एक असे आटपाट नगरी ॥ बोलतसे तिज मायानगरी ॥
जनतेचे पोटभरी॥ समृद्ध असे ॥१॥
तिच्या कोण्या कोपर्यात ॥ राहतसे सतजन लोकांत ॥
ऋन्मेष नामे मिरवीत ॥
अवतारी थोर ॥२॥
ऋन्मेष महिमा अपरंपार ॥ मायबोलीचा शाहरुख धुरंधर ॥
धागे रचयिता भारंभार ॥ प्रश्न सोडवी ॥३॥
ऋन्मेषनी किर्ती सांगावी ॥ गर्लफ्रेंडची महती वर्णावी ॥
एमेनसीची वाट धरावी ॥ दिवसामाजी ॥४॥
तो असे पक्का नास्तिक ॥ की उगाची वेड पांघरीत ॥
सन्मार्गाची कास धरीत ॥ आम्हांसी कळेना ॥५॥
एके दिनी नवल झाले ॥ न घडता ते घडूनी आले ॥
ऋन्मेषचे भाग्य बदलले ॥
धन्य असे ॥६॥
कथा सांगतो मी बापुडा ॥ ऐकावी तुम्ही घ्यावा धडा ॥
उगी न करावा ओरडा ॥
विनवितसे ॥७॥
सकाळचा तो श्रावणी सोमवार ॥ आदल्या दिवशीची धुंद गटार ॥
वर्णावा तिचा हैंग ओवर ॥
नशिल्या डोळ्यांनी ॥८॥
मायानगरीची लोकल ॥ ख्याती तिची धवल ॥
पास ऋन्मेषचा संपेल ॥
योगायोग असे ॥९॥
ऋन्मेष जाता स्टेशनावरी ॥ लोकल आली वेळेवरी ॥
नजर जाता टिसीवरी ॥ भानावर आला ॥१०॥
ईकडून चढला ॥ तिकडून उतरला ॥
टिसीपासुन चुकला ॥ चमत्कार थोर ॥११॥
पोहोचला पासाच्या रांगेत ॥ उभे असे लायनीत सात ॥
खिडकी उघडी एकुलती एक ॥ अन्याय असे ॥१२॥
समोर डोकूनी बघता ॥ आंत पुरूष दिसता ॥
मनामाजी खट्टू होता ॥ काळ लोटतसे ॥१३॥
काळ काम वेगाचे गणित ॥ इंजीनियर डोके लावीत
स्त्रिया टाईमपास न करीत ॥ सिद्धांत सांगितला ॥१४॥
विचार येता मनांत ॥ अप्सरा एक लावण्यवंत ॥
बाजूच्या खिडकीत प्रकटत ॥ मनाजोगे झाले ॥१५॥
सरसावला त्या बाजूस झटकन् ॥ मध्ये आला आडदांड पटकन् ॥
ऋ बोलणार काही सट्कन ॥ सुंदरीनं पास घेतला ॥१६॥
ऋन्मेष मनी चरफडला ॥ मग शाहण्यावानी गप्प बसला ॥
का उगीच त्रागा करा ॥ व्यर्थ शीण टाळे ॥१७॥
पण त्यास नसे माहीत ॥ देव असे साथीत ॥
सदा त्यास राखीत ॥ अज्ञान असे ॥१८॥
एक डोळा लोकलवरी ॥ दुसरा असे सुंदरीवरी ॥
तिसरा लावे घड्याळावरी ॥ डोक्यात गणगण ॥१९॥
एवढ्यात गम्मत झाली ॥ मागून कोणी सुंदरी ओरडली ॥
आधीच दुसरी ऋने ऐकली ॥
शिSSट् आवाजें ॥२०॥
समोर पाहता हसू न आवरे ॥
वर दांडीवरी बसली कबुतरे ॥
एक विष्टले डोईवरे ॥ समोरच्याच्या ॥२१॥
भिजले केस डोईवरचे ॥ शिंतोडे दिसे काचेवरचे ॥
खाली सरकता कबुतराचे ॥ पुढे वाचा ॥२२॥
कबुतरविष्ठा चमचमीत ॥ नासिकाग्राला स्पर्शीत ॥
हनुवटीला चुंबीत ॥
प्रसादे मिरविली ॥२३॥
हसू किळस सहानुभूति ॥ अनेक भावना मनीं येती ॥
ऋन्मेषबाळ केवळ हसू आणती ॥ शाहणे असे ॥२४॥
समोरच्या दांडग्याला काय वर्णावे ॥ चित्र त्याचे सेल्फीने काढावे ॥
ऋ बाळाने मनी हर्षावे ॥
वांचलो म्हणोनी ॥२५॥
बाळाला साक्षात्कार झाला ॥ देव कबुतर बनला ॥
समोरच्याला धडा शिकविला ॥
बाळ गहिवरतसे ॥२६॥
अधिक विचार करता ॥ घटनांची संगती लावता ॥
साथी देव अदृश्य असता ॥ सज्ञान झाला ॥२७॥
मनी भावना उचंबळे ॥ श्रावणाचे करावे सोहळे ॥
जिवनात प्रथम वेळे ॥ संकल्प सोडतसे ॥२८॥
पाळावा श्रावण ॥ पुण्य मिळवून ॥
होऊ भाग्यवान ॥ आयुष्यभरी ॥२९॥
बाळाने संकल्प सोडीला ॥ श्रोते असे साक्षीला ॥
नास्तिक आस्तिक झाला ॥ केला देवाने ॥३०॥
मी कवी प्रेमवेडा ॥ आपणांसी विनवीत देववेडा ॥
घ्या हाती श्रावणाचा विडा ॥ भलेंची होईल ॥३१॥
न पाळता श्रावण जरी ॥ हे आख्यान श्रवण करी ॥
श्रावणाचे पुण्य पडे पदरी ॥
वाचावे नेमेची ॥३२॥
हे आख्यान वाचिता ॥ भेटेल गर्लफ्रेंड तत्परता ॥
एमेनसीत प्रवेश होता ॥
आयुष्य सत्कारणी ॥३३॥
हे असे सत्यकथन ॥ यासी बोल ठेवील चांडाळ जन ॥
तयासी गर्लफ्रेंडचे सुख ॥ नाही कधी ॥३४॥
मुळ कथा ऋन्मेषची ॥ मती माझी पामराची ॥
अनुवाद बोल सत्यची ॥ पडताळून पहा ॥३५॥
श्रावणमासी पहीला मंगळवार ॥
लेखणी प्रसवली धुंवाधार ॥
दंडवत माझा श्रोतियांसी अपार ॥
नतमस्तक होतसे ॥३६॥
इती श्री प्रेमवेडा विरचीत ॥ऋ आख्यान चविष्टीत ॥
कल्याणवंत होऊन ॥ समाप्त करतो ॥३७॥
शुभं भवतू ॥ प्रतिसाद इश्चू ॥
जबरदस्त . सुंदरच लिहिलय.
जबरदस्त . सुंदरच लिहिलय.
अरे सोमवार वर आला
अरे सोमवार वर आला
धन्यवाद मिरींडाजी!
स्तोत्र पठण केल्यासारखं वाटलं
स्तोत्र पठण केल्यासारखं वाटलं.. भारीच +१११
पुन्हा वाचले, पुन्हा मजा आली.
पुन्हा वाचले, पुन्हा मजा आली...
मी जर अरबोपती असतो तर माझ्या प्रत्येक लेखाचे पद्य रुपांतर करायची तुला प्रत्येक एक करोडची ऑफर दिली असती
निलमजी धन्स! ऋ __/\__
निलमजी धन्स!
ऋ __/\__
अरे वा. हे भारी आहे. मी मिस
अरे वा. हे भारी आहे. मी मिस केलं होतं. जबरदस्त..!
राहुल... __/\__
धन्यवाद बीएस.
धन्यवाद बीएस.
_____/\_____ जबरदस्त
_____/\_____ जबरदस्त
राहुल,
राहुल,
पोहोचला पासाच्या रांगेत ॥ उभे असे लायनीत सात ॥
खिडकी उघडी एकुलती एक ॥ अन्याय असे ॥१२॥
हे मात्र पटले नाहि कारण पहिल्या वर्गाच्या तिकिटा साठी वेगळी रान्ग असते हे engineer साहेबांना माहित नाही हे पटले नाहि बाकि विडम्बन झकास आवडले.
खतरनाक !
खतरनाक !
(No subject)
हाहाहा
हाहाहा
हे वाचलंच नव्हतं..
हे वाचलंच नव्हतं..
सुडंबन आहे.
सुडंबन आहे.
मजा आली पुन्हा वाचायला
मजा आली पुन्हा वाचायला
काही जणांना आजही हा आयडी माझा वाटतो. मीच स्वत:च्या कौतुकाचे विडंबन बनवतो वगैरे.. पण अर्थात मी पद्य आजवर कधी लिहिले नाही, मला जमत नाही. हे ज्यांना ठाऊक आहे त्यांना ठाऊक आहे. तरी नवीन सभासदांना क्लीअर करतो
ऋन्मेष यांचा मूळ लेखही भारी
ऋन्मेष यांचा मूळ लेखही भारी होता. मला दोन्ही समसमान आवडले.
श्रावण सुरू झाल्याने आणि आज
श्रावण सुरू झाल्याने आणि आज संध्याकाळी कंटाळा आल्याने पाठ वाचला. मूळ कथा माहीत असल्याने परत वाचतानाही आपोआप हसू येते.
नवीन माबोकरांनी ही लाभ घ्यावा.
मस्त, मस्त जमलय. लै भारी.
मस्त, मस्त जमलय. लै भारी. कसल अप्रतिम आहे व्यवस्थित जमलय.
अशा मराठी प्रतिक्रिया वाचून हे लिखाण किती छान आहे असे वाटत नाही. ज्यांना इंग्रजी उर्दू वगैरे येत नाही अश्या अज्ञानी लोकांनी लिहीले असे वाटते.
तेंव्हा मायबोलीवर "राहुल बाबा तुस्सी ग्रेट हो" हे वाचून कळले की हे छान अहे.
काय मराठी मराठी लावलय?
माशाल्ला. fantastic, wonderful असे लिहीले की तरच कळते की हे छान आहे. कारण अगदी पंजाबी, इंग्रजीत सुद्धा लिहीले तरच त्याला अर्थ आहे - मराठीला कोण विचारतो?
भयंकर लिहिलंय! मजा आली.
भयंकर लिहिलंय! मजा आली.
पूर्वी कसं काय राहिलं वाचायचं!
Pages