मेकअप - माझा.... तुमचा..... सगळ्यांचा.....

Submitted by वेल on 5 February, 2020 - 04:47

मेकअप...
ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण सगळे नेहमीच करत असतो, कळून सवरून किंवा नकळतपणे. तुमच्या लक्षात आलं असेलच की मी फक्त चेहऱ्यावर करण्याच्या मेकअप बद्दल बोलत नाहीये. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या स्वतःलाच मेकअप करत असतो. एखादं लहान मूल शाळेत जाताना अगदी शहाणं गोंडस सगळं ऐकणार आणि तेच लहान मूल घरात अगदी मस्तीखोर असतं अजिबात कोणाचं न ऐकणार. ह्या लहान मुलांनीही शाळेत जाताना स्वतःचा मेकअप केलेला असतो. आपण शाळेत असताना एखाद्या मित्रमैत्रिणीशी भांडून कट्टी घेतलेली असते अगदी कायमची. पण खूप खूप वर्षांनी शाळेच्या एखाद्या गेट-टुगेदरला आपण पुन्हा भेटतो तेव्हा त्या मित्राला / मैत्रिणीला कडकडून मिठी मारतो आणि आपल्या नात्याचा मेकअप करतो. ओव्हर ऑल बरेचदा असं दिसतं की आयुष्यात नव्याने आलेली व्यक्तीमुले आपण आपल्या अग्रेसिव्ह किंवा इमपेशंट स्वभावाला मुरड घालतो थोडक्यात ती व्यक्ती आपला मेकओवर करते.

असाच काहीसा मेकओवर केलाय आमच्या मेकअप स्पेशलिस्ट पूर्वीने, शिस्तप्रिय आणि नो-नॉनसेन्स स्वभावाच्या डॉक्टर नीलचा, आमच्या मेकअप चित्रपटात. मी सहलेखन केलेला हा चित्रपट अगदी परवा 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे टीजर, प्रोमो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच. चित्रपटाची गाणी आणि डायलॉग्ज टीजर सुद्धा मी सोशल मिडियाद्वारे शेअर केले होते. आज ते सगळे मी इथे पुन्हा टाकते आहे म्हणजे कोणी मिस केले असल्यास तुम्हाला ते बघता येतील.

हा माझा पहिला चित्रपट असल्याने मी खूप excited आहे आणि माझी लेखनाची इनिंग इथे मायबोलीच्या साक्षीने सुरू झाली असल्याने ह्या excitement मध्ये मला तुम्हालाही सामील करून घ्यायचं आहे. आपण चित्रपट बघतो ते एंटरटेनमेंट साठी, मज्जेसाठी, हीच मज्जा आपण एकमेकांबरोबर शेअर करूया.

तुम्ही हा चित्रपट बघायला जाल तेव्हा मेकअपच्या पोस्टर बरोबर तुमचा फोटो काढा आणि इथे कमेंट मध्ये टाका. तुम्हाला पूर्वीने केलेला हा मेकअप कसा वाटला हे वाचायलाही मला आणि इथल्या सगळ्यानाही खूप आवडेल. आपले काही मित्रमैत्रिणी खूप छान गातात, त्यांनी मेकअप मधली गाणी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून इथे टाकली तर अजून मज्जा येईल. आणि ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या मेकअप रिलेटेड काही गमतीशीर घटना शेअर करू शकलात तर अहाहा, बहार येईल ह्या सगळ्या मज्जेला. Happy

लागेना
जुळली गाठ गं
धतिंग धिंगाणा
पूर्वी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहीलयस वल्ले

मनापासून आनंद होतोय आणि तुझा इथवरचा प्रवास जवळून बघितला असल्याने तुझ्या इतकीच मलाही उत्सुकता आहे सिनेमा पडद्यावर बघण्याची आणि तो पडद्यावर बघताना इतरांच्या रिॲक्शन बघण्याचीही. पहिल्या सिनेमाचा आनंद काही निराळाच असतो.

तुला मनापासून शुभेच्छा! सिनेमातर मी या विकेंडलाच बघणार आहे. तेव्हा नक्की फोटो काढेन आणि तुला पाठवेन.

तुझ्या इथल्या पहिल्या कथालेखनापासून तुला बघत आलेय. तू प्रत्येक चांगल्या वाईट म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रतिक्रिया अतिशय पॉझिटिव्हली घेऊन स्वत:ला पुढे नेतेस हे अगदी तेव्हापासून कायम आहे.

एकच प्रेमाचा सल्ला देईन मी, मोठ्या समुद्रात तुमची होडी सोडताय. कदाचित इतर तगडी आणि वेगवान जहाजे वेगाने पुढे जाताना पाहून दडपण येईल कि आपली होडी टिकेल कि नाही? प्रवास कसा होईल तिचा? तुम्ही नाही चिंतीत झालात तरी कदाचित समोरुन तुम्हाला तशी जाणीव करुन द्यायचा प्रयत्न होईलही कारण जग काही फक्त कौतुक करणाऱ्या लोकांनी किंवा कंस्ट्रक्टिव्ह टिका करणाऱ्या लोकांनी नाही भरलेलं. कदाचित काही टिका योग्य असतील काही उगाचच असतील. पण तू यातून नेहमीप्रमाणे योग्य ते वेचून पुढे जा. होडी पाण्यात सोडेपर्यंतचा प्रवास आठव. तू तुझा प्रवास एंजॉय कर. कौतुकातलही आणि टिकेतलही काय घ्यायच काय सोडायच हे मनात नक्की ठरव. एक मैत्रिण म्हणून मला तुझं कौतुकही आहे आणि अभिमानही आहे. Way to go Valle. All the very best

अरे वा.. छान..!
पहिल्या-वहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा..!!

अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. चित्रपट बघणार होतोच, आता अजून एक कारण !

अभिनंदन....
पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा..!!

अभिनंदन....
पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा..!!!

वेल, पहिल्या वहिल्या प्रोजेक्ट साठी खुप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

वल्लरी! अग ट्रेलर बघता बघता,शुभेच्छा द्यायचाच्या राहून गेल्या!

सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
कविन्,मस्त प्रतिसाद!

वेल डन वेल !
तारीख जवळ आली तर .. ऑल द बेस्ट.. आल ईज वेल Happy

सगळ्या मायबोलीकरांचे खूप खूप आभार, फिल्म पाहिल्यावर इथे तुमचे फोटो, तुमच्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न नक्की करा. मला ते खूप आवडेल

Pages