ते! जायचे कुठे, गाव मला सांग ना.

Submitted by Suryakant Majalkar on 30 October, 2019 - 10:31

ते! जायचे कुठे, गाव मला सांग ना.
सोडून आप्तस्वकीय, भेटणारं 'नाव' मला सांग ना.

ओलांडून उंबरठा, क्षितिजापल्याड झेप ती,
वदणारं अधरं! तुझं काळजाचा 'ठाव' मला सांग ना.

पायात काटे रूतले, घुंघरु खळखळा तुटले.
रणरणत्या तेजाची शपथ तुला थांब ना.

तोच डाव, तीच जीत, प्रेमाची ओढ अवीट
ऐतिहासिक सत्याची पुनरावृत्ती कर ना.

तारुण्याची ऐशी तर्‍हा ही,
रोमात भिनली अजब खुमारी.

सोडुन भविष्य-विचार , मन तुझे मांड ना.
थांब क्षणैक, मजला ते रुप दाखव ना.

ते! जायचे कुठे, गाव मला सांग ना.

Group content visibility: 
Use group defaults