वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>वर्षा, रंगपंढरी लिंकबद्दल धन्यवाद
अगं त्यात काय! Happy
@चंपा, हो हो मुलखती खूपच मोठ्या आहेत मीपण आज एक, दुसरा पार्ट उद्या असंच बघते.

फॅमिली मॅन पूर्ण बघितली. फारच आवडली. शेवटी श्रीकांत आणि जेके दोघंही मरणार या विचाराने खूप वाईट वाटलं. मुसाचा आणि त्याच्या आईचा शेवट दुर्दैवी आहे. दुसऱ्यासाठी खड्डे खोदणारे स्वतः त्या खड्ड्यात पडतात कॅटेगरी. श्रीकांतची बायको दाखवलेली कोणी साऊथची हिरोईन आहे का.

घोस्ट स्टोरीज बघतेय. दोन स्टोर्‍या बघुन झाल्या. झोया आणि अनुराग कश्यप.
काहीही कळलं नाही. Happy
पुढच्या दोन्हीपण आजिबात कळणार नाहीयेत याची खात्री आहे Happy

पहिल्या दोन पाहिल्या. झोयाच्या गोष्टीत म्हातारी मेलेली असते आणि ते सान्गायचा तिचा प्रयत्न असतो म्हणून ती सरकत सरकत जिथे तिचा मृतदेह पडलाय तिथे जात असते.

कश्यप ची नाही कळली.

13 reasosn - मी पहिला सिझन बघितला होता, पण मला शेवट बोर झाला. खोदा पहाड, निकला चुहा फीलिंग आल्याच आठवतंय. दुसरा सिझन काही पाहिला नाही. त्यामानाने Unbelievable च्या पुढच्या सिझन ची वाट पाहते आहे, पहिल्या सिझन चा शेवट छान होता. नवीन केस असेल अशी अपेक्षा आहे.

13 reason kinva unbelievable सारख्या सिरीज मध्ये त्यां पात्रांची मानसिकता दाखवायची असते

झोयाच्या गोष्टीत म्हातारी मेलेली असते आणि ते सान्गायचा तिचा प्रयत्न असतो म्हणून ती सरकत सरकत जिथे तिचा मृतदेह पडलाय तिथे जात असते.>>>>>> मेलेली म्हातारी सरकत सरकत तिथे जात असते हेच कळलं नाही. जे समीरा बरोबर आहे ते भूत, आत्मा आहे असं मानता येत नाही. कारण आजवर च्या भूत आत्म्याच्या व्याख्या Happy मला ती सरपटणारी म्हातारी बघुन गानु आज्जी आठवली. Happy
शेवट खरंतर कळला नाही. म्हातारी समीराचा ताबा घेते का? दोघींना पण वाट बघावी लागतेय म्हणुन. म्हातारी म्हणते ना की माझ्या अंगात ताकद असती, मी तुझ्यासारखी असती तर कधीच वाट बघत बसली नसती.
पोलिस सांगतात त्यानुसार म्हातारी ३ दिवसापुर्वी मेलेली असते. समीराला येउन दोन - तीन दिवस तरी झालेले असतात. पण पोलिस म्हणतात ये नर्स आज सुबहही आयी है. बेटा ५ दिन पहले आने वाला था. आया नही.

जामतारा बघतोय नेफिवर . २ एपिसोड झाले . रोचक स्टोरी आहे , मोबाइल वर येणारे बहुतांश फिशिंग कॉल जामतारा किंवा असनसोल एथून येतात . त्यामाग्गे असणारी रॅकेट्स आणि राजकारण यावर आहे सीरिज !

शेवट खरंतर कळला नाही. >>>>> जेवढा मला कळला असं की ती म्हातारी मरून ३ दिवस झालेत. नर्सला जे काय दिसतं ते तिचं भूत असतं. ती त्या खोलीत मेलीये हे दाखवण्यासाठी म्हातारी रोज तिकडे घसटत जात असेल, कारण त्या नर्सला आवाज येत असतो रात्री जमीन घासण्याचा. मुलगा पण येत नसतो मग कोणाला तरी कळायला हवं ना ती मेली आहे ते. एवढंच लॉजिक वाटलं.

जामतारा बघतोय नेफिवर . २ एपिसोड झाले . रोचक स्टोरी आहे , मोबाइल वर येणारे बहुतांश फिशिंग कॉल जामतारा किंवा असनसोल एथून येतात . त्यामाग्गे असणारी रॅकेट्स आणि राजकारण यावर आहे सीरिज !>>ओके

the witcher
पाहीली अन आवडली पण.
कथानक ज्या पद्धतीने मांडलय ते भारीच !!

The forgotten Army... Amazon Prime... छान वाटली. एका बैठकीत ५ भाग बघून झाले..

Man in the High Castle. (Amazon Prime..) बघुन संपली. फार मस्त आहे.

Amazon Prime वर widow खूप सुंदर आहे. Congo खोऱ्यातली कथा आहे. Suspense thriller

ब्रेकिंग बॅड संपवून जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. त्यानंतर कोणतीही सिरीज बघावीशी वाटत नाहीये, ते void का काय म्हणतात तो आलाय बहुधा. तर आता, कोणीतरी ब्रेकिंग बॅड च्या आसपास जाणारी एखादी सिरीज सुचवा. बेटर कॉल सॉल सध्या राखून ठेवलीय त्यामुळे तो पर्याय बाद झाला आहे. माझ्याकडे नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि झी फाईव्ह चे सब्स्क्रिप्शन आहे.

The great British bake off कोणत्या streaming platform वर बघता येईल? आधी नेटफ्लिक्सवर होती बहुतेक.

The Handmaid's tale all three seasons are now on Amazon prime. Somehow it is not being advertised. Disturbing content but binge watch type.

बेटर कॉल सॉल जेव्हा खूप तीव्र इच्छा होईल, जेव्हा खूप दर्जेदार पाहावं असं वाटेल तेव्हा पाहणार आहे.

Handmaid's tale on Amazon prime. >> लिस्टीत आहे. आता पहायला हवी. हुलू अमेझोन एकत्र आले? कसे? असो.

द विचर कोणी पाहिली का ?
कित्ती तो गेम ऑफ थ्रोन्स इन्फ्लुअन्स, अगदी सेट्स पासून, लोकेशन्स, कपडे, क्रिचर्स, जादु, chaos, सिजिल्स, वुल्फ, ड्रॅगन .. क्षणाक्षणाला गॉटची आठवण येते Uhoh

मी पहायचा प्रयत्न केला होता. पहिल्या एपिसोड मधे तरी फार कॅची वाटली नाही. फार रेकमेन्डेशन्स आली तर पुन्हा प्रयत्न करेन Happy

इनसाइड एज (प्राइम) - पहिला भाग बघताना कंटाळा आल्याने सोडून दिली होती. पुन्हा एक रेको मिळाल्याने पुन्हा बघू लागलो आणि दुसर्‍या तिसर्‍या भागापासून चांगली ग्रिप घेतली आहे. आता दुसर्‍या सीझनच्या मध्यावर आहे. खूप एंगेजिंग आहे.

विवेक ओबेरॉय चे काम जरा overdone आहे पण चांगले आहे.. रिचा चढ्ढा, संजय सुरी, अंगद बेदी, सिद्धांत चतुर्वेदी, तनुज विरवानी, अमित सियाल ("जामताडा" मधला व्हिलन), "भाईसाब" चे काम केलेला आमिर बशीर, सयानी गुप्ता यांची कामे जबरी आहेत. विशेषत: "वायू" चे काम केलेला तनुज विरवानी आणि सयानी गुप्ता यांच्यामधले सीन्स मस्त आहेत. तो हरियाना हरीकेन्स चा मालक मनु रिषी त्याचेही काम मस्त आहे. फक्त भाईसाब मराठी दाखवलेत आणि त्यांचे मराठी उच्चार पूर्ण गंडलेले आहेत. बाकी मस्त.

आयपीएलचा माहौल जबरी आहे यातला. क्रिकेटरही सगळे खरेच खेळणारे वाटतात.

Pages