दशक कथा!

Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29

एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.

आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?

काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!

उदाहरणार्थ,

१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!

२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!

३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.

टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"फोटो?"
"नाही, आरसा!"
"काय? मग प्रतिबिंब माझ्यासारखं का नाही दिसतेय?"

छान!

(बायको)-
" हे बघ एकच बस्स "

(नवरा)-
" नाही गं दोन हवीच् "

(आकाशवाणी )-

"किमान दहा !!"

ते कंसातले शब्द पकडायचे नै ओ ..
थोडं रैफ्रेंस लागावा म्हणून दिलंय Wink
खरं तर ३रा कंस धागामालक लिहायचं होतं पण म्हटलं जौ द्या ! आकाशवाणी बर्र आपलं.

चेहरा पांढराफटक पडला.
चहाचा प्याला अर्धवट!

.
.
.

.
.
.
.
.
साखरेऐवजी मीठ! दुसरे काय!

"........"
"ऐक...... कथा पूर्ण करं. आम्ही अडकलोय."
"तुम्ही कोण?"
"कथेतली पात्र!"

"...कुनी आहे का??"
.
(.............प्रशासकीय हालचाल............)
.
.
"सगळे आहेत बाळा.......तू सोडून!!!"

दारुडे......

"अजून नाही पोचलो का रे?"
"स्टार्टर मारून बघ गाडीला....."

Lol

Pages