सिक्कीम-दार्जिलिंग-२

Submitted by TI on 21 November, 2019 - 21:37

दिवस ४

आज पहाटेच जाग आली. पहाटे म्हणजे इकडे पहाट ३.३० पासूनच होते. उजाडतं खूप लवकर. आम्हाला ७.३० ला निघायच होतं. आज बरीच ठिकाणं होती. पहिलंच ठिकाण सिक्कीमची जुनी राजधानी राबदेंत्से (Rabdentse Ruins)अवशेष होते. साधारण १६७०-१८१४ ही सिक्कीमची मुख्य राजधानी म्हणून प्रचलित होती. अवशेषांपर्यंत जाण्याचा रस्ता अतिशय रमणीय आहे. सूर्याची किरणं पण खाली पोचत नाहीत इतकं दाट जंगल आहे. त्यातून वाट काढत आपण ह्या रुईन्स पाशी पोचतो. साधारण १-१.५ किमी चा रस्ता असेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिथे अंधार होता. हा छोटासा trail आपल्याला राजवाड्याच्या अवशेषांपर्यंत घेऊन येतो. एकूणच दिवसाची सुरुवात उत्तम झाली होती. सिक्कीम मध्ये कुठेही आपल्याला घाण, कचरा, प्लास्टिक दिसत नाही. अगदी पैजेवर कुठेही! ह्यातच इथल्या लोकांचा आणि एकूणच राज्याचा विकास किती आहे ते दिसून येतं. ठिकठिकाणी रस्त्यावर लहानशा वेताच्या कचऱ्या साठीच्या बास्केट्स दिसतात आणि कुठेही टुरिस्ट ला हे लोक कचरा करू देत नाही! तरीही काही अडाणी लोक येऊन घाण करताना दिसतात तेव्हा असं वाटतं की अशाना कठोर शासन इथल्या इथे दिलं गेलं पाहिजे! इथलं सौंदर्य अबाधित रहायला हा अतिशय महत्वाचा मुद्दा आम्हाला दिसून आला!
पुढे आम्ही orange गार्डन आणि वाटेतल्या धबधब्यांना भेट दिली. धारप village म्हणून पण एक ठिकाण आहे पण आमच्या ड्राइवरच्या मते ते फक्त थंडीतच बघण्यात मजा आहे म्हणून त्याने आम्हाला तिथे उतरू न देता नुसतंच लांबून दाखवलं. orange गार्डन मध्ये आम्हाला इकडची ट्रॅडिशनल बिअर 'टोंगबा' मिळू शकेल असं ड्राइवर म्हणाला. आम्ही लगेच तिथे थांबलो.आम्ही यायच्या आधी सिक्कीम च्या खाद्यसंस्कृती बद्दल बरंच वाचून ठेवलं होतं. त्यात टोंगबा आणि इथली rhododendron च्या फुलांपासून बनवली जाणारी wine ह्या बद्दल पण वाचलं होतं. आता प्रत्यक्ष्य चाखायला मिळणार म्हणून आम्ही खुश झालो. तर टोंगबा ही बिअर नसून ह्यांचं पारंपरिक/स्थानिक पेय आहे. बांबूच्या खोडाचा ग्लास असतो त्यात एक बांबू पासूनच बनवलेली नळी (straw) असते. त्यात आपली फेरमेन्ट केलेली नाचणी किंवा अळीव भरले जातात. त्यात गरम पाणी टाकून साधारण १०-१५ मिनिटांनी आपल्याला ते प्यायला तयार होतं. गार्निश म्हणून वर थोडे तांदूळ टाकतात! वेगळीच सुरेख चव असते पण खूपच रिफ्रेशिंग! हा एक ग्लास साधारण ४-५ वेळा असं गरम पाणी टाकत टाकत पितात. जास्ती पटकन संपवलं तर मात्र त्रास होऊ शकतो असे इथल्या टोंगबा बनवणाऱ्या वहिनींनी सांगितलं. टोंगबा इथे सगळेच पितात. दिवसभर राबून काम करून घरी आलं कि बायका माणसं घरात एकत्र टोंगबा पित बसतात म्हणे. आणि ह्यात मेडिकल बेनेफिट्स खूप आहेत असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही rhododendron wine ही टेस्ट केली. खूपच सुंदर होती. हलकीशी गुलाबी आणि अत्यंत चवदार!
सिक्कीम मध्ये जगातलं सगळ्यात बेस्ट चीज (वन ऑफ द बेस्ट) पण बनलं जातं आपल्या दुर्दैवाने ते भारतात कुठीही उपलब्ध होत नाही. इथे बनणारं चीझ हे सगळं बाहेर पाठवलं जातं असं कळलं!
आज आम्ही बरेच फिरलो pelling खूपच शांत आहे. मूळ सिक्कीमच्या राजधानी पेक्षा थोडं वेगळं आहे. तसेच Pelling हे कांचनजंगा ट्रेक साठी base village आहे. त्यामुळे ट्रेकर्स सहसा इथे रेंगाळताना दिसतात. कांचनजंगा चा सगळ्यात अभूतपूर्व नजारा Pelling हूनच दिसतो ह्यात शंकाच नाही. कांचनजंगा ची अख्खी range इथून दिसते, जर हवामान स्वच्छ असेल तर! आणि ते सुद्धा पहाटे फार लवकर.
Pelling ला skywalk bridge सुद्धा नव्याने बांधण्यात आला आहे! आमचं ते ठिकाण आमच्या ड्राइवर मुळे बघण्याचं राहून गेलं पण त्यासाठी मुद्दाम Pelling ला परत यायला एक कारण मिळालं म्हणून आम्ही इतके दुःखी झालो नाही! आजचा दिवस पूर्णपणे वसूल झाला आणि संपला!

दिवस ५

पहाटे ४ ला जाग आली. आमच्या खोलीला प्रचंड मोठ्या खिडक्या होत्या आणि दृष्टी जाईल तिथपर्यंत उंच हिरवे डोंगर दिसत होते. पण बर्फाच्या डोंगराचं काही दर्शन झालं नव्हतं. सहज म्हणून मी खिडकीत आले आणि मला समोर चं दृश्य बघून विश्वासच बसेना! नवऱ्याला उठवलं आम्ही आनंदाने अक्षरशः वेडे झालो,समोर कांचनजंगा अख्खी range ह्या टोक पासून त्या टोकापर्यंत खिडकीभर दिसत होती. अत्यानंदाने काय करावं हे ही सुचेना. जमतील तितके फोटोज काढून घेतले आणि वेड्यासारखं पाहत राहिलो. दार्जिलिंग ला दिसलं त्या पेक्षा कितीतरी जवळ आणि कितीतरी जास्तं इथून दिसत होतं. आणि ते सुद्धा बराच वेळ आमच्यावर उदार झाले होते ढग. स्वच्छ हवा म्हणजे काय असते ते खरं त्या दिवशी कळलं. साधारण एक १०मिनिटं आम्हाला अगदी कांचनजंगा ची मेजवानी होती. दिवस इतका चांगला सुरु झाला कि आम्ही सगळं सोडून तितकंच बघत बसलो. नकळत हात जोडले गेले आणि परत एकदा खरंच इथे काहीतरी अद्भुत आहे हे आम्हाला जाणवलं.

आज आम्हाला सिक्कीमची आत्ताची राजधानी गंगटोक कडे प्रस्थान करायचं होतं, आवरून आम्ही Pelling ला मनात ठेऊन पुढे निघालो.
आजचे आमचे ड्राइवर काका एकदम गप्पिष्ट होते त्यांनी आम्हाला सांगितलं कि नुसतं एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणार,४-५तासात पोचणार त्यापेक्षा मी ४ ठिकाणं दाखवत नेतो संध्याकाळपर्यंत गंगटोकला सोडतो, अशी deal कोण सोडेल?त्यात आजचा दिवस पाऊस सुट्टीवर होता आकाश निरभ्र होतं.
पुढे त्यांनी आम्हाला Pelling च्या जवळच असलेल्या रवंगला गावात नेलं. रवंगला हे डोंगरावरचं अगदी लहानसं गाव आणि त्या डोंगराच्या माथ्यावर एक बुद्धा पार्क आहे, Pelling वरून आम्हाला हा डोंगर समोरच दिसत होता आणि रात्री ह्या बुद्धा पार्क मधले दिवेही आम्हाला तेव्हा दिसले होते. हे बुद्धा पार्क तसं नवीनच बांधलं आहे. पार्किंग आणि इतर सगळ्या सोयी सुविधांचा योग्य विचार करून इथल्या गव्हर्नमेंटने अतिशय सुंदर असं हे प्रेक्षणीय स्थळ तयार केलाय. ऐसपैस पार्किंग बघूनच आपल्या सारख्या लोकांना अगदी भरून येतं. सकाळी छान ८.३०-९ची वेळ होती हवा इतकी छान होती असं वाटत होतं इतका oxygen आहे इथल्या हवेत आपल्या फुप्फुसांना सवयच राहिलेली नाहीए इतक्या शुद्ध हवेची. मला तर माझी फुप्फुसं झिम्मा फुगड्या घालताना दिसायला लागली. रवंगला बुद्धा पार्क खूपच भव्य आहे. मेन गेट मधून आत शिरलं की समोरच बुद्धाचा मोठा स्तूप दिसतो त्याच्या डाव्या बाजूला एक डोम, प्रार्थना केंद्र आहे तिथे सतत मंत्रोच्चार सुरु असतात.
बुद्धाची मूर्ती जवळ जवळ १३०फूट उंच आहे, आणि त्या मूर्ती पर्यंत जायला बऱ्याच पायऱ्या आहेत. प्रवेश द्वारातुनच ही मूर्ती डोळ्यात भरते. आणि इतक्या लांबूनही त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता मनाला भावते. आम्ही सर्व प्रथम त्या प्रार्थना केंद्रात गेलो. असं वाटलं की आपण एका अशा ठिकाणी आहोत जिथे फक्त आनंद आहे, निर्मळ सगुण आहे, मनाची शांतता काय असते ते तिथे कळतं, काहीतरी नक्कीच आहे ह्या जागी, जी भावना आपल्याला निसर्गाचे अद्भुत अविष्कार बघून येते त्या वेगळ्याच शक्तीचं अस्तित्व तिथे जाणवलं. पूर्ण वेळ तिथे मंत्रोच्चार सुरु असतो त्याने आपण भारावून जातो. तिथून निघावं वाटत नव्हतं, पण आता स्तूपाकडे जायचं होतं. बुद्धाच्या मूर्तीमधूनच आत जाण्याचा मार्ग होता. आतल्या बाजूने संपूर्ण भिंतींवर नजर जाईल तिथपर्यंत चित्रं रंगवली आहेत. बुद्धांचा \जन्मापासूनचा संपूर्ण प्रवास त्यांची शिकवण हे सगळं चित्ररूपात इथे दिसतं. बाहेर आल्यावर त्याच मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणेचा ट्रॅक बनवलाय. तिथून समोरचे नयनरम्य डोंगर आणि दऱ्या दिसतात. क्षितिजापर्यंत हिरव्या रंगाची उधळण! अतिशय सुंदर जागा आणि पूर्ण विचारपूर्वक पर्यटन स्थळ आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं! समोरच्या डोंगर म्हणजे pelling इथून अगदी छान दिसतं! खरंच आपल्याइकडे इतकी विविधता आणि सधनता आहे हे इथे आल्यावर कळतं. रवंगला बुद्धा पार्क आम्हाला मनापासून आवडलं आणि आम्ही पुढे निघालो. वाटेत त्याच धाटणीचं पण थोडं जुनं समद्रुपत्से (Samdruptse) बुद्धा स्तूपाला पण आम्ही भेट दिली. तिथून पुढे आम्ही नामचीला आलो. नामची हे दक्षिण सिक्कीम मधलं मोठं शहर आणि दक्षिण सिक्कीमची राजधानी, आपल्या बायचुंग भुतियाचं होम टाऊन. नामची मध्ये त्याच्या नावचं स्टेडियम सुद्धा आहे,सिक्कीम मध्ये एकूणच फुटबॉल वर प्रचंड प्रेम दिसून येतं.
आत्तापर्यंतच्या प्रवासात अजून एक गोष्ट सतत आमच्या बरोबर होती ती म्हणजे फुलं! इकडे अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात आणि मुख्य म्हणजे कायदा असल्यासारखं प्रत्येय घरात, अक्षरशः जागा मिळेल तिथे आणि मिळेल तितकी प्रचंड प्रकारची वेगवेगळी फुलझाडं लावलेली दिसतात घरी दुकानात, असंच मधेच रस्त्यात कुठेही; इतकी फुलं आपण बघितलीच नाहीत आत्तापर्यंत अशी फुलं इथे पाहायला मिळतात. आपलं फुलांचं ज्ञान झेंडू तगर मोगरा गुलाब पर्यंत सीमित आहे, त्यामुळे इतकी सगळी फुलं एकाच ठिकाणी आणि सततच बघायला मिळालल्याने वेड लागायची वेळ अली.

आता आम्ही १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा करू असं आमच्या ड्राइवर काकांनी सांगितलं आणि आम्ही थोडं पुण्य कमवू म्हणून उत्सुकतेने त्या ठिकाणाची वाट पाहात बसलो. रवंगला बुद्धा पार्क पासून इथे यायला साधारण ४ तास लागतात. १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम हे इतकं सुंदर केलं आहे, पुन्हा अतिशय स्वच्छ (आता हे वेगळं सांगायला नकोच) इतकी गर्दी लोटून सुद्धा कुठेही कचरा आणि अस्वच्छता नाही. १२ ज्योतिर्लिंग आणि चारधामला त्या-त्या ठिकाणची देवळं आणि मूर्ती ह्याच्या रेप्लिका बघायला मिळतात. साधारण तासा दोन तासात सगळं पाहून होतं . तिथून आम्ही थेट गंगटोक साठी निघालो. संध्याकाळी थोडं उशिरा गंगटोकला पोचलो. तिन्हीसांजेची वेळ, हवेत हलकासा गारवा आणि सोबत एखाद दोन तुरळक सरी, आजोळी असतो तसा गोडवा आहे ह्या शहरात! काहीतरी असं आहे जे सततच आपल्याला आपलंसं करतं असं वाटत राहतं. मला वाटतं प्रत्येक शहराचं असं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. सिक्कीम/गंगटोक मध्ये आपलेपणा आहे, सादगी आहे आणि संपूर्ण सिक्कीम राज्यात जर काही दिसत असेल तर ती इथली निरागसता आहे! निसर्गात तीच इथल्या लोकांत! गंगटोक आपल्याशी वेगळंच नातं जोडतं हे नक्की. आम्ही हॉटेल वर पोचलो, हॉटेलच्या बाजूलाच फुटबॉलचं स्टेडियम होतं. आम्हाला टेरेस वरची रूम मिळाली होती, रात्री पोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती, आपल्या समोर हिरे पाखडले आहेत असं वाटत होतं. समोरच्या डोंगरांवरचे लुकलुकणारे दिवे बघत बघतच तो दिवस मावळला.

सिक्कीम-दार्जिलिंग-३ https://www.maayboli.com/node/72486

१-टोंगबा

IMG_20190609_115435.jpg

२ Rhododendron Wine

IMG_20190609_120726.jpg


IMG_20190610_061012.jpg

४- कांचनजंगा अख्खी range

IMG_20190610_064449.jpg

IMG_20190610_103834.jpg

IMG_20190611_172146.jpg
७-समद्रुपत्से (Samdruptse)
IMG_20190610_123033.jpg
८-रवंगला बुद्धा पार्क
<IMG_20190610_111626.jpg

IMG_20190609_142635.jpg
१० Rabdentse Ruins कडे जाणारा trail
IMG_20190609_094437.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती सुंदर लिहिलं आहेत Happy अप्रतिम! तिथे गेल्यावर काय वाटतं ते इतकं शब्दातीत असतं.
किती सुंदर फोटो आलेत. खरंच दार्जिलिंग पेक्षा कांचनजंगा किती जवळ आणि हाताशी वाटतंय पेलिंग ला!

Dhanyawad Harihar ani Rajasi! Photo madhe space yetach nahie try kela! tari parat prayatna karte!
तिथे गेल्यावर काय वाटतं ते इतकं शब्दातीत असतं. agdi 100 takke kharay!

दोन लिंक्समधे फोटोचे टाटल द्या. किंवा फोटोला क्रमांक द्या म्हणजे दोन फोटोत अंतर राहील. फोटोंना क्रमांक असतील तर प्रतिसाद देताना फोटोचा उल्लेख करुन प्रतिसाद देता येईल.

Dhanyawad @athena
Lavkar plan kara Ani lagech ja Happy kharach Sikkim madhe barach baghnya sarkha ahe!

सुरेख हाही भाग!
बांबूचा ग्लास व स्ट्रॉ कीती मस्त.
वाईनचा हलका गुलाबी कलर !!

मस्त. दोन्ही लेख आवडले. ग्लेनरीज मस्तच आहे दार्जिलिंगचं. तिथे गेल्याशिवाय दार्जिलिंग भेट सफल होत नाही Happy
तुम्ही पेलिंग वरून योकसमला गेला नाहीत का? तीही जागा फार सुरेख आहे. आणि पहाटे पेलिंगमधून कांचनजंगा बघितलंत म्हणजे पेलिंग भेटीचं सार्थक झालं. इतक्या जवळून आणि स्वच्छपणे कांचनजंगा इतरत्र क्वचितच दिसतं.
पुढचे लेख टाका लवकर.

@varsha, madhuvanti, thank you
Bamboo glass Ani straw Cha anubhav mastach Ani tyachi taste hi veglich hoti, wine tar aprateem!

@ DJ, Darjeeling train baddal nahi lihile! prachanda gardi hoti, pan train cha pravas ekda tari anubhavava asach ahe! batasiya loop la amhala baghayla milali ani hatat wel asel tar train ne jana must ahe! ho tya ganyasathi famous ahe hi train!

@वरदा, आमच्या कडे दिवस कमी होते त्यामुळे yoksam ला जाऊ शकलो नाही!
आणि पहाटे पेलिंगमधून कांचनजंगा बघितलंत म्हणजे पेलिंग भेटीचं सार्थक झालं. इतक्या जवळून आणि स्वच्छपणे कांचनजंगा इतरत्र क्वचितच दिसतं.++ अगदी खरंय!

Pages