इडली, हॉटेल आणि भामटा !

Submitted by चंपक on 4 January, 2014 - 05:57

गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!

ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!

हे सर्व सुरु झाले, ते माझ्या एका अमेरिका स्थित मित्राने त्यांच्या नासिक येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीं यांचेशी माझी फोन वर ओळख करुन दिल्याने!! मी मे २०११ ला भारतात परतलो, अन व्यवसाय करायचे मनावर घेतले. म्हणुन मग, माझ्या मित्राने मला त्या बुजुर्ग उद्योगपतींची भेट घडवुन दिली.

एप्रिल २०१२ मध्ये मी त्यांना नासिक ला भेटलो. त्यांनी त्यांच्या पुणे येथील एका अन्न प्रक्रिया कंपनीत व्यवस्थापनाचे प्रश्न असल्याने मी त्यात लक्ष घालावे असे सांगितले. मी त्यात जास्त रस घेण्याचे कारण म्हणजे, त्या कंपनीत (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" भागीदार आहेत अन त्यांचा तरुन मुलगा विशाल ह्या कंपनीचे कामकाज पाहतो हे कळाले म्हणुन! ह्या "श्रीमान ईडलीवाले" नी आशियातील पहिले ईको-फ्रेंडली हॉटेल बनवले असे जगाला महिती आहेच!

मी मे२०१२ पासुन चिखली, पुणे येथील या कंपनीत बिनपगारी, सी. ई. ओ. म्हणुन काम सुरु केले! (जगातला मी पहिला सी. ई. ओ. असेल जो बिन-पगारी कामावर हजर झाला!) अर्थात, कंपनीचे उत्पादन ४० टन प्रती महिना वाढवले तर मला योग्य तो पगार सुरु केला जाणार होता. तसेच ह्याच कंपनीत ३०% हिस्सा खरेदी करुन रितसर भागीदार बनवले जाणार होते. तसा शब्द, नासिकचे उद्योगपती अन (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी दिला होता.

ही कंपनी (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" कुटुंबिय अन नासिकचे उद्योजक यांचेतील "लिमिटेड कंपनी' आहे. हॉटेल व्यवसायाला लागणारे "ग्रेव्ही" अन "रेडीमिक्सेस" कंपनी तर्फे बनवले जात असत. पुणे, मुंबई अन गोवा येथे हे पदार्थ हॉटेल व्यावसायीकांना विकले जात असत.

मी मे २०१२ पासुन कंपनीच्या उत्पादन वाढ, विक्री मध्ये वाढ अन त्याच सोबत उत्पादन खर्चात कपात अशा तीन पातळ्यांवर काम सुरु केले. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई अन एक संचालक नासिक येथे असल्याने कंपनीचे चेक मिळणे अन 'पेटीकॅश' चा मेळ सांभाळणे अवघड असल्याने अनेकदा माझे पदरचे पैसे खर्चुन मी कंपनी चे काम चालु ठेवत असे. माझे पैसे मला १-२ महिन्याने परत मिळत असत. अश्याने माझे दोन्ही संचालक माझ्या कामावर खुष होते.

विक्री मध्ये वाढ करण्यासाठी मी संचालकांना महाराष्ट्रभर विक्रेत्यांचे जाळे उभारण्याचे सुचवले. विक्रेत्यांची आर्थिक ताकत कळावी म्हणुन त्यांचेकडुन तीन लाखां पर्यंत अनामत रक्कम घ्यावी असे मीच सुचवले.(कुठुन दुर्बुद्धी सुचली!) त्यावर विशाल नी मला विक्रेत्यांशी संपर्क करायला अनुमती दिली. मी नगर, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, नासिक आणि पुणे येथे काही लोकांशी चर्चा केली. पैकी नगर आणि पुणे येथील दोन फर्म विक्रेते बनण्यास तयार झाले. त्यानुसार करार करण्यात आले. त्या दोन्ही फर्म्सनी प्रत्येकी रु. तीन लाख असे एकुन रु. सहा लाख हे कंपनीच्या एस. बी. आय. मुंबई येथील बॅन्क खात्यात जमा केले. त्यानुसार, अहमदनगर तसेच पुणे येथील फर्म्सना तसे लेखी पत्र माझ्या नावे देण्यात आली. तेंव्हा मला शंका आली, कि माझा अन कंपनी चा लेखी व्यवहार नसल्याने ती पत्रे "श्रीमान इडलीवाले"च्या नावाने द्यायला हवीत. पण "श्रीमान इडलीवाले" ने ती पत्रे माझ्याच सहीने द्यावीत असे आग्रहाने सांगितले.

करार झाल्या नंतर पुणे अन नगर येथे सेल्स टीम ने जाऊन जुजबी मार्केटींग पन केले. परंतु स्पर्धेत टिकण्या साठी पुरेसे मार्केटींग करण्यासाठी "श्रीमान इडलीवाले"तयार झाले नाहीत. (त्यांनी जमलेल्या सहा लाख रुपयांत बिग बजार ह्या रिटेल चेन ची एक ऑर्डर पुर्ण केली अन नफा कमावला). ज्या तडफेने "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी नगर अन पुणे येथे मार्केटींग साठी पैसे अन वेळ द्यायला हवा तो दिला नाही. मला स्वतःला कुठलाही खर्च करायला परवानगी दिली नाही. माझ्या सहीने पैसे जमा केले पन खर्च करताना "श्रीमान इडलीवाले" चीच सही हवी असे !!!

कालांतराने, मला कंपनीची पुर्वीची अनेक कर्जे नव्याने लक्षात यायला लागली. नव्याने केलेल्या विक्रेत्यांना माल देण्यासाठी नवीन माल तयार करणे गरजेचे होते. पण "श्रीमान इडलीवाले" यांनी ते पैसे इतरत्र वापरल्याने कंपनी बंद राहु लागली. तीन-तीन महिने कर्मचार्यांना पगार नसे. वीज बील अन पाणी बील थकलेले होते. कच्चा मालाचे पैसे मिळावेत म्हणुन अनेक सप्लायर दररोज प्रत्यक्ष येऊन अन फोन करुन त्रास देऊ लागले. काही स्थानिक सप्लायर्सनी कंपनी अन कर्माचार्यांना त्रास दिला जाईल असेही सुचवुन पाहिले.

अश्या अनेक तक्रारी नंतर, नोव्हेंबर २०१२ ला कंपनीचे उत्पादन पैसे नसल्याने बंद पडले. तेंव्हा काही गोष्टी नव्याने कळल्या.

१) "श्रीमान इडलीवाले" ह्यांच्या पुणे येथील या कंपनी मध्ये तयार केलेल्या उत्पादनांची विक्री ही प्रत्यक्षात "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ह्या बाप्-बेटे संचालक असलेल्या वेगळ्याच कंपनीच्या नावाने करत असत. त्यामुळे पुणे येथील कंपनीला तिच्या उत्पादनांचे पैसेच मिळत नसत. ते सर्व पैसे "श्रीमान इडलीवाले" अपहार करुन स्वतःच्या इतर कंपनीसाठी वापरत असत.

२) "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ने पुणे येथील कंपनीची उत्पादणे वेगळ्या नावाने तळोजा येथील एका कंपनीतुन बनवुन घेणे सुरु केले होते. पुणे येथील ही भागीदारीतील कंपनी त्यांना बंद पाडायची होती.

३) "श्रीमान इडलीवाले" बाल्-बेटे अनेक कागदी खेळ करुन कंपन्यांचे संचालक अन सह्याचे अधिकार बदलत होते. अन त्यामुळे त्यांच्या ही फसवा-फसवी कायद्याच्या आधारे सिद्ध करणे कठीण झाले होते.

नोव्हेंबर/ डिसेंबर २०१२ ला कंपनी बंद झाली. तोवर माझे कंपनीत खर्च केलेले रु.१.९२ लाख आणि दोन विक्रेत्यांचे रु. सहा लाख, असे एकुन रु.सात लाख ९२ हजार ही रक्कम "श्रीमान इडलीवाले" नी मला त्वरीत परत द्यावी असे मी त्यांना कळवले. त्यांनी अनेक उडवा उडवीची उतार दिली. फोन न घेणे, एस एम एस ला उत्तर न देणे, असे प्रकार केले. मी खंडणी मागतोय, अशी पोलीसांत तक्रार करील, अशी धमकीही त्यांनी ई-मेल पाठवुन मला दिली.

तुझे पैसे देईल पण वितरकांचे पैसे विसरुन जा असे सुनावले. आज एक वर्ष उलटुन एक रुपयाचाही उत्पादित माल विक्रेत्यांना न देउन, त्यांचे सहा लाख रुपये बिन-व्याजी वापरायला "श्रीमान इडलीवाले" बाप्-बेट्यांना थोडीही लाज वाटु नये ?? त्या नव्याने उद्योगात आलेल्यांचे पैसे आपण फुकट वापरतोय याची शरम वाटु नये ??

माझ्या अन सोबतच्या तरुणांच्या कुटुंबातील अनेक अडचणीच्या प्रसंगी विशाल इडलीवाले ला मदतीचे साकडे घातले, परंतु निगरगट्ट इडलीवाले महाशय अजिबात बधले नाहीत.

आपल्या पुस्तकांनी महाराष्ट्रातील तरुणांना उदयोजक बना असा सल्ला देणारे, अन आत्महत्येच्या दारातुन परत फिरुन एवढा मोठा उद्योग उभारल्याच्या गप्पा मारणारे "श्रीमान इडलीवाले" प्रत्यक्षात मात्र धादांत खोटारडे अन फसवणुकी चे धंदे करतात हे पाहुन माझ्या सारख्या तरुणाला अत्यंत क्लेश झाले.

जेंव्हा माझ्या घरी बाळ जन्माला यायचे होते, तेंव्हा मी पैशांसाठी खुप विनवनी केली, परंतु "श्रीमान इडलीवाले" बाप-लेक मात्र बधले नाहीत. त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय होऊनही ह्या बाप-लेकांची बुद्धी मात्र ठिकाण्यावर येत नाही, हे दुर्दैवच!

"श्रीमान इडलीवाले" नी स्वतःची आत्महत्या टाळली, मात्र मी अन माझ्या सारखे नव्याने व्यवसाय करु इच्छिणारे अजुन तीन तरुणांना मात्र आत्महत्येच्या दारात ढकलुन दिले!

स्वतः ऑडी ,मर्सीडिज अन तत्सम लक्झरी गाड्या उडवायच्या, फोर अन फाईव स्टार हॉटेलांत मजा मारायची, पार्ट्या करायच्या, बायका-मुलांना परदेशात फिरायला न्यायचे अन, महाराष्ट्रातील तरुण मुलांना व्यावसायीकतेची स्वप्ने दाखवुन लुटायचे हा नवाच "धंदा" "श्रीमान इडलीवाले"अन त्याच्या मुलांनी सुरु केलाय असे दिसते. मराठी मुलांना फसवणार्या या "ठकसेना" ला शिक्षा झालीच पाहिजे!

आमच्या सारख्या किती तरुणांना "श्रीमान इडलीवाले" ने फसवले ह्याचा शोध गृह खात्याने घेतला पाहिजे, ह्याची चौकशी झाली पाहिजे, आणि त्या सर्वांचे पैसे परत केले गेले पाहिजेत, ही नम्र विनंती!

"श्रीमान इडलीवाले" इतके मोठे आहेत, कि त्यांचे नाव ऐकुन पोलीस अन प्रसार माध्यमेही ह्या हत्येची दखल घेत नाहीत. पोलीसांनी एक कागदावर तक्रार तर लिहुन घेतली, पण पुढे काहीही नाही!

सदर तक्रार गेले एक वर्षे मी स्वतः मा. मुख्यमंत्री, मा. गृह्मंत्री, मा. पोलीस महासंचालक, मा. पोलीस आयुक्त, पुणे, मा. पोलिस निरिक्षक-निगडी, पुणे इत्यादी "अकार्यक्षम" कार्यालयात दिलेली आहे. पण आजवर त्यावर काहीही दखल घेउन कारवाही झाली नाही!

आता न्यायलयात जाउन आपलेच पैसे परत मिळण्यासाठी पुढील २० वर्षे लढाईची मानसिक तयारी करतो आहे!

जै हिंद! जै म्हाराष्ट्र !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे. चंपक, मामी, शर्मिला, शोभा बोंद्रे सगळेच अनुभव भयानक आहेत.
तुमच्या कायदेशीर लढ्याला शुभेच्छा.

आत्ता हातात पडलं हे...बॉस..हजम नही हो रहा अशी अवस्था आहे... Sad
दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे? 'ह्या' माण्साचं प्रत्येक पुस्तक माझ्याकडे आहे.प्रत्येक मुलाखत आवर्जून बघीतली आहे.त्याचं हॉटेल अभ्यासायचा आमचा घाट होता... वैयक्तीक कामासाठी एकदा फोनवर जुजबी बोललोय.शिवाय दोन-चार इ-मेल्सपण!!!
ह्याच्या हाटलांमध्येही गेलोय... आता सगळंच कळलं...
चंपक लढ्यासाठी शुभेच्छा तर आहेतच...
लेखाची लिंक इतर ठिकाणी शेअर केल्यास चालेल का?की अडचणीचे आहे ते...??

{{{ जेंव्हा माझ्या घरी बाळ जन्माला यायचे होते, तेंव्हा मी पैशांसाठी खुप विनवनी केली, परंतु "श्रीमान इडलीवाले" बाप-लेक मात्र बधले नाहीत. त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय होऊनही ह्या बाप-लेकांची बुद्धी मात्र ठिकाण्यावर येत नाही, हे दुर्दैवच! }}}

अतिशय खेदजनक विधान. यात त्या महिलेचा काय दोष? आणि काव्यगत न्यायाचं म्हणाल तर तुमची फसवणूक झाली म्हणजे मग तुम्हीकोणाची तरी पूर्वी तशी फसवणूक केली असणार आणि आता तुमच्यासोबत काव्यगत न्याय झाला असे म्हणावे का?

तुमच्याही अनेक चूका आहेतच की. तुम्ही नावाला भूललात आणि बिनपगारी सीईओ म्हणून काम केलंत, शिवाय पदरचे पैसे खर्च केलेत हीच तर पहिली धोक्याची घंटा होती. तुम्ही ती ओळखली नाहीत म्हणजे तुम्ही सीईओच काय पण मॅनेजर बनायला तरी पात्र आहात का याचा विचार करा.

लोकांची जी अफाट संपत्ती वाढत जात असते त्यात त्यांच्या कर्तबगारीचा कमी आणि इतरांच्या मुर्खपणाचा जास्त वाटा असतो. आपण आपल्या मुर्खपणाने त्यांची संपत्ती वाढविण्यास हातभार लावू नये. फार तर काय झाले असते तुम्हाला सीइओ बनण्याची संधी मिळाली नसती दुसरा कोणी तरी त्या खुर्चीवर बसला असता. काही हरकत नव्हती तुम्हाला पोटापाण्याला दुसरा ऑप्शन मिळाला असताच की. तुम्हाला मोह आवरता आला नाही म्हणून तुम्ही नसतं झेंगट गळ्यात अडकवून घेतलंत.

पण इडलीवाला म्हणजे नक्की कोण? खरे नाव काय याचे ? Uhoh

वाचल्यावर सुन्न व्हायला झाले. आय होप चंपक हे यातुन सावरुन पुढे गेले असतील.

"Idli orchid ani mi"
che lekhak (wa prsidhdh uryojak) asawet. Google kara

सस्मित, मागे पण हा लेख वर आला होता तेव्हा वाचला होता. तरी मला टोटल लागत नव्हती की इडलीवाला म्हणजे नक्की कोण? मी कामत समजत होते. पण डायरेक्ट नाव कसे घ्यावे हे कळेना. अतुल पाटील यांच्या प्रतीसादावरुन आता ठाम कळले. आज लेख वर आला तेव्हा परत ते आठवुन असे वाटले की कारण मनाला हादरवुन सोडणार्‍या घटनेतुन माणुस लवकर वर येत नाही कधी कधी. धन्यवाद अतुल !

बाकी भरत आणी फिल्मी ( जो कोण डु आय असाल ते ) तुमच्या कुजकटपणा चालू राहु दे. माणसाने सरळ असण्यापेक्षा कुजकट असलेले जास्त चांगले असते.

लेखावरचा पहिला प्रतिसाद यांचा म्हणजे लेख प्रकाशित होताक्षणी वाचलाय.
आता म्हणतात, मागे पण हा लेख वर आला होता तेव्हा वाचला होता. - दुसर्‍यांदा.
आता तिसर्‍यांदा.
असो.

नरमांस कुठल्या चवीचे असते याची चर्चा करुन खालच्या पातळीवर जाण्यापेक्षा ढोंगी असलेले बरे, निदान कोणाच्या भविष्यातल्या मरणाची तरी मी वाट बघत नाही. Proud

हे माहित व्हायच्या खूप वर्षे आधी एकदाच ब्रेकफास्ट केला होता विठ्ठल कामत मध्ये. अतिशय बकवास चव होती. असे वाटले रात्रीचेच सांबार दिले.
दर वाढीव.
त्यानंतर कधी पाय ठेवला नाही तिकडे आणि विठ्ठल कामत म्हणजे बकवास चव असच समीकरण फिट्ट बसलं. आजही कामत हॉटेल म्हटलं (मग ते कोणतेही असो), नाही प्रेफर करत.

--x--

याचा काही निकाल (शेवट काय झाला या अर्थी ) लागला का ? +१

Pages