष्टिकोण , अगदी समर्पक उपमेत शब्दबद्ध केला आहे। त्यांनी या सगळ्या प्रक्रियेला " केळीच्या झाडाची उपमा दिली आहे। " त्या झाडाला जसे केळाचे घड लागू लागतात तसे ते झाड़ वाकू लागते। तसे शिक्षण , विचार अणि मत स्वातंत्र्य, रोजगारीच्या संधी , आर्थिक सुब्बता अशी सगळी फ ळे लागल्यानंतर स्रिया या नम्र होतात , सर्वसमावेशक होतात , या नम्र होण्यातच खरे सबलीकरण आहे। कारण ते बाईचे बाई पण जपून केलेले सबलीकरण आहे।

आत्मकेन्द्री वृत्ति पेक्षा सर्वसमावेशकता अणि परिपक्वता यांचा आधार घेत घर अणि करियर यांचा तोल संभाळ ताना होणारी ओढा ताण नैसर्गिक आहे हे लक्षात घेऊन अंगभूत मानसिक कणखरपणा व तडजोड करण्याची वृत्ति याने त्याचा दाह कमी करणे हा त्यावरील उपाय आहे। "Winner Takes It all" या मानसिकतेपेक्षा "You can not have your Cake & eat it too" मधील तडजोडीची अपरिहार्यता महत्त्वाची ठरते।

असे बाईचे बाई पण जपून केलेले सबलीकरण " Diversity" मध्ये अभिप्रेत असलेल्या व्यक्तिमत्व ( Personal Skills),"संस्कार & विचारपद्धती, वृत्ति ( Values & Attitudes), लैंगिक पर्याय ( Sextual Orientation) या विविधतेला वाव देईल नाहीतर " बाई च्या एनाटोमी मध्ये ठाशिव पुरुषी मानसिकता घेऊन जगणाऱ्या बायका म्हणजे बाई "माणूस",हे "Tokenism" च्या युगात फक्त " प्रतिकात्मकच " ठरेल।

आत्मकेन्द्री वृत्ति पेक्षा सर्वसमावेशकता अणि परिपक्वता यांचा आधार घेत घर अणि करियर यांचा तोल संभाळत आम्हाला सक्षम बनविनाऱ्या माझ्या आईला "Mother's Day" च्या हार्दिक शुभेच्छा।

Group content visibility: 
Use group defaults

विरे दि वेडिंग आणि फोर मोर शॉट दोन्ही आवडले होते.
आयरनी म्हणजे माबो वर स्त्रियाच याना शिव्या घालत होत्या.

Thanks

स्त्रीयांनी कसे वागावे.. आपल्या शिक्षणाचा कसा वापर करावा..
शिकल्यानंतर त्यांच्यात कोणते गुण आले पाहिजेत यावर अजून एका बाप्याचा लेख Uhoh