दामले : तुम्ही म्हणाल तसे !

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:44

१२०००+ पेक्षा जास्त नाट्यप्रयोग , ३४ पेक्षा जास्त नाटके , ३ नाटकांचे १००० + अधिक प्रयोग अणि एका दिवसात सलग ५ नाटकांचे प्रयोग करण्याचा "Guinness book of World record" असा नेत्रदीपक प्रवास करणारा रंगकर्मी म्हणजे अर्थातच "प्रशांत दामले ". " पुढचे पाउल " या चित्रपटातून मनोरंजनाच्या दुनियेत प्रवेश केलेल्या या नटाने पुढे कधी मागे वळून पाहिले नाही। रंगदेवता अणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून गेली ३५ वर्षे वयाच्या साठीकडे झुकलेल्या या चिरतरुण अभिनेत्याने आपल्या अभिनयाने उभ्या महाराष्ट्राला हसविले।लोकरंजन हा जर नाट्यकलेचा आत्मा असेल , तर त्या आत्म्याचा आवाज बनुन गेल्या २ पिढ्या महाराष्ट्रातील जनतेला रोजच्या धावपळीच्या , संघर्षयुक्त आयुष्यात विसाव्याचे , आनंदाचे दोन क्षण दिले। "वेळ कसा गेला कळलेच नाही " अशा कमेंट्स हमखास घेणारा नट म्हणजे "प्रशांत दामले ". २ -२. ५ तास आपल्या अभिनयाने समोरच्याशी संवाद साधून त्याला खिळवून ठेवणे, त्याला बाह्य जगाचा विसर पडायला लावणे (Instagram Update किंवा Whatsapp Chat देखील पाहण्याचे भान न राहणे ) ही सध्याच्या काळातील नटाचे मोठेपण मोजण्याची मर्ढेकराच्या भाषेतील "शात्र्यकाट्याची कसोटी " ठरू शकेल। असा हा "नाट्यतीर्थावरील तपस्वी " नाट्य निर्माता या नवीन भूमिकेत आपल्यासमोर नवी कलाकृती / नाटक घेऊन येत आहे। "तू म्हणशील तसे " असे त्या नव्या नाटकाचे नाव। ती भूमिका जगासमोर ठेवताना ,३५ वर्षे रंगदेवतेची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर पुढच्या पिढीकडे सुत्रे सुपूर्त करण्याचा मनोदय (Passing the baton to next generation) ही त्याची मांडणी "इदं न मम " च्या धर्तीवर एखाद्या तपस्वीला लाजवेल अशीच। म्हणूनच त्याची दखल घेणे गरजेचे।

आपण जगताना आपल्याला प्रत्यक्ष पाहून , कुणाकडून तरी ऐकून किंवा पुस्तक वाचून जे जे काही अनुभव येत असतात ते ते अनुभव दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची आपल्याला ओढ़ असते। दर वेळेला तो अनुभव फार मोठा असतोच असेही नाही। कधी कधी तर ते अनुभव माणसाने प्रत्यक्ष घेतलेले पण नसतात। दुसऱ्यांनी घेतलेल्या अनुभवांच्या आधारावर कथा रंगू शकते किंवा काही अनुभव कल्पनेतून समोर ठेवता येतात। आता हे वेगवेगळे अनुभव कल्पनेने निर्माण करून लोकांना ते वाचत अणि ऐकत रहावे अशा रितीने सांगण्याची शक्ती ज्याला लाभलेली असते त्याला आपण "प्रतिभावंत " म्हणतो। अनुभव कथनासाठी तो प्रतिभावंत जे काही माध्यम वापरतो ते म्हणजे संगीत , साहित्य , नाट्य , शिल्प। या माध्यमांना आपण "कलाकृती " म्हणतो। या कलाकृतीमधील " मला काही तरी सांगायचे आहे " ची ओढ़ " माझे पण थोड़े ऐका " चे नाट्य पांघरूण तो अनुभव आपल्याला ऐकायला अणि पहायला लावते ते म्हणजे "नाटक ". त्या नावातच आभासनिर्मिति अणि साहित्य नटवून पेश करणे असल्यामुळे त्याचा आस्वाद घेणारा प्रेक्षक असतो। प्र +इक्षक म्हणजे नुसता पाहणारा नव्हे तर चोखंदळपणे अनुभूति घेणारा रसिक असतो। असे रसिक प्रेक्षक अणि त्यांचे रंजन करणारे रंगकर्मी या नाटकवेडया महाराष्ट्राला नवीन नाहीत।

प्रांताप्रांताच्या काही खास परंपरा असतात , अभिमानाच्या जागा असतात , महाराष्ट्राचे नाट्यवेड त्यातलेच। पण लोकरंजन , प्रबोधन अणि सामाजिक , राजकीय घडामोडींवर परखड भाष्य वैगरे करताना या "वेडेपणातील "Method in Madness" पण वाखाणण्याजोगी। ही परंपरा चालू झाली आजपासून १७७ वर्षापूर्वी कृष्णातीरी वसलेल्या "सांगलीत ". १८४३ मध्ये तत्कालीन संस्थानिकाच्या आज्ञेवरुन "सीता स्वयंवर " हे मराठीतील पहिले नाटक सादर केले ते विष्णुदास भावे यांनी , सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणरायला नमन करून नाटकाची नान्दी म्हटली गेली ती अशी

" पद राग सुधकल्याण ताल त्रिवट / करनाटकी नाटक करो ईशआज्ञा। वाटे मम मना गजानना //धृ //

सकला रंभी तुझे स्तवन करिता जाती विघ्ने पळून /धाव पाव बा गुणज्ञा /१ /

/कैचे होईल हे निर्विघ्न। आणिक अज्ञ हस्ते जनरंजन या सुमति या हो आज्ञा /२ /

चिन्तामण राव पट वर धन देऊन करवी नाटक हे उत्पन्न /विष्णुदासा देऊनी आज्ञा /३/"

कलानिर्मितीची भावना अणि त्यामागील प्रेरणा स्वच्छ असेल तर त्याचे प्रयोजन चटकन हृदयाला भिडते। त्याच मुळे असेल कदाचित भावे यांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पाहतो। त्यासाठी ज्या नाट्यवेड्या परंपरेचा आपण वारसा सांगतो त्या किर्लोस्कर , देवल , खाडिलकर , कोल्हटकर , गडकरी , वामन जोशी , सावरकर , वरेरकर ,अत्रे , रांगणेकर, पु ल देशपांडे, तेंडुलकर , कानिटकर,विजया मेहता ते अगदी आत्ताचे केंकरे , मोहन वाघ ,, सुधीर भट, लता नार्वेकर कुलकर्णी , केदार शिन्दे या सगळ्यांनी तत्कालीन समाज , नाट्यव्यवसाय , नाट्यकला या वेगवेगळ्या मुद्द्यावर काय तडजोडी केल्या , कुठे पुर्वासुरीचे अनुकरण केले तर कुठे नवीन विचारला वाट मोकळी करून दिली। हा विचार आनंदाची सफर करणारा आहे , कोणाचे हेवेदावे किंवा तेजोभंग वैगरे करणारा नाही।

"जीवनासाठी कला " की " कलेसाठी कला " हे द्वंद्व कायमच राहिलेले आहे पण लोकरंजन या मूळ उद्दिष्टापासून जर रंगकर्मी दूर जात असेल तर त्याची जागा दाखविण्याचे काम पण रसिक प्रेक्षकाने केले आहे। किर्लोस्करांनी रंगभूमीला देव , राक्षस यांच्या कचाट्यातून बाहेर काढले , खाडिलकरांनी संगीत रंगभूमीचे वैभव वाढविले। संगीत रंगभूमीमध्ये "नाटकापेक्षा गाण्याला जास्त महत्त्व येऊ लागल्यावर , नाटक सोडून गायकी दाखविण्यासाठी घेतलेल्या गाण्यातील ताना , मुरक्या प्रेक्षकांना रुचल्या नाहीत। " हे म्हणजे " भटजीला चांगल्या मंगलाष्टका येतात म्हणून नवरा नवरीला बोहल्यावरून खाली उतरता का " असे म्हणण्यातील प्रकार झाला। त्यातून मग

वरेरकर ,अत्रे , रांगणेकर यांची " थोड़े संगीत अणि गद्य , संवाद असलेले नाटक " प्रेक्षकांच्या अभिरूचिला रुचत गेले। कोल्हटकर " भाऊ -बहिणीची " नाटके करीत होते तर तेंडुलकर " सामाजिक रूढ़ि परंपरा, स्री पुरुष संबं ध यातील दाम्भिकतेवर प्रकाश टाकत होते। कानिटकर इ नी ऐतिहासिक नाटकांचा मोर्चा सांभाळलेला होता। हे सर्व चालत असताना "चार घटका करमणूक " या मध्यमवर्गीय मानसिकतेला साद घालण्यासाठी "निखळ करमणूक " करणारी , विनोदी नाटके पण प्रसिद्ध होऊ लागली। पु ल देशपांडे यांनी या प्रकारची मुहूर्तमेढ रोवली। प्रशांत दामले हा असाच निखळ आनंद देणाऱ्या करमणूक प्रधान नाटकांचा झेंडा पुढे घेऊन जाणारा नायक। शाब्दिक कोट्या किंवा चेहऱ्यावरच्या हावभावातून विनोद निर्मिति , जीवनातील विसंगतीवर केलेले भाष्य अणि विनोद निर्मिति ही त्याची बलस्थाने त्यामुळे अंगविक्षेप किंवा इंसल्ट कॉमेडी असल्या विनोद निर्मितीच्या साधनांचा त्याला कधी उपयोग करायला लागला नाही।

संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे अणि नाटक हे जर खऱ्या आयुष्यातील अनुभव नटवून सांगण्याचे माध्यम आहे हे मान्य केले की " नाटकासाठी , ते जीवंत ठेवण्यासाठी " संघर्ष आपोआप येतो। जशी परंपरा जुनी तसाच संघर्ष पण जुनाच। कधी तो चित्रपट , रेडिओ , टीवी या सारख्या करमणुकीच्या दुसऱ्या माध्यमांबरोबरच्या स्पर्धेमुळे निर्माण होतो , तर कधी सोयी , सुविधा , चांगली नाट्यगृहे ,नाटक कंपनी चालविताना येणाऱ्या आर्थिक अडचणी अशा पायाभूत गरजांसाठी पण असतो।

आज "चित्रपट , नाटक , शॉर्ट फिल्म्स , जाहिराती , वॉइस ओवर प्रोजेक्ट , वेब सीरीज " असे विविध पर्याय खुणावत असताना "FOMO(Fear of missing Out)" च्या प्रभावाखाली एकाच वेळी खूप सारे काम करण्याकडे कल वाढला आहे। संधी उपलब्ध असताना त्यांना नाकारणे कठीणच , अशावेळी एखाद्या तपस्वी प्रमाणे एका वेळी एकच नाटक किंवा मालिका किंवा चित्रपट असे माध्यम निवडून पूर्ण वाहून घेऊन काम करणारे प्रशांत सारखे कलावंत विरळाच। त्यामुळे त्याच्या कामात ताज़ेपणा टिकून आहे।

एकांकिका स्पर्धा , कॉलेज फेस्टिवल्स , नाट्य शिबिरे हे एका बाजूला अणि सोयी , सुविधा , चांगली नाट्यगृहे ,नाटक कंपनी चालविताना येणाऱ्या आर्थिक अडचणी अशा पायाभूत गरजांसाठी संघर्ष दुसऱ्या बाजूला अशा कचाट्यात नाट्यव्यवसाय सापडलेला असताना "प्रशांत " सारख्या नटा ने "T-School" सारखी संस्था काढून नवीन रंगकर्मी निर्मितीसाठी आपला हातभार लावला आहे , त्याबरोबरीनेच स्व:त ३४ वर्षे नाटक केलेले असल्याने त्याची आर्थिक गणिते जवळून पहिलेली असल्याने निर्माता होण्याचे पुढचे पाउल नक्कीच अभिमानस्पद।

क्रिकेटला "Commonwealth Sports ते International Sports" हा प्रवास करण्यासाठी जशी "T-20" ची गरज आहे. तशीच "नाटक " वाचविण्यासाठी "चित्रपट, शॉर्ट फिल्म्स ,, वेब सीरीज " ही सर्व माध्यमे खुलू देणे गरजेचे आहे। या माध्यमातून उद्याचे रंगकर्मी आपल्याला मिळणार आहेत। ही अस्तित्वाची लढाई नसून सहजीवनाची अणि'त्यातील आपली जागा शोधण्याची धडपड आहे।

२०२० हे अखिल भारतीय नाट्य परिषदेने भरविलेल्या नाट्य संमेलनाचे १०० वर्ष आहे। त्या संमेलनाचे अध्यक्ष "डॉ जब्बार पटेल " हे जेष्ठ रंगकर्मी आहेत।त्यांनी देखील "शॉर्ट फिल्म्स ,, वेब सीरीज" च्या युगात नाटक धंदा वाचविण्यासाठी काय केले पाहिजे याचा उहापोह होणे गरजेचे आहे असे म्हटले आहे। " पुढे होणाऱ्या अध्यक्षीय भाषणात ते आपली भूमिका मांडतीलच। पण प्रशांत दामले यांनी त्या दिशेने उचललेले पाउल निश्चितच अभिमानस्पद।

साहजिकच अशा अवलिया रंगकर्मीसाठी प्रेक्षक पण त्यांच्याच नवीन "तू म्हणशील तसे" या नाटकातील

गाण्याप्रमाणे त्यांच्या नवीन उपक्रमांना साद घालेल हे निश्चित ।

त्याच जागी ठरल्या वेळी वाटले होते येशील / मागून डोळे झाकून माझे ओळख बरे म्हणशील /

मग मी ना ओळखल्याचे नाटक थोड़े करीन , विचार केल्या सारखे करून पटकन हात धरिण/

Group content visibility: 
Use group defaults

शीर्षक वाचून दामले मास्तरांच्या दादागिरीला कंटाळून कुणीतरी टाहो फोडला असेल असं वाटून गेलं.

सायलेंट जी एकदम मौन सोडल्यासारख्या माणसासारखे एकदमच खूप लेख नका ना टाकू. थोडा वेळ द्या प्रत्येक लेखावर विचार मंथन होण्यासाठी.

छान लिहिलंय..
कुमारदा+१, एकदम इतके लेख पोस्ट नका करु.. सगळे वाचले जात नाहीत मग.
पुलेशु! Happy

कंबरेखालचे विनोद न करता जे हसवलेय आणि जो निर्मळ आनंद दिलाय आजवर त्याला तोड नाही.
प्रशांत दामले फेव्हरेटच... त्याला बघावे ते नाटकातच