Submitted by अमृत जोशी on 19 November, 2019 - 05:06
थंडी अशी कडाक्याची, त्यात जाग विरघळणारी...
गार हवा घेउन गिरकी, अंगची उब चुरगळणारी..
दुपार होता उन्हामधे, पाउल जरासं घेउन मागे..
रात्रीच्या गर्भातून बेफाम, रोजच्या रोज उलगडणारी.. [१]
पहाटेचे दाट धुके, नजर त्यात विरघळणारी...
बहरातली पाने-फूले, थंडी क्षणात चुरगळणारी...
शेकोटीच्या अवती-भवती, गारवा जरा टाकुन मागे..
विझल्या राखेवरती अलगद, रोजच्या रोज उलगडणारी..[२]
ती रोज एकटीच, अभाळभर पसरून हात..
ती एवढी शक्त की, उन्हालाही देते मात..
थंडी अशी कडाक्याची, अवती भवती सळसळणारी...
तरी जपते बर्फा-खाली, नदी खोल झुळझुळणारी... ! [३]
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली कविता
आवडली कविता
तू लिहिलेली माझी ही सगळ्यात
तू लिहिलेली माझी ही सगळ्यात आवडती कविता
बंगलोरला तुझ्या तोंडून ऐकल्यापासून मी पंखा आहे!
आणि हो, मायबोलीवर स्वागत!
आणि हो, मायबोलीवर स्वागत!
सुंदर ...
सुंदर ...
थंडी आणलीत मायबोलीवर... पण
थंडी आणलीत मायबोलीवर... पण अजुन अनुभवायला थंडीच नाहि..
छान लिहिलिय कविता
छान!
छान!
खूप मस्त कविता
खूप मस्त कविता
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!