Hand Writing, copy- paste प्रकारच्या job मध्ये कितपत तथ्य आहे?

Submitted by गाडीवान on 30 December, 2019 - 13:30

बऱ्याच ठिकाणी English / Marathi hand writing work, typing job, copy-paste job अशा प्रकारच्या जाहिराती दिसतात. या जाहिरातींमध्ये सांगितलेले वेतनही खूप जास्त असते. इतके जास्त की कोणालाही हे काम स्वीकारण्याचा मोह व्हावा. (रु. १५००० ते रु. ६०००० प्रति आठवडा) मात्र ही कामे स्वीकारण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे नोंदणी करावी लागते, ज्या नोंदणीची फी रु. १००० ते रु. ५००० पर्यंत असते.

तर अशा प्रकारची कामे खरेच असतात का? काम स्वीकारून ते यशस्वीपणे पूर्ण केल्यावर खरोखरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे मिळतात का? यात फसवणूक होण्याची शक्यता किती आहे? मायबोलीकरांच्या माहितीत कोणी आहे का की ज्यांना खरोखर असे पैसे मिळाले?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कॉलेजमधील मैत्रीण फसून झालीय.
नॉवेल लिहायचे काम.. मी बघूनच बोल्लेलो गंडवेगिरी आहे. नाय ऐकले माझे. .. पंधरा दिवस मेहनत पाण्यात...
हे असे ते तसे नको पुन्हा लिहून आणा.. तरच पैसे.. समजून चुकली नशीबाने लवकरच... रजिस्ट्रेशनचे चारेक हजार गेले.

याविषयावर एक धागा आहे आणि तो फार जुना नाही Happy विनाकारण धागे काढणार्यांना नवीन वर्षात तरी सद्बुद्धी मिळो _/\_