उडता मुका, जरी असला सुका

Submitted by सिद्धेश्वर विला... on 13 December, 2019 - 02:10

उडता मुका, जरी असला सुका

तो गॉड मानून घ्यावा

कितीही चंचल पऱ्या दिसल्या

तरी एकीचाच हात धरावा

सोज्वळ शालीन निवडून

द्यावी सून आपुल्या घराला

घेत जावे उडते मुके मग

ठेउनी स्थिर मनाला

हात लावूनी ओठांना

त्या सोडिती हवेत सारे

अंतकुक्कुट बनवती सैरभैर

उमजा धोक्याचे हेच इशारे

सुक्या मुक्यांचे पाश हळूहळू

करतील विजार तुमची ओली

घेणाऱ्याला करावा लागतो

आपला खिसा तिच्या हवाली

सुक्या मुक्याने पदरी पडती

फक्त ओलीचिंब स्वप्ने

बायको कुशीत येऊनही

उराशी नको नको ते दुखणे

इथे धड ना तिथे धड

नुसती मनाची घालमेल

मुक्यामुळे तो मुका जाहला

जणू जिव्हा झाली जड

कशाला हवे ते सुके मुके

ओले हक्काने घ्यावे

दुर्लक्षून ते सारे सुके

हात पिवळे करावे

==============================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद तुलसी साहेब ......

एकदम शीघ्र सुचलीय हि कल्पना .. सकाळी सुमारे आठच्या दरम्यान मी मुलाला शाळेत सोडून येत होतो .. जवळच असलेल्या फाईव्ह गार्डन परिसरात बऱ्याच तरुणतरुणी चालत असतात .. एक सुंदर तरुणीने मस्तपैकी माझ्या मागून येत असलेल्या तिच्या मैत्रिणीला उडत मुका दिला ..मी दोघींच्या मध्ये असल्याने , गोंधळून गेलो .. आणि तिथेच गाडी थांबली .. मग ..काय तिलाही तिच्या मुक्याचा परिणाम जाणवला आणि मी तर आधीच सर्द झालो होतो .. त्या दोघीही आपापसात हसल्या , गळाभेट झाली आणि आल्या मार्गाने माझ्यावर हसत निघूनही गेल्या .. थोड्याच वेळात गृहमंत्र्यांच्या फोन आला आणि भाजीकुजी आणायला सांगितले .. तो थोडा क्षणिक बदल , हि कल्पना देऊन गेला आणि परत गृहस्थाश्रमाकडे रवाना झालो .