बाह्य परिसरातील अतिपरिचित / अपरिचित / अस्पर्शित चित्रीकरण स्थळं

Submitted by नोझिपा मरारे on 24 November, 2019 - 11:20

या धाग्यावर आपण नेहमी दिसणारी चित्रीकरण स्थळं (आउटडोअर शूटींग लोकेशन्स) किंवा खूप कमी आणि ओळखू न येणारी किंवा प्रेक्षणीय स्थळं जिथे अद्याप चित्रीकरण झालेलं नाही पण व्हायला हवे असे वाटते अशा स्थळांबाबत बोलूयात.

अतिपरिचित म्हणजे पाचगणीचा पारसी पॉईण्ट. किंवा शिमला येथील फिल्मी चक्कर (जय जय शिवशंकर या गाण्याचे शूटींग असलेले), मनाली येथील नदीच्या परिसरातील ( सौदागर सिनेमा ) आणि लोणावळ्यातील असंख्य स्थळं.

खूप कमी किंवा ओळखू न येणारी म्हणजे सैराटमधली शूटींग लोकेशन्स. पण या सिनेमाने आता ही स्थळं अगदी अतिपरिचित करून ठेवली आहेत.

याशिवाय कुणाला अशी काही लोकेशन्स ठाऊक असतील जी नितांत सुंदर आहेत पण शूटींग झालेलं नाही. अशाची ही माहिती लिहूयात.
शक्य झाल्यास नेमके कुठे आहे, कसे जायचे, आजूबाजूला काय सोयी आहेत, वैशिष्ट्ये काय आणि शक्य असल्यास प्रकाशचित्र टाकावे ही विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
पौराणिक सिनेमांचे शुटिंग
१) चैना क्रीक, ठाणे भायंदर रोड,
२) माहुलीच्या तळाचे रान, आसनगाव,
३) गाढेश्वर तलाव,पनवेल - धोधाणी रस्ता.
----
रेल्वे स्टेशनसाठी
४) आपटा रे स्टेशन, पनवेलजवळ.

फोटो नैत. पण बऱ्याच सिनेमा/मालिकांत या जागा आहेत. तीनही जागा साध्याच आहेत पण चित्रीकरणात भारी वाटतात.

आमच्या कॉलनीत मागे 3-4 वर्षांपूर्वी एकदा आणि हल्लीच 1 महिन्यांपूर्वी एक असे दोनदा फिल्म शूटिंग झालेले मी पाहिलंय, माझ्या न पाहण्यात बाकी वेळा झाले असेल तर माहिती नाही. पण चित्रपटात माझी कॉलनी म्हणून मला ओळखता येईल की नाही सांगता येत नाही कारण ओळखता येणाऱ्या ठळक गोष्टी सोडल्यास बाकी सगळे पडद्यावर वेगळे दिसते.

नव्या मुंबईतील रेल्वे स्टेशन्स बाहेरून व आतून, रस्ते, उड्डाणपूल इत्यादी बऱ्याच चित्रपटात दिसले आहेत. आमच्या इथल्या एका उड्डाणपुलावर अतुल कुलकर्णीचा एकच शॉट तीन चार तास सुरू असलेलाही पाहिला आहे.

मगरपट्टा
- - -
टी वी एस विगो( बॉडी balance)
शिवाजी द बॉस
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
महिंद्रा रोडियो
नॉक आऊट
अजब प्रेम की गजब कहाणी

पँगाँग लेक - लडाख

हे सरोवर लेह पासून जवळ आहे. लेह ला कसे जायचे याची माहिती मिळू शकेल. १९९८ पर्यंत हे फिल्मी पडद्यावर दिसले नव्हते. दिल से या सिनेमात पहिल्यांदा हे लोकेशन हिंदी सिनेमात दिसले. त्यानंतर अनेक चित्रपटात दिसू लागले. अलिकडे गाजलेल्या ३ इडीयट्स मधला शेवटचा सीन इथेच चित्रित झाला आहे. तर जब तक है जान मधेही आहे.

लक्ष्य या सिनेमातही आहे.

Pangong-Lake-495x330.jpg

एस आर डी ओके. मी गुगल सर्च करून पाहीलं. पाण्याचे ठिकाण आहे तेच काय ? तेच असेल तर सुंदर आहे.

साधनाताई , नवी मुंबई रेल्वे आतून स्टेशन पाहीले नाही. पण मुंबईत शूटींग करणे महाग असल्याने इथे शूट करतात हे ठाऊक आहे.

जावेद खान - मगरपट्ट्यात कुठे ? त्या मार्केटमधे झालेय का शूट ?

अंधाधून तर पुण्यातच शूट केला आहे. थोडे फार सीन्स बाहेरचे असतील. अनेक ठिकाणं पहिल्यांदा दिसली आहेत पडद्यावर. रेंज हिल्स येथील रेल्वेचा सब वे क्रॉसिंग छानच घेतलाय.

मगरपट्टा
- - -
टी वी एस विगो( बॉडी balance) -- Magarpatta South Gate (The body balance advertisement).
शिवाजी द बॉस -- Aditi Garden, Magarpatta North Gate (Shivaji University in the film was actually Magarpatta city, the scene where Rajni comes back as B Amitabh was shot in aditi garden, and the climax was shot near Yummy Tummy.)
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय -- Magarpatta North Gate (The scene where Bhosle's son get hit by a truck)
महिंद्रा रोडियो Stallio - Between Tower 3 and Tower 4 (Amir khan's advertisement)
नॉक आऊट - Most of the shooting took place at the junction between Tower 1 and Tower 12.
अजब प्रेम की गजब कहाणी - Aditi Garden (Prem ki naiya hai ram ke bharose se song)

उमेद भवन पॅलेस - जोधपूर, राजस्थान

हे एक खूपच भव्य दिव्य असे शूटींग लोकेशन आहे. हा उमेद सिंह यांचा महाल आहे. त्याचे आता पंचतारांकित हॉटेल बनलेले आहे. अर्ध्या भागाचा वापर हॉटेल म्हणून होतो. अर्ध्या भागात आजही शाही कुटुंब राहते. हा महाल आतून पाहण्यासारखा असून त्याला तिकीट आहे.

मायबोलीकरांना काहीच अशक्य नाही. हा महाल लग्नासाठी वापरण्याची टूमही निघालेली आहे. नियंका (निक आणि प्रियंका) च्या लग्नासाठी हेच वेडींग डेस्टीनेशन होते. मायबोलीकरांपैकी एखादे लग्न इथे झाले तर त्यावर धागा निघू शकेल. तसेच मायबोलीचे सम्मेलन देखील तिथेच होऊन जाईल.

42417525[1].jpgroyal-destination-pre-wedding-shoot-at-taj-umaid-bhavan-jodhpur-1[1].jpgbb8dbf2405a61f3de2e7400cb5c3f6f9.jpg

पॅलेसच्या छतावर एक खुले भोजनालय आहे. या भोजनालयातल्या यम्मी भोजनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आम्हाला मोफत असल्याने दर काही कळू शकले नव्हते.
IMG_2444_Facetune_07-04-2019-21-42-40.jpg

अलिकडे कोकणातली खूप चित्रीकरण स्थळं ( हा शब्द का नाही सुचला आधी ?) दिसतात. ब-याच टीव्ही मालिका, वेबसिरीज मधे आहेत. त्या मालिका आठवणे आता अवघड आहे. कोणाकडे असेल माहिती तर द्या.

रात्रीस खेळ चाले ही मालिका तर कोकणातच झाली आहे. किल्ला हा सिनेमा कोकणात शूट झालाय.
दोन तीन मराठी रहस्यपट पण इथे शूट झाले आहेत. त्यांची नावे आठवल्यावर लिहीन.
एकात आदीनाथ ठाकरे आहे.

नदी वाहते हा एका मायबोलीकरीणीचा सिनेमा कोकणातच शूट झालाय.

प्रकाश झांच्या बऱ्याच चित्रपटांचे चित्रिकरण सातारा आणि वाई परिसरात झालेले आहे.
उदा. गंगाजल, मृत्यूदंड, अपहरण वगैरे

पुण्यातला पु. ल. देशपांडे उद्यान. तिकडे दुनियादारी मधल्या त्या एका गाण्याचं शूटिंग झालंय. त्या गाण्याच्या एंट्रीला सगळे एकापाठोपाठ एक सायकल वर येतात. ते गाणं.
येस्स.. मागारपट्ट्यात बरीच शूट होतात.
तिकडे रणबीर आणि कतरिना आले होते तेव्हा सगळं पब्लिक काम सोडून शूट बघायला गेलं होतं. Lol

तिकडे कंगना रानौत पण आली होती शूट साठी.
तो पिक्चर फार चालला नाही.
ढेपे वाडा.

मुंबईत माटुंग्याचा इराणी कॅफे (Koolar & Co) - कॅफे कूलार
आंबेडकर रोडवर आहे. माटुंगा इस्ट स्टेशनवरुन चालत जाण्याच्या अंतरावर आहे.
सिंघम, नाम शबाना, गल्ली बॉय वगैरेमधले सीन्स इथे चित्रित झालेत.

कॅम्पमधे, ईस्ट स्ट्रीट वर तो बस वाला कॅफे जिथे अजब प्रेम की गजब कहाणी एक गाणे शूट झालेय. स्वदेस चे निलायम जवळ असलेले पाथफाईन्डर, ना तुम जानो ना हम चा सीन कॅम्पमधे... आठवेल तसे टाकते अजून

एकात आदीनाथ ठाकरे आहे.

नवीन Submitted by पुरोगामी गाढव on 27 November, 2019 - 16:06
>>>
कोण हा आदिनाथ ठाकरे?
राज्याच्या सत्तांतरात एवढे रमू नका. कुठेही काहीही.....

कोठारे. Lol
आत्ता जे नाव सातत्याने कानावर पडते तेच येणार ना

आता एवढी स्थळे कळल्यावर लक्षात आले की त्या जागांचे फोटो काढून ठेवू. माझ्या यादीतल्या जागा भटकंतीतल्या आहेत. या मुंबईला जवळ असल्याने आणि गोरेगाव फील्मसिटीपेक्षा थोडा वेगळा निसर्ग असल्याने निवडत असतील.
चैना क्रीकला दहा बारा घोडे आणून आमराईतल्या ओढ्यापाशी सीन छान जमतात. गुजराती सिनेमांतही आहे.

शिमला
मायबोलीवर क्वचितच कुणी एखादा असेल ज्याने शिमल्याला भेट दिली नसेल. असंख्य सिनेमात दिसलेलं हे लोकेशन म्हणजे माल रोडने वर आल्यानंतरचा चौक आणि चर्च. रात्री वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशात ते खूपच मोहक दिसतं. याची बांधणी खूप खास आहे. हॅरी पॉटर च्या सिनेमातल्या जादूच्या महालासारखी. माल रोडच्या सुरूवातीलाच स्किईंग क्लब आहे. विंटर स्पोर्ट्स होतात तिथे.

६ किमी वर फिल्मी चक्कर नावाची जागा आहे. इथे तर अगणित सिनेमांचे शूटींग होत असते. जय जय शिवशंकर या गाण्यात दिसलेले देऊळ इथे आहे. घोड्यावर बसूनच जावे लागते. इथे प्रत्येक जण जाऊन आलेला असतो त्यामुळे फोटो टाकण्याची गरज नाही.
मनाली च्या बाबतीतही सेमच.

ritz_shimla[1].jpg

आता एवढी स्थळे कळल्यावर लक्षात आले की त्या जागांचे फोटो काढून ठेवू.>>>

मस्त कल्पना. माबोकाराने काढलेला फोटो व चित्रपटातल्या त्या जागेचा स्क्रीनशॉट असे केले तर मज्जा येईल.

इथे प्रत्येक जण जाऊन आलेला असतो त्यामुळे फोटो टाकण्याची गरज नाही>>>
मी शिमल्याला गेले नाहीय त्यामुळे त्या जागीही गेले नाहीय.

प्रभात रोड, बाजीराव रस्ता , रेंज हिल्स , मगरपटा आणि इतर बरीचशी ठिकाणी अंधाधून चित्रपटात आहेत. पैकी बाजीराव रस्ता, विशेषतः चितळे जवळचा चौक हे अतिशय दुर्मिळ चित्रीकरण स्थळ आहे. दिवसा तिथे दुचाकी चालवणे अवघड, मग चित्रीकरण? म्हणून बहुधा रात्री चित्रीकरण केले आहे.

वरील फोटोतील जागा जब वी मेट मध्ये बघितल्यासारखी वाटतेय. करीना कपूर टीचर म्हणून नोकरी करत असताना बहुतेक .

बाजीराव रस्ता आणि चितळ्यांच्या दुकानासमोरचा भाग, मंडई हा परिसर 'अस्तु'मध्ये आहे.

जोगेश्वरी इथे हायवे ला फार पूर्वी भांगराची मोठाली दुकाने होती (टूवर्ड्स अंधेरी ) तिथे आमिरच्या "दिल" पिक्चरची शूटिंग झाली होती.
अनुपम खेर एका मोठाल्या तराजुत बसून काहीसा विनोदी सिन होता आणि आमिरला मारायला गुंड हायवे क्रॉस करून त्या दुकानाच्या दिशेने तलवारी घेऊन येतात वैगरे शिवाय माधुरी पण आली होती पण तिला पाहायला नाही मिळाले आमिरला अगदी जवळून एक हाताच्या अंतराने पाहिले होते. शनिवारी दुपारी लवकर शाळा सुटल्यावर शाळकरी गणवेशातच धावत गेले होते पहायला. त्याच्या गाडीच्या अगदी जवळ मी आणि एक काकी तिच्या लहान मुलांसोबत असे ३/४ जणच होतो. आमिर अगदी लाजत गाडीत बसला होता. ती काकी काहीतरी कमेंट्स पास करत होती.
इस्माईल युसूफ कॉलेज इथे तर खूप साऱ्या मराठी आणि हिंदी मुवीचे शुटिंग्स झालेत आणि होतात. गोविंदाचा आँखे कॉलेज रेल्वे स्टेशन दाखवले होते. मराठी मुवि कळत नकळत मध्ये कोर्ट दाखवले होते.

कहो ना प्यार है रिलीज व्हायच्या आधी फिजा चित्रपटातले आजा माही वे गाणे भाऊच्या धक्क्यावर चित्रित झालेले. आम्हाला शूटींगची खबर लागताच सारे पोरे टोरे हाफ्चड्डीतच शूटींग बघायला पोहोचलो. पण तेव्हा आम्हाला हृतिक रोशन या नावाला आम्ही ओळखतही नव्हतो. असो, त्यामाने कमीच शूटींग झाले आहे धक्क्यावर.. त्सेच आमच्या राणीच्या बागेतही व्हायला हवे.

वीजेटीआयला असताना महेश्वरी उद्यानच्या कॉर्नरवरच्या कॅफेचेही आम्हाला फार कौतुक.. कारण वास्तवचा आयकॉनिक नाट्यमय सीन तिथे चित्रित झाला होता.

Pages