हक्क

Submitted by पुरंदरे शशांक on 11 October, 2019 - 07:44

हक्क

इतकेही धन नको देऊस की तू सोडून मला धनातच गुंतावसं वाटेल...

इतकेही कला गुण नको देऊस की त्यात रंगून गेल्यावर तुझाही विसर पडेल...

इतकेही सुख नको की त्यातच सुखावून तुलाच विसरेन..
इतकेही दुःख नको त्यात बुडून गेल्यावर तुझे पूर्ण विस्मरण होईल...

इतकाही मान नको की तुझ्या चरणांशी शरणागत व्हायच्या ऐवजी गर्वाने फुगून जाईन मी...

काय द्यावं, किती द्यावं हे तर सारं तुला ठाऊक असताना मी का सांगतोय हे तुला उगीचच ??
खरं तर तुझ्याकरता नाहीच्चे हे काही.., मी माझ्याच मनाला, माझ्याच बुद्धीला, अहंकाराला सांगतोय खरं तर...

ऐहिकातले कितीही मिळाले तरी कमीच वाटते, त्यामुळे "हे कमी ते कमी" कडे लक्ष देण्यापेक्षा जो संपूर्ण आहे, जिथे कसली कमतरताच नाही त्या तुझ्याकडेच सतत दृष्टी असू दे, तिकडेच वाटचाल सतत असू दे ....

तू पण एक लक्षात घे....मागणं नाहीच्चे काही, पण हक्कानेच सांगतोय... पुढे उभा असल्याचं जाणवू दे की सतत....., मार्गावरुन भरकटलो तर निदान जाणीव तरी करुन दे की !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्तक आवडलं. तुझे रूप चित्ती राहो, मुखे तुझे नाम!
"हे कमी ते कमी" कडे लक्ष देण्यापेक्षा जो संपूर्ण आहे, जिथे कसली कमतरताच नाही त्या तुझ्याकडेच सतत दृष्टी असू दे, >> +१

छान आवडले
देव प्रत्यक्षात असो वा नसो. कोणीतरी आहे आपल्यासाठी ही भावना बळ आणि सदबुद्धी देणारी असते.

सुरेखच....
हर ज़र्रा चमकता है अनवार-ए-इलाही से , हर साँस ये कहती है हम हैं तो ख़ुदा भी है

शशांक, सुंदर लिहीलंय!

पण हक्कानेच सांगतोय... पुढे उभा असल्याचं जाणवू दे की सतत....., मार्गावरुन भरकटलो तर निदान जाणीव तरी करुन दे की !! >>> हे तर अप्रतिम.