Diversity & Scotland of India

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:40

सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना घडून गेलेल्या घडामोडींचा लेखाजोखा मांडणे अणि नविन वर्षाकडून असणाऱ्या अपेक्षांचे सुतोवाच करणे तसे आता नित्याचेच । कधी ते वेगवेगळ्या माध्यमांच्या "Annual Conclave" मध्ये चर्चिले जाते तर कधी ते घरबसल्या होणाऱ्या गप्पांच्या अड्ड्यात रंगते ।

सरत्या वर्षाची हळहळ अणि नविन वर्षाची हुरहुर या भावनाकल्लोळामध्ये आर्थिक , सामाजिक , कौटुंबिक , राजकीय अशी जीवनाची सर्वच अंगे व्यापून जातात। कुठे ती "मंदिर वही बनायेंगे"ची अपेक्षापूर्ति असते तर कुठे " मित्रपक्षाने दगा दिला ... नाहीतर सरकार आमचेच होते " चा उसासा असतो। कुठे ती " 5 Trillion dollar economy in 2022 : जुमला की वास्तव " ची गहन आर्थिक चर्चा असते तर कुठे "रोजगार विरहित आर्थिक वाढ( Jobless Growth); Industry 4.0 अणि त्याचे सामाजिक परिणाम (Social Impact)" वरचे सुंदर विवेचन असते। कधी ती "दुसऱ्या घरखरेदीची" स्वप्नपूर्ति असते तर कुठे "हुकलेल्या नोकरी /व्यवसाय /परदेशातील संधीची " हुरहुर असते। या सर्व गोंधळात(कोलाहल हा शब्द खरे तर फिट बसेल ) खालील २-३ गोष्टींनी ठळकपणे माझे लक्ष वेधून घेतले त्या खालील प्रमाणे :

हिंदुस्तान टाइम्सच्या "Annual Conclave " मधील 3K (करीना कपूर खान ) & AK ( अक्षय कुमार ) यांची मुलाखत आणि करीनाने व्यक्त केलेली "Equal Pay for Lead Actor & Actress" ची इच्छा
हिंदुस्तान टाइम्सच्याच "Annual Conclave " मधील ट्विंकल खन्ना (Mrs Funny bones & Pajamas are forgiving ची लेखिका )& अमिश त्रिपाठी (Shiva Trilogy & Sita etc. पुस्तकांचे लेखक ) यांची मुलाखत आणि ट्विंकलने व्यक्त केलेली अपेक्षा ; ती म्हणजे " No. 1 Female Author in India" पासून " No.1 Author in India " बनण्याचे स्वप्न।
"Tata Sons-Dalberg " यांनी केलेला भारतातील सर्वे अणि त्याचे निष्कर्ष (Findings) " 12 कोटी उच्च माध्यमिक शिक्षण झालेल्या मुली सामाजिक रुढि , सुरक्षा , कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे नोकरी /उद्योग करत नाहीत। अणि जर त्यांनी काम करायचे ठरविले तर भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात(GDP) $440 billion( ३१ लाख करोड़ रूपये ) भर आपण घालु शकू।या संधीचा अवाका लक्षात घ्यायचा असेल तर हा नंबर सध्याच्या भारताच्या GDP च्या १५ % आहे।
यातील पहिले दोन संदर्भ हे आपण आजूबाजूला पाहत असलेल्या "India"ची प्रतिनिधिक उदाहरणे आहेत। स्री शिक्षण , स्रियांचा सेवाक्षेत्रातील वाढता वावर , त्यांच्या आशाआकांक्षा , स्वतंत्र विचारशैली अणि उराशी जपलेली स्वप्ने , ती सत्यात उतरवण्याची जिद्द हे एका बाजूला अणि ही प्रगति उत्तरोत्तर होत रहावी म्हणुन पोषक वातावरण निर्मिति ही दुसऱ्या बाजूला अशा सशक्त चाकांवर "Diversity Express" वेगाने पळत आहे। तर तिसरा संदर्भ हा "Bharat " या संकल्पनेमधील "Potential " & ते फुलू देण्यासाठी जर आपण मार्ग शोधले तर निर्माण होणाऱ्या अमर्याद प्रगतीच्या संधी "बेटी बचाओ / बेटी पढ़ाओ " या सरकारी घोषणेला खऱ्या अर्थाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा निर्माण करणारा ।

हा विचार मनात रेंगाळत असतानाच वर्षअखेरीस कौटुंबिक सहलीसाठी मी "Scotland of India " ला भेट दिली। ( देशी सहल करणे हा foul धरला जात असल्यामुळे केलेल्या देशी सहलीला परदेशी सहलीचे आवरण चढवुन जग रहाटी पाळण्याचा केलेला भाबडा प्रयत्न। असो ).

आमच्या सांगली जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने निम्मा असलेला , ७५% भूभाग जंगलानी व्यापलेला , जैवविविधेत अत्यंत श्रीमंत असलेला , पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे वसलेला, "ब्रह्मगिरी " अणि "सुब्रमण्यम "या पर्वत रांगांच्या अंगाखांद्यावर खेळणारा , कावेरी(नदी ) अम्माच्या मांडीवर खुलणारा, निसर्गाने मुक्त हस्ताने वरदान बहाल केलेला प्रदेश म्हणजे "कोडागु (Kodagu )". १९५६ पर्यन्त स्वत्रंत राज्य असणारा अणि नंतर त्यावेळच्या म्हैसूर (Mysore ) राज्यात विलीन झालेला व आता कर्नाटक राज्याचा भाग असलेला हा नितांत शांत अणि सुंदर प्रदेश म्हणजे "कूर्ग (Coorg )".

जसे कोकण म्हटले की " हा सागरी किनारा। ओला सुगंध वारा " या ओळींप्रमाणे अथांग सागर अणि त्याच्या साथीने फुलणाऱ्या नारळी फोफळीच्या बागा , फणस ,सुपारी , काजू अणि आंबा (Mangoes ), कोकम हा रान मेवा अशा सगळ्या गोष्टी मनात येतात। त्यात भर म्हणून जोडीला जर भात अणि माश्याचे कालवण असेल तर आनंदाची परमावधीच। त्याचप्रमाणे "कूर्ग (Coorg ) म्हटले की दोन्ही हात पसरून आपल्याला आलिंगन देणाऱ्या हिरव्यागार पर्वतरांगा , मातेच्या मायने आपल्याला अंगाखांद्यावर खेळविणारी कावेरी(नदी ) अम्मा अणि " Number 54 & the house with a bamboo door"या गाण्याप्रमाणे पिवळ्याशार मातीतील बाम्बुचे , ओक वृक्षाचे वन अणि त्या सावलीत फुललेला रत्नांचा महल म्हणजे " कॉफी( Coffee )"& " मसाल्याच्या ( Spices ) " बागा म्हणजे मुक्त हस्ताने निसर्गाने केलेली जैवविविधतेची उधळणच , त्यामुळेच की काय त्याला Estate वैगरे म्हणत असावेत। भोवताली डोंगर , दोन्ही बाजूला गर्द झाड़ी , सुन्दर कॉफीचे म ळे , वळणा वळणावर डोका वणारी कावेरी नदी & त्यावर टाकलेले पूल , &अश्या चढ़ उतरणीच्या रस्तात असणारी छोटी छोटी घरे किंवा "Home Stay" पुरविणारी घरगुती हॉटेल्स म्हणजे मडिकेरी किंवा विराजपेठ ही कोडागुमधील मुख्य पर्यटक ठिकाणे।

साधारण "पर्यटन स्थळाला भेटी (Tourist Destination)" हा जो प्रकार असतो त्याची मला धास्ती आहे कारण "दत्तदिन्गंबर किंवा साई दर्शन छाप टूर मध्ये पाहण्यापेक्षा "पाहिले " हा Tick mark जास्त महत्त्वाचा असतो अणि दूसरी भीती जी मला शाळेपासून छळते ती म्हणजे ही प्रेक्षणीय ठिकाणे पाहिल्यावर सांगा पाहु "अमुक अमुक ठिकाण समुद्र सपाटी पासून किती उंचावर आहे " किंवा " आपण पहिलेल्या राजवाड़ा कुठल्या राजाने किती साली बांधला अणि तो कुठली बांधकाम शैली वापरून बांधला " असली बौद्धिके। आता आपण शाळेत नाही त्यामुळे तो राजा , त्याचा राजवाड़ा , ती सनावळ आपली शाळा करणार नाही हे मनाशी पक्के ठरवून "sightseeing " पाहून अणि ऐकून काढले।

कधी तिथे "Abbey Falls / Irupu Falls " चा "वॉलपेपरला " शोभेल असा जीवंत नैसर्गिक देखावा , पाण्याचा गारवा मन मोहुन गेला। तर कुठे "मंडलपट्टि "ची Rough जीप Ride निराळाच जीवनानुभव देऊन गेली। " भागमंडलच्या "देवळाच्या परसातील त्रिवेणी संगम "आमच्या तुळापुरची" आठवण करुन गेला। "तलकावेरी " च्या निसर्गरम्य परिसरात आदि काळापासून पाण्याचे महत्त्व अणि त्याचा रोजच्या आयुष्यातील अविष्कार म्हणजे जीवनदायी कावेरी नदी व तिचा उगम हे पाहताना " Utility " ते " Deity" पर्यन्त कावेरी अम्माचा प्रवास डोळे भरून पाहता आला। "आले देवाजीच्या मना .. " च्या धर्तीवर प्रत्यक्ष ब्रह्मदेवच्या विनंतीने कावेरी माता तिथे प्रकट झाली असे मानतात , हे कळल्यावर अणि आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहिल्यावर " कावेरी " अम्माच्या " Beauty Consciousness" चा हेवा वाटला।

निसर्गाची जैवविविधतेच्या संपत्तीची उधळण डोळे भरून पाहिल्यानंतर आम्ही मोर्चा वळविला तो मानवनिर्मित " Coffee & Spices" Estate कड़े। २३० एकरात पसरलेली ती बाग आमचा टूर गाइड व्यवस्थित समजावून सांगत होता , कॉफीची झाड़े , त्याचा हंगाम , त्याचे प्रकार (Arabica & Robusta) या बरोबरच वेगवेगळ्या मसाल्याच्या जाती , त्याची रोपे हे अगदी सोदाहरण दाखवत होता। विडाच्या पानांसारखी दिसणारी मिरिची पाने & त्याची फळे (Black Pepper), कर्दळीच्या पानांसारखी दिसणारी " वेलदोड्याची रोपे" ( Cardamom) , Vanilla चे रोपटे, दालचीनीची झाड़े किंवा तमालपत्र (Cinnamon Tree & its leaves ) अशी शहरी माणसासाठी किराणा मालाच्या दुकानातून पॅकेटमध्ये येणाऱ्या वस्तूंची झाड़े पाहून काढली। त्या आनंदात असतानाच , एका नकळत्या क्षणी त्या टूर गाइडने प्रश्न केला, तो असा " या कॉफीच्या बागेत काम करणाऱ्या पुरुष अणि स्री कामगाराला किती पगार मिळत असेल & कॉफी फळे तोडण्याच्या हंगामात बोनस किती मिळत असेल ? ". आकड़ेच लावायचे असल्याने बरेच लोक हिरिरिने भाग घेत होते। सर्वांचे अंदाज बांधून झाल्यावर त्या गाइड ने जी माहिती दिली ती विचार करायला लावणारी होती। स्री किंवा पुरुष कामगार दिवसाच्या रोजन्दारीवर तेथे काम करतात। दोघांनाही सारखा भत्ता (Daily Wages) दिला जातो अणि कॉफी फळे तोडण्याच्या हंगामात बोनस पण पूर्णत: किती किलो कॉफी फळे गोळा केली त्याच्या प्रमाणात दिला जातो। स्री किंवा पुरुष कामगार जर समसमान फळे गोळा करत असेल तर बोनस सारखाच। मला वाटले हा बागमालक दयाळू वैगरे असेल (हल्लीच्या भाषेत Compassionate Capitalist),पण मग नंतर कळले की भारतातील ७० % कॉफी ही कूर्गच्या परिसरात लावली जाते अणि सगळीकडे असेच भत्ते (Daily Wages ) दिले जातात। तेव्हा मात्र मनात घोळ णाऱ्या त्या विचाराने उचल खाल्ली अणि सहज कुतूहल म्हणून तिथल्या स्थानिक लोकांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला।

जैवविविधतेसाठी (Biodiversity) प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशाने लोकसंख्येच्या वैविध्यतेमध्ये पण ( Population Diversity ) आपला अग्रक्रम टिकविला आहे (Sex Ratio : 1019 Women Vs 1000 Men ) अणि साक्षरतेच्या ( Literacy Rate )बाबतीत ८० % हुन अधिक लोक साक्षर आहेत। या स्थानिक लोकांना "कोडावा" म्हणतात। निर्सगाने रसरसलेल्या या प्रदेशात अर्थातच हे लोक निसर्गप्रेमी अणि शेतकरी आहेत। धर्माने ते हिन्दू असले तरी देव देवतांचे ( कावेरी अम्मा सोडून ) पूजन न करता आपल्या पूर्वजांना देव मानून त्यांची पूजा करतात। पूर्वजांच्या आठवणीसाठी त्यांच्या घरात आपल्याकडे आपण देवासमोर जसा दिवा लावतो तसा दिवा पूर्वजांच्या फोटोपुढे तेवत असतो। घरच्या वरिष्ठ स्रीला कुटुंबप्रमुखाबरोबरच दिशादर्शकाचे काम करावे लागते कारण या लोकांच्या सामाजिक अणि धार्मिक विधी मध्ये पुरोहित , पोथ्या , देव यांना स्थान नाही। परंपरा , चालिरीति या मौखिक आहेत ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त होतात। त्याचा फायदा असा आहे की "उगाच----शास्त्रों में लिखा है ---" च्या नावाखाली रुढि परंपरांचे गुणगान नाही तर काळाप्रमाणे बदलण्याची लवचिकता दिसते। मुलगा मुलगी एक आहेत त्यामुळे " लग्नात कन्यादान वैगरे होत नाही ". जी गोष्ट सामाजिक चालिरितींची तीच त्यांच्या पोशाखाची अणि खानपानाची। असे म्हणतात की हे लोक " born naturists" आहेत त्यामुळे शेतात पिकणारे तांदुळ व त्याचे वेगवेगळे प्रकार , बरोबरीला मसाले युक्त पंधी करी (Pork Curry), अक्की रोटी ( तांदळाची ) हाच मुख्य आहार। पोशाख पण शेतात काम करताना सोपे जावे असा। ही लवचिकता इतकी स्रियांचा पदर घेण्याची अणि साडीच्या नीरा घालण्याची पद्धत अशी जी ज्यामुळे भात शेतात किंवा कॉफी बागेत काम करताना दोन्ही हात मोकळे राहावेत। "Productivity Index " मध्ये हा समाज भलताच Efficient निघेल। ते करताना पण "Arabica " कॉफीचा तरल भाव & " Robusta " कॉफीचा robustness यांचा सुन्दर समतोल आढळतो।

तेच रहस्य आहे त्या कॉफी बागेतील "Equal Pay " मध्ये।

मनात विचार आला की " India " मधील वर उल्लेखलेल्या Diversity Expressला अजुन जोरात धावण्यासाठी ऊर्जा अणि " भारत " या संकल्पनेतील " स्रियांचा रोजगारातील सहभाग " वाढविण्यासाठी स्फूर्ति देण्याचे काम करण्यासाठी गरज आहे ती "Look South" पॉलिसीची।

हे लिहताना कुठे तरी मराठी म्हणून माझा उर भरून येतो कारण याच साठी ( स्री शिक्षण & सबलीकरण ) क्रांतिज्योति सावित्रीबाई फूल्यांनी धर्ममार्तण्डांकडून दगड धोंडे खाल्ले होते , अवहेलना सहन केली होती . महर्षि कर्वे यांना याच कामासाठी सामाजिक बहिष्कार अणि उपास सहन करावा लागला होता। "याच साठी केला होता अट्टाहास " म्हणत केलेल्या प्रयत्नरूपी झाडाला लागलेली फळे पाहून आज ते नक्कीच सुखावले असते।

मागच्याच आठवडयामध्ये क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती साजरी झाली। त्या माऊलीला आदरांजली म्हणून हा " Blog ."

Happy New year to all of you!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्ग!! काय सुंदर लिहीले आहे. वाचून एकदम मस्त वाटले.
___________
आता एका मैत्रिणीला आपल्या लेखा चे कौतुक करत होते. तिला म्हटले एक नवा आय्डि आला आहे. मग जीभ चावली. आला का? आली का नाही? Happy
हे असे होते, आपण किती सहज पूर्वग्रह करुन घेतो.

चांगला लेख. कुर्गी लोकांबद्दल ऐकले होते पण पूर्ण माहिती नव्हती.

तिला म्हटले एक नवा आय्डि आला आहे. मग जीभ चावली.
आयडी हा इंग्रजी शब्द मराठीत पुल्लिंगी आहे. त्यामुळे आयडी आला हे बरोबर. मग भलेही आईडीमागची व्यक्ती स्त्रीलिंगी असेल नसेल.

चांगला लेख!

आयडी हा इंग्रजी शब्द मराठीत पुल्लिंगी आहे. त्यामुळे आयडी आला हे बरोबर. मग भलेही आईडीमागची व्यक्ती स्त्रीलिंगी असेल नसेल.>>>> +१.