संकेतांवर कितपत विश्वास ठेवावा

Submitted by VB on 16 November, 2019 - 10:32

माझ्या मित्रमंडळीमध्ये एक जोडपे आहे, म्हणजे अद्याप लग्न झाले नाहीये पण बोलणी चालुयेत. त्यांची एक समस्या इकडे लिहून सल्ला घ्यावासा वाटला म्हणून हा धागा.

दोघांच्याही लग्नाच्या बोलणी करताना दरवेळी काही न काही अपशकुन घडतोय म्हणजे हळद कुंकू सांडणे, चहाचा अगदी चांगला कप फुटणे, दूध फाटने, बांगडी तुटणे. या सगळ्या मुळे दोन्ही घरची मंडळी खूप तणावात आहे. म्हणजे अंधश्रद्धा समजून सोडून द्यावे तर जर हे काही वाईटचे संकेत असतील तर पुढे वैवाहिक आयुष्यात काही त्रास किंवा कुणाच्या जीवावर बेतायला नको ही भिती, अन मुख्य म्हणजे दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात त्यामुळे लग्न न करायचा निर्णय घेणेही सोपे नाही अन लग्न करणेही अवघड असे झालेय.

तर अश्या परिस्थितीत लग्न करावे की नाही?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवरा नवरीनेच विचारलेय की. मग आम्हाला काय जातय पिंका टाकायला. Wink

वीबी, मला तर वाटतेय की, एकता कपूरच योग्य राहिल ह्या बाबत सल्ले द्यायला. एकदा तिला सुद्धा विचारून पहा.

ह. घ्या.

संकेत असतील किंवा काही श्रद्धा त्यांना एका फटक्यात चुकीचे ठरवू नका.
आतून जी भावना येते किंवा विचार येतात त्यात तथ्य असते.

आतून जी भावना येते किंवा विचार येतात त्यात तथ्य असते.>> खरंच आपला आतून निर्णय झालेलाच असतो फक्त त्याला जस्टिफाय करायला संकेत वगिअरे वापरतात. नाहीतर अगदी रँडम घटनांवर जीव नातले मोठे निर्णय कसे घेता येतील.

आतून भावना येणे -इंट्युशन- ही फक्त एक प्रोसेस आहे.
फाईट ऑर फ्लाईट स्थितीमध्ये क्षणाचा वेळ न दडवता त्वरीत निर्णय घेणे गरजेचे असते अशावेळी आपल्या मेंदूच्या प्रोग्रॅममधून तीव्र संदेश येतो. आता सिव्हीलायझेशन मुळे अशा वेळा आपल्यावर फार कमी येतात. पण जेव्हा अशा आतून भावना येतात त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला म्हणजे तो योग्यच असतो असे नाही. तो निर्णय योग्य असण्याची probability ०.५ पेक्षा जास्त नसावी.

> पाल कदाचीत बाळाला अंगाई गात असेल.
टिटवी मैत्रीणीला चल ग दाणे शोधू म्हणत असेल. > टिटवीच माहीत नाही पण पाल चुकचुकणे म्हणजे मेटींग कॉल असतो ना?

पाल चुकचुकणे हे आपल्या स्पर्धकांना धमकी / सूचना असावी, आपल्या भक्ष्यापासून दूर रहा सांगण्यास.

दोन्ही असतं, टेरिटरी मार्किंग आणि मेटींग कॉल.

Do Lizards Make Sound ? ... Very few of the nearly 5,000 species make vocal sounds, meaning it is a rarity to hear lizard noises . Geckos are the chattiest of the common species, communicating with a variety of chirps, squeaks, and clicking sounds. The chirping is used to define territory and also as a mating call.

>>>>> आपल्याकडच्या स्त्रीपुरुषांची सेक्स लाईफ यापेक्षा वेगळी नसते.>>>> सेक्स इज हेल ऑफ अ‍ॅन ओव्हररेटेड थिंग. हेमावैम!!
>>>>>पाल कदाचीत बाळाला अंगाई गात असेल.>>> हाहाहा!!! एकदा एक पाल तिचे नवजात पिल्लू, स्वतःच्या तोंडात धरुन नेताना पाहीलेले आहे. Happy

> हाहाहा!!! एकदा एक पाल तिचे नवजात पिल्लू, स्वतःच्या तोंडात धरुन नेताना पाहीलेले आहे. Happy > स्पेसिफीक पालीचं माहीत नाही पण मला वाटतं पालक/मादीने पिलांची काळजी घेणे हे सरीसृप आणि खालच्या वर्गात होत नसावे, पक्षी आणि सस्तन वर्गात होते.

कोतबोचा प्रत्येक धागा मायबोलीवर जसा मुरंब्याप्रमाणे अधिक मुरत जातो तसे ते कोतबो न राहता विरंगुळा सदर (ग्रुप) आपोआप होत जाते. हां बग फिक्स करायला अजुन भल्या भल्या लोकांना जमलेले नाही Wink

Pages