बाबाई ... जेव्हा बाबाची आई होते

Submitted by दत्तप्रसन्न on 31 October, 2019 - 14:28

मस्त पाय पसरून बसलेला पूर्वीचा बाबा
अंग चोरून बसतो
चुपचाप अडगळीत बसलेल्या त्याला मात्र पाहवत नाही

जेवण आवडलं नाही म्हणून ताट भिरकावणारा
समोर येईल ते मुकाट्याने खातो
कसली आवड नाही, गार गरम चा सोस नाही

रोखठोक राहणारा, आरे ला कारे करणारा
हल्ली एकदम मवाळ झाला
अंगावर कोणी ओरडलं तरी बिचाऱ्याचं काही म्हणणं नाही

फटकून वागला जिच्याशी बऱ्याचदा
आठवणीत रडतो तिच्याच आता
एकटेपणाची सल काही केल्या त्याची जात नाही

राजा सारखा राहत होता दिमाखात
आजारपणात तिच्या आक्खा उन्मळून पडला
जीवाचं रान पेटवून पुन्हा उठला, शेवटपर्यंत हिम्मत त्याने सोडली नाही

राब राब राबला झिजझिज झिजला
तहान भूक विसरून स्वतःची, आईचा दास होऊन राहिला
ती दूर निघून गेली, खरं त्याला अजूनही वाटत नाही

राग यायचा मलाही खूप त्याचा
पण आवडायला लागलाय आता
बाबा ची बाबाई कधी झाला ते सालं कळलंच नाही

Group content visibility: 
Use group defaults