विचार कर मित्रा

Submitted by सखा on 28 November, 2019 - 20:50

ऊर अभिमानाने भरून आला. महाभयंकर राजकीय भूकंप झाला. वगैरे म्हणून झाल असेल तर माझ्या मित्रा लक्षात घे या महिन्यात पण तुला तुझा EMI भरायचा आहे. खरा भूकंप झाला आणि तू खरच खड्ड्यात गेलास तरी तुला ते भरणे भाग आहे. अरे हो खड्ड्यावरन आठवलं काल खड्ड्यातून गाडी गेल्याने तुझी पाठ दुखते आहे डॉक्टरला दाखवून घे मात्र फीचे पैसे
दुरून डिंग्या मारणारा तुझा नेता भरणार नाहीये. खरं म्हणजे तो तुला ओळखत सुद्धा नाही. तुझ्याकडे दोन चाकी आहे अलिशान गाडी नाही त्यामुळे खड्ड्यांचा सामना तुला जास्त करायचं आहे. गर्दीशी झटापट करत धडपड करत तुलाच कामावर रोज जायचं. ना तुझ्याकडे सत्ता आहे ना तुझ्या ओरडण्याने काही फारसा फरक पडणारे. दोन-चार फेसबुक वरचे वाद होतील एवढेच. याने तुला काय साध्य होणारे? कुठं थांबायचं हे पण कळलं पाहिजे ना? तुझी लहानगी पोरगी तापली आहे कदाचित डेंगू पण असू शकतो तू कचऱ्याच्या शहरात राहतोस तिला घेऊन दवाखान्यात जा. मुलाच्या फिसचे काय? त्याला आरक्षण नाहीये त्यामुळे तुला निवृत्ती नाहीये. ते आज मंत्री आहेत उद्या जेलमध्ये जातील पुन्हा बाहेर येतील पुन्हा मंत्री बनतील त्यांची संपत्ती वाढत जाईल तुझी घटत जाईल. त्यांचे आपापले कंपू आहेत. आतून सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. तू जिवाचा निकराने त्यांच्याबद्दल तावातावाने बोलतो काल रात्री ते एकत्र बसून पार्टी करत असतील पण हे तुला कधीच कळणार नाही. लक्षात घे ते तुझे कोणीच नाहीत. त्या टीव्हीच्या हिप्नॉटिझम मधून बाहेर ये. त्यांच्या वर्तुळात तुझी फारशी जागा नाहीये कारण तुझे प्रश्न वेगळे आहेत आणि ते तुला सोडवायचे आहेत. निवडणुकीच्या काळात तुला थोडा भाव दिला तर एवढा चढून होऊन जाऊ नकोस. आता ते तुला पाच वर्ष भिक पण घालणार नाहीत. विचार कर किती शत्रु बनवलेस तू गेल्या काही दिवसात? आणि किती मित्र कमावलेस टीनपाट राजकारणावर चर्चा करून? कुणाची युती होऊ दे नाही तर तुटू दे, आज प्यायला पाणी येईल का नाही याची चिंता तुला करायची आहेच त्यातून सुटका नाहीये. बघ जमल तर आज एखादे छानसे पुस्तक वाच. जुन्या मित्राबरोबर लांब फिरायला जा. लहानपणीचे खेळ आठव. टीव्हीला पूर्ण सुट्टी दे. रात्री मस्त आकाशात बघ चांदण्या पहा. आजूबाजूचा निसर्ग बघ. घाणीत बरबटलेल्या आणि स्वार्थी राजकारणी लोकांचा कायम विचार करून तुला नाही वाटत असं की तुझ्या पण मनावर परिणाम होतोय? तू एक बोर माणूस होत चालला आहेस. खरच गरज आहे का? विचार कर. तुझे आयुष्य आहे ते रंगीत कर. बघ पटलं तर. नाहीतर तू मित्रा समजस आहेसच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_छान

Hahah this was epic"

"OMG what a hilarious turnaround"

"Wait for it still more games to come"

"Masterstroke Masterstroke.... This man is a genius I tell you"

"Wait what!! This is ridiculous"

"This is a complete backstabbing of the voters"

"There are no morals and ethics left in politics"

"Leave it na, whoever forms the Govt what difference does it make to us. Everyone is the same"

दर्शन मोंडकर यां ची फेसबुक पोस्ट

< त्याला आरक्षण नाहीये > आर्थिक मागासात ( ८ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न ) नाही मोडत का तुमचा मित्र ?

Proud

व्हॅटसप ग्रुपवर आता राजकीय मेसज नकोत , करीयरचेच मेसेज पाठवा, असे सूर उमटत आहेत,

ह्यांचे असेच सूर निरागस हो !