Submitted by अमृत जोशी on 10 December, 2019 - 11:05
मी शब्दांना जोडीत जातो...
अन अर्थाला तोडीत जातो..
निरर्थकाचे सारे-सारे ,
कविता म्हणुनी ओढीत जातो..
मी शब्दांचे बांधून इमले..
जे लिहतो,ते कुणा न गमले..
सहज सोपे सोडून सारे..
अगम्य कडवे खरडीत जातो..
यमकांमधले रुक्ष खेळही..
अन जुळवतो छन्दमेळही..
जे लिहतो ते राखून हातचे..
खुद्द स्वत:ला फसवत जातो ..
मला न कळली कविता फार ..
तरी लिहिण्याचा घेऊन भार ..
जाण, जाणत्या रसिकाला मी ..
माझ्यावरती हसवीत जातो..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
मला काव्यतलं फारसं कळत नाही
मला काव्यतलं फारसं कळत नाही पण तुम्ही काय लिहिता हे तुम्हाला तरी स्पष्ट कळलं आहे असं दिसतंय. कुणीतरी कविता उलगडून सांगावी असं मला फार वाटतं खूपदा.
छान कविता.
छान कविता.
छानेय तुमची कविता!! माझ्या
छानेय तुमची कविता!! माझ्या कविता काहीशा अशाच असतात..
मनात आलं कि
डायरीत खरडायच
त्या अर्थहीन ओळींना
कवितेच लेबल चिकटवायच
र ला ट जोडायच
अन् काहीतरी जमलय
यातच समाधान मानायच!
छानेय कविता मला आवडली
छानेय कविता
मला आवडली