कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शिवसेना न्यायालयात गेलेली नाही हे उठा नी पत्रकार परिषदेत सांगितल.. तसाही काही उपयोग झाला नसता.

बरं शिवसेनेला सपोर्ट करणार होते ते अधिकचे ११९ आमदार कुठे आहेत? त्यांच्यामुळे महाराष्ट्रावर आज ही वेळ आलीय...

एकीकडे ईडीचा फेरा मागे लागूनही पवारांनी फार गहजब न करता त्या संकटाचे आधी संधीत आणि मग संधीचे यशात रुपांतर केले.
आणि दुसरीकडे "मला खोटे ठरवले" असे शंभर वेळा ओरडून सांगत ठाकरेंनी मिळालेल्या यशाचे मातीत आणि त्या मातीचे पक्षाच्या आजवरच्या धोरणांचे थडगे बांधण्यात रूपांतर केले आहे असे मला वाटते. त्रिपक्षीय सरकार स्थापन झाले तरी त्यांच्या ह्या आततायी स्टंटला कुठलेही राजनैतिक भवितव्य आहे असे मला वाटत नाही.

पण एका बाबतीत शिवसेनेला मानले पाहिजे की, 'काही झाले तरी मुख्यमंत्री आपलाच असेल आणि तो बनवण्यासाठी आपल्या पक्षाच्या धोरणांसहित कशाचाही बळी द्यायची तयारी आहे' ही त्यांची दग्धभू महत्वाकांक्षा भाजपाच्या थिंकटँकपासून त्यांनी यशस्वीपणे लपवून ठेवली.
२०१४ चा कटू अनुभव गाठीशी असतांना, लोकसभेसाठीच्या युतीवरूनही भाजपाने कुठलाही ट्रस्ट अर्न केलेला नसतांना आणि जागा वाटणीवरून मागच्याएवढी खळखळ केलेली नसतांना ही वादळापूर्वीची शांतता भाजपाला समजली नाही... हे भाजपचे राजनैतिक अपयश आहे.

ह्या प्रकरणातून राज ठाकरेंना नवसंजीवनी मिळेल असे वाटते. शिवसेनेला काटशह देण्यासाठी भाजप मनसेला हाताशी धरणार हे नक्की. २०१४ च्या वेळी मोदींनी शिवसेनेला सोडून आपल्याला जवळ करावे ह्यासाठी राज ठाकरेंनी डोंगर हलवण्याएवढे प्रयत्न केले होते. आता ही आयती चालून आलेली संधी मनसे आणि भाजप दोघेही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा कटू काळ विसरून भरतमिलाप घडवून आणतील असे वाटते.

विषया<चे गांभीर्य अजुन नाही.
सेना सरकार बनवू शकली नाही किंवा राष्ट्रवादी सरकार बनवू शकली नाही हा विषयच नाही 356 कलम हे मनमानी पद्धतीने वापरून आपण काँग्रेस पक्ष वेगळा नाही हे bjp ने दाखवून दिले .
ते पण महाराष्ट्र मध्ये जे राज्य काश्मीर प्रश्न ,राम मंदिर प्रश्न ह्या प्रश्नांना राज्य हिता समोर काडीची किँमत देत नाही

शिवसेनेला काटशह देण्यासाठी भाजप मनसेला हाताशी धरणार हे नक्की.
>>>
सध्याच्या लोकसभेला भाजपला विरोध हाच एकमेव अजेंडा होता ना राजसाहेबांचा

राज्यपाल मात्र शहामोदी केंद्राच्या आदेशावर नाचतात वाटते. भाजपा सरकार बनवायची शक्य्ता होती तेव्हा थांबून होते. चेंडू सेना राष्ट्रवदीच्या कोर्टात जाताच बॅडलाईट म्हणत खेळ थांबवला....

मध्य प्रदेश chya अलीकडील राज्यांना असा केंद्र सरकारचा रुबाब दाखवत रहा मग ही राज्य भारत ह देश नसून अनेक राज्य मिळून एकत्रित राहिलेला कृत्रिम प्रदेश आहे हा धडा केंद्र सरकार कडून पाठ करून घेतील

राज्यपाल मात्र शहामोदी केंद्राच्या आदेशावर नाचतात वाटते.

>>

नुसते राज्यपालच काय, पवार सुद्धा नाचतात बहुतेक . ७:३०-८ ची वेळ असताना भर दुपारी राज्यपालांना फोन केला, तो उगाच नाही. Wink

स्वतःला ईडीची कुठलीही नोटीस आली नसताना, बोलावलं नसताना, पळू पळू ईडीच्या कार्यालयात जाणं... डेडलाईन संपायच्या आधीच राज्यपालांकडे मुदतवाढ मागणं... वेळेआधीच पत्ते टाकायची पवारांची नेहमीची खेळी आहे.

दोन्हीचा उद्देश एकच. भाजपाला होणाऱ्या संभाव्य फायद्यापासून रोखणं. ईडी निमित्तानं जनमत आपल्या विरोधात जाऊ नये, म्हणून आधी घाई केली, आणि आता वेळ संपायच्या आधीच जास्ती वेळ मागून राष्ट्रपती राजवट आणण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणजे मागाहून भाजपनं दडपशाही करून वेळेआधी राष्ट्रपती राजवट आणली, असं चित्र लोकांसमोर रंगवायला बरं पडतं.

भाजपनं नुसतं पंक्तीला बसायचं नाटक करावं, पवार पत्रावळ्या घेऊन फरार होतील.

नवीन Submitted by विलभ on 13 November, 2019 - 02:52. >>>

सहमत,. पण काही बिनडोक लोकांना शिवसेनेचा आदल्या दिवशीचा अनुभव अख्ख्या जगाला माहित असतानाही पवारांनी दुपारी केलेला आणखी वेळ मागण्याचा आगाऊपणा दिसत नाही, किंवा त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते.

>>म्हणजे मागाहून भाजपनं दडपशाही करून वेळेआधी राष्ट्रपती राजवट आणली, असं चित्र लोकांसमोर रंगवायला बरं पडतं.<<
आणि हे येडे म्हणातायंत कि आम्ही फेरनिवडणुकित स्वबळावर १५०+ निवडुन आणु. फक्त एका डॉग व्हिसलची गरज आहे... Lol

राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना कोर्टात गेलीय, आणी केस कोण लढवणार तर कपिल सिब्बल .

स्वतःला ईडीची कुठलीही नोटीस आली नसताना, बोलावलं नसताना, पळू पळू ईडीच्या कार्यालयात जाणं... डेडलाईन संपायच्या आधीच राज्यपालांकडे मुदतवाढ मागणं... वेळेआधीच पत्ते टाकायची पवारांची नेहमीची खेळी आहे.>>>>>>+१

एखादं वात्रट , चालाक पोरगं नाही का आई वडिलांनी हाणायच्या आत स्वतःच मला मारल, मला मारल असा ठणाणा करत सुटतं तसला प्रकार आहे हा. याला सिंपथी सिकर म्हणतात.

>>> मनसे व भाजप एकत्र येतील असे मला तरी वाटत नाही...पाहूच पुढे काय होतंय ते... >>>

फेरनिवडणुक झाली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मनसेला आघाडीत सामील करून घेतील.

आज परत बैठक घेणारेत असे अजीत पवार म्हणाले. ५ वर्षे मु. पद सेनेला व उ. मु. पद राष्ट्रवादीला असे ठरलेय. कॉ ने पाठिंबा दिला तर रा. राजवट रहाणार नाही.

उद्धव ठाकरे होणार म्हणजे मज्जाच आहे. 10 रुपयात पोटभर जेवण देणार आहेत ते. फक्त व्हेज की नॉनव्हेजपण असेल त्यात.

शिवसेना मुख्यमंत्री म्हणून कुणाचे नाव समोर करणार ? उध्दव ठाकरे , आदीत्य ठाकरे की तिसरंच कुणीतरी.कारण उध्दव आमदार नाही , आदीत्यला प्रशासकीय अनूभव नाही .

उद्धव ठाकरे होणार म्हणजे मज्जाच आहे. 10 रुपयात पोटभर जेवण देणार आहेत ते. फक्त व्हेज की नॉनव्हेजपण असेल त्यात.

Submitted by बोकलत on 13 November, 2019 - 10:32
>>>
ते तेलकट बटाटेवडे कुठे मिळतात? राठा ने वर्णन केलेले?

सोनिया गांधी ला
महाराष्ट्र मधील आमदारांनी काँग्रेस सोडून जाण्याचा इशारा दिला तेव्हा तिला हा म्हण्या शिवाय पर्याय च शिल्लक नव्हता

सेना राष्ट्रवादी २.५-२.५ मुख्यमंत्री.. कोणाजवळ काही लेटेस्ट अपडेट ??
माझ्या माहितीनुसार
काँग्रेस ५ वर्षे उपमुख्यमंत्री आणि मंत्रीलदांचे वाटप आमदारांच्या संख्येत..
फॉर्म्युला जवळपास ठरलाय...

पण नुकतेच लोकमतची बातमी वाचली
ठाकरे घराण्याचा मुख्यनंत्री नको - सोनिया गांधींची अट
खरे असेल तर लावला बांबू

राष्ट्रपती राजवटीत दारू 30 टक्के स्वस्त होतेय आशिपण न्यूज आहे!

असलं काय असेल तर आपनत बवा फुल्ल राराच्या सपोर्टमध्ये!

चिअर्स!!

Pages