आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

Submitted by सेनापती... on 11 May, 2011 - 12:12

नमस्कार मित्रांनो...

काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..

इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?

*************************************************************************************************************

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.

blog_script.txt (1.29 KB)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण पाहिले. संस्थळाचा हेतू आणि रचना उत्तम आहे.
पण कुणीही साहीत्य प्रकाशित करत सुटलंय. त्यामुळे अजिबात दर्जा नाही. चोरीवर पायबंद नाही. अनेकांनी सांगूनही संस्थळाने कारवाई केल्याचे दिसत नाही. मूळ लेखकाने तक्रार करणे आवश्यक असेल कदाचित. मूळ लेखकालाच काही करायचे नसेल तर इतरांनी सांगून उपयोग होणार नाही.

शाली, फेसबुकवर कुणावर अ‍ॅक्शन घेणार ? अवघडच आहे.

महाराष्ट्र टाईम्स मधील लेखावरून बालभारती ७ वीच्या पुस्तकात विंदा करांदिकरांची कविता गुरु ठाकूर यांच्या नावावर छापलेली आहे अशी पोस्ट मध्यंतरीच्या काळात कायप्पा वरून फिरत होती याची आठवण झाली. काय झाले त्याचे पुढे?

Pages