चंद्रावर मनुष्य पोचलाच नाही!!!????

Submitted by हर्ट on 8 November, 2009 - 08:29

आज मी हा ५ भागांचा माहितीपट पाहिला. खाली संकेतस्थळ देत आहे. पाच भाग पाहिल्यानंतर मलाही हेच वाटायला लागले आहे की चंद्रावर अमेरिकन मनुष्य गेलाच नाही. तुम्हाला काय वाटतं ते लिहा.

http://www.youtube.com/watch?v=Y5MVVtFYTSo

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, मागे कुठल्यातरी चॅनलवर मी पाहिलं होतं यासंबंधी. डिटेल्स काही आठवत नाहीयेत पण मतितार्थ हाच होता की नील आर्मस्ट्राँग वगैरे मंडळी काही चंद्रावर गेलेली नव्हती.

प्रश्नचिन्ह तरी टाका रे ! उद्गारचिन्हे टाकून अगदी अंतिम सत्य शोधल्याच्या थाटात जाहीर करतोयस बी तू.

हो मीही असाच एक प्रोग्रॅम पाहिला होता पूर्वी. विशेषतः अलिकडे झालेली स्पेस शटल लाँचिन्ग फेल्युअर्स आणि ती प्रोटेक्टिव कव्हरिंग्चे तुकडे पडल्यामुळे शटलने पेट घेऊन ६ अंतराळवीरांचा मृत्यू झाल्याची घटना यानन्तर अशा चर्चा बर्‍याच झाल्या होत्या ( ज्या बर्‍याच कन्विन्सिन्गही वाटल्या होत्या Happy )
काय माहित खरं काय खोटं काय! कुछ भी हो सकता है!
** इथे डॅन ब्राउन च्या 'डीसेप्शन पॉइन्ट'ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही!!

बी डिसकव्हरी वरती मिथ बस्टर्स नावाची एक सिरीज असते...त्यात ते दोघंजणं अतिशय वैज्ञानिक द्रुष्टया समाजातील विविध "गैरसमज" पडताळुन बघतात्. त्यांनी हे मिथ सुद्धा पद्धतशीर पणे बस्ट केले आहे आणि नासाने मानव चंद्रावर उतरवलाच नव्हता हा दावा खोडुन काढला आहे....ही लिंक बघा
http://www.youtube.com/watch?v=Wym04J_3Ls0&feature=PlayList&p=799D193807...

अरे हे फार जुने आहे.... काही नविन नाही.
विशेषतः जर्मन लोकं अजूनही हेच मानतात अन सांगतात की प्रत्त्यक्षात अमेरीकेचे यान चंद्रावर उतरलेच नव्हते. फेक मून लँडींग असा गूगल सर्च केलास तर अनेक लिंक्स सापडतील.. दोन्ही बाजूने वाद प्रतिवाद आहेत. seriously does it make any difference..?

मी सुद्धा असे पुष्कळ व्हिडिओ पाहिले आहेत युट्युबवर... कॉन्स्पिरसी आणि मिथबस्टर.. दोन्ही प्रकारचे. मिथबस्टर व्हिडिओ बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देतात. त्या 'रेडिएशन बेल्ट' चं उत्तर मी कुठे पाहिलं नाहीये पण. कोणाला माहिती असेल तर सांगा.

चिन्मय, चांद्रयानाने कशा प्रकारे सिध्द केलंय ते पण सांग ना कृपया...

वरती दिलेल्या मिथबस्टर उत्तरांपैकी लेजर रिफ्लेक्टर हे सर्वोत्कृष्ट उत्तर वाटले. त्याच लेजर रिफ्लेटरचा वापर करून शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की चंद्रावर ११०० साली एक मोठा अ‍ॅस्टरॉईड धडकला होता आणि त्यामुळे चंद्र आजही vibrate होतो. गंमत म्हणजे चंद्रावरचा हा स्फोट युरोपातल्या कुठल्याशा चर्चच्या दैनंदिनीमध्ये 'आज एक अशुभ घटना पाहिली' असा लिहून ठेवला होता. ८०० वर्षांनी त्याचा उपयोग झाला. Happy

अवांतरः
अमेरिकेत कॉन्स्पिरसी थीअरी म्हणजे करमणूक असते. दिसेल त्या गोष्टीची थीअरी मांडतात. ९/११ अमेरिकन सरकारनेच घडवून आणलं, एरिआ ५१ हा सिक्रेट एरिया असून तिथे एलियन लोकांशी संपर्क साधतात, त्सुनामीसुद्धा अमेरिकेने घडवून आणली,वगैरे वगैरे अशा अनेक थीयर्‍या आहेत. त्यात तथ्यही असू शकेल. पण एकंदरित थीअर्‍यांची संख्या पाहता त्यात तथ्य न वाटता त्यांच्यामुळे करमणूकच जास्त होते.

चिन्मय, मलाही तोच प्रश्न आहे, चांद्रयानाने कसे सिद्ध केले?

सॅम, त्यानंतर परत नविन कुणीच जाऊ शकले नाही चंद्रावर हे नवल नाही का? उलट त्यानंतर तर विज्ञानाने अजून प्रगती केली. मग तर अजून सोपे व्हायला हवे चंद्रावर उतरणे पण तसे झाले नाही. चंद्रावर हवा नसताना अमेरिकेचा झेंडा फडकवत असताना दाखविले आहे. सावल्यांमधे फरक दाखविला आहे. याची उत्तरे नासा देऊ शकला नाही.

http://en.wikipedia.org/wiki/Lunar_Reconnaissance_Orbiter

http://beta.thehindu.com/sci-tech/article13950.ece+chandrayaan+images+ap...

इस्रोने उपलब्ध करून दिलेली काही छायाचित्रे लवकरच इथे टाकण्याचा प्रयत्न करेन. चांद्रयानाच्या संकेतस्थळावरील ही माहिती नंतर शोधून तो दुवाही देईन.

बी,
झेंडा फडकणे इत्यादी गोष्टी सोप्या भौतिकशास्त्राच्या आधारे सहज स्पष्ट करता येतात. याबद्दलही नंतर लिहीन.

बी, अरे त्या lovevin ने टाकलेला व्हिडिओपण पहा की... ती सिरीज पहा, त्यात बर्‍याच गोष्टी दाखवल्या आहेत सिद्ध करून..

संता, मी सर्व संकेतस्थळं पाहिली आहेत इथली. सर्वच नाही कळतं पण त्यातलं. जसे वर तू लेजर रिफ्लेक्टर बद्दल म्हणालास मला ते काहीच कळले नाही.

<<<इतक्या अंतराळ वार्‍या करणार्‍या नासाला मागील ४० वर्षात एकदाही चंद्रावर यान पाठ्वता येऊ नये , यातचं सगळं आलं >>>

फारच बुवा विनोदी लिहीता तुम्ही श्री १२३!!!!

ही माहीती नासाच्या वेब साईट वर उपलब्ध आहे फार शोधायचीही गरज नाही
<<<
Six of the missions -- Apollos 11, 12, 14, 15, 16 and 17 -- went on to land on the moon, studying soil mechanics, meteoroids, seismic, heat flow, lunar ranging, magnetic fields and solar wind. Apollos 7 and 9 tested spacecraft in Earth orbit; Apollo 10 orbited the moon as the dress rehearsal for the first landing. An oxygen tank explosion forced Apollo 13 to scrub its landing, but the "can-do" problem solving of the crew and mission control turned the mission into a "successful failure." >>>

http://www.nasa.gov/mission_pages/apollo/index.html

अपोलो १३ नावाचा एक फार छान सिनेमा आहे तो पहा....

प्रेमाविना, बहुतेक श्रीला असे म्हणायचे असेल की यान पाठविले परत चंद्रावर पण परत मनुष्य का नाही पाठविला वा तिथे गेला.

जेव्हा ते चंद्रावर उतरले तेव्हा त्यांनी चंद्रावर ते लेजर रिफ्लेक्टर बसवले.. म्हणजे पृथ्वीवरून लेजर पाठवला की तो रिफ्लेक्ट होऊन परत येतो. जिथे तो रिफ्लेक्टर बसवला आहे तिथूनच तो लेजर परत येतो, चंद्रावर इतर कुठेही तो लेजर मारला तर परत येत नाही.

ह्याच रिफ्लेक्टरचा वापर करून चंद्र हा ११०० च्या सुमारास झालेल्या अ‍ॅस्टरॉईडच्या धडकेमु़ळे एका विशिष्ट फ्रीक्वेन्सीने अजूनही थरथरतो आहे असे खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे.

>> सॅम, त्यानंतर परत नविन कुणीच जाऊ शकले नाही
'जाउ शकले नाही' का 'पाठवले नाही'? ती अंतराळस्पर्धा शितयुद्धाचा भाग होती. रशियाच्या आधी चंद्रावर जाण्यात अमेरिकन सत्ताधिशांना रस होता. एकदा उद्देश सफल झाल्यावर, नासाला चंद्रावर जाण्यासाठी अजुन पैसा पुरवायला ते उत्सुक नव्हते. त्याऐवजी तो पैसा 'स्पेस शटल' उपक्रमात लावण्यात आला ज्यात जास्त फायदा होता.

बाकी http://www.youtube.com/user/naosoueu#grid/user/317163BCE0A6BAD7 इथे तुला Mythbusters चा पुर्ण भाग बघायला मिळेल, त्यात त्यांनी खालील शंकांची उत्तरं दिली आहेत,
- सावल्यांमधील फरक
- सावलीतला 'स्पष्ट' फोटो
- पदचिन्हे
- 'फडकणारा' झेंडा
- चलचित्रांची सत्यता

Apollo astronauts who walked on the Moon[edit]

Twelve men have walked on the Moon – eight of whom are still alive. All of the landings took place between July 1969 and December 1972 as part of the Apollo program.

Name Born Died Age at
first step Mission Lunar EVA dates Service Alma Mater
01. Neil Armstrong August 5, 1930 August 25, 2012 (aged 82) 38y 11m 15d Apollo 11 July 21, 1969[6] NASA[7] Purdue University, University of Southern California
02. Buzz Aldrin January 20, 1930 (age 84) 39y 6m 0d Air Force United States Military Academy, MIT
03. Pete Conrad June 2, 1930 July 8, 1999 (aged 69) 39y 5m 17d Apollo 12 November 19–20, 1969 Navy Princeton University
04. Alan Bean March 15, 1932 (age 82) 37y 8m 4d Navy University of Texas, Austin
05. Alan Shepard November 18, 1923 July 21, 1998 (aged 74) 47y 2m 18d Apollo 14 February 5–6, 1971 Navy United States Naval Academy, Naval War College
06. Edgar Mitchell September 17, 1930 (age 84) 40y 4m 19d Navy Carnegie Mellon University, Naval Postgraduate School, MIT
07. David Scott June 6, 1932 (age 82) 39y 1m 25d Apollo 15 July 31 – August 2, 1971 Air Force University of Michigan (freshman year, and later, an honorary doctorate), United States Military Academy, MIT
08. James Irwin March 17, 1930 August 8, 1991 (aged 61) 41y 4m 14d Air Force United States Naval Academy, University of Michigan
09. John W. Young September 24, 1930 (age 84) 41y 6m 28d Apollo 16 April 21–23, 1972 Navy Georgia Institute of Technology
10. Charles Duke October 3, 1935 (age 79) 36y 6m 18d Air Force United States Naval Academy, MIT
11. Eugene Cernan March 14, 1934 (age 80) 38y 9m 7d Apollo 17 December 11–14, 1972 Navy Purdue University, Naval Postgraduate School
12. Harrison Schmitt July 3, 1935 (age 79) 37y 5m 8d NASA Caltech, University of Oslo (exchange), Harvard University

बी यांचेशी सहमत.

अ‍ॅक्चुअली तो सीन आमच्या गणपती मंडळाच्या देखाव्यातला होता. त्याची फिल्लिम घेऊन नासाने चंद्रावर माणूस उतरल्याचे दाखवले.

मोदींनी मंगळाच्या कक्षेत पाठवलेले यानही असेच कुंभकोणमच्या गणपतीच्या देखाव्यातले होते, त्याची फिल्लिम इस्रोच्या वतीने टिव्हीवर दाखवण्यात आली.

स्पेसबीस चंद्रबिंद्र सगळं खोटं आहे. चंद्र सूर्य तारे, हे आपल्या डोक्यावर ठेवलेल्या टोपलीला पडलेल्या भोकांतून झिरपणारा प्रकाश आहे फक्त. आपण टोपली खाली झाकलेल्या कोंबडीसारखे कुणा एलियनने पाळलेले प्राणी आहोत.

बरोबर ना? एका वेबसाईटवर हे सगळं लिहिलेलं आहे, अन माझी यावर श्रद्धा आहे!

अरे, डॉ ईब्लिस , 'तुमचं' गणेशोत्सव मंडळ आहे?
ऐ ते न.

इथे कुणी अंतराळ संशोधक आहेत म्हणे माबोवर.
त्याना अशीच गं माहिती विचारूया का चंद्रमोहिमेविशयी?

Pages