शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'प्रमाथी चित्रीकरण ' यातील 'प्रमाथी' चा अर्थ ?
? घातक
( बाकी जालशोधात एक कौरव, एक संवत्सर असेही अर्थ मिळतात).

प्रमाथी >> खळबळजनक किंवा धोकादायक किंवा त्रासदायक किंवा तिन्ही अर्थांशी निगडित कोणताही शब्द

हा धागा शोधत होतो.
'कोळून पिणे' म्हणजे नेमके कसे? आपण शब्दशः अर्थाने काय कोळून पितो?

चिंच.
ड्राय (सेमी ड्राय) चिंच पाण्यात भिजवली की त्याचा गर सुटा होतो. तो उरलेल्या चोथ्या पासून वेगळा करणे याला चिंच कोळणे असे म्हणतात. ज्याने चिंचेचे काँसंट्रेट मिळते/ गाभा वेगळा होतो.
एखादी गोष्ट खूप जवळून माहित असणे, मुळातुन त्याचं सार समजणे == कोळून पिणे.

ओह, चिंचेचा कोळ. आले ध्यानात.
To know someone or something inside out ह्या अर्थाने माहीत होते पण शब्दशः अर्थाने क्रियापद आता कळाले.
धन्यवाद अमित.

ते आजकाल 'कोल्ला (/कोलला) तुला!' म्हणतात; त्याचाही अर्थ कोळून काढणे अश्या प्रकारचा आहे का?

एखाद्या कर्जदाराने रक्कम परत न केल्यास त्याच्याकडून जबरदस्तीने ती रक्कम किंवा इतर मालमत्ता हस्तगत करणे याला कोळणे म्हणतात.
हा शब्द पुढे स्वयंपाकघरात शिरला. आंबा, तांदूळ, चिंच इत्यादीचा अर्क ज्या पाण्यात काढला जातो, त्यास कोळ असं म्हणतात. आता हा शब्द चिंचेपुरता मर्यादित राहिला आहे. चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचा अर्क असलेले पाणी.

वाळून कोळ होणे या वाकप्रचारात कोळ म्हणजे अर्क काढून उरलेला चिंचेचा भाग.

कोलणे म्हणजे विटीस दांडूने मारणे. फेकून देणे असाही एक अर्थ आहे.

मला हे खूप दिवसांपासून विचारायचं होतं. हा धागा बघून आठवण झाली.
काय बरोबर आहे?
१) मला एखादी गोष्ट कळली.
२) मला एखादी गोष्ट कळाली.
माझ्या मते १) बरोबर आहे.
पण बर्‍याच उत्तम मराठी बोलू/टाईप करु शकणार्‍या लोकांनी ' कळालं' लिहिलेलं पाहिलंय, इथे किंवा इतरत्रही.

धन्यवाद चिनूक्स.
पण कोळून पिणे चा अर्थ एखाद्या गोष्टीचा अर्क/सत्व्/गाभा काढून ऊदा. चिंच ती पिणे असाच आहे ना?

कोळणे आणि कोलणे दोन्हींचा अर्थ माहित आहे. नगर साईडला दोन्ही शब्द वापरतात.
चल त्याला जरा कोळून येऊ हा, दम देऊन पैसे काढण्याच्या ईराद्याने एखाद्याला भेट देणे असा वापरतात. त्यातला कर्ज दिलेले असले पाहिजे किंवा कर्जवसूली हा आयाम आता नव्याने कळत आहे.

धन्यवाद स्वाती ताई
मी इषित (इष) हा शब्द The Students New Sanskrit Dictionary -देवस्थळी, कुलकर्णी, जोशी यांच्या शब्दकोशात शोधला परंतु सापडला नाही

ते आजकाल 'कोल्ला (/कोलला) तुला!' म्हणतात;
>>

विटी दांडूतल्या कोलणे या क्रियेवरून केलेला असभ्य वाकप्रचार आहे. खेळ सुरू करताना विटी गदेवर ठेवून दांडूने ती उडवतात त्याला कोलणे असे म्हणतात. ती क्रिया डोळ्यासमोर आणा म्हणजे याचा अर्थ लागेल

कोलणे = दूर उडवून लावणं.
बोलाचाली करताना हाकलणे, निरूत्तर / अपमान करून घालवून देणे असं काही तरी.

ते आजकाल 'कोल्ला (/कोलला) तुला!' म्हणतात; त्याचाही अर्थ कोळून काढणे अश्या प्रकारचा आहे का?
<<
नुसता विटी दांडु नव्हे.
बैलाने शिंगावर घेऊन उडवला, तर त्याला कोलला असे म्हणतात.

टवणेंना अभिप्रेत असलेला अर्थ "कोल्ला"पूर साईडला फ्येमस असण्याची शक्यता नाकारता येत नाही Rofl

शिवस्तुती मध्ये शेवटी एक श्लोक आहे -
शास्त्राभ्यास नको श्रुती पढु नको
तीर्थासी जाऊ नको
योगाभ्यास नको व्रते मख नको
तीव्र तपे ती नको
काळाचे भय मानसी धरू नको दृष्टासी शंकू नको
ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको

या मधल्या 'मख' चा अर्थ काय आहे ?

सोळा सोमवारच्या कहाणीत उल्लेख आहे की राणी चिवटं विकायला जाते तर ती उडून जातात. तर चिवटं म्हणजे काय?

थँक्स.

चिवटं म्हणजे काय हे अनेक वर्षाचं न सुटलेलं कोडं आहे माझ्यासाठी

अंधार पडायला लागल्यावर ब्राईटनेस कमी होतो, तेव्हा दिसतं तसं दिसणं म्हणजे अंधुक. भरपूर प्रकाश असतानाही धूर/धुकं इत्यादी आलं असेल तर जसं अस्पष्ट दिसतं ते म्हणजे धूसर.

दुसरा धागा आहे माहीत नाही म्हणून इथे विचारते की "एखाद्याला दुसर्‍याने ऐकवणं" म्हणजे आपण म्हणतो ना की 'मला हे ऐकवू नकोस "यासाठी इंग्रजी शब्द किंवा वाक्प्रचार कोणता आहे?

टॉक टू दि हँड
ड्झ दिस फेस लुक लाईक ऑफ समवन हू केयर्स?
(हे दोन्ही भांडण करताना वापरावे Wink एरवी नाही. एरवी 'लेट्स रिव्हीझिट दिस कॉन्व्हर्सेशन लेटर' सहसा पुरेसं असतं)

'मला हे ऐकवू नकोस "यासाठी इंग्रजी शब्द किंवा वाक्प्रचार कोणता आहे? >> इंग्रजी नाही येत पण हिंदी मधला हा संदर्भ बरेच जण वापरतात.
index

Pages