Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
मर्दन या शब्दाचे/ क्रियापदाचे
मर्दन या शब्दाचे/ क्रियापदाचे सोपेकरण मळने असावे.
'प्रमाथी चित्रीकरण ' यातील
'प्रमाथी चित्रीकरण ' यातील 'प्रमाथी' चा अर्थ ?
? घातक
( बाकी जालशोधात एक कौरव, एक संवत्सर असेही अर्थ मिळतात).
प्रमाथी >> खळबळजनक किंवा
प्रमाथी >> खळबळजनक किंवा धोकादायक किंवा त्रासदायक किंवा तिन्ही अर्थांशी निगडित कोणताही शब्द
धन्यवाद !
धन्यवाद !
हा धागा शोधत होतो.
हा धागा शोधत होतो.
'कोळून पिणे' म्हणजे नेमके कसे? आपण शब्दशः अर्थाने काय कोळून पितो?
चिंच.
चिंच.
ड्राय (सेमी ड्राय) चिंच पाण्यात भिजवली की त्याचा गर सुटा होतो. तो उरलेल्या चोथ्या पासून वेगळा करणे याला चिंच कोळणे असे म्हणतात. ज्याने चिंचेचे काँसंट्रेट मिळते/ गाभा वेगळा होतो.
एखादी गोष्ट खूप जवळून माहित असणे, मुळातुन त्याचं सार समजणे == कोळून पिणे.
ओह, चिंचेचा कोळ. आले ध्यानात.
ओह, चिंचेचा कोळ. आले ध्यानात.
To know someone or something inside out ह्या अर्थाने माहीत होते पण शब्दशः अर्थाने क्रियापद आता कळाले.
धन्यवाद अमित.
ते आजकाल 'कोल्ला (/कोलला)
ते आजकाल 'कोल्ला (/कोलला) तुला!' म्हणतात; त्याचाही अर्थ कोळून काढणे अश्या प्रकारचा आहे का?
एखाद्या कर्जदाराने रक्कम परत
एखाद्या कर्जदाराने रक्कम परत न केल्यास त्याच्याकडून जबरदस्तीने ती रक्कम किंवा इतर मालमत्ता हस्तगत करणे याला कोळणे म्हणतात.
हा शब्द पुढे स्वयंपाकघरात शिरला. आंबा, तांदूळ, चिंच इत्यादीचा अर्क ज्या पाण्यात काढला जातो, त्यास कोळ असं म्हणतात. आता हा शब्द चिंचेपुरता मर्यादित राहिला आहे. चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचा अर्क असलेले पाणी.
वाळून कोळ होणे या वाकप्रचारात कोळ म्हणजे अर्क काढून उरलेला चिंचेचा भाग.
कोलणे म्हणजे विटीस दांडूने मारणे. फेकून देणे असाही एक अर्थ आहे.
मला हे खूप दिवसांपासून
मला हे खूप दिवसांपासून विचारायचं होतं. हा धागा बघून आठवण झाली.
काय बरोबर आहे?
१) मला एखादी गोष्ट कळली.
२) मला एखादी गोष्ट कळाली.
माझ्या मते १) बरोबर आहे.
पण बर्याच उत्तम मराठी बोलू/टाईप करु शकणार्या लोकांनी ' कळालं' लिहिलेलं पाहिलंय, इथे किंवा इतरत्रही.
धन्यवाद चिनूक्स.
धन्यवाद चिनूक्स.
पण कोळून पिणे चा अर्थ एखाद्या गोष्टीचा अर्क/सत्व्/गाभा काढून ऊदा. चिंच ती पिणे असाच आहे ना?
कोळणे आणि कोलणे दोन्हींचा अर्थ माहित आहे. नगर साईडला दोन्ही शब्द वापरतात.
चल त्याला जरा कोळून येऊ हा, दम देऊन पैसे काढण्याच्या ईराद्याने एखाद्याला भेट देणे असा वापरतात. त्यातला कर्ज दिलेले असले पाहिजे किंवा कर्जवसूली हा आयाम आता नव्याने कळत आहे.
अग्रेषित (forward) या शब्दाचा
अग्रेषित (forward) या शब्दाचा संधीविग्रह कसा होईल? काही संदर्भ मिळेल का?
अग्र = पुढेइषित = चालवले(ला
अग्र = पुढे
इषित = चालवले(ला/ली/ले)
धन्यवाद स्वाती ताई
धन्यवाद स्वाती ताई
मी इषित (इष) हा शब्द The Students New Sanskrit Dictionary -देवस्थळी, कुलकर्णी, जोशी यांच्या शब्दकोशात शोधला परंतु सापडला नाही
ते आजकाल 'कोल्ला (/कोलला)
ते आजकाल 'कोल्ला (/कोलला) तुला!' म्हणतात;
>>
विटी दांडूतल्या कोलणे या क्रियेवरून केलेला असभ्य वाकप्रचार आहे. खेळ सुरू करताना विटी गदेवर ठेवून दांडूने ती उडवतात त्याला कोलणे असे म्हणतात. ती क्रिया डोळ्यासमोर आणा म्हणजे याचा अर्थ लागेल
कोलणे = दूर उडवून लावणं.
कोलणे = दूर उडवून लावणं.
बोलाचाली करताना हाकलणे, निरूत्तर / अपमान करून घालवून देणे असं काही तरी.
ते आजकाल 'कोल्ला (/कोलला)
ते आजकाल 'कोल्ला (/कोलला) तुला!' म्हणतात; त्याचाही अर्थ कोळून काढणे अश्या प्रकारचा आहे का?
<<
नुसता विटी दांडु नव्हे.
बैलाने शिंगावर घेऊन उडवला, तर त्याला कोलला असे म्हणतात.
टवणेंना अभिप्रेत असलेला अर्थ "कोल्ला"पूर साईडला फ्येमस असण्याची शक्यता नाकारता येत नाही
तर्क या शब्दाची व्याख्या काय
तर्क या शब्दाची व्याख्या काय आहे?
सरस्वती चिन्हाचा अर्थ काय आहे
सरस्वती चिन्हाचा अर्थ काय आहे? म्ह णजे सरस्वती म्हणून ते का काढतात , काही प्रतिकत्मक अर्थ आहे का ?
शिवस्तुती मध्ये शेवटी एक
शिवस्तुती मध्ये शेवटी एक श्लोक आहे -
शास्त्राभ्यास नको श्रुती पढु नको
तीर्थासी जाऊ नको
योगाभ्यास नको व्रते मख नको
तीव्र तपे ती नको
काळाचे भय मानसी धरू नको दृष्टासी शंकू नको
ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको
या मधल्या 'मख' चा अर्थ काय आहे ?
सोळा सोमवारच्या कहाणीत उल्लेख आहे की राणी चिवटं विकायला जाते तर ती उडून जातात. तर चिवटं म्हणजे काय?
मख - यज्ञ
मख - यज्ञ
थँक्स.
थँक्स.
चिवटं म्हणजे काय हे अनेक वर्षाचं न सुटलेलं कोडं आहे माझ्यासाठी
अंधुक आणि धूसर ह्यांच्यात फरक
'अंधुक' आणि 'धूसर' ह्यांच्यात फरक काय? आणि हे शब्द कुठल्या संदर्भात वापरले जातात?
अंधार पडायला लागल्यावर
अंधार पडायला लागल्यावर ब्राईटनेस कमी होतो, तेव्हा दिसतं तसं दिसणं म्हणजे अंधुक. भरपूर प्रकाश असतानाही धूर/धुकं इत्यादी आलं असेल तर जसं अस्पष्ट दिसतं ते म्हणजे धूसर.
धन्यवाद हरचंद पालव
धन्यवाद हरचंद पालव
दुसरा धागा आहे माहीत नाही
दुसरा धागा आहे माहीत नाही म्हणून इथे विचारते की "एखाद्याला दुसर्याने ऐकवणं" म्हणजे आपण म्हणतो ना की 'मला हे ऐकवू नकोस "यासाठी इंग्रजी शब्द किंवा वाक्प्रचार कोणता आहे?
टॉक टू दि हँड
टॉक टू दि हँड
ड्झ दिस फेस लुक लाईक ऑफ समवन हू केयर्स?
(हे दोन्ही भांडण करताना वापरावे एरवी नाही. एरवी 'लेट्स रिव्हीझिट दिस कॉन्व्हर्सेशन लेटर' सहसा पुरेसं असतं)
डोन्ट प्रीच टु मी?
डोन्ट प्रीच टु मी?
'मला हे ऐकवू नकोस "यासाठी
'मला हे ऐकवू नकोस "यासाठी इंग्रजी शब्द किंवा वाक्प्रचार कोणता आहे? >> इंग्रजी नाही येत पण हिंदी मधला हा संदर्भ बरेच जण वापरतात.
मिममधला मनुष्य कोणे ?
मिममधला मनुष्य कोणे ?
Pages