अग आई

Submitted by Swamini Chougule on 15 November, 2019 - 00:25

अग आई

मी आहे एक नाजूक कळी

नको ना मला कुस्करु

मी आहे तुझ्याच सारखी

नको ना मला टाकु

अग आई

मला ही होऊ देना फूल

तुझ्या बागेतील छान

मी पन उधळण सुगंध

गावून जीवन गाण

अग आई

मला आहे माहित

तुला हवा कुलदिपक

मी ही होईन तुमच्याच घरची

पनती सुंदर सुबग

अग आई

मला ही पाहू दे जग

माझा हक्क नको ना हिरावू

मला ही देना आकाशात

उंच उंच भरारु

( गर्भातील एका निरागस मुलीचे आपल्या आई जवळ व्यक्त केलेले मनोगत जी गर्भात मुलगी आहे म्हणुन तीचा बळी द्यायला निघाली आहे तीच्या पति च्या भीतीने)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users