बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमराठी लोकांच्या पार्टीसाठी मराठी मेनु सुचवा. आत्तापर्यंत कोथिंबीर वडी, मिनी साबुदाणा वडा, वडापाव हे सुचलयं. डेझर्ट आणि मेन कोर्स, अजुन आपशन्स सुचवा प्लिज.

फ्लाॅवर/तोंडली मसाले भात, टो. सार/सोलकढी/कढी / मसाला ताक एक उसळ, भरली वांगी/वांग बटाटा/मिक्स वेज/आलू दम ला भोपळा बाखर भाजी/पनीर
कोशिंबीर/रायता
गुजा,रसगुल्ले,जिलबी
घरी करणार का सगळं? किती डोकी?

पुपो, उमो, श्री/आम्र खंड, पुरी, मटार बटाटा भाजी,भरलं वांग/भाकरी, मेतकूट दही कालवून , दहीभात

तेजो, मस्त मेन्यु, फक्त दहीभात ऐवजी, वरण भात किंवा मसाले भात
अन पुरी ऐवजी भाकरी किंवा घावण

सर्वांना धन्यवाद, छान छान ऑपशन्स आले आहेत. आम्ही धरून 9 मोठे आहोत. मी थोडा स्टार्टर, मेन कोर्स आणि डेसर्ट असा मेनु शोधत होते. घरीच करणार आहे.
कोथिंबीर वडी, साबुदाणावडा, वडापाव पकोडा हे स्टार्टर्स, पावभाजी आणि रगडा पॅटिस, दहीबुत्ती हे मेन, मिष्टी दही (खरवस टाईप ) आणि खांडवी किंवा अळीव लाडु असा विचार आहे.
मेन कोर्सला रगडा पॅटिस, मसालेभात आणि सोलकढी पण करता येईल. पण र पा और म भा ये जोडी कुछ जम नाही रही हैं, पावभाजी फायनल केली तर ब्रेड खूप होतोय. त्यामुळे सुचवा प्लीज काहीतरी.

मला वाटतंय स्टार्टर्स इतके हेवी नकोत .. कोथिंबीर वडी , मसाला पापड , ढोकळा हे स्टार्टर्स
मसाले भात टोमॅटो सार /सोलकढी /ताक आणि एखादी रसभाजी (भरली वांगी किंवा भरली मसाला तोंडली किंवा डाळिंब्या विकत मिळत असतील तर त्याची उसळ ) स्वीट म्हणून खोबऱ्याच्या वड्या (या २ days आधी करून ठेवता येतील )/गुळपोळी (हि पण २ days आधी करून ठेवता येईल )/ पुरणपोळी (विकत )
किंवा सरळ गुजा (हे आदल्या दिवशी करायला लागतील ) + icecream

पिठलं, ज्वारी- बाजरी भाकरी, कांदा फोडून , सोलापुरी शेंगा चटणी, लसणाची चटणी, जवसाची चटणी, गुळ तूप, दही साखर, मटका कुल्फी.

स्टार्टर्स आधी आणि नंतर मेन जेवण असं आहे का ? पारंपारिक मराठी पद्धतीत असे वेगवेगळे कोर्सेस नसतात ना?
तरी , सुरळीच्या वड्या / कोथिंबीर वड्या, भजी, पापड, कुरडया, असे ठेवता येईल.
जेवणात भरली वांगी, अंवाडीची भाजी, पिठलं. उसळ , फ्लावर बटाटा रस्साभाजी, वालाचं / मुगाचं बिरडं यापैकी दोन प्रकार
घडीच्या पोळ्या /पुर्‍या / भाकरी
काकडीची / टॉमेटोची कोशिंबीर
टॉमेटो सार
मसाले भात
गोडात बासुंदी , मोदक, पुपो , पुर्‍या असतील तर श्रीखंड

शेवटी पान
आणि निघताना खणा नारळाने ओटी भरा सर्वांची Happy

याच धाग्यावर पान ८ वरची माझी पोस्ट पाहा. बरेच पर्याय आहेत.
तिथलं चोप्य-पेस्ट.

- उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी, मटकीची उसळ, पुर्‍या, श्रिखंड्/आम्रखंड, मसालेभात, ताक, खमंग काकडी
- वांग्यांचं भरीत, भाकरी (कुठलीही - ज्वारी/बाजरी इ), मिरच्यांचा ठेचा/खरडा, लाल भोपळ्याचं भरीत, साधं वरण आणि भात, गुलाब जाम
- आलू प्राठे, दही आणि आमटी भात, दुधी-हलवा
- भरली वांगी, पोळी, कढी, साधं वरण, भात, कांदा - टोमॅटोची कोशिंबीर, काला जाम किंवा पीस वाईज कुठलंही गोड
- फ्लॉवर, बटाटा, मटार, टोमॅटो मिक्स सुकी भाजी, चपाती, आमटी भात, कुठलीही कोशिंबीर, चमचम
- मटार उसळ, फुलके, मुगाच्या डाळीची पातळसर खिचडी, गाजर हलवा, कुठलही ताजं लोणचं
- पत्ताकोबीची सुकी भाजी, पालकाची पातळ भाजी, कढी, साधं वरण भात, पुरण, गाजराची कोशिंबीर, डाळीचे वडे किंवा कांदा भजी आणि पुरण
- लाल भोपळ्याची बाकर भाजी किंवा कोफ्ता करी, आमटी भात, फुलके, गाजर किसून वाफवून दह्यातली कोशिंबीर, कणकेचा शिरा
- पाटवडी रस्सा, साधं वरण भात, पोळी, काकडीची दह्यातली कोशिंबीर, खव्याच्या पोळ्या
- मेथीचे पराठे, डाळीची दह्यातली चटणी, कुठलाही पांढरा पुलाव, टोमॅटो सार, जिलेबी
- तुरीच्या ओल्या दाण्यांची आमटी, भाकरी, कांद्याच्या पातीचा झुणका, वरण भात, भाजलेल्या मिरच्या, डिंगर्‍या (मुळ्याच्या शेंगा) तोंडी लावायला, दही
- चिकन ग्रेव्ही, पोळ्या, भात आणि दह्यांतली कोशिंबीर
- अंडा करी, थोड्या पोळ्या, चिकन बिर्यानी, कचुंबर
- माश्यांची करी, तळलेल्या तुकड्या, तांदळाची भाकरी, भात आणि सोलकढी
- भरप्पूर कोथिंबीर मिळत असेल आणि घाट घालायचा असेल तर, कोथिंबीरीची पुडाची वडी - श्रीखंड (इथे साधं श्रीखंडच हवं), साधा भात आमटी आणि हवंच असेल तर भाजी-पोळी
- पनीर ची ग्रेव्ही, पोळ्या, भात - आमटी किंवा साधं वरण, रबडी

संध्याकाळी
- पावभाजी, दहीबुत्ती (फार गारठा असेल तर पातळसर खिचडी)
- भरपूर भाज्या घालून केलेली खिचडी, पापड, कुरडया, सांडगे इ तळून एखादी कोशिंबीर
- दलीया खिचडा (चालत असेल तर)
- बिशिबेळे राईस जरा सढळ साजुक तूप, तळलेले काजू वगैरे घालून
- सांबार - राईस, बाजूला तोंडी लावायला कुठलीही परतून केलेली सुकी भाजी
- पिठलं - भात
- वरण फळं (ही भरपूर लागतात, करणार असाल तर); यावर घ्यायला ताजी शेंगदाण्याची लसूण घालून भरड चटणी
- मिसळ
- टोमॅटो सूप, कॉर्न चाट, कुठलाही पुलाव (पनीर चे क्यूब्स, भाज्या घालून केलेला)
- बिर्यानी, कचुंबर, मिर्च का सालन

काही बदल करता येतील नक्कीच. नॉनव्हेज चालत असेल तर मग अजून बरेच पर्याय मिळतील.

नॉन मराठी लोकांना आपल्या पदार्थांपैकी पिवळी बटाटयाची भाजी, मटकी उसळ, साधे भरीत हे फारसे आवडणार नाहीत. त्यांना ते पदार्थ फारच प्लेन वाटू शकतील. माझा अनुभव म्हणजे भाजणीचे मिनि वडे, साबुदाणा वडे किंवा खिचडी , कोथिंबीर वडी हे स्टार्टर्स, आणि मेन जेवणात भरली वांगी, मसाले भात हे नक्की आवडेल. श्रीखंड/ आम्रखंड सहसा आवडते. आंब्याचा शिरा पण हिट होतो.

स्टार्टर, मेन कोर्स आणि डेसर्ट हा format आणि त्यात मराठी पदार्थ असं हवंय ना?
स्टार्टरमध्ये वडापावातला पाव उडवा. साबुदाणा वडा ही नसला तरी चालेल.
मेन मध्ये रगडा पॅटिस ऐवजी मिसळ पाव + दहीबुत्ती

स्टार्टर - मिनी बटाटवडे
मेन कोर्स ~ कुर्मा , पुरी , पुलाव, टोमॅटो सार, काकडीची कोशिंबीर
डेझर्ट- आइसक्रीम
बटाटावडा आणि पुरी म्हणजे 2 तळलेले पदार्थ होतील पण. डेझर्ट नंतर नाही दिले आणि जेवणात श्रीखंड ठेवले तर पुरीबरोबर पण खाता येईल.

परवा फक्त नातेवाईकांबरोबर बर्थडे पार्टीला केलेला मेन्यु: यातले काही पदार्थ वर्क होतात का बघा.
पंपकिन प्युरी घालून पराठे केलेले (फारसे मसाले न घालता). त्रिकोणी तुकडे करून ठेवलेले. सोबत चपाती पण केलेली.
त्या बरोबर पावट्याची उसळ गोडा मसाला घालून (पावटा बॅकयार्डमधला होता म्हणुन तो केला. कोणतीही उसळ चालेल.), ढब्बुमिरची + बटाटाची कुट घालुन भाजी, दुधीचे मुठिया,गाजराची मुग डाळ घालून हिरव्या मिरचीची फोडणी घातलेली कोशिंबीर. मसाले भात व मठ्ठा .
सोबत फ्रुट सॅलड प्लॅन केलेले पण वेळ नाही झाला. त्या ऐवजी नानकची रसमलाई दिली. पण मराठी मेनु असेल तर आंबा शिरा दिला असता.

मेन कोर्स मध्ये , मास वाडी try करू शकता पण बऱ्यापैकी वेळखाऊ आहे..किंवा आपल्या मायबोली वरच ' म्हाळसा' यांनी तिखट मोदक आमटी केलेली तेही विचार करू शकता..थोडं वेगळ आणि आवडेल असं...आणि मराठमोळं

भाच्याचा पहिला वाढदिवस आहे. चायनीज व्हेज मेन्यू ठरतोय. अंदाजे २५ मोठी माणसे, १० लहान मुले ( ४ ते १२ वर्षे वयोगटातील) असतील. शेजवान राईस, व्हेज मंचुरियन असं ठरलंय. त्यात स्टार्टरमध्ये पनीर टिक्का पण सुचवलाय.
अजून काही वेगळे suggestions?

Pages