वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मॉडर्न लव्ह चे ३ एपिसोड पाहिले. तिसरा सर्वात आवडला. Anne Hathaway चं काम पहिल्यांदाच इतकं आवडलं.
पहिला एपिसोड पण छान आहे. दुसरा देव पटेलचा फारसा नाही आवडला. आता बाकीचे पाहिणार आहे. Another winner in Prime's cap!
मला शेवटचा ओल्ड कपलवाला सगळ्यात जास्त आवडला.
आणि टीना फे वाला दुसऱ्या नंबरला.

नेटफ्लिक्स वर सध्या ब्लॅक लिस्ट नावाची सिरीज बघतोय. FBI टॉप १० मोस्ट वॉन्टेड यादीतील एक जण सरेंडर करून त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो कि तो त्यांना खूप खतरनाक गुन्हेगार कि जे FBI ला पण माहिती नाहियेत त्यांना पकडायला मदत करेल . आणि तो फक्त एका लेडी ऑफिसर शीच बोलेल ( हे का ते माहिती नाही) . खूप उत्कंठावर्धक आणि IMDB रेटिंग ८ आहे.

हो टीना फे आणि ओल्ड कपलचे एपिसोड चांगले आहेत. तिसर्‍या एपिसोडव्यतिरिक्त हेच दोन आवडले. बाकीचे मला फार आवडले नाहीत, रिलेट झाले नाहीत.

हॉटस्टारवर सध्या आउट ऑफ लव बघतेय. चांगली वाटतेय. तिग्मांशू धुलियाची आहे.
मिर्झापूर मधली रसिका दुग्गल, सोनी राझदान आहेत.

आउट ऑफ लव्ह
चिकाटीने एका निर्णयात्मक सकारात्मक स्थितीला आणलीय सिरियल
मधे मधे फारच स्लो आहे.
पण चांगली आहे.

Out of Love बघायला सुरुवात केली .
कन्नूरचा परिसर, मीराचा बंगला , कश्यपच restaurant सगळं फार सुंदर आहे.
पूरब कोहलीला बरेच दिवसांनी पाहिलं

sleepy hollow सुरु केलीये बघायला. बायबल मधल्या Four Horsemen of the Apocalypse वर आधारित आहे. नेटफ्लिक्स वर कन्टेन्ट इतक्या प्रमाणात येत असत कि काय बघावं नि काय नाही कळतच नाही

इनसाईड एज 2 बघितली. पण पहिल्या भागाच्या तुलनेत एवढी नाही आवडली. प्रेडिक्टेबल वाटली.

bbc & hbo यांची his dark materials हि फँटसी सिरीज आलीय जी अर्थात हॉटस्टार वर उपलब्ध आहे. >>>.

His Dark Materials म्हणजे फिलीप पुलमनची तीन पुस्तकांचा संच ( trilogy ). यातल्या पहिल्या पुस्तकावर अप्रतिम सिनेमा आला होता Northern Lights (or The Golden Compass). अफाट आवडलेला हा मला. मी उरलेली इतर दोन पुस्तकंही वाचली आणि प्र चं ड इम्प्रेस झाले. अतिशय सुरेख आणि वेगळीच आहेत ही तीनही पुस्तकं. तिसर्‍या पुस्तकात (The Amber Spyglass) वेगळ्याच प्राण्यांचं एक आख्खं जग कसं डेवलप झालं याचं अत्यंत अमेझिंग वर्णन येतं. मरणानंतरच्या जगाचं वर्णन येतं ते ही अचंबित करणारं आहे.

दुसर्‍या (The Subtle Knife) की तिसर्‍या पुस्तकात दोन पुरुष एंजल्समधली रिलेशनशिपही खूप छान रेखाटली आहे.

या अश्या नितांतसुंदर पुस्तकांवर वेबसिरीज आली याचा खूपच आनंद झालाय. आताच बघायला घेते. निराशा मिळू नये म्हणजे मिळवली.

आउट ऑफ लव्ह >>>
ही बहुधा बीबीसीच्या 'डॉ फॉस्टर'वरून घेतलेली आहे.

डॉ फॉस्टरचा सीझन-१ खूपच प्रभावी होता. त्यामानाने सीझन-२ ठीकठाक वाटला. दुसर्‍या सीझनच्या शेवटाला तिसर्‍या सीझनची तजवीज केलेली वाटली.

Laal Kaptaan : a hidden gem

आपल्याकडे अनेक फालतू चित्रपटाना पब्लिक डोक्यावर घेतं आणि त्यात हिरेमाणके बाजूलाच राहतात . माझ्या मते सैफ अली खान ची मुख्य भूमिका असलेल्या " नागा साधूचा सूड " अर्थात " लाल कप्तान " हा अगदी " लगान " च्या तोडीस तोड असलेला जबरदस्त मूव्ही आहे .

अठराव्या शतकातील वातावरण आणि ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेली बंडाळी यांचे अभूतपूर्व असे चित्रण ह्या सिनेमात आहे . क्लायमॅक्स ला तर सिमेमॉटोग्राफीची कमाल आहे . यमुना तीरावरील किल्ला आणि नदीत होणारी लढाई अप्रतिम टिपली आहे .

माझ्याकडून या सिनेमाला 4.5 *

Available on Amazon Prime

योगायोगाने कालच रात्री हा सिनेमा पहिला. वेगळा आहे. सगळे कलाकार अगदी सैफ अली खानने सुद्धा उत्तम अभिनय केला आहे.

मैत्रेयी, तुम्ही मनाची तयारी करून पहावा म्हणून आधीच सांगते की नेहमीचा क्युट हँडसम सैफ दिसणार नाही. बऱ्याच वेळा जाड दिसतो, कपाळ सोडून मागे गेलेले केस आणि एकूणच कळकट अवतार आहे. पण तरी मला नेहमीच्या चॉकलेट बॉय सैफ पेक्षा यातला सैफ आवडला. अभिनय तर उत्तमच.

हो, आय नो. Happy तो आशिक आवारा टाइप क्यूट सैफ नव्हे, तर लेटर इनिंग्ज मधला सैफ, ओंकारा, सेक्रेड गेम्स वगैरे.

सैफ व विशेषतः त्याचा आवाज कधीच आवडले नाहीत पण आताच्या सैफचे व्यक्तिमत्व पुर्वीच्या सैफपेक्षा नक्कीच चांगले झाले आहे, बालीशपणा गेल्यामुळे.

लाल कॅप्टन काल मला प्राईमवर दिसला पण वेब सिरीजच्या धाग्यावर त्याबद्दल वाचल्याचे आठवत होते, मग वाटलं ती वेब सिरीज वेगळी असेल. मंदार तुम्ही गल्ली चुकलात Happy असो. आउट ऑफ लव्हचे मागच्या रविवारच्या लोकसत्तेत परीक्षण आहे. अतिशय वाईट आहे, घिसापीटा विषय, दिग्दर्शकाच्या लौकिकाला साजेशी नाही वगैरे. निसर्ग सौंदर्य छान आहे हे मात्र लिहिलंय.

प्राईम वर चित्रपट कसे शोधायचे...? मला प्रयत्न करुनही लाल कप्तान काही दिसलाच नाही! >>>>.अलेक्साला सांगा, नसेल तर मग प्राईमच्या होम पेजवर सर्च आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून लाल कप्तान टाईप करा. खरं तर प्राइम उघडलं की होमपेज वर तो सिनेमा दिसतो आहे

प्राईम वर चित्रपट कसे शोधायचे.>>> सर्च मधे मी हिंदी मुव्हीज असं टाकते. पण लेटेस्ट मधेच कुठेही असतात लिस्ट मधे. वर येईल अशी गॅरेंटी नाही. सेम विथ मराठी

Pages