Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29
एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.
आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?
काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!
उदाहरणार्थ,
१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!
२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!
३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.
टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मन्याS
मन्याS
सगळ्याच दशक एकसेएक आहेत
सगळ्याच दशक एकसेएक आहेत
"फोटो?"
"फोटो?"
"नाही, आरसा!"
"काय? मग प्रतिबिंब माझ्यासारखं का नाही दिसतेय?"
अरे त्याला मारलंय मी.
अरे त्याला मारलंय मी.
तो तर तुझ्या मागे उभा आहे.
छान!
छान!
(बायको)-
(बायको)-
" हे बघ एकच बस्स "
(नवरा)-
" नाही गं दोन हवीच् "
(आकाशवाणी )-
"किमान दहा !!"
भिकाजी पार डोक्यावरून गेल.
भिकाजी पार डोक्यावरून गेल.
समजावुन सांगाल.
भिकाजी शब्द जास्त झाले तरी
भिकाजी शब्द जास्त झाले तरी भारीये दशक!
ते कंसातले शब्द पकडायचे नै ओ
ते कंसातले शब्द पकडायचे नै ओ ..
थोडं रैफ्रेंस लागावा म्हणून दिलंय
खरं तर ३रा कंस धागामालक लिहायचं होतं पण म्हटलं जौ द्या ! आकाशवाणी बर्र आपलं.
(No subject)
(No subject)
तो बेशुद्ध पडला.
चेहरा पांढराफटक पडला.
चहाचा प्याला अर्धवट!
.
.
.
.
.
.
.
.
साखरेऐवजी मीठ! दुसरे काय!
एक साध्या कागदावरची सही
एक साध्या कागदावरची सही कुणाचा मृत्यु कसा काय ठरवु शकते?
दोन आयडी दिवसभर हुज्जत घालत
दोन आयडी दिवसभर एकमेकांशी हुज्जत घालत एकाच पीसीवरुन लॉगआउट झाले !!
हा हा हा झाल हसुन
हा हा हा
झाल हसुन
मी (बेडरूममधून, फोनवर): येऊ
मी (बेडरूममधून, फोनवर): येऊ का?
ती (किचनमधून): नको. हा आहे.
"........"
"........"
"ऐक...... कथा पूर्ण करं. आम्ही अडकलोय."
"तुम्ही कोण?"
"कथेतली पात्र!"
उडालेला ड्यू :-
"...कुनी आहे का??"
.
(.............प्रशासकीय हालचाल............)
.
.
"सगळे आहेत बाळा.......तू सोडून!!!"
दारुडे......
दारुडे......
"अजून नाही पोचलो का रे?"
"स्टार्टर मारून बघ गाडीला....."
Pages