प्रेमाची परवडत भाग १

Submitted by Swamini Chougule on 8 November, 2019 - 04:57

सुमेधा घरातुन कोणाला ही न सांगता गुपचूप चोरून घरातून बाहेर पडली होती. ती चालत चालत एका झाडाखाली येउन उभारली. पावसाळ्याचे दिवस होते नुकताच पाऊस पडून गेला होता . जिकडे - तिकडे हिरवेगार दिसत होते. निसर्ग मुक्त हस्ताने आपले रंग उधळत होता . आणि हवेत चांगलाच गारवा होता . सुमेधा आजूबाजू चा परीसर न्याहाळत होती. पण तीचे मन विचलीत होते. ती सारख रस्त्याकडे पाहत उभी होती. तीची नजर चारी बाजूने भिरभिरत होती.जणू तीने काही तरी चोरी केली होती आणि आपण पकडले जाउ अशी भीती वाटावी असेच तीच्या चेहऱ्याकडे पाहुन वाटत होते. ती कोणाची तरी वाट पाहत असावी कदाचित. तीतक्यात तीला समोरून कोणी तरी येताना दिसले तीने निरखून पाहिले तर तो प्रवीणच होता. ज्याची ती वाट पाहत होती .प्रवीण आला आणि बोलू लागला.

" सुमेधा इतक्या तातडीने का बोलावलेस मला ?"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults