मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हिंदी+ऐकण्यातला चुकीचा खरा किस्सा माझ्याच सोबत घडलेला
मी: "हॅलो, xxxx हॉल? हमारा सोसायटी कंपाउंड आपके हॉल के स्टेज के पिछे है, अभि अभि आपके हॉल स्टेजपर एक 4 फूट का गोल्डन यलो कलर का साप गया है.आप ध्यान रखना, वहा स्टेज पर आपके वर्कर आते है."
पलीकडे हॉल चा माणूस: "क्या? साब आपके यहा से निकला है क्या?अभितक नही पहुचा इधर.आया तो फोन करने बोलता हूँ."
आता 4 फुटाचा, गोल्डन यलो वगैरे वर्णनावरून माणूस नाहीय असा थोडा क्लू मिळायला हरकत नव्हती त्या बाबाजीला.

माझा भाऊ एकदा सातवी आठवीत असताना काश्मीरला गेला होता. तेव्हा तिथले ते पारंपारिक पोशाख भाड्याने देणारी लोकं या सगळयांच्या मागे लागली की, ये पेहेनके फोटो लेलो... वगैरे अर्थात पैसे होते त्यासाठी... हे सगळे नाही नाही म्हणत होते तरी ते मागे लागले म्हणून शेवटी माझा भाऊ वैतागून ओरडला "हमे नही घालनेका..."

ये पेहेनके फोटो लेलो >> आश्चर्य आहे. हिंदी माणूस सुद्धा मराठी माणसाप्रमाणे फोटो ले लो म्हणाला, फोटो खिचवा लो नाही म्हणाला.

पुड्या सोडण्याची स्पर्धाच भरलीय की इथे >>
मला पण आवडते पुड्या सोडायला.

माझा किस्सा :
आमच्या शेजारी उत्तर भारतीय कुटूंब नुकतेच रहायला आले होते. दोनच दिवस झाले होते अजून त्यांचे सामान नीट लावून झाले नव्हते.
त्या दिवशी मी ऑफिस मधून परतलो तर तो शेजारचा माणुस आला आणि म्हणाला "मानवजी I want to see the corodiles those you have in your house."

मगरी! माझ्या घरात? काय येड तर नाही ना लागलं याला असं वाटलं. मी म्हटलं क्यो मजाक करते हो. तर म्हणे त्याच्या बायकोने तसं सांगितलं. आणि तिला म्हणे माझ्या आईने तसं सांगितलं. मग आईला आणि त्याच्या बायकोला बोलावल्यावर उलगडा झाला.

त्याच्या बायकोने गेले दोन दिवस आईला अनेक वेळा वेळ विचारली.
"आंटी टाइम क्या हुआ" असं सारखं विचारल्यावर झालेला संवाद.
आई: " अरे तुम्हारे घर मे घडियाल नही है क्या?"
ती: "घडियाल! नही तो! घर मे कोई घडियाल रखते है क्या?"
आई: " क्यो नही रखते? हमारे घर मे तो तीन तीन है! तुम को बघना है क्या? "
ती घाबरून: "नही! मुझे डर लगता है!"
आई: " अरे इतनी घाबरती क्यों है? तुम्हारे घर मे भी एक घड़ियाल लेके आओ. बोलो तुम्हारे मिस्टर को."
ती: "ठीक है, शाम को ये आएंगे ना तो उन्हें आप के यहाँ घडियाल देखने भेजूंगी. "
आई: " ठीक है!"

तर आईला वाटले हिंदीत घड्याळालाच घडियाल म्हणतात काय. त्यामुळे हा सगळा घोळ झाला होता.

उत्तर भारतीय तुम्हाला इंग्रजीत विचारत होता?
Crocodile चे corodile झालेय बादवे...
उत्तर भारतियांचे इंग्रजी अशा धाग्याचे पोटेनशिअल दिसत आहे..

माझी मुलगी वय वर्षे 6.5
1. देखो हम खेलेंगे तो ये हम दोघोंका है।
2. मेरे बाबांका नाम गणेश है।
3. अरे अरे नीचे मत वाको

मेरे बाबांका नाम >> हे आवडलं. एक तर बाबा, आणि त्यांना आदरार्थी बहुवचनात हिंदीत कसं संबोधावं ह्याचा लहान मुलीने काढलेला सुंदर तोडगा. बाबांका Happy

आमला (मध्यप्रदेश) मधे आमच्या घरी छिन्दू नावाचा एक माणूस रोज पाणी भरायला यायचा.. आम्ही विमानदलाच्या कँप मधे राहत होतो आणि तो नागपूरच्या जवळच्या कुठल्यातरी गावचा होता.. एक दिवस तो पाणी आणायला विसरला, म्हणून आईने,
'अरे छिन्दू आज पाणीच नाही आणलं तू...'
छिन्दू : बाई मी तुम्हाला भुलूनच गेलो..... Happy
....
...
आमच्या शेजारी राहणारे नवरा बायको लखनऊ / वाराणासी इथले कुठलेतरी होते.. ती बायको एकदा आईला म्हणाली...
'आप कैसे सून लेते हो इस आदमी को. मैं एक दिन जुता लेके इस आदमी को पीटने वाली हूं..'
आई म्हणाली, 'लेकीन हुआ क्या?'
'आपको बाई बाई कहके पुकारता है, बाई तो कोठे पे होती है... ' Happy

me mazya giranivalya dadana mhanae hote.. barik dalana hann bhaiyya.. pichle time mota dalake diya tha to poli kadak aati thi...

Pages