गेट टूगेदर

Submitted by डॉ.अमित गुंजाळ on 10 January, 2020 - 12:50

ज्ञानोदय इंग्लिश स्कूल ,नेवासा येथील ssc 1993 batch म्हणजे माझ्या batch चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा शनिवारी 10 नोव्हेंबर 2018 ला पार पडला .
खरे तर वयाच्या 15-16 व्या वर्षी विखुरलेले आम्ही सर्वजण चाळीशी पार झाल्यानंतरच एकत्र भेटलो . सुमारे 25 वर्षांनंतर भेटलेले मित्र त्यांच्या आठवणी.. त्याचा हा वृत्तांत!

तसं पाहिलं तर ह्या गेट टुगेदरची नांदी आठ महिन्यापुर्वीच झाली होती. मार्च महिन्यातच सौ. कल्पनाने व्हाट्सग्रुपवर हे पिल्लु सोडलं होतं.ते पिल्लु डोक्यात वळवळत असल्याने आम्ही पण उत्साहाने चटकन होकार दिला होता खरा. पण ग्रुप वरील नंतरच्या चर्चेने उत्साह डळमळीत होऊ लागला.गेट टुगेदर होणार नाही या विचाराने अंगावर काटा यायला लागला.
पण नितीन , विजय व इतर नेवासकर मंडळींनी एकांड्या शिलेदारासारखी ही फळी संभाळली व गेटटुगेदर यशस्वी करून दाखविले.
प्रत्यक्ष गेट टुगेदरच्या आधी २-३ दिवस सगळ्यांना फोन करुन पुन:पुन्हा येण्याचे आव्हान केले .शनिवारी सकाळी सर्वानी यायचे असे ठरले होते
ठरल्या प्रमाणे बरेच जण आलेही.आल्यावर सगळ्यांनी हॉलकडे कूच केले. तिकडे जातांना कुणी विचारही केला नसेल की, पुढचे 3-4 तास त्यांचे पुर्ण हास्यकल्लोळात बुडुन जाणार आहेत याची.
हॉलमधे सगळे बसल्यावर 'नितीन - द मॉनिटर' म्हणत होता की सगळे समोर तोंड करुन बसु... मग ओळखी करु. त्याने प्रस्ताव मांडला की आपण आपापली ओळख करुन द्यावी.
सगळे शीस्तीत समोर तोंड करुन बसले.मला नेहमीप्रमाणे मागच्या बेंचवर जागा मिळाली. प्रत्येकाने नाव गाव, शाळा सोडल्यानंतर काय काय 'उद्योगधंदे' केले ई.ई. बोलायचं असे ठरले.
सर्वानी छान अन सोप्या शब्दांत आपापली ओळख करुन दिली.
नंतर माझं नाव पुकारलं गेलं. वर्गात डोकं खाली करुन लिहित असतांना अचानक एखाद्या सरांनी नाव पुकारावं नि आपण दचकुन लटलट कापत उभ रहावं तशी परिस्थिती माझी झाली. उभं रहातांनाच काय बोलायचं त्याची उजळणी केली..आणि बोलून टाकले पटकन.
नंतर बाकीची मंडळी नंबर प्रमाणे बोलायला उठली.व छान छान गोष्टी सांगितल्या.
पुण्याचा डॉ .अतुल पालवे हा बोलायला उठला, तो थांबायचं नावच घेत नव्हता. माझ्याशेजारी बसलेल्या कुमार बाजीरावाला मी विचारले,' हा प्राध्यापक तर नाही ना?
हो ना, ४५ मिनिटे झाल्याशिवाय थांबणार नाही तो बहुतेक असे बाज्या म्हटला. मग मी ही म्हटले," तास संपल्याची घंटा वाजवावी काय?
नंतर डॉ.ने आपण तर सेटल आहोतच अन जमलेलोच आहोत तर असं काही सामाजिक कार्य करुया की समाजाच्या उपयोगी पडेल अशी छान कल्पना काढली.

मध्येच होमवर्क सारखा एक स्वमाहितीपर कागद ही दिला होता संयोजकांनि, चालू चालूतच तो सर्वानी रंगवला.आणि
कार्यक्रमही उत्तरोत्तर रंगत गेला.
मधेच आम्ही दिवंगत गुरुजन आनि काही पालक याना श्रद्धांजली अर्पण केली.
नंतर उठला ! संतोष सामसे स्वतः ची ओळख सांगितल्या नंतर त्याने संयोजकांचे आभार मानले व म्हटला कल्पना ताई, धन्यवाद बरंका! ग्रुप वर प्रथम gt चा विषय काढला बद्दल.

पुढे आपण एकत्रित समाजोपयोगी काय काय करु शकतो व ते करतांना जमा झालेल्या निधीचा योग्य विनियोग कसा करायचा याबद्द्ल चर्चा केली.
नंतर आम्ही जेवणाकडे कूच केले. चपाती, रोटी भाकरी, दोन भाज्या, वरण भात,बदामाचा शिरा असा फक्कड बेत होता. तिथे मग सर्वांनीच आडवा हात मारला. जेवतांना खुप धम्माल आली. जेवताना गप्पाचा छान फड रंगला होता. एकीकडे जेवणाच्या चवीने तर एकीकडे गप्पांनी पोट भरत होते. हशा आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता.
जेवण झाल्यावर ग्रुप फोटोची टुम निघाली.
फोटोसेशन आटोपलं लगेच सगळ्यांची निघायची घाई सुरु झाली. तरी नितीनने 'चहा येइल इतक्यात' असं सांगितले.
चहा झाला.. सर्वांनाच पुढे जायची घाई होती. पण कुणाचाही पाय निघत नव्हता. रेंगाळणारे जड पावले गाड्यांमधे परतत होती. गाड्या सुटल्या....खिडकीतुन निरोपाचे हात हलले...!

आणि वाटले,
स्नेहाचे असे चार क्षण
कधीतरीच वाट्याला येतात.
थांबावे असे वाटत असतांनाच
निसटुन जातात…
जपुया ओंजळीत,
असेच हळवे क्षण…
मनाच्या एका कप्प्यात...
किमान आयुष्यभरासाठी!

माझ्या या सगळ्या वर्ग मित्रमैत्रीणींचा भरपेट उत्साह आणि साथ यांनी हे गेट टुगेदर यशस्वी झालं! खुप आनंददायी वाटलं! एकेक जण ज्या वेळी आठवणी सांगत होते त्यावेळी आम्हालाही शाळेचे ते निरागस दिवस जे आता आपण 'मिस' करत आहोत ते ..... सगळं सगळं परत आठवलं.

खरच,मित्रानो ते फुलपाखरा सारखे दिवस परत येतील का ?

✍शब्दांकन
डॉ. अमित गुंजाळ
गंगापूरकर.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
साधेसुधे निर्मळ लिखाण
व्हीट्सपग्रूपच्या निनित्ताने जुने यार दोस्त फण्टर एकत्र येतात भेटतात आठवणी जागवतात एकमेकांच्या उपयोगी प्डतात आणि मग एक पाऊल पुढे जात समाजोपयोगी कार्येही करतात हे हल्ली एक छानच होते...