नार्कोस

Submitted by राधानिशा on 19 November, 2019 - 02:30

खऱ्या घटना आणि व्यक्तींवर आधारीत आहे मालिका .. कोलंबिया देशात पाब्लो एस्कोबार हा ड्रग माफिया होता 1980 - 90 दशकात .. त्यावेळच्या जगातल्या पहिल्या 10 श्रीमंत लोकांत त्याचा नंबर होता इतकी अमाप संपत्ती कमावली ... अमेरिकेत कोकेन पहिल्यांदा आणणाऱ्या माफियांपैकी तो होता . कितीतरी बिलियन डॉलर अमेरिकेतुन कमावून नेले ...

पैसा व्हाईट मनी कसा दाखवायचा हा प्रश्न निर्माण झाला .. शेकडो एकराच्या प्रॉपर्टीज , 800 बंगले / घरं , अनेक गाड्या , हेलिकॉप्टर .. धंद्यातून मिळणारा प्रॉफिट असं दाखवण्यासाठी खोट्या धंद्यांचा देखावा निर्माण केला .... तेही कमी पडू लागलं तेव्हा पैसे पुरुन ठेवण्याची वेळ आली ...

संपत्तीने समाधान होईना ... महत्वाकांक्षा आणखी वाढली .. आपल्या कोलंबिया या देशाचा पंतप्रधान होण्याचं त्याचं स्वप्न होतं ... ड्रग माफिया असण्याचे त्याच्यावर आरोप होते पण पुरावा एकही नव्हता .. लोकप्रियता मिळवण्यासाठी गरिबांना घरं बांधून दिली , हॉस्पिटल्स , शाळा हायस्कूल कॉलेजेस , खेळाची मैदानं .. सढळ हस्ताने लोकोपयोगी कामं केली ( ड्रग विकून आलेल्या पैशातून अर्थात , त्यासाठी किती जणांचे मध्ये खून पडले , कितींची आयुष्य ड्रगने बरबाद झाली )

कोलंबियातुन ड्रग येतात हे कळल्यावर अमेरिकन सरकारने कोलंबिया सरकारवर लवकर ड्रग व्यवसाय नष्ट करण्याचा दबाव आणला ... संसदेत निवडून गेला त्यादिवशीच त्याचा जुना ड्रग संदर्भात संशयित आरोपी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये काढलेला फोटो मंत्रालयात सादर केला गेला पुरावा म्हणून ... मंत्रीपद गेलं , पंतप्रधान पदाचं स्वप्न धुळीला मिळालं . कोलंबिया सरकार तेवढ्यावर थांबलं नाही , त्याच्या व्यवसायाची पाळंमुळं खोदून ड्रग व्यवसाय बंद करण्याचा विडा उचलून पाब्लो विरुद्ध उभं राहिलं .

वॉन्टेड म्हणून त्याच्या फोटोची पत्रकं लागली ... देश सोडून पळून जावं लागलं ...

पंतप्रधान पदाच्या पुढच्या उमेदवाराचा त्याने खून करवला ... त्या पदासाठी उभं राहायला कुणी धजावेना ... जो राहिला तोही मनात घाबरून .... पोलीस खात्यात त्याने भ्रष्ट केलेले अनेक पोलीस होते ...

त्याच्या विरुद्ध जो शोध घेतला गेला त्यात त्याच्या शेकडो गुन्ह्यांचा - बेकायदेशीर कामांचा पुरावा असलेली कागदपत्रं हाती लागली , त्या फाईलींनी एक पूर्ण खोली भरली .

पुरावे नष्ट व्हायला नको म्हणून ते कोलंबियाच्या सुप्रीम कोर्टात ठेवले ... त्याने एका कम्युनिस्ट संघटनेला पैशाचं आमिष दाखवून हेलिकॉप्टर मधून सुप्रीम कोर्ट हायजॅक करायला लावलं ; त्यांनी पूर्ण कोर्टाला आग लावून दिली , सगळे पुरावे नष्ट झाले ... त्यानेच हे केलं असेल हे सिद्ध करायला कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता .

मालिकेत जुन्या खऱ्या बातम्यांच्या क्लिप्स पण दाखवतात ... त्या पाहताना अवाक होऊन जायला झालं .

पंतप्रधान पदाचा उमेदवार ज्या विमानातून जाणार होता त्या विमानात बॉम्ब घेऊन एकाला पाठवलं त्याला ते रेकॉर्डिंग डिव्हाईस आहे , 2 पॉलिटिशीयन चं संभाषण रेकॉर्ड कर म्हणून सांगितलं .. बटण दाबल्यावर स्फोट ..

काहीतरी दगाफटका होण्याची बातमी हाती आल्याने त्या उमेदवार ऐन वेळी एअर पोर्ट वरून मागे गेला . प्लेन क्रॅश मध्ये 117 लोक मारले गेले .

मालिकेतला पाब्लो दिसायला बऱ्यापैकी देखणा आहे . हिरो म्हणून आवडण्यासारखा नाही , पण व्हिलनबद्दल सहानुभूती निर्माण होते .. अगदी सभ्य , सुसंस्कृत , चांगल्या कुटुंबातील माणसाचा चेहरा वाटतो .... एक्सप्रेशन्स असे इमोशनल दिले आहेत की हा व्हिलन आहे , याचा पराभव होत असताना पाहून आनंद व्हायला पाहिजे असं स्वतःला सांगावं लागलं ... आनंद झाला नाही .. वाईटही वाटलं नाही .. थोडंसं समाधान वाटतं पराभव होताना पाहून .. ह्याने अकारण अतिरेकी निर्णय घेतले नसते तर खूप चांगलं काम करण्याची क्षमता याच्यात होती ; ठरवलं तर किती चांगलं काम करू शकला असता ( भले ड्रगच्या पैशांनी का असेना ) आणि कशी माती करून घेतली स्वतःच्याच कर्मांनी असं वाटून थोडं वाईट वाटतं ...

जर सरळ व्हिलन सारखे एक्सप्रेशन दिले असते , क्रूर - विकृत हसणं , दुष्ट डायलॉग वगैरे तर तिरस्कार वाटायला सोपं गेलं असतं . पण हा तर फॅमिली मॅन दाखवला आहे , आईशी प्रेमाने - आदराने वागणारा , बायकोला सर-आंखो पर ठेवणारा , आपल्या मुलांचे लाड करणारा त्यांच्याशी खेळणारा ... कुटुंबाला जपणारा ..

तो हजारो लोकांच्या मरणाला कारणीभूत झालेला असेल हे त्या निरागस चेहऱ्याकडे बघून परत परत विसरायला झालं ... आणि स्वतःच्या कुटुंबावर इतकं प्रेम करणाऱ्या माणसाला दुसऱ्यांच्या लहान मुलं , कुटुंबांच्या मृत्यूचे आदेश देताना काहीच कसं वाटत नसेल या प्रश्नाने दिगमूढ व्हायला झालं .

मुद्दाम प्रेक्षकांच्या फिलिंग्ज कॉम्प्लिकेट करण्यासाठी पाब्लोला असं दाखवलं आहे असं वाटतं .

पूर्ण दुष्ट व्हिलन तर खूप सिरिअल्स मध्ये असतात , त्यांच्याशी प्रेक्षक भावनिक दृष्ट्या कनेक्ट होत नाही .. तेव्हा व्हिलन असा दाखवायचा ज्याच्याबद्दल प्रेक्षकाच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला पाहिजे ... पण तरी त्याच्या बरबादीची इच्छा प्रेक्षकाने केली पाहिजे .... एकाच पात्राबद्दल वेगवेगळे भावनांचे लेयर्स अनुभवता आले की ती मालिका अधिक भारी वाटते प्रेक्षकाला ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाब्लो आणि दाऊद मध्ये मला प्रचंड साम्य वाटतं. एक फॅमिली मॅन, गुन्हे करण्याची पद्धत, शरीरयष्टी आणि यंत्रणेवर असलेला प्रचंड वचक. (रेफरन्स डोंगरी ते दुबई!)
नार्कोस मधील अजून एक बेस्ट कॅरेक्टर पेद्रो पासकल ने रंगवलंय. त्यामानाने नार्कोस ३ आणि नार्कोस मेक्सिको काही जमलं नाही.
बादवे आजपर्यंत अंमली पदार्थांच्या सिरीजमधला बेस्ट हिरो/व्हिलन असेल, तर माझ्यामते वॉल्टर व्हाईटचं!!!!

बादवे आजपर्यंत अंमली पदार्थांच्या सिरीजमधला बेस्ट हिरो/व्हिलन असेल, तर माझ्यामते वॉल्टर व्हाईटचं!!!! >> काहीही.
हायझेनबर्ग बेस्ट विलन आहे, त्याच्यापुढे वॉल्टर व्हाईट किस झाड की पत्ती, त्याने हायझेनबर्गचे चरण धुऊन पाणी प्यावे.

धन्यवाद Happy

पेद्रो ( की पेड्रो? ) चं कॅरॅक्टर मस्तच आहे .. माझं उलट झालं , मला तो नार्कोस 3 मध्ये जास्त आवडला , काली कार्टेलच्या विरोधात काम करताना ... नार्कोस तिसरा सिजन सुरुवातीचे 3 - 4 एपिसोड आवडला नाही फारसा पण नंतर पकड घेतली..... रॉड्रीग्झ ब्रदर्स पकडले गेले तेव्हा , आणि तुरुंगातून सुटणार नाहीत हे निश्चित झाल्यावर मनापासून समाधान वाटलं . सालाकाडो आणि त्याच्या कुटुंबाबद्दल शेवटपर्यंत धाकधूक वाटत होती , ते सुखरूप बाहेर पडल्यावर सुटकेचा निःश्वास सोडला , त्याचं कॅरॅक्टर आवडतं झालं होतं . डेव्हिडला गोळ्या घातल्या तेव्हा आनंद झाला , अजून थोडं संथ वेदनादायी मरणही चाललं असतं ..त्याला कोलंबियन जॉफ्री म्हणता येईल , अभिनय अप्रतिम केला आहे . पाचोचा आधी राग येत होता पण शेवटी शेवटी किंचित सहानुभूती निर्माण झाली , त्याची वडलांनी अपमान केल्याची स्टोरी ऐकून आणि त्याने आपल्या पार्टनर्सना दगा न देण्याचा निर्णय घेतल्याने , भावाबद्दलच्या काळजीने ... त्याला मरताना पाहून व्हायला हवा तेवढा आनंद झाला नाही ...

नार्कोस मेक्सिको नार्कोसच्या मानाने अळणी आहे थोडी ... मिगेल तर शेवटपर्यंत व्हिलन वाटतच नाही , चक्क चांगला माणूस वाटत होता .. शेवटी त्याने गव्हर्नरच्या मुलाला मारलं तोवर .. पण तेही त्याच्या कॅरॅक्टरशी साफ विसंगत आहे ..

नार्कोसच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये 15 --20 वर्षांपूर्वी किकि या डीइए ( अमेरिकन ) एजंटला ड्रग माफिया टोळीने किडनॅप केलं आणि टॉर्चर करून मारलं , त्यानंतर अमेरिकन सरकारने ड्रग माफिया गॅंग विरुद्ध मोठी ऍक्शन घेऊन त्या कार्टेल्सना उध्वस्त केलं .. तेव्हापासून डीइए एजंटच्या वाट्याला कुठलंही ड्रग कार्टेल सहसा जात नाही असा उल्लेख आहे .

नार्कोस मेक्सिको मध्ये किकिला पहिल्यांदा पाहिला तेव्हा वाटलं मेन कॅरॅक्टर म्हणून जरा डॅशिंग ऍक्टर तरी घ्यायचा , हे काय मेषपात्र दिसत आहे .. पण एकाच एपिसोड मध्ये मन जिंकून घेतलं .. ऍक्टरचं रूप महत्वाचं नाही , त्याला दिलेलं कॅरॅक्टर आणि ऍक्टिंग महत्वाची हे परत एकदा पटलं ... पहिल्या एपिसोड पासूनच हा कसा मरणार हे माहीत असल्याने पात्राबद्दल अधिकच सहानुभूती निर्माण झाली .. शिवाय कॅरॅक्टर मस्त दाखवलं आहे , धाडसी , रिस्क घ्यायला तयार , वेषांतर असं नाही पण नावगाव बदलून प्रत्यक्ष गुंडांमध्ये मिसळून माहिती काढायचा धोका पत्करायला तयार , मेक्सिकोत आल्यावर तिथल्या भ्रष्ट सिस्टीमने फ्रस्टेट होणारा .. तिथल्या अमेरिकेन सहकाऱ्यांची निष्क्रियता पाहून उखडणारा .. पण त्यांचाही वरच्या सिस्टीमपुढे नाईलाज आहे हे समजल्यावर जरा समजुतीने घेणारा ... किकि आल्यावर त्याच्या कामाने , किरकिरीने - कटकटीने Lol धाडसी , खोलात जाऊन माहिती काढण्याच्या वृत्तीने हळूहळू मेक्सिकोतल्या अमेरिकेन एजंट्समध्येही चैतन्य येतं आणि जरा चतुराईने कारवाई केली तर भ्रष्ट मेक्सिको सरकारला आणि आपल्या दखल घ्यायला अनुत्सुक असलेल्या अमेरिकन सरकारला या गोष्टींची दखल घ्यायला आपण भाग पाडू शकतो असा विश्वास त्यांच्यात निर्माण होतो ... किकि त्यांचा जवळचा सहकारी बनतो आणि प्रेक्षकाचं आवडतं कॅरॅक्टर .... एन्डिंग थोडं डिसअपॉइंटिंग वाटलं , गुन्हेगारांना परस्पर टिपून मारणार हे समजलं पण ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहणं जास्त समाधानकारक झालं असतं .

Couldn't agree more!!!! >> खरंय. तो सांगत राहतो If you don't know who I am then your best course would be to tread lightly.
पण लोक ऐकत नाही आणि मग बिचारे रडत बसतात.

तो जोपर्यंत लपून छपून कारभार करत होता, चांगला राहिला, पण जेव्हा त्याने स्वतःचा खरा चेहरा पुढे आणायचा प्रयत्न केला, तेव्हाच बिचारा पळून पळून मेला.
बिचारा हायझेनबर्ग!!!!

>>बिचारा हायझेनबर्ग<<
बिचारा म्हणण्यापेक्षा, हि वाज जस्ट वन लकि डॉग. परिस्थितीमुळे आलेल्या प्रवाहात नुसता वहावत गेला आणि नशिब जोरावर म्हणुन टिकला. याउलट गसचं कॅरेक्टर स्ट्राँग आहे. रुथलेस यट रॅशनल, व्हाइट कॉलर्ड क्रिमिनल...

याउलट गसचं कॅरेक्टर स्ट्राँग आहे. रुथलेस यट रॅशनल, व्हाइट कॉलर्ड क्रिमिनल... >> अँड यट ही वॉज आऊटस्मार्टेड अ‍ॅट एवरी स्टेप बाय धिस वन लकी डॉग. द रिझन बीईंग गस कुडबी अ‍ॅज रूथलेस अ‍ॅज एनीवन बट ही कुड नॉट बी अ‍ॅज मॅन्युप्युलेटिव अ‍ॅज युनोहू.

वॉव्हा मनिप्युलेटिव? गिम्मी ए ब्रेक. भितीपोटी त्याने गसला मारलं, तो मनिप्युलेटिव असता तर गसचा चांगला वापर करु शकला असता. वॉव्हा वाज अ‍ॅन इमोशनल फूल, अँड पॅथलाजिकल इडियट...

ओके, बिफोर दिज आर्ग्युमेंट्स गो आउट ऑफ हँड्स, मुव इट टु दि ब्रेबॅ थ्रेड...

वॉव्हा वाज अ‍ॅन इमोशनल फूल, अँड पॅथलाजिकल इडियट.. >> अँड यट ही सर्वाईव्ड लाँगर दॅन एवरीवन एल्स. Proud

ओके, बिफोर दिज आर्ग्युमेंट्स गो आउट ऑफ हँड्स, मुव इट टु दि ब्रेबॅ थ्रेड... >> हो पण तिथे जाऊन सिरियल मध्ये काय घडले त्यावरून चर्चा करायची असेल तरच लिहा.. त्याने असे करायला हवे होते आणि तसे करायला हवे होते असे ईतिहास किंवा राजकारणातले आपल्याला सगळे भूत, भविष्य वर्तमान माहित आहे असे लिहिणार नसाल तरच लिहा. Wink

>>त्याने असे करायला हवे होते आणि तसे करायला हवे होते असे ईतिहास किंवा राजकारणातले आपल्याला सगळे भूत, भविष्य वर्तमान माहित आहे असे लिहिणार नसाल तरच लिहा.<<

म्हणजे असे? - द रिझन बीईंग गस कुडबी अ‍ॅज रूथलेस अ‍ॅज एनीवन बट ही कुड नॉट बी अ‍ॅज मॅन्युप्युलेटिव अ‍ॅज युनोहू... Lol

मी तर असं म्हणेल, की हायझेनबर्ग हा फक्त एक नशिबाने आणि शिक्षणाने अचानक संधी चालून आलेला मूर्ख माणूस होता. आपल्या पूर्ण आयुष्यात त्याला संधी मिळत गेला, पण प्रत्येक आघाडीवर तो अपयशी ठरत गेला, ना त्याला फॅमिली नीट सांभाळत आली, ना बिजनेस. सुरुवातीला छोट्या गुंडांसमोर भाव खाणारा नंतर पोलीस आणि माफियांसमोर उंदरासारखा पळाला... आणि शेवटी मेला.
त्याला सगळ्यात बेस्ट व्हिलन म्हणण्याच कारण म्हणजे, त्याने कशाचाही वापर सुटकेसाठी केला. अक्षरशः त्याच्या नवजात मुलीचाही. नेहमी तो भेकडासारखा लढून जिंकत राहिला, आणि शेवटी भेकडासारखाच मेला...

द रिझन बीईंग गस कुडबी अ‍ॅज रूथलेस अ‍ॅज एनीवन बट ही कुड नॉट बी अ‍ॅज मॅन्युप्युलेटिव अ‍ॅज युनोहू.. >> विच ईज अ फॅक्ट नॉट अ स्पेक्युलेशन.
ऊदा. जेव्हा गस हाबला मारण्यासाठी त्याला शोधत होता तेव्हा त्याने गसला हेक्टरच्या भेटीला येण्यासाठी मॅन्यूपुलेट केले.
जेसीला ब्रॉक प्रकरण घडवून पुन्हा सोबत येण्यास मॅन्युप्युलेट केले.
लिडियाला शेवटी रेस्टॉ मध्ये मी स्वतः तुझ्या हातात येत आहे असे दाखवून मॅन्यूप्युलेट केले.
जेसीला गेल ला मारायला पाठवून एकाच वेळी गस आणि जेसीला मॅन्युप्युलेट केले.
शेवटी भिती दाखवून ग्रेचेन आणि ईलियटलाही फॅमिलीपर्यंत पैसे पोचवण्यासाठी मॅन्युपुलेट केले.

हिज सर्वायवल वॉज ऑल अबाऊट बीईंग स्मार्ट आणि मॅन्युप्युलेटिव.. नॉट बीईंग रूथलेस ऑर स्ट्राँग अँड डेफिनाईटली नॉट बीईंग इमोशनल फूल, अँड पॅथलाजिकल इडियट... ऑन द काँट्ररी ही युज्ड आदर पीपल्स ईमोशन्स टू हिज अ‍ॅडवंटेज.

नेहमी तो भेकडासारखा लढून जिंकत राहिला, आणि शेवटी भेकडासारखाच मेला... >> अहो पण तुम्ही आधीच्या प्रतिसादात त्याला हीरो म्हणालात ना? विसरलात का एवढ्यात Lol

हो पण माझे विचार बदलले तुमचे प्रतिसाद बघून.
तुम्ही दिलेली कारणे इतकी सयुक्तिक आहेत, की हायझेनबर्ग उर्फ वॉल्टर व्हाईट हा एक मनोरुग्ण, विकृत आणि नीच पातळीचा व्हिलन होता, हे माझ्या मनात पक्के ठसलय.
म्हणून हायझेनबर्ग - एक वाईट निपजलेला कथाकार, मी तुमचे आभार मानतो. किंबहुना तुम्ही माणसाची मने फिरवण्यात वाकबगार असून तुमच्या गोष्टी पटवून देण्याची हातोटी आहे, हे नम्रपणे नमूद करून इथेच थांबू इच्छितो!!

Proud You are welcome अज्ञातवासी.
पण कृपया लिहिणं थांबवू नका. तुमच्या लिखाणाचे अनेक चाहते आहेत ईथे जे तुमची आतुरतेने वाट पहातात. त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी तरी लिहा.

अरे यार ते अज्ञातवासी खरच गेले का ? Sad काय एवढी बिनकामाची, टाईमपास गोष्टं मनाला लाऊन घेतात देव जाणे.
अज्ञातवासी, तुम्ही हे वाचत असल्यास कृपया पुन्हा लिहिते व्हा. मला फार वाईट वाटेल तुम्ही लिहिणे थांबवले तर.
तुम्ही समंजस आहात योग्य तो निर्णय घ्याल ही अपेक्षा.