गजरा

Submitted by किरण ..विहंग on 16 December, 2019 - 10:05

आज खरा मोगराही गंधाळला होता..
वेणीत तुझ्या मी जेंव्हा... गजरा माळला होता..

अवतरले चांदणे नभीचे आंगणात माझ्या
मोह नक्षत्रांना तुझा... अनावर जडला होता..

नको म्हटले तरीही...वाट वळते पुन्हा वळणावर
पावलांनाही रस्ता तूझा...आपसुकच कळला होता..

कविता माझ्याच मी ...चाळल्या पुन्हा नव्याने
शब्दाश्ब्दांवर ठसा तूझा ...अलवार ऊमलला होता..

आता मौन ही वाटते हवेहवेसे...रात्र ढळताना
निशब्द तुझ्या स्पर्शाने जणु ..आसमंत सुखावला होता...

काय करावी मी सुखाची परीभाषा..तू समीप असताना
बाहूपाशात माझ्या आज चंद्र निजला होता...

वेणीत तुझ्या मी जेंव्हा... गजरा माळला होता..

किरण विकास कांबळे
(शब्दवेल)

Group content visibility: 
Use group defaults

वाह... अप्रतिम.. तिचा केसांचा स्पर्श होताच मोगरा अधिक च गांधाळला होता... जेव्हा मे केसात तिच्या गजरा माळला होता...