स्मशानवैराग्य!

Submitted by अज्ञातवासी on 14 January, 2020 - 02:49

"रो मत अम्मी, खुदा कि बंदी थी..."
दिलशानने अम्मीला दिलासा दिला, आणि जनाजा निघाला.
सकीना, वीस वर्षाची कोवळी पोर. बिचारी, साप चावल्याचं निमित्त झालं,आणि गेली.
अब वो निकली थी, कब्रस्तान कि राहों पर...
----------------------------------------------
'ये येड्या... कब्रस्तान हाये ते. खविस झपाटल तुला...'
तो मात्र जायचं नाव घेईना.
जसा जनाजा जवळ आला, तशी ती टवाळ पोरे तिथून निघून गेली...
-----------------------------------------------
"परस्त्री, मातेसमान. आणि आपल्यासारख्या बैराग्यांना तर विषासमान. भोग... विषय... हे शरीराला नागासारखे दन्श करतात, आणि एकदा ते विष शरीरात भिनलं..."
गुरुजी हसले...
"तर मुक्ती नाही... मुक्ती नाही..."
----------------------------------------------
"गुरुजींचा शब्द... प्रणाम... शब्दाबाहेर गेलास... तर प्राणांत प्रायश्चित!!!"
"होय बाबा."
"आम्ही राहो न राहो... गुरुजी कायम असतील."
-----------------------------------------------
"आत्मा म्हणजेच सर्वकाही.... आत्मा सोडून गेला... कोण पुरुष, कोण स्त्री. फक्त जड उरलेलं शरीर...जे कुजून जाणार. जोपर्यंत आत्मा तोपर्यंत सजीव... आत्मा गेला..."
गुरुजी हसले...
"तर फक्त निर्जीव..."
------------------------------------------------
"हरामखोर... आश्रमातल्या पोरीवर नजर."
गुरुजी त्याला गुरासारखा बडवत होते.
कोपऱ्यात ती मान खाली घालून गालातल्या गालात हसत होती.
"लक्षात ठेव... वचन दे...कुठल्याही स्त्रीविषयी कामभावना मनात बाळगणार नाही."
त्याने वचन दिलं...
गुरुजींना दिलेलं वचन कधी मोडायचं नसत....
-----------------------------------------------
त्यादिवशी ती रात्री गुरुजींकडे गेली. हा जागाच होता.
'महिन्यातून चार पाच वेळा तरी जाते.'
-----------------------------------------------
ती मेली... साप चावला तिला.
अंत्यविधीच्या वेळी त्याने गुरुजींना विचारलं.
"गुरुजी, या शरीराला आता स्त्री म्हणायचं कि पुरुष? आत्मा तर निघून गेला."
गुरुजी हसले.
"हा तर फक्त जड देह!!!!"
तोही यावेळी हसला....
-----------------------------------------------
महिन्याभरात गुरुजीही साप चावून गेले.
हा भ्रमिष्ट झाला. त्याने आश्रम सोडला.
-----------------------------------------------
रात्र झाली...
'नाग्या... जा, तुही भक्ष्य शोध.'
त्याने पोतडीतून नाग काढला... फणा पसरून तो अंधारात निघून गेला.
त्याने कब्र उकरायला सुरुवात केली...
'आत्मा गेल्यावर स्त्री उरत नाही...
उरतं फक्त शरीर!!!!!!!!'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा, लॉगिनला काही प्रॉब्लेम आला तर मला मेल करा, मी पोस्ट करेल इथे तुमचा मेसेज.

गुरुजींचा शब्द... प्रणाम... शब्दाबाहेर गेलास... तर प्राणांत प्रायश्चित!!!"
>> प्रणाम ऐवजी प्रमाण हवं.

धन्यवाद एमी!
दोन तीन दिवसात विस्कटून सांगतो, बाकी काही वाचकांचा रसभंग व्हायला नको म्हणून!

त्याने कब्र उकरायला सुरुवात केली...
'आत्मा गेल्यावर स्त्री उरत नाही...
उरतं फक्त शरीर!!!!!!!!'>> विकृतच आहे तो.

गोष्ट भिडली.
समजावून सांगणार नाही, लेखकालाच चांगली सांगू दे.

मस्त कथा. "गुरुजी, या शरीराला आता स्त्री म्हणायचं कि पुरुष? आत्मा तर निघून गेला." गुरुजी हसले. "हा तर फक्त जड देह ------त्याने कब्र उकरायला सुरुवात केली" -- भारीच.
एक पडलेला प्रश्न- कोवळ्या पोरीचा आणि गुरुजींचा (सुडाखातर) दंश होऊन झालेला मृत्यू पाहता तो नाग त्याने ट्रेन केलेला होता का?
बाकी खर तर तो वासनान्ध होता. गुरुजींना दिलेलं वचन पाळले त्याने पण पळवाट शोधली त्यामुळे (परिस्थितीमुळे) विकृत झाला असे म्हणावे लागेल.

गुरुजींना दिलेला शब्द न मोडता , पाहिजे ते , कोणत्याही मार्गाने साद्ध्य करण्यासाठी रचलेला कट.
फारच विचित्र आणि विकृत मनोवृत्ति आहे त्याची.

त्यादिवशी ती रात्री गुरुजींकडे गेली. हा जागाच होता.
'महिन्यातून चार पाच वेळा तरी जाते.'>>>> गुरुजी सुद्धा

त्याला इतके कडक पाठ आणि लेक्चर देणारे गुरुजीच भ्रष्ट आचार करत होते.एक प्रकारे तो याचा सूड, आणि गुरुजींची शिकवण पाळायला काढलेली पळवाट.खरं तर मुलीला नाग चाववायची गरज नव्हती.(म्हणजे कायदा पाळायचा तर कोणालाच नाग चाववायची गरज नव्हती.)
मृतदेहाबरोबर केलेलं कृत्य म्हणजे वासना नसून सूडाचाच एक भाग असू शकतो.लेखक जास्त बरोबर सांगू शकतील त्यांना काय अर्थ अपेक्षित होता ते.

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. सगळ्यांचे अंदाज बरोबरच आहेत, पण माझ्या मनात काय होत ते सांगतो.

जॉनर - नियो नोयर सायकॉलॉजिकल थ्रिलर
प्रेरणा अथवा कल्पना - मंटोची 'थंडा गोश्त' नावाची कथा आणि सेक्रेड गेम्स.

या कथेतील व्यक्ती ही एकांगी, एककल्ली विकृत तर आहेच, पण त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा पगडा मोठा आहे. आधीपासून त्याच्या मनावर जे बिंबवलं गेलं, त्यापासून तो बाहेरही पडू शकत नाही, आणि त्याच्या वासनाही त्याला शांत बसू देत नाही. तो गुरुजींना वचन देतो, पण जेव्हा त्याला कळत, कि गुरुजीही या वासनेच्या आहारी गेलेले आहेत, तर तो आधी त्याच्या पाळलेल्या नागकरवी त्या मुलीला मारतो.
त्याच्या डोक्यात सारखं आई वडिलांना दिलेला शब्द घुमत असतो. "गुरुजींचं वचनाला कायमी प्रणाम करेन." आणि गुरुजींना दिलेलं वचन असत "परस्त्रीला हात लावणार नाही." (आठवा सेक्रेड गेम्स मधला गणेश गायतोंडे, सारखा गुरुजींचा आवाज त्याच्या डोक्यात घुमून शेवटी तो बलिदान देतो.)
तेव्हाच तो गुरुजींकडून हेही वदवून घेतो कि मेल्यावर स्त्री पुरुष असा भेद उरत नाही. हे ऐकून तो समाधानी होतो, आणि ज्या गुरुजींनी आपल्याला वचनात अडकवलं, पण तसं त्यांचं आचरण नाही, अशा गुरुजीलाही मरवतो.
आता आपल्या वासना शमवण्यासाठी तो कब्र खोदून त्यातील शरीरे वापरतो.
कब्रस्थान म्हणजेच स्मशान. या स्मशानातच त्याने पाळलेल्या वैराग्यचा विकृत कडेलोट होतो म्हणून 'स्मशानवैराग्य.'

अज्ञातवासी, खरं सांगायचं तर मला कथा पहिल्या वाचनात समजली नाही. आणि कुटकथा वाचण्यात मला रस असला तरी ही कुटकथा नाही तर कोडं आहे. वाचकाने वाचायचे, मग अंदाज बांधत बसायचे व मग नंतर लेखकाने त्याच्या मनात नक्की काय होते हे सांगायचे हा प्रकारच मला कळत नाही. माझं आपलं जुन्या पठडीतलं वाचन असतं. लेखकाने दहा वाक्यात दहा पानांचा मजकुर वाचकापर्यंत पोहचवला पाहीजे या जुन्या विचारातून मला काही बाहेर पडता येत नाही. आणि असे प्रभावी लिहिताही येत नाही मला.
तुझे लेखन कमी झाले आहे, ते वाढव बरे. खुप लिही.

अप्पा अब बच्चे कि जान लोगे क्या! Lol
नवीन बरच लिहायचं आहे (पण ते मायबोलीवर कि दुसरं कुठे याचा मी सिरियसली विचार करतोय), जुनं बरच पूर्ण करायचंय.
बघुयात!

बघुयात! कशात?? Lol
वेळ मिळाला कि पुर्ण कर सगळ्या कथा.. Happy

भयंकर!

वेगवेगळ्या वेळी घडलेल्या घटना (काळाच्या बाबतीत) असंबद्ध पद्धतीने कमी शब्दांत मांडून शेवटच्या काही वाक्यांमुळे त्या घटना एकत्रितपणे कथा म्हणून समोर आणणे, हे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.

अर्थात, कथेतले तिघेही विकृत असल्याने कथा वाचल्यानंतर संमिश्र विचार आणि प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे.

Dhanyawad!!!

बापरे भयंकर... एकदा वाचल्यावर कळली नाही परत वाचल्यावर विकृतपणा कळला त्याचा..चांगली मांडणी..वाचकाला डोके लावायला पाहिजे कळण्यासाठी

Pages