मुलांचे फोटो सोशलसाईटवर प्रसिद्ध करण्यास लागणारी परवानगी

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2020 - 05:11

आपण ऑर्कूट काळापासून आजच्या फेसबूक ईण्स्टा काळापर्यण्त मुलांचे फोटो सोशलसाईटवर अपलोड करत आला असाल.

हे करताना आपण साधारण दोन गोष्टी लक्षात घेतो

१) मुलांची सुरक्षितता वा फोटोचा गैर्वापर होऊ नये.
२) मुलांना नजर लागू नये. (श्रद्धा वा अंधश्रद्धा जे काही असेल)

मायबोलीच्या ईतिहासात कोणी आजवर आपल्या मुलांचा फोटो ईथे टाकला आहे का नाही याची कल्पना नाही. (कोणी टाकला आहे का?)
पण आज माझ्या नाचाच्या धाग्यावर काही जणांनी माझ्या मुलांचे फोटो ईथे टाकता येतील का अशी विचारणा केल्यानंतर तिसराच मुद्दा उपस्थित झाला. त्या मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी म्हणून हा धागा.

आधी राजेश यांची पोस्ट जशीच्या तशी देतो
--------
फेस बुक असेल किंवा दुसरे कोणतेही सामाजिक प्लॅटफॉर्म.
तिथे तुम्ही वैयक्तिक सभासद आहात.
तिथे स्वतः व्यतिरिक्त कोणाचे ही फोटो प्रसिद्ध करण्याचं तुम्हाला (म्हणजे सर्वांना ) अधिकार नाही .
अगदी मुलांचे,बायकोचे सुद्धा .
ज्यांचे फोटो तुम्ही अपलोड करत आहात त्यांची अनुमती
ची आवश्यकता आहे.
-----------

आता राजेश यांच्या पोस्टवर मला पडलेले प्रश्न

१) बायकोचा परवानगीशिवय फोटो तर तसेही कोणी पुरुष टाकत नसावा. पण पोरांचे फोटो टाकायला एका पालकाची परवानगी पुरेशी ठरावी का? जर एका पालकालाच आपल्या पोरांचा फोटो शेअर करावासा वाटला तर त्याने प्रत्येकवेळी दुसरयाची परवानगी घेणे गरजेचे का?

२) अगदी लहान मुलांच्या फोटोची परवानगी साहजिकच पालक देणार पण मुलांची स्वत:ची परवानगी कोणत्या वयापासून घेण्यात यावी? कायदेशीर वय काही आहे का? नसल्यास शिष्टाचाराला धरून वगैरे सांगा...

३) माझ्या मायबोली डीपीवर मी ईतके दिवस शाहरूखचा फोटो त्याच्या वा त्याच्या पालकांच्या परवानगीशिवाय लावलेला वा आजही माझ्यासोबत कोलाज करत लावला आहे ते योग्य की अयोग्य? अयोग्य असल्यास कोणालाही आजवर आक्षेप घ्यायचे का सुचले नाही?

याव्यतिरीक्त कोणाला आणखी काही प्रश्न पडल्यास वा वेगळाच मुद्दा वेग्ळाच दृष्टीकोन मांडायचा असल्यास झरूर लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरुख़ प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्याचे फोटो कोणत्याही अवस्थेत असले तरी त्याला काही फरक पडणार नाही आहे, त्यांना याची सवय झालेली असते.

पण या व्यतिरिक्त आंतरजालावर आपल्या कोण्या जवळच्या व्यक्तीचा फोटोचा गैरवापर झालेला कोणाला पटेल, कोणालाच नाही.

आज गैरवापर हा प्रकार, खूप वेग-वेगळ्या रुपात येतो. मागेच एका व्यक्तीचा असाच वायरल झालेला फोटो होता आणि त्यावर अनेक प्रकारच्या मीम्स (memes) बनवण्यात आल्या, मला तरी नाही वाटत कोणाला हे आवडेल म्हणून.

प्रशि, शाहरूख वा तत्सम प्रसिद्ध व्यक्तींना हे आवडते वा फरक पडत नाही हे आपणच ठरवायचे का?
जर फरक पडत नसेल तर का फरक पडत नाही याचा विचार करायला हवा. तो दृष्टीकोन बाळगून आपण का जगू शकत नाही?

देवकी, हो राजेश यांची पोस्ट तुम्हालाही योग्य वाटत असेल तर त्यावर मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही मला देऊ शकता

ऋ, सुट्टी असेल तर आराम कर न,
तुला असे नाही वाटत का की तू जरा जास्तच प्रश्न /शंका उपस्थित करत आहेस,जनरली असं वागून समोरचा व्यक्ती इरिटेड होतो,म्हणजे आता मी तरी होत आहे,कारण तुझे हल्ली अति प्रश्न विचारणे कंटाळवाणे वाटायला लागलेय

पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही मला देऊ शकता>>>> मी पोस्टबद्दल सहमती दर्शवली आहे.
प्रश्न तुला पडले आहेत ना,मग उत्तरे तूच शोध की.

आदू, कदाचित होत असेल तसे Sad ...
पण हे ही खरेय की प्रश्न पडतात तेव्हा शोध लागतात. नूतनने डोक्यात पडलेले ॲप्पल मुकाट खाल्ले असते तर आजही आपण गुरुत्वाकर्षणरहीत आयुष्य जगत असतो.
कोलंबसला सागराला वळसा घतल्यावर काय हा प्रश्न पडला नसता तर ना अमेरीका असती ना अमेरीकेहून चालणारी मायबोली असती..
प्रश्न पडावेत.. शक्यतो त्यांची उत्तरेही स्वत:च शोधावीत.. मी फक्त ईतरांनाही न्यूटन कोलंबस बनायची संधी देतो ईतकेच.

देवकी प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजे असे नाही. साधारणप्णे लोकांचा एक समज असतो की प्रश्न उपस्थित केले तर ते विरोधालाच, वाद घालायलाच. कोणी आपल्या ज्ञानात भर टाकायला प्रश्न विचारते हा फंडाच कोणी लक्षात घेत नाही.

नूतनने डोक्यात पडलेले ॲप्पल मुकाट खाल्ले असते तर >>> तर मोहनिषचा टुकार अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर आली नसती.
Pj Happy

मोहनिषचा टुकार अभिनय>>> हे भारीय!

नूतनने डोक्यात पडलेले ॲप्पल मुकाट खाल्ले असते>>>. तेच तर ना! ज्याच्या डोक्यात पडले, त्यालाच प्रश्न पडला आणि त्यानेच उत्तर शोधले .

सामो, मी प्रोफाइल चेक करायला जात नाही, पण लेखाखाली फोटो दिसतो, त्यात तुमचा फोटो टीनएजर मुलीबरोबर आहे / होता. Wink

Jokes apart, पण टिनएजर्सचे फोटो तर with out consent अजिबात अपलोड करू नयेत. बाकी सिक्युरिटी वगैरे जाऊ दे, पण ते आपल्या फोटोबाबत फार सेन्सिटिव्ह असतात. कुठला फोटो आहे, कुणाबरोबर आहे आणि काय कपडे इ त्यांच्या दृष्टीने फार महत्वाच असतं. आई बाप लाडालाडाने आग्रह करून स्वतःबरोबर फोटो काढतात म्हणून त्यांना फोटो काढून घ्यावे लागतात Proud पण ते कुटूंबापूरते असावेत लगेच फेसबुकवर प्रसिद्ध करू नयेत अशी अपेक्षा असु शकते. Lol मला वाटतं ही रास्त अपेक्षा आहे. मला स्वतःलाही कॅन्डीड मोमेंट म्हणून माझे वाट्टेल ते फोटो अपलोड केलेले आवडत नाहीत. अगदीच लहान मूल असेल तर ठीक, पण एकदा मुलांना छान वाईट कळायला लागलं की त्यांना विचारूनच फोटो सोशल मीडियावर टाकायला हवेत. अगदी 7-8 वर्षाच्या मुलांना सुद्धा 'माझा हा फोटो छान नाही / मस्त आहे' हे कळतं. त्यामुळे विचारणं योग्यच. आणि हो, एकदा 8व्या वर्षी दिलेली consent जन्मभर गृहीत धरणही चूक. मोठा झाल्यावर तोच फोटो न आवडू शकतोच की. नाहीतर 15 व्या वाढदिवस किंवा कोणत्या तरी बालदिनालया, उगीच 4 वर्षाच्या वयातला अर्धा नंगु फोटो फेसबुकवर टाकून मुलांना embarrass करणारे आईवडील पण असतात.

माझ्या मायबोली डीपीवर मी ईतके दिवस शाहरूखचा फोटो त्याच्या वा त्याच्या पालकांच्या परवानगीशिवाय लावलेला वा आजही माझ्यासोबत कोलाज करत लावला आहे ते योग्य की अयोग्य? अयोग्य असल्यास कोणालाही आजवर आक्षेप घ्यायचे का सुचले नाही?

>>>

शाहरुख व धागालेखक लहान मूल किंवा अज्ञान वयाचे आहेत काय?

शाहरुख व धागालेखक लहान मूल किंवा अज्ञान वयाचे आहेत काय?
>>>>

लेखात तो प्रश्नही विचारला आहे ना की फोटो परवानगी बाबत सज्ञान वय काय समजावे?
त्याचे उत्तर मिळाले की याचे ऊत्तरही देता येईल.

फोटो टाकण्याची हौस कोणत्या वळणावर जाते त्या बद्दल एक प्रसंग.
माझ्या फोन कॉन्टॅक्ट मध्ये एक स्त्री आहे वय असेल 30 ते 35 पर्यंत.
व्हॉट्स ऍप वर कामानिमित्त संबंध असतो त्या मुळे व्हॉट्स अँप वर पण आहे.
तिनी नवीनच gym मध्ये जाणे चालू केलं आहे.
त्या मुळे रोज स्टेटस ला व्यायाम करताना चे व्हिडिओ असतात.
न चुकता रोज टाकते.
एकदा तिचे स्टेटस पूर्ण बघितला व्हिडिओ च्या शेवटच्या भागात ती खाली वाकून वजन उचलत होती आणि व्हिडिओ शूटिंग मागच्या बाजूने केले होते.
आताच्या मुली घालतात ती त्वचेला लागून असलेली पँट (त्याला काय म्हणतात ते माहीत नाही)आणि t shirt asa dress.
पण ती पँट खाली वाकल्या मुळे ताणली गेली आणि व्हिडिओ मध्ये शरीराचा पँट च्या आतील भाग चित्रित झाला होता.
मी तिला तत्काळ msg karun त्याची जाणीव करून दिली तिने चेक केले आणि हजार वेळा sorry bolun states delete kele.
ह्या प्रसंगावरून लक्षात घ्या फोटो टाकण्याची हौस काही बरी नाही.
विचार करून चेक करून नंतर व्हिडिओ ,फोटो शेअर करत जा.

अजून एक:
तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो
असे ती केव्हा म्हणते?
नशेत असताना. मग उतरल्यावर पास्तावते.

म्हणजे व्यक्ती सज्ञान असली तरी नशेत असताना तिने फोटो काढायला / शेअर करायला दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येऊ नये.

परवाच एका पेडि. डॉक्टरने लहान मुलांचे मेडिकल एक्क्षाम करताना फोटो घेतलेले आणि चाइल्ड पोर्न साइट्स वर अपलोड केले होते अशी बातमी वाचली. एकतर लहान मुलांना असे एकटे सोडु सुद्धा नये व फोटो त्यांच्या आईवडिलांच्या परवानगी शिवाय आजिबात अपलोड करू नये. इथे पूर्वी दोन धाग्यांवर अशी चर्चा झाली आहे. लहान मुले सर्वात व्हल्नरेबल आहेत सध्याच्या काळात तर. ऋन्मेष अरे तुला पण मुलगी आहे. तू करशील का तिचे फोटो अपलोड?

करू नये. ह्या पिढीतील मुलांचे सर्व जीवन व पर्सनल डाटा ऑलरेडी जगभर कोणालाही उपलब्ध होउ शकतो असे आहे. फेसबुक व संलन्ग कंपन्यां च्या साइट वर मुले किंवा पालक अपलोड करत असलेले फोटो गुगल वरील माहिती, हे सर्व कोठे ही शेअर केले जाउ शकते अश्यावेळी संयम बाळ गणे बेस्ट. जे मूल आपले नाही त्याबाबत तर फोटो अपलोड केल्यास कोर्ट कचेरीस तयार राहावे.

त्यात फेक आयडी, कॅट फिशिंग करणा रे साळसूद पब्लिक, ऑनलाइन मैत्री ह्या मधले लोक गोड बोलुन फोटो घेउन त्याचा अब्युज करू शकतात हे ध्यानात ठेवावे.

गूगल मॅप तर सर्वच माहिती जपून ठेवत आहे
तुम्ही कुठे जाता.
कुठे किती वेळ थांबला आहात.
तुम्ही काढलेले फोटो आणि त्याच ठीकनची माहिती.
काही ही बाकी ठेवत नाही

कित्येक लोक फेसबुकवर आईचा, पत्नीचा, मुला मुलीचा वाढदिवसाचा फोटो शेअर करत असतात. या फोटोंचा गैरवापर लाखात एखादा होत असतो. पण होतो. तेव्हा फोटो अपलोड करु नये. हे वाटतं.

स्वतःचे फोटो अपलोड करताना बॅक ग्राउंड मध्ये कोणते दृश्य आहे ते पण तपासा .
सेल्फी upload करण्या च्या नादात .
बॅक ग्राउंड मध्ये बायको कपडे बदलत आहे असे पण फोटो अपलोड होतात.

म्हणजे व्यक्ती सज्ञान असली तरी नशेत असताना तिने फोटो काढायला / शेअर करायला दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येऊ नये.
>>>>

नशेत असतानाचे मित्रांचे फोटोही शेअर करू नयेत. मागे मी आयुष्यात पहिल्यांदा दारूचा ग्लास हातात घेतला. चवही चाखली. नवीनच जॉब होता. बॉसची बड्डे पार्टी होती. शॅंपेन हा मद्यप्रकार होता. केक कापावे तसे बाटली फोडून बड्डे साजरा केलेला. प्रत्येकाने चव घ्यावीच असा आग्रह होता. मग घेतली ग्लासभर. तो मद्याचा आकर्षक चषक धरलेल्या अव्स्थेत स्टाईल मारत मित्राबरोबर एक फोटोही काढला. त्याने मला न विचारता टाकला सोशलसाईटवर. माझी गर्लफ्रेंड आमची कॉमन फ्रेंड तिने तो पाहिला. झाले वाजली माझी बॅंड. कशीबशी काढली समजूत आणि दिले वचन पुन्हा आयुष्यात मद्यप्राशन न करण्याचे...
परवानगीशिवाय फोटो टाकल्याने एका कोवळ्या पोराचा जीव जाता जाता वाचला.

परवाच एका पेडि. डॉक्टरने लहान मुलांचे मेडिकल एक्क्षाम करताना फोटो घेतलेले आणि चाइल्ड पोर्न साइट्स वर अपलोड केले होते अशी बातमी वाचली
>>>>

डेंजर आहे हे ... खरेच याबाबतीत विश्वास हल्ली कोणावरही टाकायची सोय राहिली नाही

कित्येक लोक फेसबुकवर आईचा, पत्नीचा, मुला मुलीचा वाढदिवसाचा फोटो शेअर करत असतात. या फोटोंचा गैरवापर लाखात एखादा होत असतो.
>>>>

फेसबूक डीपीवरचा फोटो मित्रयादीत नसलेली व्यक्तीही बघू शकते, त्याला प्रायव्हसी नसते. तसेच थेट वा स्क्रीनशॉट मारून सेव्ह सुद्धा करू शकते. व्हॉट्सप डीपी सुद्धा तुम्ही प्लंबरचा नंबर सेव्ह केलात तर तो सुद्धा बघू शकतो वाटते.

जे मूल आपले नाही त्याबाबत तर फोटो अपलोड केल्यास कोर्ट कचेरीस तयार राहावे.
>>>>>>

मागे मुलीच्या मैत्रीणीच्या बड्डे पार्टीला गेलेलो. तेथील फोटो फेसबूकवर टाकताना ग्रूप फोटोही होते. मला बायकोने हेच कारण देत त्यातले काही डिलीट करायला लावले. योग्यच होते ते. पुन्हा मी असे केले नाही. पुढच्या पार्टींचे कधी टाकलेच तर क्रॉप क्रॉप करत टाकले. पण काही पालकांनी मात्र बिनधास्त असे ग्रूप फोटो शेअर केलेले दिसतात मला. तसेच ज्युनिअर सिनिअर केजी म्हटले की हल्ली शाळेत दर दहा दिवसांनी काहीतरी फंक्शन असतेच. त्याचे फोटो टिचरच शाळेच्या व्हीटसपग्रूपवर टाकतात. पुढे आणखी ते कोण कसे वापरते देवास ठाऊक.

नशेत असतानाचे मित्रांचे फोटोही शेअर करू नयेत. >> व्यक्ती हा शब्द व्याकरणानुसार स्त्रीलिंगी असला तरी त्यात स्त्री, पुरुष, एलजीबीटी- आबालवृद्ध सगळेच येतात.

काही लोक खरोखर निर्बुद्ध आहेत.
ताजी घटना सेल्फी च्या नादात सिंह गडा वरून एक सेल्फी प्रेमी दरीत पडला.
मध्ये समुद्रात प्रवास करताना तंत्रण्य सेल्फी च्या नादात तोल जावून बोट बुडाली सर्वांना जल समाधी.
गेल्या वर्षी सेल्फी च्या नादात मरीन ड्राईव्ह ला कॉलेज कुमारी समुद्रात वाहून गेली.
असंख्य घटना आहेत.
कालच सारखं सारखं फ्लॅश होत होत म्हणून लाईक डाऊन लोड केले आणि अॅक्टिवे केले.
व्हिडिओ चेक केले तर ९० टक्के व्हिडिओ उत्तर प्रदेश आणि बिहार मधील अती गरीब भागातील आणि आश्चर्य म्हणजे स्त्रियांचे
लाईक साठी सर्व लाज सोडून टाकलेले व्हिडिओ.
एकंदरीत स्थिती अत्यंत चिंता जनक आहे.
वीट आला लाईक चा आणि ते अँप delete kele

Pages