स्त्री बॉसच्या हाताखाली काम करणे पुरुषांना त्रासदायक जाते का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2019 - 16:21

(माझ्या दुसरया एका धाग्यात पुरुषांवर कमवायचे दडपण असते का ही चर्चा थोडीशी ट्रॅक सोडून स्त्री बॉसवर उगाचच गेलीय. तिथली चर्चा रूळावर राहायला आणि हा देखील एका चांगल्या चर्चेचा विषय वाटल्याने स्वतंत्र धागा. तिथल्या प्रतिसादकर्त्यांना ईथे लिहायची विनंती)

तिथलेच मुद्दे घेऊन चर्चा पुढे न्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे माझे विचार न समजता, माझ्याशी वाद न घालता, या मुद्द्यांवर स्वतंत्र चर्चा अपेक्षित. माझी मते आणि विचार चर्चेदरम्यान प्रतिसादात येतील.

१) मेल फिमेल ईगो प्रॉब्लेम - स्त्री बॉस असेल तर हाताखाली काम करणारया पुरुषांचा ईगो दुखावतो. तिच्या ऑर्डर सहन होत नाहीत. तिने बॉसिंग गाजवलेली आवडत नाही.
याची दुसरी बाजू अशीही की स्त्री बॉसचा देखील पुरुषांना ऑर्डर सोडताना ईगो सुखावण्याची शक्यता असते.

२) अजय यांच्या मतानुसार मासिक पाळीच्या दिवसात स्त्री ची चीडचीड होते आणि त्याचा राग हाताखालच्यांवर निघतो. भले यात त्या स्त्री ची चूक नसेल. कारण हे नैसर्गिक आहे. पण हाताखालच्यांना त्रास व्हायचा तो होतोच.

३) आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता असते.

अजून काही मुद्दे असतील तर जोडा तसेच हे चुकीचे वाटल्यास खोडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्री बॉस म्हटलं की पाळीचा मुद्दा आणणे हे गैर आहे. अतिशय चूकीचे आहे. तुम्हाला काय माहीत पाळी आहे की नाही ते.

अजय चव्हाण म्हणतात -
>>>>>>>>>- पण महीन्याच्या ठराविक वेळी उगाचच बाॅस राग राग करायला लागली की, कळत आपोआप..>>>>>>>>>> बालीश बहु ....!! काय वाट्टेल ते बर्का.
_______________
>> आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता असते.>>>>>>>>>>>>>>> काय वाट्टेल तो जावईशोध लाउ नका.
उद्या मी म्हणेन भारतिय पुरुषांना इन जनरल, साईझ कॉम्प्लेक्स असतो त्यातून जो न्युनगंड येतो तो लपविण्याकरता ते हाताखालच्या स्त्रियांवरती अरेरावी करतात.
.
का फक्त तुम्ही जावई शोध लावायचे? आम्ही नाही????

<आपल्या पुरुषप्रधान आणि लग्नानंतर नवरयाच्या घरी राहाव्या लागणारया संस्कृतीत स्त्रियांना ज्या अडचणी आणि त्रास घरी सहन कराव्या लागतात त्याची चीडचीड ऑफिसमध्ये हाताखालच्यांवर निघण्याची शक्यता असते.>
ऑफिसमध्ये जो त्रास होतो त्याचा वचपा पुरुष घरी येऊन काढण्याची शक्यता असते.

मी तर वाट बघतोय कधी एखादी सुंदर स्त्री बॉस म्हणून येतेय .
आपला नशीबच खराब / सगळे पुरुष बॉस मिळत राहिले .
अँपल मध्ये टीम लीड मुलगी होती पण फक्त एक महिना नंतर क्रेडिट कर्मा जॉईन केली. आता ऍमेझॉन मध्ये नुसते पूरूष आहेत टीम लीड .

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्यामुळे हा जनरल विषय होऊ शकत नाही. मी स्वतः आतापर्यंत 2 वेळा स्त्री बॉसच्या हाताखाली काम केलंय. पण तिथे इगो वगैरे काही अडचणी आल्या नाहीत. कंपनीत तुम्ही तुमचं काम प्रोफेशनली केले, आपण बरे की आपले काम बरे असा attitude ठेवला की बऱ्याच गोष्टी सुकर होतात. माझ्या कंपनीत जसे आरडाओरडा करणारे पुरुष बॉस आहेत तसेच स्त्री बॉस ही आहेत. सुदैवाने माझी व अशा लोकांची गाठ आजतागायत पडलेली नाही.

ऑफिसमध्ये जो त्रास होतो त्याचा वचपा पुरुष घरी येऊन काढण्याची शक्यता असते.
>>>>

हो, पण तो घरचा त्रास झाला. कौटुंबिक कलह. वेगळ्या धाग्याचा विषय.

मी तर वाट बघतोय कधी एखादी सुंदर स्त्री बॉस म्हणून येतेय .
>>>

काइईइई काय
सुंदर स्त्री यावी पण सोबत वा ज्युनिअर म्हणून... बॉस नसावी. विचार असा असतो ना सहसा

माझा अनुभव आहे की नक्कीच होतो. जुन्या पठडीतल्या बाप्यांना तर नक्कीच. होतो. तरुणांना ज्यांच्या आया नोकरी केलेल्याच आहेत ते जरा अ‍ॅक्सेप्टिंग अस तात. बाप्ये उगीच इन्ग्रेशिएट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे तुमचे वजन काहीहे असले तरी अरे यु हॅव लॉस्ट वेट. असे सारखे म्हणायचे. दिवसात दोनदा भेटले तरी, वाढदिवसा ला कविता वगिअरे करायची व भेट द्यायची. ड्रेसिंग वर काँप्लिमेंट करायची. इमोशनल इशू वर कमेंट करायची. फेक पोलाइट बोलायचे नाहीतर उगीचच इतके रूड की तुम्ही फोन ठेवुन रडलेच पाहिजे. असा रिव्हर्स त्रास होउ शकतो.

पण खर्‍या ग्रेट वुमेन लीडर्स असतात व त्यांना अशाना कसे हेंडल करायचे माहीत असते. अल्टिमेटली तुमचा पर्फॉर्मन्स व केआरे मीट होतात ते महत्वाचे. कामाच्या ठिकाणी भावनांना स्थान नाही

माझा अनुभव आहे की नक्कीच होतो. जुन्या पठडीतल्या बाप्यांना तर नक्कीच. होतो. तरुणांना ज्यांच्या आया नोकरी केलेल्याच आहेत ते जरा अ‍ॅक्सेप्टिंग अस तात. बाप्ये उगीच इन्ग्रेशिएट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे तुमचे वजन काहीहे असले तरी अरे यु हॅव लॉस्ट वेट. असे सारखे म्हणायचे. दिवसात दोनदा भेटले तरी, वाढदिवसा ला कविता वगिअरे करायची व भेट द्यायची. ड्रेसिंग वर काँप्लिमेंट करायची. इमोशनल इशू वर कमेंट करायची. फेक पोलाइट बोलायचे नाहीतर उगीचच इतके रूड की तुम्ही फोन ठेवुन रडलेच पाहिजे. असा रिव्हर्स त्रास होउ शकतो.

पण खर्‍या ग्रेट वुमेन लीडर्स असतात व त्यांना अशाना कसे हेंडल करायचे माहीत असते. अल्टिमेटली तुमचा पर्फॉर्मन्स व केआरे मीट होतात ते महत्वाचे. कामाच्या ठिकाणी भावनांना स्थान नाही

स्त्री वा पुरुष बॉस यांच्या कार्यपद्धतीत मी स्त्री -पुरुष या कारणाने फरक पाहिलेला नाही. व्यक्तिपरत्वे असतो तसाच दोन बॉसमध्ये फरक जाणवला.

काहीही फरक वाटत नाही. किंबहुना बॉस हा विषय जेंडर न्युट्रल आहे अस वाटत. यापेक्षा चांगला/वाईट बॉस असा विषय असतात तर लोकांनी बरंच लिहिल असत.
हा धागा म्हणजे नेहमीचा घिसापिटा स्त्री पुरुष भेदभाव इत्यादी जाणार. बास आता तो विषय. जगात किती चांगल्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परत परत तेच विषय कशाला. हे लिहायच होत म्हणुन उघडला धागा.

स्त्री बॉस चा फक्त एकदाच अनुभव. पण त्रास मी स्वतः स्त्री असुन झाला. टीम सोडली.
बाईला कामापेक्षा इतर गोष्टीत पॉलिटीक्स आणण्यातच जास्त इंट्रेस्ट होता.
पुरुष बॉसांचा नेहमीच चांगला अनुभव. एकदा १० जणांच्या टीममधे आम्ही फक्त दोन मुली होतो.
अगदी छान वागायचे आमच्याशी. सांभाळुन घ्यायचे आणि जपायचेही.

बाईला कामापेक्षा इतर गोष्टीत पॉलिटीक्स आणण्यातच जास्त इंट्रेस्ट होता.>> हो बायका पॅसिव अ‍ॅग्रेसिव त्रास खूपच देतात. समोर गोड बोलणे,
पाठी गॉसि प. व्हिशिअस. वायर पुलिंग. हुद्द्याचा गैरवापर.

राजकारण सगळेच करतात.
आपलं पद टिकवण्यासाठी, इतरांना धाकात ठेवण्यासाठी, श्रेय लाटण्यासाठी वगैरे वगैरे....
त्यात स्त्री-पुरुष भेद नसतो.
पद्धत आणि चाली वेगवेगळ्या असतात, पण राजकारण असतेच.

ज्युनियर लोकांना तर मान आणि इगो बाहेर ठेवूनच ऑफिसमध्ये पाऊल ठेवावे लागते.

सामो, तुमच्या प्रतिसादाला +१११११

धागा माझा असला तरी वरचे मुद्दे मते माझी नाहीत. वा धागा माझ्या डोक्यातून आला नाही. किंबहुना माझ्याच दुसरया धाग्यावर या चर्चेत लोकांना रस दिसल्याने तो विषय वेगळा राहावा म्हणून मी हा विषय स्वतंत्र धाग्यात आणला.

असो

माझे मत आणि अनुभव मी सविस्तर लिहितोच वेळ मिळेल तसे.

पण मला वाटते स्त्री-पुरुष यांच्या स्वभावात आणि वर्तनात निसर्गानेच जो काही फरक बनवला आहे तो ईथेही लागू आणि त्यानुसार स्त्री बॉस आणि पुरुष बॉस यात काहीतरी फरक हा राहणारच.

तसेच एका स्त्रीचे दुसरया स्त्री शी वागणे, एका स्त्रीचे एका पुरुषाशी वागणे, एका पुरुषाचे दुसरया पुरुषाशी वागणे, एका पुरुषाचे एका स्त्रीशी वागणे या चारही केस वेगळ्या आहेत. यात भिन्न भिन्न वर्तणूक आढळते.

अजून एक मुद्दा म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीत आपली झालेली वाढ आणि विकास.
यातही गंमत अशी की स्त्रीपुरुष समानतेचे जे बदलाचे वारे वाहताहेत त्याचा वेग सगळीकडे एकसारखा नाहीये. काही ठिकाणी अजूनही पुरुषांचीच सत्ता चालते तर काही ठिकाणी पुरुषच केविलवाणे झाले असतील.
ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे लोकं एकत्र जमतात आणि प्रत्येकाची विचारसरणी याबाबत वेगळी असते.

त्यामुळे हा विषयच गंडला आहे असे मला वाटत नाही.

असे सरसकट स्त्री आणि पुरुष दोघांविष्यी
सुधा मत व्यक्त करणे चुकीचं आहे .
काही स्त्रिया बॉस सुधा अतिशय हुशार,निर्णय क्षमतेत लाजवाब,आणि सहकाऱ्यांना बरोबर घेवून जाणाऱ्या असतात

"सरसकट" हा एक विषयाला फाटे फोडायला वापरला जाणारा शब्द आहे. कुठल्याही फरक दाखवा चर्चेत चपलखपणे वापरू शकतो.

स्त्री बॉसच्या हाताखाली काम करणे आणि स्त्री कलीग बरोबर काम करणे माझ्यासाठी नवर्‍या साठी त्रासदायक ठरल कारण
1. स्त्री कलीग ने सहा महिने बाळंतपणा साठी जाऊनही increment साठी हट्टाला पेटून भरगोस increment पदरात पाडून घेतला.
2. त्या साईट वर्क करू शकत नाही सो या आॅफिस मध्ये बसून आर्रडर देणार आणि नवरा ते साईट वर्रक संपवायला 6 महिने घराबाहेर.
3. पुरुष बॉस सोबत गोड बोलून हवे असलेले प्रोजेक्ट, क्रेडिट ढापता. नवर्यालला कोणाच्या ही पूढे पूढे करण जमत नाही म्हणून त्याचा बराच लॉस होतो.
4. स्त्री बॉस असेल तर फटाफट डिसीजन घेत नाहीत आणि काम रेंगाळतात. प्रॉब्लेम अंगावर आला की समोरच्या व्यक्ती वर ढकलून मोकळे होतात.

नवर्‍याला खूप त्रास झाला त्याच्या आॅफिस मधे

1. स्त्री कलीग ने सहा महिने बाळंतपणा साठी जाऊनही increment साठी हट्टाला पेटून भरगोस increment पदरात पाडून घेतला.
>>>>

आमच्याईथे फार कमी वा जवळपास शून्य देतात इन्क्रीमेण्ट त्या वर्षाला अशी तक्रार स्त्री कर्मचारयांक्डून ऐकली आहे.

2. त्या साईट वर्क करू शकत नाही सो या आॅफिस मध्ये बसून आर्रडर देणार आणि नवरा ते साईट वर्रक संपवायला 6 महिने घराबाहेर.
>>>>

स्त्री बॉस असो वा कलीग, साईटवर्क वा उशीरापर्यंत थांबून काम करण्यास तयार नसणे हे समजून घ्यायला हवे प्रत्येक पुरुष कर्मचारयाने. त्यांची स्वत:ची बायकोही दुसर्या कंपनीत याच सवलती मिळवत असेलच ना.
अर्थात कंपनीही या सवलतींच्या बदल्यात मग तसा पगार कमीच देते. पण असे असूनही त्या स्त्रीचा पगार जास्त असेल तर तिच्यात तसेच टॅलेंट असेल. कंपनी कोणालही उगाच नाही पोसत. थोडेसेच अपवाद असतात.

अवांतर:
"सरसकट" हा शब्द आमच्याकडे कॅरॅम मध्ये वापरला जात असे. छान कट मारून क्वीन आणि कव्हर एकाच शॉट मध्ये सर केली की त्याला "सरस कट "असे म्हणायचो.

सर केली की त्याला "सरस कट "असे म्हणायचो.
>>
मॅडम करून तर मॅडमस कट का नाही?
ईथेही मॅडम बॉस नको??

मॅडम करून तर मॅडमस कट का नाही? >>

"मॅड मस्कट" हा एक दुसरा खेळ आहे. विषयांतर खूप होईल म्हणुन इथे लीहीत नाही आता.

अशे विषय कसकाय डिस्कशनला घेता राव? शिंपले. बॉस बॉस होता हय. तुम्हाला पटलं त नौकरी करायची नायतर टाटा बाय बाय.
(अर्थात पोलिटिक्स खेळायच असेल त पेशन्स अन त्रास सहन करून बाजी प्लटवायची तयारी पाहिजे अन त्यासाठी काहीही करायची तयारी)

मॅडम सकट दुसरा खेळ .. आणि सरांसोबत पहिला.. पुन्हा अन्याय >>>
सरस कट हा फक्त सरांसोबत खेळला जातो, किंवा मॅड मस्कट हा फक्त मॅडम सोबत ही चुकीची समजूत आहे.

Pages