थंडी

Submitted by अमृत जोशी on 19 November, 2019 - 05:06

थंडी अशी कडाक्याची, त्यात जाग विरघळणारी...
गार हवा घेउन गिरकी, अंगची उब चुरगळणारी..
दुपार होता उन्हामधे, पाउल जरासं घेउन मागे..
रात्रीच्या गर्भातून बेफाम, रोजच्या रोज उलगडणारी.. [१]

पहाटेचे दाट धुके, नजर त्यात विरघळणारी...
बहरातली पाने-फूले, थंडी क्षणात चुरगळणारी...
शेकोटीच्या अवती-भवती, गारवा जरा टाकुन मागे..
विझल्या राखेवरती अलगद, रोजच्या रोज उलगडणारी..[२]

ती रोज एकटीच, अभाळभर पसरून हात..
ती एवढी शक्त की, उन्हालाही देते मात..
थंडी अशी कडाक्याची, अवती भवती सळसळणारी...
तरी जपते बर्फा-खाली, नदी खोल झुळझुळणारी... ! [३]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर ...

छान!