Submitted by mi manasi on 20 November, 2019 - 09:10
"मिटलेलं पान"
तुटलेल्या नात्यांचे
जरतारी पदर
त्या ना मायेची उब
प्रेमाची कदर
गाठीगाठीत फक्त
बोचरे आठव
कशास मिरवायचे?
भरजरी पाटव !……… १
तो पाठीवर हात अन
डोळ्यात पाणी
ते तुडुंबलेलं मन
श्वासात गाणी
क्षणाक्षणाने दिलं
जीवनाचं दान
उघडेल का कुणी कोणी ते?
मिटलेलं पान……………….. २
.....मी मानसी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन पानाचे मोठ्या मनाने
नवीन पानाचे मोठ्या मनाने स्वागत करा.
हळवी कविता आहे.
सामो....धन्यवाद!
सामो....धन्यवाद!
तितक्याच हळव्या प्रतिसादासाठी..
खूप छान, वास्तवदर्शी.
खूप छान, वास्तवदर्शी.
कांचनगंगा..धन्यवाद!
कांचनगंगा..धन्यवाद!